#मनाचं व्रत
कधी कधी आकाशात ढग दाटून येतात. त्यामुळे सूर्याचं अजिबातच दर्शन होत नाही. आपल्या मनावरही असंच विचारांचे ढग दाटून मळभ येते. अशा परिस्थितीत सगळंच बिनसल्यासारखं होतं. हे मळभ दूर करणे सर्वस्वी आपल्याच हातात असतं. ते कसं? साध्या सोप्या पद्धतीने करता येतं ते म्हणजे विचारांचा , मनाचा उपवास.
मनाचा उपवास करायचा,कसा? जसं आपण उपवास करताना मनाला खाण्याच्या बाबतीत यावर घालतो तसंच वाईट विचार मनात आले की मनाला बजावत राहायचं.
खरं तर याला उपवास म्हणण्यापेक्षा व्रत म्हणता येईल.
आयुष्य अजून थोडंसं मधुर करण्याचं व्रत. कधीही कुठेही करता येईल असं. गरज आहे ती फक्त मनावरचं मळभ दूर करून दृष्टिकोन स्वछ राहण्यासाठी प्रयत्न करत राहण्याची.
मलाही कुठे जमतंय अजून पण करतेय अडखळत प्रयत्न. जरासं अवघड आहे पण अशक्य नाही. पटलं तर ट्राय करून बघा.
प्रत्येकाला आज एक तरी क्षण व्रतस्थ ,मानासिक समाधान देणारा लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शुभं भवतु!!!!
#गौरीहर्षल
४.७.२०१७
मंगळवार, ४ जुलै, २०१७
मनाचे व्रत
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
#तेच_तेच_अडथळे? विचारांचे चक्र आणि बदल कधी कधी आपल्याला वाटतं की नशीबच खराब आहे. सगळीकडे सतत तेच तेच अडथळे, तीच ती "बॅड लक" ची माल...
-
#Quote_of_the_day9 रजनी अगदी चिडखोर स्वभावाची होती पण कुणाला मदत करायची म्हटली की वेगळीच रजनी समोर यायची. थोडीशी ओळख असणाऱ्या लोकांनाही गरजे...
-
मध्यमवय, भावनिक रिकामेपणा आणि नात्यांमधील 'भूलभुलैया' आयुष्याच्या एका टप्प्यावर, विशेषतः वयाच्या ३५ ते ५० च्या दरम्यान, अनेक स्त्रिय...
Contact form |
Tags |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा