रविवार, ३ मे, २०२६

दस साल बाद

#दस_साल_बाद 
आज एक खूप छान गोष्ट जाणवली. काय माहित आहे?? 2016 मधली मी आणि 2026 मधली मी या दोघींमध्ये एक महत्त्वाचा फरक मला लक्षात आला. आणि तो फरक म्हणजे 2016 मध्ये माझ्या आध्यात्मिक गोष्टींच्या बाबतीतल्या संकल्पना फार रॉ होत्या म्हणजे त्या बऱ्यापैकी कच्च्या किंवा वरवरच्या अशा होत्या. बैठक जरी पक्की असली तरी आयुष्यात अजून बरेच अनुभव घेणे तेव्हा शिल्लक होते. त्यामुळे ते सहाजिकही होतं. आपल्या बाबतीत ज्या गोष्टी घडत आहेत त्या का घडत आहेत त्यांचे भविष्यात काय परिणाम घडतील याबद्दल फारसा विचार मी करत नव्हते. कारण तेव्हाही आणि आत्ताही एक गोष्ट माझ्या मनावर आणि मेंदूवर कोरलेली होती ती म्हणजे माझा मित्र आहे तो बघून घेईल, मला कुठल्याही गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही. 
आणि जसं जसं आयुष्य पुढे सरकत गेलं तसं तसं लक्षात आलं की खरोखर त्याने कितीतरी गोष्टींची काळजी माझ्या अपरोक्ष घेतली आहे. 
म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आपण म्हणतो ना की देव आपल्या आयुष्यातून माणसांना वजा करतो कारण आपल्याला त्यांचं जे रूप दिसत असतं त्यापेक्षा वेगळं असलेलं आणि खरं असलेलं रूप त्याला माहीत असतं. 
आज जेव्हा मी मागे वळून पाहते तेव्हा मला ह्या गोष्टी फार ठळकपणे दिसतात. 
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मला जाणवली ती म्हणजे जी माणसं आपल्याला खूप जवळची आपल्याबद्दल चांगला विचार करणारी अशी वाटत असतात ना कालांतराने आपल्याला आपल्या पडत्या काळात किंवा कठीण काळात त्यांनी आपल्याबद्दल काय विचार केला होता हे लक्षात येतं. कधी कधी ते सत्य समोरून आपल्याकडे येतं आणि कधी कधी त्या व्यक्तींच्या बाबतीत अशा काही घटना घडतात की आपल्याला त्यांच्या मनात आपल्याबद्दल असणारे विचार जाणवतात. 
माझ्या बाबतीत जसा जसा माझा प्रवास पुढे पुढे सरकत गेला तशा तशा या गोष्टी जास्त ठळकपणे घडत गेल्या. आजही बऱ्याचदा बऱ्याच गोष्टी मला आधीच जाणवतात. पण कारण पुन्हा तेच मी त्यावर आताही फारसा विचार करत नाही. 
आपल्याबद्दल कोणी काय विचार करायचा आणि काय कृती करायची हा अक्षरशः ज्याच्या त्याच्या कर्माचा प्रश्न असतो. आणि त्या गोष्टींचा चांगलं किंवा वाईट फलित हे त्या व्यक्तीला मिळणार असतं. 
मग माझ्यासारख्या कित्येक सामान्य माणसांना हा प्रश्न पडतो की या सगळ्यांमध्ये आपण काय करायचं असतं???
त्याचं फार छान उत्तर तुकाराम महाराजांनी दिलेलं आहे ,
" ठेविले अनंते तैसेची रहावे ।चित्ती असो द्यावे समाधान ।" 

अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगते, आत्ता जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या आयुष्यात चांगला काळ चाललेला नाहीये किंवा तुमचं कोणी जवळच नाहीये तर मनापासून फक्त एकच गोष्ट करा - तुमचं जे कुठलं इष्ट दैवत, श्रद्धास्थान असेल त्याच्या समोर पूर्णपणे शरणागती पत्करा ,समर्पण करा. 
आपल्या चुका, आपल्या मनात येणारे वाईट विचार चांगले विचार सगळं काही सांगून मोकळे व्हा. त्यानंतर त्यांनाच योग्य मार्ग दाखवण्यासाठी विनंती करा. 
आणि हे सगळं करताना मनापासून त्यांच्या अस्तित्वावर विश्वास ठेवा. तो विश्वास कधीही डळमळीत होऊ देऊ नका. एवढी गोष्ट जर केली तर तुम्ही कल्पनाही करू शकत नाही अशा पद्धतीने तुमच्या आयुष्याची जबाबदारी घेतली जाते. 
मी तर अनुभव घेतला आहे आणि घेत आहे, भविष्यातही घेणार आहे. ही गोष्ट करण्यासाठी कुठल्याही चांगल्या मुहूर्ताची गरज नसतेच. मनात येईल तो ईश्वराच्या जवळ जाण्यासाठी चांगला मुहूर्त. 
बाकी??? 
बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु!!!
स्वतःला शोधताना - गौरी हर्षल 
3 मे 2026

शनिवार, १८ एप्रिल, २०२६

वड्याचे तेल वांग्यावर कशासाठी?

#वड्याचे_तेल_वांग्यावर_कशासाठी?
आपल्याकडे एक जुनी आणि अतिशय अर्थपूर्ण म्हण आहे— 'वड्याचे तेल वांग्यावर काढणे'.  आजकाल माणसांच्या वागण्याचंही अगदी असंच झालंय.हे वागणं खरंच खूप विचित्र असतं, पण आजकाल पावलोपावली पाहायला मिळतं. 
आपल्या आयुष्यात आपण अनेकदा अशा माणसांना भेटतो जे विनाकारण आपल्यावर डाफरतात किंवा तुसडेपणाने वागतात. आपण विचार करतो, "अरे, मी तर यांचं काहीच बिघडवलं नाही, मग हे माझ्यावर का चिडलेत?" पण सत्य हे असतं की, त्या रागाचं मूळ आपल्यात नसतं, तर त्यांच्या भूतकाळात कोणा दुसऱ्याने दिलेल्या जखमेत असतं.
माणूस स्वभावतः खूप गुंतागुंतीचा आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला कोणीतरी खूप जवळचं माणूस फसवतं, अपमानित करतं किंवा मानसिक त्रास देतं, तेव्हा त्या त्रासाची एक 'गाठ' मनात तयार होते. ही गाठ कधी सुटली नाही की ती रागाचं रूप घेते. मग होतं असं की, ज्याने त्रास दिला त्याच्यासमोर आपण काहीच करू शकत नाही—कधी भीतीपोटी, तर कधी नात्याच्या दबावापोटी.
आणि मग सुरू होतो 'बदल्याचा' चुकीचा प्रवास.
कोणीतरी जुना राग मनात धरून बसलेलं असतं आणि मग एखादा निष्पाप मित्र, घरातील लहान मुलं किंवा ऑफिसचा सहकारी समोर येतो. त्यांच्याकडून एखादी साधी चूक झाली, तरी हा माणूस त्यांच्यावर तुटून पडतो. खरं तर तो त्या व्यक्तीवर नाही, तर त्या जुन्या त्रासावर ओरडत असतो. "दगड मारला एकाने, पण त्याची कळ आपण दुसऱ्यावरच काढतो."
हे वागणं म्हणजे कसं आहे माहितीये? जसं एखाद्याने आपल्याला अंधारात धक्का मारला आणि आपण चिडून समोरून येणाऱ्या दिव्यावरच दगड भिरकावला. यामुळे अंधार कमी होत नाही, उलट जो उजेड मिळणार होता तोही आपण गमावून बसतो.
माणसाने एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी—ज्याने तुम्हाला दुःख दिलंय, त्याला माफ करणं किंवा त्याच्यापासून लांब जाणं हाच त्यावरचा उपाय आहे. पण त्या दुःखाचं भांडं दुसऱ्या कोणाच्यातरी डोक्यावर फोडणं, हे त्या व्यक्तीवर केलेला अन्याय आहे. आपण ज्यांना त्रास देतोय, त्यांचा दोष काय? फक्त एवढाच की ते आपल्या आयुष्यात 'आहेत' आणि ते आपलं ऐकून घेतात?
स्वतःला विचारून बघा...
⚠️तुमच्या आजूबाजूला अशी माणसं आहेत का, ज्यांचा राग तुम्हाला विनाकारण सहन करावा लागतोय?
 ⚠️पण त्याहून महत्त्वाचं...कळत-नकळत तुम्हीही तुमच्या जुन्या जखमांचा राग अशा माणसांवर काढत नाही ना, ज्यांनी तुम्हाला फक्त प्रेम आणि साथ दिली आहे?
🔔विचार करा... ज्या व्यक्तीचा दोष नाही, तिला तुमच्या भूतकाळाची शिक्षा का?
टीप: या प्रश्नांची उत्तरं शोधताना स्वतःशी प्रामाणिक राहणं, हाच तुमच्या मानसिक स्वास्थ्याचा पहिला टप्पा आहे.

लक्षात घ्या कुठलाही बदल एका रात्रीत घडत नसतो आणि जेव्हा आपण मानसिक पातळीवर काम करायला सुरुवात करतो.  तेव्हा बऱ्याचदा आपल्याला त्रास होऊ लागतो अशावेळी तज्ञांची मदत घेणे योग्य असते. 
तुम्हाला सुद्धा जर तुमच्या स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणायचे असतील आणि एका नवीन प्रवासाला सुरुवात करायची असेल तर संपर्क करा...
Gauri Harshal Kulkarni
Clinical Psychologist & Counselor
📩 WhatsApp: 9730961014 (paid counselling)

बुधवार, १५ एप्रिल, २०२६

पुन्हा पुन्हा तेच ते?

#पुन्हा_पुन्हा_तेच_ते?
इतरांकडून पुन्हा पुन्हा तेच वागणं तुम्हीही सहन करत आहात का? 
लोक आपल्याशी कसं वागतात, हे बऱ्याचदा आपण त्यांना किती मुभा देतो यावर अवलंबून असतं. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा—एखाद्या व्यक्तीने त्यांचं खरं रूप एकदा दाखवलं की ते पुरेसं असतं. त्यांनी दुसऱ्यांदा तेच वागणं तुम्हाला दाखवावं, इतकी सूट त्यांना देऊ नका.
⚠️पहिल्याच वेळी ओळखा 🔔
जेव्हा कोणी तुमच्याशी आदराने वागत नसते किंवा तुम्हाला त्रास होईल असं वागतं असते, तेव्हा ती 'पहिली वेळ' एक धोक्याची घंटा असते. आपण अनेकदा "कदाचित चुकून झालं असेल" किंवा "समोरच्याचा मूड खराब असेल" असं म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतो. पण हीच ती वेळ असते जिथे आपल्याला सावध व्हायचं असतं. समोरच्याचे 'खरे रंग' सुरुवातीलाच ओळखा.
तुमच्या कडून आखलेल्या 'सीमा' तुमचं रक्षण करतात.

'बाउंड्रीज' किंवा सीमा आखणं म्हणजे समोरच्याचा द्वेष करणं नाही, तर स्वतःवर प्रेम करणं आहे. तुमची मनःशांती आणि तुमचा स्वाभिमान ही तुमची जबाबदारी आहे. जर एखाद्याचं वागणं तुमच्या मूल्यांच्या विरोधात जात असेल, तर तिथे ठामपणे उभं राहणं गरजेचं आहे. तुमच्या सीमा जेवढ्या स्पष्ट असतील, तेवढं तुमचं मानसिक आरोग्य चांगलं राहील.

⚠️स्वतःची किंमत ओळखा
तुम्ही सुरुवातीपासूनच प्रेम आणि आदरासाठी पात्र आहात. कोणालाही तुमचं मन वारंवार दुखावण्याचा परवाना देऊ नका. तुमच्या अंतर्मनाचा आवाज (Instincts) ऐका. जर तुम्हाला आतून वाटत असेल की काहीतरी चुकीचं घडतंय, तर ते खरं असण्याची शक्यता जास्त असते.

⚠️निरोगी नात्यांचा पाया
खऱ्या आणि निरोगी नात्यांमध्ये एकमेकांच्या सीमांचा आदर केला जातो. स्वतःचा आदर करणं म्हणजे दुसऱ्यांना कमी लेखणं नाही, तर स्वतःला सन्मानाने वागवलं जाईल याची खात्री करणं होय.
लक्षात ठेवा, तुम्ही लोकांना जशी परवानगी द्याल, तसेच ते तुमच्याशी वागतील. त्यामुळे तुमच्या बाऊंडरीज काटेकोरपणे आखा. 

वरचा लेख वाचल्यानंतर तुमच्या मनात जर गोंधळ उडाला असेल किंवा हे सगळं कसं करता येईल असं तुम्हाला वाटत असेल तर खाली मी काही प्रश्न दिले आहेत ते सोडवा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नक्की मिळतील.आणि तरीसुद्धा जर तुम्हाला असं वाटत असेल की मी माझ्या जवळच्या नात्यांमध्ये बाउंड्रीज आखू शकत नाही तर कौन्सिलर ची मदत नक्की घ्या. 
१. पहिली वॉर्निंग 🔔
✔️ तुमच्या आयुष्यात अशी कोणती व्यक्ती किंवा परिस्थिती आहे, जिथे तुम्हाला पहिल्याच वेळी काहीतरी 'चुकीचं' जाणवलं होतं, पण तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं? आज त्याचा परिणाम काय होतोय?
२. तडजोड की आदर?
✔️ तुम्ही एखाद्या नात्यात शांतता टिकवण्यासाठी स्वतःच्या 'स्वाभिमानाशी' तडजोड करत आहात का? ती शांतता खरंच टिकणारी आहे का?
३. तुमची 'नो-गो' झोन
✔️ अशी कोणत्या तीन कृती किंवा गोष्टी आहेत, ज्या तुम्ही तुमच्या आयुष्यात कोणाकडूनही कधीच सहन करणार नाही? तुमच्या या सीमांबद्दल तुम्ही स्वतःशी स्पष्ट आहात का?
हे प्रश्न तुम्हाला तुमच्या नात्यांमधील 'पॅटर्न' ओळखायला आणि स्वतःच्या सीमा निश्चित करायला मदत करतील.

🧘🏼‍♀️स्व-संवाद: सीमा आणि स्वाभिमानासाठी ३ प्रश्न
हे प्रश्न तुम्हाला तुमच्या नात्यांमधील 'पॅटर्न' समजून घेण्यास आणि स्वतःच्या मानसिक शांततेसाठी पावलं उचलण्यास मदत करतील:
१. 'दुसरी संधी' की 'दुसऱ्यांदा झालेला त्रास'?
जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला त्यांच्या चुकीच्या वागणानंतर पुन्हा एकदा संधी देता, तेव्हा त्यामागे नक्की काय भावना असते? ती भावना 'त्या व्यक्तीवरचा विश्वास' असते, की 'ती व्यक्ती सोडून जाण्याची भीती' किंवा 'एकटेपणाची भीती' असते? तुमच्या या निर्णयामुळे तुम्हाला शांती मिळते की अधिक अस्वस्थता जाणवते?
२. तुमच्या 'सहनशक्तीची' किंमत काय?
तुम्ही स्वतःला किती सहनशील (Adjusting) मानता? तुमची ही सहनशीलता तुम्हाला एक 'समंजस व्यक्ती' बनवतेय की ती तुमच्या 'स्वाभिमानाचा बळी' घेतेय? तुमच्या सहनशक्तीची सीमा कुठे संपते आणि जिथे ती संपते, तिथे तुम्ही स्वतःसाठी खंबीरपणे उभे राहू शकता का?
३. 'नाही' म्हणण्यातला अडथळा काय?
एखाद्या गोष्टीला किंवा व्यक्तीला स्पष्टपणे 'नाही' म्हणताना तुमच्या मनात कोणत्या प्रकारच्या विचारांचे काहूर माजते? (उदा. "मी वाईट ठरेन का?", "समोरचा दुखावला जाईल का?"). हा विचार समोरच्या व्यक्तीच्या भावना जपण्यासाठी असतो की स्वतःला गुन्हेगार (Guilty) वाटण्यापासून वाचवण्यासाठी असतो?
टीप: या प्रश्नांची उत्तरं शोधताना स्वतःशी प्रामाणिक राहणं, हाच तुमच्या मानसिक स्वास्थ्याचा पहिला टप्पा आहे.

लक्षात घ्या कुठलाही बदल एका रात्रीत घडत नसतो आणि जेव्हा आपण मानसिक पातळीवर काम करायला सुरुवात करतो. तेव्हा बऱ्याचदा आपल्याला त्रास होऊ लागतो अशावेळी तज्ञांची मदत घेणे योग्य असते. 
तुम्हाला सुद्धा जर तुमच्या स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणायचे असतील आणि एका नवीन प्रवासाला सुरुवात करायची असेल तर संपर्क करा...
Gauri Harshal Kulkarni
Clinical Psychologist & Counselor
📩 WhatsApp: 9730961014 (paid counselling) 

मंगळवार, ७ एप्रिल, २०२६

जो थांबला तो संपला

#जो_थांबला_तो_संपला
"जो थांबला तो संपला" हे आपल्या मनावर इतकं खोलवर रुजलेलं आहे की आपण त्याचा शब्दशः अर्थ घेतो. 
पण आपले सुप्त मन याला मानत नाही. ज्या वेळेला आपण 'वाया गेलेली' म्हणत असतो , त्याच वेळी ते माहितीवर प्रक्रिया करते, ती साठवते आणि पुनर्बांधणी करते. आपल्या मेंदूची खरी जीवशास्त्रीय(biology) रचना अशीच काम करते.
नीट विचार केला तर लक्षात येईल की कुठेतरी हे गणितच चुकले आहे. विश्रांती ही मिळवण्याची गोष्ट बनली आहे. काम पूर्ण केल्यावर मिळणारे एक बक्षीस अशा अर्थाने आपण तिच्याकडे पाहतो. आपल्या डोक्यात जातात हे झालं की मग मला आराम मिळेल, ते पूर्ण केलं तर मला मनःशांती मिळेल असे विचार असतात. आणि ह्या 'पूर्ण'ची व्याख्या सतत बदलत राहिल्यामुळे, विश्रांती कधी मिळतच नाही. 
जेव्हा शरीर थकलेले असते आणि आपण तरीही त्याला काम करण्यासाठी अजून धक्का मारत असतो , तेव्हा विचार करण्याची गती मंदावते आणि भावनांवर नियंत्रण मिळवणे कठीण होते. तुमचे मन हे सर्व कुठेतरी टिपून ठेवत असते. 

पण आपल्या तयार झालेल्या माईंड सेटमुळे आपण विश्रांतीला काय समजत असतो ते बघा...
आपल्याला असं वाटत असतं आपण जेव्हा विश्रांती घेत असतो तेव्हा आपण तो वेळ वाया घालवत असतो. कारण आपल्याकडून कोणतंही काम होत नाही. आणि कोणतही काम होत नाही म्हणून नकळतच आपण स्वतःचीच किंमत कमी करत असतो. 

लक्षात घ्या, आठवड्यातून एकदा मिळणारा सुट्टीचा दिवस हा ऐच्छिक पर्याय नसून तुमच्या मज्जासंस्थेसाठी तो गरजेचा असतो. आणि हे आपल्याला नव्याने शिकणं गरजेचं आहे. 

तुम्हाला काय वाटते?
१. कामाच्या व्यापात तुम्ही स्वतःला विश्रांती घेण्यासाठी वेळ देता का, की फक्त थकल्यावरच थांबता?
२. 'काहीही न करणे' म्हणजे वेळ वाया घालवणे असे तुम्हालाही वाटते का?
३. तुमच्या मते शरीरापेक्षा मनाची विश्रांती जास्त महत्त्वाची आहे का?
आतल्या आत घुसमटण्यापेक्षा, व्यक्त व्हा... कारण संवाद हीच समाधानाची पहिली पायरी आहे.
स्वतःला शोधताना - गौरी हर्षल 
जर तुम्हालाही self awareness journey सुरू करायची असेल, 
तर संपर्क करा:
Gauri Harshal Kulkarni
Clinical Psychologist & Counselor
📩 WhatsApp: 9730961014 (paid counselling) 

शनिवार, ४ एप्रिल, २०२६

काम चालू रस्ता बंद

#काम_चालू_रस्ता_बंद ❎
कधी कधी आपल्याला वाटतं की सगळं काही थांबलंय. आपण खूप प्रयत्न करतो, पण यश अजूनही लांबच आहे असं वाटतं. माझीसुद्धा काही वर्षांआधी या गोष्टीमुळे खूप चिडचिड व्हायची, राग यायचा. पण आता मी शिकलेय—हा 'उशीर' म्हणजे मला थांबवणं नाही, तर मला 'घडवणं' आहे.
ही 'वेटिंग' नाही, तर 'प्रिपेरेशन' आहे!
कधी कधी देव आपल्याला थांबवतो, कारण तो आपलं रक्षण करत असतो. आपल्याला ज्या संकटाची कल्पनाही नसते, त्यापासून तो आपल्याला लांब ठेवतो. आपल्याला वाटतं की वेळ वाया जातोय, पण खरं तर देव आपल्यातल्या अशा गुणांना पैलू पाडत असतो, ज्याची आपल्याला जाणीवही नसते. ही फक्त 'वाट बघणं' नाही, तर ही एक 'तयारी' आहे—मोठ्या जबाबदारीसाठी!
शांतता म्हणजे 'प्लॅनिंग'
जेव्हा सगळीकडे शांतता असते आणि काहीच घडत नाही असं वाटतं, तेव्हा समजून जा की पडद्यामागे काहीतरी मोठं 'प्लॅनिंग' सुरू आहे. आपल्याला देवाचं 'टाइमिंग' कदाचित नेहमी समजणार नाही, पण एक गोष्ट नक्की—त्याच्या हातात दिलेलं काहीच वाया जात नाही.
त्रागा नको, आता फक्त विश्वास!
जर एखादी गोष्ट मिळायला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागत असेल, तर त्याचा अर्थ असा की ती गोष्ट आपण कल्पनेपेक्षा मोठी असणार आहे. मोठ्या इमारतीचा पाया जसा खोल आणि मजबूत लागतो, तसंच मोठ्या यशासाठी आपली तयारी सुद्धा मजबूत लागते. म्हणूनच, आता मला फ्रस्ट्रेशन येत नाही, तर माझा विश्वास अधिक वाढत जातो.
जाता जाता एकच सांगेन पुढे चालत राहा...
मी माझं काम करत राहणार, स्वतःवर मेहनत घेणार आणि देवावर पूर्ण भरवसा ठेवणार. कारण जेव्हा तो काहीतरी अफाट देणार असतो, तेव्हा घेतलेली ही मेहनत आणि ही प्रतीक्षा कधीच फुकट जात नाही.
लक्षात ठेवा, जेवढी मोठी प्रतीक्षा, तेवढंच गोड फळ! ✨🙏

आपल्या आयुष्यातील 'पॅटर्न' आणि 'ग्रोथ' यावर विचार करायला लावणारे, थोडेसे खोलवर जाणारे ३ प्रश्न खालीलप्रमाणे आहेत:
१. 'रिसायकल' होणारे अनुभव: तुमच्या आयुष्यात अशा कोणत्या घटना, व्यक्ती किंवा समस्या आहेत ज्या 'नाव बदलून' वारंवार तुमच्यासमोर येत आहेत? (उदा. दरवेळी सारखेच मित्र मिळणे किंवा प्रत्येक कामात एकाच टप्प्यावर अडथळा येणे). तुम्हाला वाटतं का, की ही परिस्थिती बदलण्यासाठी समोरच्या व्यक्तीपेक्षा आधी तुमचा 'प्रतिसाद' बदलण्याची गरज आहे?
२. तुलनेचा चष्मा: सध्या तुम्ही स्वतःला ज्या यशाच्या किंवा सुखाच्या मापदंडांवर मोजत आहात, ते खरोखर तुमचे आहेत का? की ते फक्त समाज, नातेवाईक किंवा सोशल मीडियाने तुमच्यावर लादलेल्या अपेक्षा आहेत? जर या अपेक्षा तुमच्या नसतील, तर तुम्ही स्वतःच्या दृष्टिकोनातून यशाची कोणती व्याख्या ससांगाल
३. बदलाचा अडथळा: स्वतःचा एखादा जुना स्वभाव किंवा विचार सोडताना तुम्हाला नेमकी कशाची भीती वाटते? (उदा. "मी बदललो तर लोक काय म्हणतील?" किंवा "अनोळखी वाटेवर चालताना माझं काय होईल?"). ही भीती तुमच्या प्रगतीपेक्षा मोठी आहे का?

💫तुम्ही जर असं काहीच केलं नसेल पण करायचं असेल तर माझे कोर्सेस तुमच्यासाठी आहेत... 
🧿🧿🧿 योग्य वेळी कौन्सेलर ची मदत घ्या आणि स्वतःच्या आयुष्यात बदल घडताना बघा.🔮🔮🔮🔮
🧘🏼‍♀️स्वतःला नव्याने जाणून घेण्यासाठी तयार व्हा आणि लवकरात लवकर संपर्क करा. 
📱Gauri Harshal Kulkarni
Clinical Psychologist & Counselor 
(paid counselling)


मंगळवार, ३१ मार्च, २०२६

तेच तेच अडथळे? तुम्हीही अनुभवत असाल तर 👉🏼

#तेच_तेच_अडथळे? विचारांचे चक्र आणि बदल
कधी कधी आपल्याला वाटतं की नशीबच खराब आहे. सगळीकडे सतत तेच तेच अडथळे, तीच ती "बॅड लक" ची मालिका पुन्हा पुन्हा आपल्यासमोर येते. मग आपण नशिबाला किंवा लोकांना दोष द्यायला लागतो. पण खरं सांगू? जर पुन्हा पुन्हा त्याच समस्या येत असतील, तर आता थोडं 'आत' डोकावून बघण्याची वेळ आली आहे.
💫जुन्या विचारांनी नवीन जग कसं घडणार?
आपण नेहमी त्याच त्याच पद्धतीने विचार करतो आणि अपेक्षा मात्र वेगळ्या निकालांची ठेवतो. हे कसं शक्य आहे?
 जर आपल्याला आयुष्यात काहीतरी नवीन हवं असेल, तर आपल्याला आपली विचार करण्याची पद्धत—म्हणजेच आपली 'मेंटॅलिटी'—बदलावी लागेल. जुन्या विचारांच्या साच्यात अडकून आपण कधीच नवीन उंची गाठू शकत नाही.
🔃 हे अनुभवांचं रिसायकलिंग थांबवा!
जोपर्यंत आपण आपले विचार बदलत नाही, तोपर्यंत आपण आपले जुने अनुभवच 'रिसायकल' करत राहतो. 
🛞 म्हणजे काय?
 तर फक्त माणसं बदलतात, जागा बदलते, पण समस्या मात्र तशीच राहते. कारण आपण अजूनही त्याच जुन्या चष्म्यातून जगाकडे बघतोय. हे दुष्टचक्र तोडण्यासाठी आपल्याला एक नवीन 'स्टोरी' स्वतःला सांगावी लागेल.
🏆नवीन विचार = नवीन निकाल
आजच ठरवा की मी परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेन. जेव्हा तुम्ही तुमचे विचार बदलता, तेव्हा तुमच्या कृती बदलतात आणि आपोआपच त्याचे निकालही बदलतात. 
🧶"हे माझ्यासोबतच का होतंय?" म्हणण्यापेक्षा "मी यातून काय शिकू शकतो?" हा एक छोटासा बदल सुद्धा तुमचं आयुष्य बदलू शकतो.

???आजचे तीन प्रश्न 
१. अनुभवांची पुनरावृत्ती: तुमच्या आयुष्यात अशी कोणती समस्या किंवा 'बॅड लक' आहे, जे वारंवार वेगळ्या रूपात तुमच्यासमोर येत आहे? तुम्हाला असं वाटतं का की तिथे तुमचा एखादा जुना विचार कारणीभूत असू शकतो?
२. नजरेचा चष्मा: एखाद्या कठीण परिस्थितीकडे पाहताना तुमचा पहिला विचार "हे माझ्यासोबतच का होतंय?" (Victim mindset) असा असतो, की "यातून मी काय शिकू शकतो?" (Growth mindset)? हा दृष्टिकोन बदलल्यास निकाल बदलू शकेल का?
३. नव्या संकल्पाची सुरुवात: आजच्या दिवसात असा कोणता एक छोटासा निर्णय किंवा विचार तुम्ही बदलू शकता, जो तुम्हाला तुमच्या जुन्या 'कम्फर्ट झोन'मधून बाहेर काढून एका नवीन रिझल्टकडे घेऊन जाईल?

🧘🏼‍♀️आजचा संकल्प
तुमच्या डोक्यातले ते जुने, नकारात्मक विचार आता कचऱ्यात टाका. आजपासून नवीन, सकारात्मक आणि प्रगतीशील विचारांची पेरणी करा.

लक्षात ठेवा, जोपर्यंत विचार बदलत नाहीत, तोपर्यंत जग बदलणार नाही. स्वतःला एक नवी संधी द्या! 🔄🧠✨

💫तुम्ही जर असं काहीच केलं नसेल पण करायचं असेल तर माझे कोर्सेस तुमच्यासाठी आहेत... 
🧿🧿🧿 योग्य वेळी कौन्सेलर ची मदत घ्या आणि स्वतःच्या आयुष्यात बदल घडताना बघा.🔮🔮🔮🔮
🧘🏼‍♀️स्वतःला नव्याने जाणून घेण्यासाठी तयार व्हा आणि लवकरात लवकर संपर्क करा. 
📱Gauri Harshal Kulkarni
Clinical Psychologist & Counselor
📩 WhatsApp: 9730961014 (paid counselling)

रविवार, २९ मार्च, २०२६

मध्यमवय, भावनिक रिकामेपणा आणि नात्यांमधील भूलभुलैया

मध्यमवय, भावनिक रिकामेपणा आणि नात्यांमधील 'भूलभुलैया'

आयुष्याच्या एका टप्प्यावर, विशेषतः वयाच्या ३५ ते ५० च्या दरम्यान, अनेक स्त्रियांच्या आयुष्यात एक 'पोकळी' निर्माण होते. मुले मोठी झालेली असतात, पती आपल्या कामात व्यस्त असतो आणि स्वतःचे अस्तित्व फक्त 'घर सांभाळणारी' एवढ्यापुरतेच उरले आहे की काय, असा प्रश्न पडू लागतो. याच काळात मनाची दारे नकळत अशा कोणासाठी तरी उघडली जातात, जो प्रेमाचा, आदराचा आणि लक्ष देण्याचा (Attention) देखावा करतो.
पण हा प्रवास जितका सुखद वाटतो, तितकाच तो धोकादायकही असू शकतो. या विषयाचे काही महत्त्वाचे पैलू खालीलप्रमाणे आहेत:
१. ही ओढ निर्माण का होते? (The Root Cause)
भावनिक उपासमार: घरातून मिळणारे दुर्लक्ष आणि संवादाचा अभाव स्त्रीला बाहेरून मिळणाऱ्या थोड्याशा कौतुकाकडेही खेचून नेतो.
थ्रिल किंवा वेगळेपण: रोजच्या कंटाळवाण्या आयुष्यात काहीतरी नवीन, थरारक हवे असते. याला अनेकदा 'मिडल एज क्रायसिस' म्हटले जाते.
आर्थिक गरज: काही वेळा परिस्थिती इतकी बिकट असते की, केवळ कुटुंबाला आधार देण्यासाठी किंवा स्वतःच्या गरजांसाठी स्त्रिया अशा संबंधांकडे वळतात, जिथे त्यांना मदतीचे आमिष दाखवले जाते.
२. फसवणुकीची कार्यपद्धती (The Predator's Trap)
अशा वेळी काही पुरुष स्त्रियांच्या भावनिक कमकुवतपणाचा फायदा घेतात. त्यांची पद्धत साधारणतः अशी असते:
मैत्रीचा हात: सुरुवातीला ते केवळ एक 'चांगला मित्र' म्हणून समोर येतात. ते तुमचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतात, जे कदाचित घरी घडत नसते.
संधीसाधूपणा: तुम्हाला भावनिकदृष्ट्या गुंतवून ठेवले जाते. "तुला तुझ्या घरात कोणीच समजत नाही, मी मात्र तुला पूर्ण ओळखतो," अशी जाणीव करून दिली जाते.
सवय लावणे: दिवसातून अनेकदा मेसेज करणे, सतत संपर्कात राहणे यातून तुम्हाला त्यांची सवय लावली जाते. जेव्हा तुम्ही त्यांच्यावर पूर्णपणे विसंबून राहता, तेव्हा ते अचानक 'डिस्कनेक्ट' होतात.
लक्ष देणे बंद करणे (Ghosting): जेव्हा त्यांना समजते की शिकार आता पूर्णपणे जाळ्यात आहे, तेव्हा ते दुर्लक्ष करू लागतात. यामुळे स्त्रीला प्रचंड धक्का बसतो आणि ती अधिकच त्यांच्या मागे लागते.
३. अंतर्गत संघर्ष आणि घुसमट
या संपूर्ण प्रवासात स्त्री दोन पातळ्यांवर लढत असते:
१. अपराधीपणाची भावना (Guilt): "मी माझ्या कुटुंबाशी प्रतारणा करत आहे का?" हा विचार तिला आतून खात असतो.
२. सामाजिक भीती: "कोणाला समजले तर काय होईल?" या भीतीने ती कोणाकडे मदतही मागू शकत नाही.
चेहऱ्यावर हसू ठेवून आतल्या आत रडणे, ही अवस्था अत्यंत भयानक असते. यालाच 'सायलेंट किलर' म्हटले जाते.
४. यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग (Counseling Advice)
भावनिक दलदलीतून बाहेर पडण्यासाठी मार्गदर्शक उपाययोजना
जेव्हा एखादी स्त्री अशा 'भावनिक सापळ्यात' अडकते, तेव्हा तिला तिथून बाहेर पडणे अशक्य वाटते. पण योग्य पावले उचलल्यास स्वतःचे मानसिक आरोग्य आणि सामाजिक प्रतिष्ठा दोन्ही जपता येतात.
जर तुम्ही किंवा तुमची ओळख असलेली कोणी व्यक्ती या परिस्थितीत असेल, तर खालील गोष्टी लक्षात ठेवा:
१. The 'No Contact' Rule
हे सर्वात कठीण पण सर्वात प्रभावी पाऊल आहे.
डिजिटल डिटॉक्स: त्या व्यक्तीचा नंबर ब्लॉक करा. सोशल मीडियावरून त्यांना अनफॉलो किंवा ब्लॉक करा. जुने मेसेज, फोटो आणि कॉल लॉग्स डिलीट करा. कारण ते पुन्हा पुन्हा पाहिल्याने जुन्या आठवणी आणि 'हळवेपणा' जागा होतो.
प्रतिसाद देऊ नका: जर त्या व्यक्तीने पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला (उदा. नवीन नंबरवरून किंवा मित्रांमार्फत), तर कोणताही प्रतिसाद देऊ नका. 'स्पष्टीकरण' देण्याच्या फंदात पडू नका, कारण तिथेच पुन्हा भावनिक गुंतवणूक सुरू होते.
२. स्वतःच्या भावनांचे विश्लेषण (Self-Analysis)
भ्रमातून बाहेर या: ती व्यक्ती तुमच्या प्रेमात नव्हती, तर तिला तुमच्याकडून मिळणाऱ्या 'अटेंशन' किंवा 'फायद्यात' रस होता, हे सत्य स्वीकारणे गरजेचे आहे.
गरज ओळखा: तुम्हाला नक्की काय हवे होते? प्रेम, संवाद की आर्थिक मदत? एकदा मूळ गरज समजली की, ती सुरक्षित मार्गाने कशी पूर्ण करता येईल याचा विचार करता येतो.
३. 'गिल्ट' (अपराधीपणा) मधून मुक्तता
स्वतःला माफ करा: "माझ्याकडून चूक झाली" हे मान्य करणे धैर्याचे लक्षण आहे. स्वतःला सतत कोसत राहिल्याने नैराश्य (Depression) येते. झालेली चूक ही एक 'धडा' म्हणून स्वीकारा आणि पुढे चला.
गोपनीयता पाळा: प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सांगण्याची गरज नाही. विश्वासू व्यक्ती किंवा समुपदेशकाशिवाय इतर कोणाशीही यावर चर्चा करू नका, जेणेकरून तुमचे सामाजिक आयुष्य सुरक्षित राहील.
४. आर्थिक स्वावलंबन आणि सुरक्षा
आर्थिक पर्याय शोधा: जर गरज आर्थिक मदतीची असेल, तर सन्माननीय मार्गाने पैसे कसे कमवता येतील याचा विचार करा. एखादा छोटा गृह उद्योग, पार्ट-टाइम नोकरी किंवा जुन्या कौशल्याचा वापर करून पैसे मिळवण्याचा प्रयत्न करा.
ब्लॅकमेलिंगला घाबरू नका: जर समोरची व्यक्ती तुम्हाला धमकावत असेल, तर घाबरून त्यांच्या मागण्या पूर्ण करू नका. अशा वेळी कायदेशीर सल्ला किंवा सायबर सेलची मदत घेणे केव्हाही उत्तम.
५. नातेसंबंधांवर पुन्हा काम करणे (Rebuilding Relations)
कुटुंबात संवाद वाढवा: पती किंवा मुलांशी संवाद सुधारण्याचा प्रयत्न करा. त्यांच्यासोबत वेळ घालवा. घरामध्ये 'भावनिक गुंतवणूक' वाढवल्यास बाहेरची गरज कमी भासते.
नवीन मैत्री: सकारात्मक आणि सुरक्षित मित्र-मैत्रिणींचा गट तयार करा, जे तुम्हाला प्रगतीसाठी प्रोत्साहित करतील.
६. मानसिक आणि शारीरिक आरोग्य
छंद जोपासा: वाचन, व्यायाम, योगा किंवा गाणे शिकणे यांसारख्या गोष्टी मनात रिकामेपणा जाणवू देत नाहीत. रिकामे मन हे 'सैतानाचे घर' असते, त्यामुळे स्वतःला विधायक कामात गुंतवून ठेवा.
व्यावसायिक समुपदेशन: जेव्हा विचार चक्र थांबत नाही, तेव्हा 'कौन्सिलिंग' घेणे हे औषधासारखे काम करते. समुपदेशक तुम्हाला परिस्थितीकडे तटस्थपणे पाहायला शिकवतात.
७. स्वतःची किंमत (Self-Worth) ओळखा
कोणीतरी दुर्लक्ष केले म्हणून तुमची किंमत कमी होत नाही. तुम्ही कोणाच्या 'मूड'वर अवलंबून असणारी वस्तू नाही आहात. स्वतःला आदर द्यायला शिका, तेव्हाच जग तुमचा आदर करेल.
लक्षात ठेवा: ही एक तात्पुरती वादळी स्थिती आहे. तुम्ही यातून नक्कीच बाहेर पडू शकता आणि पुन्हा आनंदी आयुष्य जगू शकता.
जाता जाता इतकच सांगते, 
तुमचे आयुष्य एका चुकीच्या निर्णयामुळे संपत नाही. समोरची व्यक्ती तुम्हाला 'कंट्रोल' करत असेल, तर ते प्रेम नाही. स्वतःची किंमत ओळखा. तुम्ही केवळ एका पुरुषाची 'गरज' नाही आहात, तर तुम्ही एक स्वतंत्र, सन्माननीय आणि सामर्थ्यवान व्यक्ती आहात.
आतल्या आत घुमण्यापेक्षा, व्यक्त व्हा... कारण संवाद हीच समाधानाची पहिली पायरी आहे.
स्वतःला शोधताना - गौरी हर्षल 
जर तुम्हालाही self awareness journey सुरू करायची असेल, 
तर संपर्क करा:
Gauri Harshal Kulkarni
Clinical Psychologist & Counselor
📩 WhatsApp: 9730961014 (paid counselling) 

शनिवार, २८ मार्च, २०२६

आज काय लिहू?

#आज_काय_लिहू? 
आजच्या डिजिटल युगात आपण लॅपटॉप आणि मोबाईलच्या इतके आहारी गेलो आहोत की, हातात पेन धरून कागदावर लिहिणं आपण जवळजवळ विसरूनच गेलोय. पण तुम्हाला माहित आहे का? हाताने लिहिण्याची ही 'जुनी सवय' तुमच्या आयुष्यात किती मोठे सकारात्मक बदल घडवू शकते?
खाली शेयर केलेल्या माहितीवरून, हाताने लिहिण्याचे ६ जबरदस्त फायदे सोप्या भाषेत सांगणारा संवाद वाचूया...

पेन, कागद आणि आपण: एक गप्पांचा फड
पार्थ: (लॅपटॉपवर वेगाने टाईप करत) "अरे समीर, काय करतोयस? अजून त्या जुन्या डायरीत काय लिहित बसलायस? टॅबवर नोट कर ना, पटकन होतं सगळं!"
समीर: (हसून पेन बाजूला ठेवत) "अरे मित्रा, वेग महत्त्वाचा आहेच, पण कधीकधी 'सावकाश' जाणं जास्त फायद्याचं असतं. तुला माहितीये का, या हाताने लिहिण्याचे किती फायदे आहेत?"
पार्थ: "फायदे? कसले फायदे? उलट हात दुखतात आणि वेळही जास्त लागतो."
समीर: "असं नाहीये रे. बघ, जेव्हा आपण हाताने लिहितो, तेव्हा आपलं डोकं आणि हात यांचा एक वेगळाच ताळमेळ बसतो. त्याने आपली एकाग्रता (Focus) कमालीची वाढते. तू लॅपटॉपवर टाईप करताना मध्येच नोटिफिकेशन आलं की विचलित होतोस, पण कागदावर लिहिताना फक्त तू आणि तुझे विचार असतात. यामुळे Distractions पूर्णपणे थांबतात."
पार्थ: "ते तर आहेच म्हणा, पण लॅपटॉपवर सगळं सेव्ह राहतं ना!"
समीर: "सेव्ह तर राहतं, पण मेंदूत किती साठतं? संशोधक सांगतात की, हाताने लिहिलेली गोष्ट आपल्या स्मरणशक्तीत (Memory) जास्त काळ टिकते. इतकंच नाही, तर तुला जर खूप स्ट्रेस किंवा टेन्शन असेल ना, तर मनातलं कागदावर उतरवून बघ. Stress आणि Anxiety कमी करायला हा एक उत्तम मार्ग आहे."
पार्थ: "खरंच? मला वाटलं होतं हे फक्त जुन्या लोकांचे चोचले आहेत."
समीर: "मुळीच नाही! हाताने लिहिल्यामुळे आपली Creativity (सर्जनशीलता) वाढते. तू जेव्हा पेन धरतोस, तेव्हा तुझे विचार अधिक मोकळेपणाने वाहतात. आपली Hand-eye coordination सुधारते आणि मेंदूची कार्यक्षमता वाढून Mental aging म्हणजे मेंदूचं म्हातारपणही लांबणीवर पडतं."
पार्थ: "बापरे! म्हणजे हे एक प्रकारचं मेंदूचं वर्कआउटच आहे तर!"
समीर: "अगदी बरोबर! आणि विचार कर, एखाद्याला वाढदिवसाला 'व्हॉट्सॲप मेसेज' पाठवणं आणि 'हाताने लिहिलेलं पत्र' देणं यात किती फरक आहे? हाताने लिहिलेलं पत्र समोरच्याला Special वाटतं. त्यात एक जिव्हाळा असतो जो कीबोर्डवरच्या बटणांमध्ये नसतो."
पार्थ: "पटलं रे बाबा! तुझी ही 'फायद्यांची' यादी ऐकून आता मलाही वाटतंय की रोज किमान एक पान तरी काहीतरी लिहावं."
समीर: "नक्कीच! सुरुवात कर, मग बघ तुला स्वतःलाच किती फ्रेश वाटतंय ते!

✔️तुम्ही कधी मनातले विचार आहे तसे कागदावर उतरवण्याचा प्रयत्न केला आहे का? 
✔️की तुम्हाला प्रश्न पडतो नेमकं काय लिहू? 
✔️तुम्हाला माहित आहे का की नकारात्मक विचार कागदावर उतरवल्यानंतर तुमच्या मनावरचे ओझं हलकं होतं?
✔️तुम्हाला यापैकी कोणता फायदा सर्वात जास्त महत्त्वाचा वाटतो?

💫तुम्ही जर असं काहीच केलं नसेल पण करायचं असेल तर माझे कोर्सेस तुमच्यासाठी आहेत... 
🧘🏼‍♀️स्वतःला नव्याने जाणून घेण्यासाठी तयार व्हा आणि लवकरात लवकर संपर्क करा. 
📱Gauri Harshal Kulkarni
Clinical Psychologist & Counselor
📩 WhatsApp: 9730961014 (paid counselling) 

शुक्रवार, २७ मार्च, २०२६

तुम्ही स्वतःला स्विकारलं आहे का?

#तुम्ही_स्वतःला_स्विकारलं_आहे_का? 
आपण दिवसभरात किती वेळ स्वतःवर टीका करण्यात घालवतो? "मी हे करू शकलो असतो," "माझ्यात हीच उणीव आहे," किंवा "लोक काय म्हणतील?" अशा विचारांच्या चक्रात आपण स्वतःची उर्जा खर्च करत असतो. पण कधी शांतपणे विचार केला आहे का, की आपण ज्या मापदंडांवर स्वतःला मोजत आहोत, ते खरंच आपले आहेत का?
🌿अपेक्षांचे ओझे
बऱ्याचदा आपण समाजाच्या, पालकांच्या किंवा सोशल मीडियाने ठरवून दिलेल्या यशाच्या व्याख्येशी स्वतःची तुलना करत असतो. या अशा अपेक्षा आहेत ज्या आपण कधी स्वतःसाठी निवडल्याच नव्हत्या. जेव्हा आपण या 'दुसऱ्यांच्या' चष्म्यातून स्वतःला पाहतो, तेव्हा आपल्याला फक्त उणिवाच दिसू लागतात. खऱ्या अर्थाने स्वतःला ओळखण्यासाठी हे ओझे उतरवून ठेवणे गरजेचे आहे.
🌿उत्क्रांती आणि जुना 'मी'
माणूस म्हणून बदलणे हा निसर्गाचा नियम आहे. आपण काल जे होतो, त्यापेक्षा आज नक्कीच वेगळे आहोत. पण याचा अर्थ असा नाही की आपण आपल्या भूतकाळातील रूपाचा द्वेष करावा. तुम्ही पूर्वी जे काही निर्णय घेतले किंवा ज्या चुका केल्या, त्या परिस्थितीनुसार आणि त्यावेळच्या तुमच्या समजुतीनुसार होत्या. स्वतःचा विकास करताना जुन्या 'स्व'ला सोबत घेऊन, त्याला सन्मानाने निरोप देऊन पुढे जाणे म्हणजे खरी प्रगती.
🌿आजचे प्रेम, आजचा स्वीकार
स्वतःवर प्रेम करण्यासाठी आपण सहसा काही अटी घालतो - "जेव्हा माझे वजन कमी होईल," किंवा "जेव्हा मला ती नोकरी मिळेल," तेव्हा मी आनंदी होईन. पण खरं सांगू? तुम्ही जसे आहात, ज्या स्थितीत आहात, तसेच आज 'प्रेम' आणि 'सन्माना'साठी पात्र आहात.
स्वतःला पूर्णपणे स्वीकारणे म्हणजे आळशी होणे नव्हे, तर स्वतःला प्रगती करण्यासाठी एक सुरक्षित आणि प्रेमळ आधार देणे होय. स्वतःवर टीका करण्यात शक्ती वाया घालवण्यापेक्षा, तीच शक्ती स्वतःला घडवण्यासाठी वापरा.
लक्षात ठेवा, तुम्ही एक 'Work in Progress' आहात आणि ते अतिशय सुंदर आहे. ✨

✔️प्रश्न १:  तुम्हाला अजूनही स्वतःला आहे तसे स्वीकारणे जमले आहे का? कमेंट्समध्ये सांगा. 👇
✔️प्रश्न २: स्वतःच्या बाबतीत तुमच्या मनात काही प्रश्न आहेत का? तुम्ही त्यांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला का? 
✔️प्रश्न ३: या कथेतील कोणती ओळ तुम्हाला सर्वात जास्त भावली?
स्वतःला शोधताना - गौरी हर्षल 
जर तुम्हालाही self awareness journey सुरू करायची असेल, 
तर संपर्क करा:
Gauri Harshal Kulkarni
Clinical Psychologist & Counselor
📩 WhatsApp: 9730961014 (paid counselling) 

मंगळवार, २४ मार्च, २०२६

कशाला उद्याची बात

#कशाला_उद्याची_बात? 
उद्याची काळजी करण्यात आपण आजचा आनंद विसरतोय का? हा प्रश्न बऱ्याच क्लायंटशी बोलताना मनात डोकावत असतो. 
🫧 मन अनेकदा अशा समस्या सोडवत बसतं ज्या प्रत्यक्षात अस्तित्वातच नसतात. आजच्या क्षणात जगायला शिका, कारण आयुष्य इथेच वर्तमानात आहे, हे जेव्हा सांगूनही पटत नाही तेव्हा आपल्या मनाला उदाहरणांची गरज असते. 

उदाहरणामुळे त्याला गोष्टी लवकर समजतात. म्हणूनच ही आजची गोष्ट....👇🏼
एका तरुणाने एकदा एका साधूला विचारले,“मी खूप विचार करणं कसं थांबवू?”
साधूने उत्तर दिले:“तू खूप विचार करतोस कारण तुझं मन तुझं संरक्षण करायचा प्रयत्न करतंय... अशा भविष्यापासून जे अजून अस्तित्वातच नाही. मला सांग—उद्याचा दिवस कोणी पाहिलाय?
त्याबद्दल तुला वाटणारी भीती हे सत्य नसून केवळ सत्याचा मुखवटा घातलेली एक कल्पना आहे.म्हणून मन अशा समस्या निर्माण करतं ज्या खरंतर अस्तित्वात नाहीतच...
आणि मग त्या सोडवण्याचा प्रयत्न करून स्वतःला थकवून टाकतं. अगदी एखाद्या मांजरीसारखं, जी स्वतःच्या शेपटीचा पाठलाग करत गोल गोल फिरत असते.
जर तुला मुक्त व्हायचं असेल, तर दोन गोष्टी लक्षात ठेव.
💫पहिली—तुझे विचार म्हणजे सत्य नव्हेत.
तू ज्या गोष्टींची काळजी करतोस, त्यातील बहुतेक गोष्टी कधीच घडणार नाहीत.
💫दुसरी—जीवन त्याच्या गतीनेच पुढे जाईल.
जे तुझ्या नियंत्रणात नाही ते सोडून दे, आणि जे समोर येईल त्याला हुशारीने सामोरं जा.
हे केलंस की तुझं अस्वस्थ मन बदलून जाईल...भीतीच्या चक्रातून.... एका नदीसारखं—जी वाहत असते संथपणे, परिस्थितीनुसार मार्ग बदलते आणि शांत असते.
✔️हे नीट समजून घे: मन अनेकदा स्वतःच निर्माण केलेल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतं. 
🌸जीवनावर विश्वास ठेव.
🧘🏼‍♀️जिथे शक्य आहे तिथे कृती कर.
🤷🏼‍♀️जिथे शक्य नाही तिथे विषय सोडून दे.
हाच मार्ग आहे.”
खरे शहाणपण विचारांच्या गोंधळात अडकून राहण्यात नसून, एका शांत श्वासात असतं.
❤️ जेव्हा आपण प्रत्येक 'उद्या' आजच सोडवण्याचा हट्ट सोडतो, तेव्हा आपल्याला जाणवतं की वर्तमानाचा प्रकाश मार्ग दाखवण्यासाठी पुरेसा आहे.
या क्षणावर विश्वास ठेवण्यात एक वेगळीच शक्ती आहे, कारण आयुष्य नेमकं इथेच फुलत असतं. या क्षणात जगायला शिकलात की हृदयाला विश्रांती मिळते आणि भीतीमुळे दडून बसलेला अंतरात्म्याचा आवाज स्पष्ट ऐकू येतो. 🌿
जाता जाता इतकच सांगते...
"तुमचे विचार म्हणजे 'सत्य' नव्हेत, तर ती फक्त मनाची एक कल्पना असू शकते. भीतीचा मुखवटा बाजूला सारून पहा, वर्तमान अधिक सुंदर आहे. जे आपल्या हातात नाही, ते सोडून देण्यातच खरी शांतता आहे. ✨"

✔️प्रश्न १: तुमच्या मनातही कधी अशा समस्या येतात का, ज्या प्रत्यक्षात कधी घडल्याच नाहीत? कमेंट्समध्ये सांगा. 👇
✔️प्रश्न २: 'अतिविचार' (Overthinking) थांबवण्यासाठी तुम्ही कोणती गोष्ट आवर्जून करता?
✔️प्रश्न ३: या कथेतील कोणती ओळ तुम्हाला सर्वात जास्त भावली?
स्वतःला शोधताना - गौरी हर्षल 
जर तुम्हालाही self awareness journey सुरू करायची असेल, 
तर संपर्क करा:
Gauri Harshal Kulkarni
Clinical Psychologist & Counselor
📩 WhatsApp: 9730961014 (paid counselling) 

मनातल्या गाठी

#मनातल्या_गाठी 
जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला 'खटकते'...
आपल्याला कधी कधी एखाद्याचं बोलणं किंवा वागणं एकदम मनाला लागतं. कशावरून तरी आपण एकदम चिडतो, नाहीतर एकदम गप्प होतो. आपण म्हणतो, "त्यानं मला असं का म्हटलं?" किंवा "तिचं वागणं मला अजिबात आवडलं नाही." आपल्याला वाटतं की समोरची माणसं किंवा ती परिस्थितीच चुकीची आहे.
पण जरा थांबून विचार करा... आपल्याला जे 'खटकतंय', ते खरं तर आपल्याला काहीतरी सांगायला आलंय.
आरसा दाखवणारी अस्वस्थता
जेव्हा आपल्याला राग येतो ना, तेव्हा तो राग फक्त समोरच्यावर नसतो. तो आपल्या आतल्या कुठल्यातरी जुन्या जखमेवर बोट ठेवत असतो. जसं शरीराला कुठे लागलं असेल आणि तिथे कुणी हात लावला की आपण कळवळतो, तसंच मनाचं आहे. जे आपल्याला 'ट्रिगर' करतं, ते खरं तर आपल्याला सांगतंय की, "हे बघ, इथे अजून थोडं मलम लावायची गरज आहे बरं का!"
बदलणं नेहमीच 'शांत' नसतं
आपल्याला वाटतं प्रगती म्हणजे सगळं कसं छान, शांत असणार. पण कधी कधी मनाची साफसफाई करताना थोडी धूळ उडणारच. काही कटू सत्य समोर येणारच. ते स्वीकारणं थोडं जड जातं, पण तिथेच खरी सुधारणा असते. स्वतःला ओळखून, आपल्या उणिवा समजून घेणं हीच तर मोठी गोष्ट आहे.
मोकळं होण्याचा मार्ग
जोपर्यंत आपण त्या खुपणाऱ्या गोष्टींकडे बघत नाही, तोपर्यंत आपण त्यातून मुक्त होऊ शकत नाही. जेव्हा आपण स्वतःला विचारतो, "अरे, मला या गोष्टीचा इतका त्रास का होतोय?", तेव्हा कुठेतरी त्या त्रासाची गाठ सुटायला सुरुवात होते. आणि एकदा का ती गाठ सुटली की जे सुख मिळतं, तेच खरं स्वातंत्र्य!
मग आज काय शिकायचं?
आज तुम्हाला कशाचा सगळ्यात जास्त राग आला? कशाची भीती वाटली?
लक्षात ठेवा, जे तुम्हाला अस्वस्थ करतंय, तेच तुम्हाला बरं होण्याचा रस्ता दाखवतंय. त्या खुपणाऱ्या गोष्टींकडे शत्रू म्हणून न बघता, सुधारण्याची एक संधी म्हणून बघा. मग बघा, आयुष्य कसं हलकं-फुलकं वाटायला लागेल! ✨

✔️प्रश्न १: नजीकच्या काळात तुम्हाला कशाचा सगळ्यात जास्त राग आला? कशाची भीती वाटली?कमेंट्समध्ये सांगा. 👇
✔️प्रश्न २: जे तुम्हाला अस्वस्थ करत आहे, ते तुम्हाला ओळखता येतं का? 
✔️प्रश्न ३: या कथेतील कोणती ओळ तुम्हाला सर्वात जास्त भावली?
स्वतःला शोधताना - गौरी हर्षल 
जर तुम्हालाही self awareness journey सुरू करायची असेल, 
तर संपर्क करा:
Gauri Harshal Kulkarni
Clinical Psychologist & Counselor
📩 WhatsApp: 9730961014 (paid counselling) 

सोमवार, १६ मार्च, २०२६

असं का झालं?

#असं_का_झालं? 
जेव्हा उत्तरं मिळत नाहीत, तेव्हा शांतपणे पुढे जाणंच चांगलं...
"काही गोष्टींचा शेवट ' आता सगळं काही नीट झालंय' अशा उत्तराने किंवा स्थितीत होत नाही; तर तो होतो मनाला झालेल्या स्पष्ट जाणिवेने आणि स्वतःच्या स्वाभिमानाने."

कधीकधी आपल्या आयुष्यातली काही पावलं अशी असतात की तिथे समोरचा माणूस आपल्याला ना काही सांगतो, ना आपली माफी मागतो. आपण मात्र उगाच विचार करत बसतो की 'असं का झालं?'

तुमच्यासोबत सुद्धा असं झालं असेल ना??? 
पण खरं सांगू का? 
मनाला शांतता मिळवण्यासाठी समोरच्याने उत्तर द्यायलाच पाहिजे असं काही नसतं.
जेव्हा आपल्याला वस्तुस्थिती नीट समजते, तेव्हा ती गोष्ट तिथेच संपते. आपण जसा विचार केला होता तसं जग नसतं, हे जेव्हा आपल्याला उमजतं ना, तेव्हा एक प्रकारची शांतता मिळते. त्या शांततेत आपला स्वाभिमान जागा होतो आणि आपल्याला सांगतो की, "जिथे तुझी किंमत नाही, तिथे आता वेळ घालवण्यात काहीच अर्थ नाही."
कोणत्याही उत्तराची अपेक्षा न ठेवता आयुष्यात पुढे जाणं म्हणजे हार मानणं नसतं; तर तो स्वतःचा सन्मान करण्याचा एक मार्ग असतो. शेवटच्या शब्दासाठी भांडण्यापेक्षा स्वतःच्या मनाची शांतता निवडणं कधीही श्रेष्ठच!
स्वतःला शोधताना - गौरी हर्षल 
जर तुम्हालाही healing journey सुरू करायची असेल,
तर संपर्क करा:
Gauri Harshal Kulkarni
Clinical Psychologist & Counselor
📩 WhatsApp: 9730961014

सोमवार, २३ फेब्रुवारी, २०२६

व्यक्त होणं का थांबतं?

"व्यक्त होणं का थांबतं? ~अनपेक्षित धक्क्याचा मनावर होणारा परिणाम"
बऱ्याचदा ढोर मेहनत करून सुद्धा ऐनवेळी तोंडचा घास दुसऱ्या व्यक्तीने हिसकावून घेतल्यावर ढसाढसा रडणाऱ्या व्यक्ती कौन्सिलिंग सेशनमध्ये भेटतात. 
त्यापैकी कित्येक जणांचे मनोगत ही खालची वाक्यं दर्शवतात... 

तुमच्या बाबतीत सुद्धा हे घडलं आहे का? 
हळूहळू काही माणसं व्यक्त व्हायची बंद होतात किंवा ती व्यक्त होणे टाळू लागतात असं का होत असेल? 
कारण त्यांच्या आजूबाजूला त्यांना इतरांचा खोटेपणा, दिखाऊपणा, इतरांचं क्रेडिट लाटण्याची वृत्ती अशा अनेक गोष्टी उघडपणे दिसू लागतात पण त्याच वेळेला त्यांना हेही दिसतं की असं वागणाऱ्या लोकांना कोणीच ना त्यांच्या चुकीची जाणीव करून देतात... ना कधी धारेवर धरतात... उलट दुसऱ्यांच्या गोष्टी लाटून खऱ्याचं खोटं करून खोट्याचं खरं करून स्वतःची बाजू चांगली सिद्ध करायला शिकलेल्या ह्या लोकांना जर चुकून कधी यश मिळालं तर त्यांच्या यशाचा एवढा गाजावाजा केला जातो की रात्रंदिवस मेहनत करणाऱ्या व्यक्तीचे यश झाकोळून जातं. 

आता कोणी म्हणेल की त्याने त्या यशाची किंमत कमी तर होत नाही ना? नक्कीच होत नाही पण आनंदाने आपलं काम करणाऱ्या व्यक्तीच्या मनस्थितीवर मात्र खोलवर परिणाम होतो. 

 कारण हे असं वागणारी आपलीच माणसं असतात... ज्यांना आपण कधीकाळी बऱ्यापैकी जवळच्या नात्यांमध्ये ओळखत असतो. पण त्या व्यक्ती वेळ आल्यावर आपल्या कल्पना, आपण मांडलेली मतं, आपण केलेली काम सुद्धा स्वतःच्या नावावर खपवून मोकळे होतात. 

कालाय तस्मै नमः म्हणजे काळ हे या सगळ्या गोष्टींवर उत्तम उत्तर असतं. कारण अर्थातच सत्य एके दिवशी समोर येतच...
 पण म्हणून झालेला त्रास, मनस्ताप यांची भरपाई होत नाही. 

माणसं कितीही यशस्वी झाली तरी सुरुवातीच्या काळात किंवा अगदी यशाच्या शिखरावर असताना सुद्धा जर त्यांना जवळच्या लोकांकडून असे अनुभव आले तर ती अलिप्त होत जातात. कारण बऱ्याचदा अन्याय झालाय म्हणून दाद मागायला गेलो तर समोरच्या व्यक्तीला वाचवण्यासाठी वाटेल त्या लेवलची वाक्य तोंडावर फेकून मारली जातात. 

हे फक्त घरात, ऑफिसमध्ये घडत नाही तर हल्ली सर्वत्र घडतं. 
उपाय खूप सारे असतात... पण जेव्हा समोरच्याने आपला केसाने गळा कापलेला असतो... तेव्हा त्यावर चिडचिड करून त्रागा व्यक्त करून काहीही साध्य होत नाही.‌

उदाहरण द्यायचं झालं तर थोडक्यात सांगते, 
नावं बदललेली आहेत...
नेहा नावाची माझी एक क्लायंट मागच्या आठवड्यात सेशनची वेळ ठरवून माझ्याशी बोलत होती. 
तिच्या आत्तापर्यंतच्या सेशनचा आढावा घेत असतानाच अचानक ती थांबली आणि म्हणाली , "गौरीताई मला एक महत्त्वाची गोष्ट शेअर करायची आहे. खरंतर तुम्ही म्हणाल की इतके दिवस आपण जे काही करत आहोत तरीही तुझ्याकडून अशी रिएक्शन मला अपेक्षित नव्हती. पण मला राहावत नाहीये आणि मला प्रामाणिकपणे तुम्हाला हे सांगायचं आहे." 

मी तिला म्हणाले, " ठीक आहे, आधी तुझ्या मनात जे काही साचलेले आहे ते आपण बाहेर काढू आणि मगच पुढे जाऊ." 

ती, " माझी एक मैत्रीण आहे. जिला मी इतके दिवस खूप जवळची मैत्रीण समजत होते. मागच्या वर्षापर्यंत ती नोकरी करत होती. आणि तिचं बाकी सगळंही उत्तम सुरू होतं. पण अचानक तिच्या नोकरीत काही प्रॉब्लेम झाले आणि तिला राजीनामा द्यावा लागला. त्यावेळेला ती निराश झालेली होती. म्हणून मी तिला उभारी देण्यासाठी नेहमी तिच्याशी स्वतःहून संवाद साधत होते. 
संवाद साधत असताना एके दिवशी मी तिला एका व्यवसायाबद्दल स्वतःहून माहिती दिली आणि म्हणाले की जर तुझे तयारी असेल तर आपण दोघी एकत्र हे काम करू. मला हे काम करायची खूप इच्छा आहे. त्यावेळी ती मला म्हणाली की मी विचार करून सांगते. त्यानंतर बरेच दिवस, महिने उलटले तिच्याकडून मला काहीही रिप्लाय आला नाही. माझ्याकडे बाकीची ही कामं असल्यामुळे मी ही गोष्ट फारशी मनावर घेतली नाही. आणि अचानक काही दिवसांपूर्वी मला असं कळलं की मी सुचवलेला व्यवसाय तिने करायला सुरुवात केली आहे. तिने मला त्यात सामील केलं नाही याच्याशी मला काहीच देणं घेणं नव्हतं. पण ते करताना तिला एकदाही मला संपर्क करावासा वाटला नाही याचं मला खूप वाईट वाटलं. मुळात तिला ती गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवावी वाटली यातच मला काय ते उत्तर मिळालं होतं. पण तरीही माझा स्वभाव जो सगळ्यात जास्त तुम्हालाच माहित आहे. त्याला अनुसरून मी फोन करून माझा त्रागा व्यक्त केला. आणि इथेच माझं चुकलं.... समोरच्या व्यक्तीने अर्थातच माझं म्हणणं उडवून लावलं आणि समोरून फोन बंद केला. या सगळ्या गोष्टींमुळे माझा पुढचा सगळा आठवडा खराब गेला. तुम्ही म्हणाल की मी वेड्यासारखी वागले, मी असं करायला नव्हतं पाहिजे हे मला सुद्धा पटलं पण तोपर्यंत बंदुकीतून गोळी सुटली होती. " 

मंडळी माझ्या ह्या क्लायंटला अँगर इशू आहेत. त्यांना राग येतो, आणि त्यावर आम्ही गेले काही महिने काम करत आहोत. पण होतं काय सगळ्या पद्धती तंत्र वापरली तरी त्या स्वतः एक माणूस आहेत आणि जेव्हा माणूस एखाद्या व्यक्तीकडून जाणून बुजून दुखावला जातो तेव्हा त्याला आपल्या रागावर नियंत्रण ठेवण्यात जमेलच असं नाही. 
लक्षात घ्या आपण रागावर नियंत्रण ठेवणं शिकायचं असतं पण ते केव्हा जेव्हा बऱ्यापैकी वेळेला आपल्याला माहीत असतं की आपल्याला राग येणार आहे आपलं शरीर तसेच सिग्नल आपल्याला देत असतं. इथे माझ्या क्लायंटच्या बाबतीत मात्र घडलेली घटना पूर्णपणे अनपेक्षित होती त्यामुळे त्या जे काही वागल्या ती त्यांची प्रतीक्षिप्त प्रतिक्रिया होती. म्हणजे त्या घडलेल्या घटनेवरची रिएक्शन... इन्स्टंट रिएक्शन. 
जी खरंतर त्यांना टाळता येऊ शकली असती.... पण कदाचित ते त्यांना नाही जमलं. हरकत नाही... त्याही परिस्थितीत आपण चुकत आहोत , चुकीच्या व्यक्तीसमोर व्यक्त होत आहोत हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी ते माझ्याकडे प्रामाणिकपणे कबूल केलं ही सुद्धा स्वतःमध्ये चांगल्या सुधारणा घडवून आणण्याची एक बाजू आहे. 
हळूहळू कदाचित त्यांना त्यांच्या रागावर पूर्णपणे नियंत्रण मिळवता येईल. 

पण एक गोष्ट लक्षात घ्या आपण समोरच्या व्यक्तीच्या कडून नकळत किंवा जाणून बुजून केल्या जाणाऱ्या अशा पद्धतीच्या वर्तणुकीवर नियंत्रण ठेवू शकत नाही. मग अशा लोकांच्या बाबतीत काय करायचं? ते मी जनरलाइज्ड सांगू शकत नाही. पण ज्यांना असं वाटतं ते कौन्सिलिंग सेशन चा वापर करून स्वतःच्या आयुष्यातील अशा व्यक्तींसोबत कसं वागायचं हे नक्कीच शिकू शकतात... 
बाकी तुमच्या बाबतीत सुद्धा जर असं काही घडत असेल तर ते आमच्या पर्यंत पोहोचवा.... 
गौरी हर्षल 
क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आणि कौन्सेलर 

शुक्रवार, ६ फेब्रुवारी, २०२६

choice is yours

Choice is yours 
निवड तुमची: जेव्हा शहराच्या वेगात आयुष्य थबकतं!
'समीर' एका नामांकित मल्टिनॅशनल कंपनीत (MNC) सिनीअर मॅनेजर म्हणून काम करत होता. पुण्यात स्वतःचं हक्काचं घर, आलिशान गाडी आणि सुखी कुटुंब—सगळं काही एखाद्या स्वप्नासारखं होतं. समीरला वाटायचं की त्याने आयुष्याचं गणित अचूक सोडवलं आहे.
पण एक दिवस अचानक कंपनीत 'ले-ऑफ' जाहीर झाला आणि एका ईमेलने समीरचं जगच बदलून गेलं. ज्या कंपनीसाठी त्याने रक्ताचं पाणी केलं होतं, तिथून त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.
बाहेर पावसाळी संध्याकाळ होती आणि समीर मुंबई-पुणे हायवेवर गाडी थांबवून सुन्न होऊन बसला होता. डोळ्यासमोर घराचे हप्ते, मुलांचे शिक्षण आणि भविष्याची चिंता उभी राहिली. त्याला वाटलं, "हे माझ्याच बाबतीत का झालं? मी काय चूक केली होती?"
अशाच अस्वस्थ मनस्थितीत तो आपल्या कॉलेजच्या एका जुन्या मित्राला, 'विक्रम' ला भेटायला गेला. विक्रम एक यशस्वी उद्योजक होता आणि त्याने आयुष्यात खूप चढ-उतार पाहिले होते.
समीरने आपली सगळी कैफियत मांडली. विक्रम शांतपणे ऐकून घेत होता. त्याने हॉटेलच्या खिडकीबाहेर पाहिलं, जिथे जोरात पाऊस पडत होता आणि ट्रॅफिक जाम झालं होतं.
विक्रम म्हणाला, "समीर, बघ बाहेर ट्रॅफिक जाम आहे. कोणीतरी गाडी खराब झाल्यामुळे किंवा पावसामुळे अडकलंय. तुझ्या मते, त्या माणसाच्या हातात हा पाऊस थांबवणं होतं का?"
समीर म्हणाला, "नाही रे, पाऊस किंवा ट्रॅफिक आपल्या हातात नसतं."
विक्रम हसून म्हणाला, "अगदी हेच तुझ्या करिअरचं आहे. जागतिक मंदी, कंपनीचे निर्णय किंवा 'ले-ऑफ' हे त्या पावसासारखं आहे. ते टाळणं तुझ्या हातात नव्हतं. पण आता कारच्या आत बसून रडत बसायचं की जवळचा रस्ता शोधून बाहेर पडायचं, हे मात्र तुझ्या हातात आहे."
समीरला काहीतरी पटू लागलं. विक्रम पुढे म्हणाला:
"संकटं ही शहरातल्या ट्रॅफिकसारखी असतात. ती कधी येतील सांगता येत नाही. पण त्या वेळी आपण 'हॉर्न' वाजवून डोकं दुखवून घ्यायचं की शांत राहून पुढच्या वळणाचा विचार करायचा, ही आपली निवड असते."
समीरने त्या रात्री स्वतःला एक प्रश्न विचारला— "मी जे बदलू शकत नाही त्याचा विचार करत बसू की जे मी करू शकतो त्यावर लक्ष देऊ?"
त्याने दुसऱ्या दिवसापासून रडणं थांबवलं. त्याने आपल्या अनुभवाचा वापर करून स्वतःची कन्सल्टन्सी सुरू केली. सुरुवातीला कठीण गेलं, पण सहा महिन्यांतच तो आधीपेक्षा जास्त कमावू लागला आणि मुख्य म्हणजे तो आता स्वतःचा मालक होता.
कथेचे तात्पर्य:
शहरातल्या धावपळीच्या आयुष्यात कधी 'पिंक स्लिप' मिळेल, कधी तब्येत साथ देणार नाही किंवा कधी नाती दुरावतील, हे आपल्या हातात नसतं. संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटाचा सामना करणं, त्याच्या हातात असतं.
जेव्हा परिस्थिती तुमच्या नियंत्रणाबाहेर असते, तेव्हा तुमच्याकडे दोनच पर्याय असतात:
परिस्थितीचे बळी (Victim) बनायचं की
परिस्थितीचे विजेते (Warrior) बनायचं.
लक्षात ठेवा, वादळ तुम्हाला थांबवण्यासाठी नाही, तर तुमच्यातली सुप्त ताकद ओळखण्यासाठी येतं!
तुमच्याही आयुष्यात असं कधी 'वादळ' आलं होतं का? तुम्ही त्याला कसं तोंड दिलं? कमेंट्समध्ये नक्की सांगा.
गौरी हर्षल कुलकर्णी
क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आणि कौन्सेलर
📱 9730961014

शनिवार, ३१ जानेवारी, २०२६

Do you compare your life with others?

Do you compare your life with others? 
अमित आणि सुमित हे दोघे एकाच कॉलेजमधून इंजिनिअरिंग पूर्ण करून एका नामांकित आयटी कंपनीत रुजू झाले. अमित कोडिंगमध्ये अत्यंत हुशार होता, त्याला तांत्रिक गोष्टींची उपजत जाण होती. दुसरीकडे सुमित हा स्वभावाने मनमिळाऊ होता आणि त्याचे संवादकौशल्य उत्तम होते.
दोन वर्षे झाली. एके दिवशी कंपनीने 'प्रमोशन'ची यादी जाहीर केली. सुमितला 'टीम लीडर' बनवण्यात आले होते, तर अमित अजूनही 'सिनियर डेव्हलपर' म्हणूनच काम करत होता.
ही बातमी ऐकल्यापासून अमित अस्वस्थ झाला. त्याने स्वतःची तुलना सुमितशी करायला सुरुवात केली. "मी सुमितपेक्षा जास्त वेगाने कोड लिहितो, मी त्याच्यापेक्षा जास्त तास काम करतो, तरीही त्याला माझ्या वरचे पद मिळाले? कंपनीला माझ्या कामाची किंमतच नाही," असे विचार करून तो स्वतःला कमी लेखू लागला. या वैफल्यात त्याचे कामात लक्ष लागेनासे झाले. त्याने स्वतःचे महत्त्व स्वतःच्याच नजरेत कमी केले होते.
त्याचे मार्गदर्शक असलेले विकास सर ह्यांच्या लक्षात आले. त्यांनी अमितला केबिनमध्ये बोलावले.
"अमित, तू आजकाल खूप उदास वाटतोयस. काय झालंय?" विकास सरांनी विचारले.
अमितने आपले मन मोकळे केले, "सर, सुमितला प्रमोशन मिळाले आणि मी तिथेच आहे. मला वाटते मी त्याच्याइतका सक्षम नाहीये."
विकास सर हसले आणि त्यांनी टेबलावर दोन वस्तू ठेवल्या— एक महागडा 'स्मार्टफोन' आणि एक 'पॉवर बँक'.
ते म्हणाले, "अमित, हे बघ. हा फोन कितीही महागडा असला तरी तो पॉवर बँकशिवाय जास्त वेळ चालू शकत नाही. आणि ही पॉवर बँक कितीही शक्तिशाली असली तरी ती फोनसारखे फोटो काढू शकत नाही किंवा इंटरनेट चालवू शकत नाही. जर स्मार्टफोनने विचार केला की, 'मी पॉवर बँकसारखी वीज का साठवू शकत नाही?' तर तो त्याचा अपमान होईल. कारण त्याचे काम वेगळे आहे."
"सुमितमध्ये लोकांकडून काम करून घेण्याची आणि व्यवस्थापन करण्याची कला आहे, म्हणून तो 'टीम लीडर' झाला. पण तुझ्याकडे 'टेक्निकल आर्किटेक्चर'ची जी दृष्टी आहे, ती सुमितकडे नाही. तुला 'टेक्निकल एक्सपर्ट' म्हणून पुढे जाण्याची संधी आहे. तू सुमितशी तुलना करून तुझ्या या दुर्मिळ कौशल्याचा अपमान करतोयस."
अमितला आपली चूक उमजली. त्याने सुमितसारखे बनण्याचा नाद सोडला आणि स्वतःच्या कोडिंग कौशल्याला अधिक धार लावली. काही महिन्यांनी, कंपनीने त्याला 'चीफ टेक्निकल ऑफिसर' च्या विशेष ट्रेनिंगसाठी निवडले— जे सुमितच्या पदापेक्षाही वेगळ्या आणि मोठ्या जबाबदारीचे काम होते.

कथेचे तात्पर्य:
✔️खऱ्या आयुष्यात आपण अनेकदा सोशल मीडियावरील फोटो किंवा दुसऱ्याचे पगार पाहून स्वतःला दुःखी करतो.
✔️ पण प्रत्येकाचा प्रवास, परिस्थिती आणि कौशल्ये वेगळी असतात.
 ✔️दुसऱ्याच्या यशाचे मोजमाप आपल्या आयुष्याला लावणे म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाचा अनादर करणे होय.
✔️तुमची प्रगती ही कालच्या 'तुम्ही' पेक्षा आज तुम्ही किती चांगले आहात, यावर मोजली पाहिजे, दुसऱ्याच्या गतीने नाही.
✔️लक्षात ठेवा 👉🏼स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका,
तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करता आहात

तुम्हाला सुद्धा स्वतःच्या आयुष्याची इतरांसोबत तुलना करण्याची सवय आहे का? 
तुमचे अनुभव नक्की सांगा. 
गौरी हर्षल कुलकर्णी 
क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आणि कौन्सेलर 
📱📩 9730961014

गुरुवार, २९ जानेवारी, २०२६

be selective

Be selective 

राजहंस वृत्ती: काय स्वीकारावं आणि काय सोडावं?

एका प्रसिद्ध आश्रमात एक तरुण शिष्य, 'वेदांत', आपल्या गुरूंकडे शिकत होता. वेदांत खूप हुशार होता, पण तो एक बाबतीत खूप त्रस्त असायचा. लोकांच्या प्रतिक्रिया, टीका आणि सल्ले यांचा त्याच्यावर खूप लवकर परिणाम व्हायचा. कोणी चांगलं म्हटलं की तो हवेत उडायचा आणि कोणी टीका केली की तो दिवसभर उदास राहायचा.

एके दिवशी तो गुरूंना म्हणाला, "गुरुदेव, या जगात इतके लोक आहेत आणि प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत. कोणाचं ऐकावं आणि कोणाचं सोडून द्यावं, हेच मला समजत नाही. लोक जे बोलतात ते माझ्या मनात घर करून राहतं."

गुरुदेव स्मितहास्य करत त्याला आश्रमाच्या तलावाकाठी घेऊन गेले. तिथे एक देखणा राजहंस पोहत होता. गुरूंनी वेदांतला सांगितले, "वेदांत, या राजहंसाचं नीट निरीक्षण कर. असं म्हणतात की, जर राजहंसासमोर दूध आणि पाणी एकत्र करून ठेवलं, तर तो फक्त दूध पितो आणि पाणी सोडून देतो. तो त्या मिश्रणात गुंतून न राहता, जे 'सार' (Essence) आहे तेच स्वीकारतो."

वेदांत म्हणाला, "पण सर, माणसाच्या बाबतीत हे कसं शक्य आहे?"

गुरू समजावून सांगू लागले, "माणसानं सुद्धा राजहंसासारखं असावं. रोज तुला हजारो विचार ऐकायला मिळतील, हजारो सल्ले दिले जातील. पण त्यातील सर्वच गोष्टी तुझ्या कामाच्या नसतात. काही गोष्टी तुझ्या प्रगतीसाठी चांगल्या असतील (दूध), तर काही फक्त तुझे मन कलुषित करणारी टीका असतील (पाणी)."
"ज्या क्षणी तू लोकांच्या टोमण्यांना किंवा निरर्थक टीकेला मनात जागा देतोस, त्या क्षणी तू 'पाणी' पिऊ लागतोस. ज्याला स्वतःची उंची गाठायची आहे, त्याने राजहंसासारखा 'विवेक' जागृत ठेवला पाहिजे. जे तुला पटेल, जे तुला प्रगतीकडे नेईल, तेच स्वीकारावं; बाकी सगळं तिथेच सोडून द्यावं."

वेदांतला एक मोठा धडा मिळाला होता. त्याने ठरवले की आता तो लोकांच्या शब्दांचा कचरा स्वतःच्या मनात साठवणार नाही. तो फक्त तेच शब्द निवडेल जे त्याला अधिक चांगला माणूस बनवतील.

कथेचे तात्पर्य:
हे जग विविध विचारांच्या मिश्रणाने भरलेले आहे. इथे चांगुलपणाही आहे आणि नकारात्मकताही. माणसाचा 'विवेक' हा त्याच्यातला राजहंस आहे. आपण काय स्वीकारतो, यावरच आपले सुख आणि शांती अवलंबून असते. जे पटत नाही किंवा जे आपल्याला मानसिक त्रास देते, ते सोडून देण्यातच खरी बुद्धिमत्ता आहे.
"तुमच्या मनाची बरणी राजहंसासारखी ठेवा; फक्त शुद्धाचा स्वीकार करा, अशुद्धाचा त्याग करा."
माणसानं राजहंसासारखं असावं.आपल्याला जे पटेल तेच घ्यावं, नाही ते सोडून द्यावं.

तुम्हाला सुद्धा राजहंस व्हायला आवडेल का? की तुम्ही आधीच हे करण्याचा प्रयत्न करत आहात पण जमत नाही? मग योग्य वेळी योग्य व्यक्तीची मदत घ्या. 

गौरी हर्षल कुलकर्णी 
क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आणि कौन्सेलर 
📱📩 9730961014

बुधवार, २८ जानेवारी, २०२६

Are you avoiding anything? - Gauri Harshal

Are you avoiding anything? - Gauri Harshal 

The magic you are looking for is in the work that you are avoiding...
ज्या कामाला तुम्ही टाळत आहात, तिथेच ' बदल घडवून आणणारी जादू' लपलेली आहे

आर्यन हा एक तरुण फ्रीलान्स ग्राफिक डिझायनर होता. तो कामात उत्तम होता, पण त्याचे एक स्वप्न होते— त्याला स्वतःची एक मोठी 'डिझाईन एजन्सी' सुरू करायची होती. त्याच्याकडे कल्पकता होती, प्रतिभा होती, पण तरीही त्याचे काम एका ठराविक मर्यादेच्या पुढे जात नव्हते.
तो नेहमी यशस्वी उद्योजकांचे व्हिडिओ पाहायचा, प्रेरणादायी पुस्तके वाचायचा आणि विचार करायचा की, "माझ्या बाबतीत ती 'मॅजिक' (जादू) कधी घडणार? मला मोठे क्लायंट्स कधी मिळणार?"
एके दिवशी त्याची भेट एका यशस्वी निवृत्त व्यावसायिकाशी, दाते काकांशी झाली. दाते काकांनी त्याला विचारले, "आर्यन, तुझं काम कसं चाललंय?"
आर्यन निराश होऊन म्हणाला, "काका, मी खूप मेहनत करतोय, पण जे यश मला हवंय ते मिळत नाहीये. मला वाटतंय माझ्या नशिबातच ती जादू घडणं नाहीये."
दाते काकांनी स्मितहास्य केले आणि विचारले, "आर्यन, तुझ्या रोजच्या कामाच्या यादीत (To-do list) अशी कोणती गोष्ट आहे, जी तू गेल्या अनेक महिन्यांपासून पुढे ढकलत आहेस?"

आर्यन थोडा विचार करून म्हणाला, "अं... खरं तर मला 'नेटवर्किंग' आणि 'कोल्ड कॉलिंग' (अनोळखी मोठ्या कंपन्यांना भेटून स्वतःचे प्रेझेंटेशन देणे) करायचा कंटाळा येतो. मला वाटतं की माझं डिझाइन इतकं चांगलं असावं की लोकांनी स्वतःहून माझ्याकडे यावं. सेल्स आणि मार्केटिंग हे काम मला खूप भीतीदायक आणि कंटाळवाणे वाटते, म्हणून मी ते टाळतो."
दाते काका गंभीर होऊन म्हणाले, "आर्यन, तू ज्या 'मॅजिक'ची वाट पाहत आहेस, ती नेमकी त्याच कामात दडलेली आहे जे तू टाळत आहेस (The magic you are looking for is in the work that you are avoiding)."

आर्यनला धक्का बसला. त्याला जाणवले की तो फक्त स्वतःला आवडणारी कामे (डिझाइनिंग) करण्यात वेळ घालवत होता, पण व्यवसायाला मोठ्या उंचीवर नेण्यासाठी आवश्यक असलेले सर्वात महत्त्वाचे पण कठीण काम (मार्केटिंग) तो टाळत होता. त्याला वाटले होते की यश आपोआप येईल, पण 'जादू' तर त्या भीतीचा सामना करण्यात होती.
त्याच दिवशी आर्यनने ठरवले की तो रोज किमान दोन तास फक्त त्या कामासाठी देईल जे तो टाळत आला आहे. त्याने कंपन्यांना ईमेल पाठवण्यास, लोकांशी प्रत्यक्ष भेटून बोलण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्याला खूप नकार मिळाले, त्याला भीती वाटली, पण त्याने प्रयत्न सोडले नाहीत.
दोन महिन्यांनंतर, एका मोठ्या मल्टिनॅशनल कंपनीने त्याच्या कामाचे प्रेझेंटेशन पाहून त्याला एक खूप मोठा प्रोजेक्ट दिला. हे यश डिझाइनमुळे मिळाले होतेच, पण त्यापेक्षा जास्त ते 'त्या' टाळलेल्या कामामुळे मिळाले होते.
आर्यनला आता समजले होते की, आपली प्रगती तिथेच थांबलेली असते जिथे आपली भीती सुरू होते.

कथेचे तात्पर्य:
आपण नेहमी शॉर्टकट किंवा चमत्काराची वाट पाहतो, पण खरा चमत्कार हा आपण टाळत असलेल्या कठीण कामात (Hard work/Uncomfortable work) दडलेला असतो. एकदा का तुम्ही त्या टाळलेल्या कामाला भिडलात, की यशाची दारे आपोआप उघडतात.

तुमच्याकडून असे कोणते काम टाळले जात आहे हे शोधून काढा. आणि आम्हाला तुमचे अनुभव नक्की सांगा. 
स्वतःला शोधताना - गौरी हर्षल 
क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आणि कौन्सेलर 
📱📩 9730961014

मंगळवार, २७ जानेवारी, २०२६

Fomo???

Fomo??? 👉🏼 Fear of missing out 
If you can't decide the answer is no 
निर्णयक्षमता: जर तुम्ही ठाम नसाल, तर उत्तर 'नाही' आहे
समर्थ नावाचा एक हुशार तरुण एका मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीत काम करत होता. तो कष्टाळू होता, पण त्याच्या आयुष्यात एक मोठी समस्या होती— 'निर्णय न घेता येणे'. मग ते नवीन घर विकत घेण्यासारखे मोठे निर्णय असोत किंवा हॉटेलमध्ये कोणते जेवण मागवायचे यासारखे छोटे निर्णय, समर्थ नेहमी गोंधळलेला असायचा.
एके दिवशी त्याला त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी संधी मिळाली. एका जागतिक स्तरावरील कंपनीकडून त्याला मोठ्या पदासाठी विचारणा झाली होती. पगार उत्तम होता, पण त्यासाठी त्याला आपला देश सोडून कायमस्वरूपी परदेशात जावे लागणार होते.
समर्थ द्विधा मनःस्थितीत सापडला. एका बाजूला प्रगतीची संधी होती, तर दुसऱ्या बाजूला त्याचे कुटुंब आणि मित्र होते. तो तासनतास विचार करायचा. त्याने कागदावर 'फायदे' आणि 'तोटे' अशा दोन बाजू लिहिल्या, पण तरीही त्याचे मन एका निर्णयावर ठाम होत नव्हते.
तो आपल्या जुन्या शाळेतील शिक्षकांकडे, कुलकर्णी सरांकडे गेला. कुलकर्णी सर त्यांच्या स्पष्ट विचारांसाठी ओळखले जात असले. समर्थने आपली सर्व अडचण सांगितली.
"सर, मला ही संधी सोडायची नाहीये, पण मला इथली ओढही स्वस्थ बसू देत नाहीये. मी हो म्हणू की नाही? मी ठरवूच शकत नाहीये," समर्थ हताश होऊन म्हणाला.
कुलकर्णी सरांनी शांतपणे त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले, "समर्थ, एक साधे तत्त्व लक्षात ठेव— जर तुला 'हो' म्हणण्याबद्दल १०० टक्के खात्री वाटत नसेल, तर त्याचे उत्तर 'नाही' हेच आहे."
समर्थ चकित झाला. "पण सर, याचा अर्थ मी संधी गमावतोय असा नाही का?"
सरांनी समजावून सांगितले, "नाही समर्थ. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीसाठी खरोखर तयार असतो, तेव्हा आपल्या मनात 'जर-तर'चे विचार येत नाहीत. ज्या क्षणी तुला निर्णय घेण्यासाठी इतका संघर्ष करावा लागतोय, याचा अर्थ तुझे अंतर्मन अजून त्या बदलासाठी तयार नाही. जर तू या संभ्रमात 'हो' म्हणालास, तर तू परदेशात गेल्यावरही इथल्या आठवणीत दुःखी राहशील. आणि जर तू ठामपणे 'नाही' म्हणालास, तर तू इथे राहून अधिक चांगल्या संधी शोधण्यासाठी मुक्त होशील."
सरांनी पुढे एक मोलाचा सल्ला दिला, "अर्धवट मनाने घेतलेला 'हो' हा पूर्ण मनाने घेतलेल्या 'नाही' पेक्षा जास्त घातक असतो."
समर्थला आपले उत्तर मिळाले होते. त्याने त्या नोकरीला नम्रपणे नकार दिला. आश्चर्य म्हणजे, नकार दिल्यानंतर त्याला मानसिक शांतता लाभली. त्याचा जो ऊर्जेचा वेळ निर्णय घेण्यात जात होता, तो आता त्याने आपल्या सध्याच्या कामात आणि कौशल्यात लावला.
काही महिन्यांतच, त्याला भारतातच एका आंतरराष्ट्रीय प्रकल्पाचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले. तिथे त्याला परदेशापेक्षाही मोठी संधी मिळाली आणि कुटुंबासोबत राहण्याचे सुखही.
त्या दिवसापासून समर्थने स्वतःला एक नियम लावून घेतला— जर मन द्विधा असेल, जर स्पष्टता नसेल, तर धाडसाने 'नाही' म्हणायचे. कारण 'नाही' म्हणणे हे कमकुवतपणाचे लक्षण नसून, ते स्वतःच्या मूल्यांशी प्रामाणिक राहण्याचे लक्षण आहे.
कथेचे तात्पर्य:
आयुष्यात अनेकदा आपण 'गमावण्याच्या भीतीपोटी' (FOMO) अशा गोष्टींना 'हो' म्हणतो ज्याबद्दल आपण साशंक असतो. पण लक्षात ठेवा, तुमची स्पष्टता हीच तुमची शक्ती आहे. जर तुम्हाला 'हो' म्हणायला उशीर लागत असेल, तर तो 'नाही'च आहे असे समजा आणि पुढे चला.
स्वतःला शोधताना - गौरी हर्षल 
क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आणि कौन्सेलर 
📱📩 9730961014