Quote of the day 14
#Quote of the day 14 निकिता आणि निखिलचं अरेंज मॅरेज. निकिताच्या माहेरी जशी जॉइंट फॅमिली होती तशी निखीलकडे नव्हती. निखिलच्या घरात तो , त्याचे आईबाबा आणि बहीण एवढेच लोक. बाकी नातेवाईक येऊन जाऊन असत पण ते कधीतरी निमित्तापुरते. त्यामुळे घरातील व्यवस्था आईच्या हातात होती. आणि इतक्या वर्षांची एकटीने सगळं करण्याची सवय त्यांनाही लागली होती. त्यात सुनेच्या येण्याने बदल होणार हे जरी गृहीत धरले होते तरी तसा अनुभव दोघींचाही पहिलाच असणार होता. इतर घरात जस होत असे तस त्यांच्या घरातही होई भांड्याला भांडं लागलं की आवाज होणारच. निकिताला मिळून मिसळून गोष्टी कराव्या वाटत तर सासूबाई ची एक पद्धत ठरली होती त्यांना ते तस हवं असे. ह्या सगळ्या गोष्टींचं निरीक्षण निखिल आणि त्याचे बाबा करत होते. पण सोल्युशन काय काढावं त्यांना समजेना. वयानुसार आईही नमतं घ्यायला तयार नाही मग शेवटी निखिलने वेगळं व्हायचं ठरवलं. त्याच सोसायटीमध्ये पण दुसऱ्या विंगमध्ये त्यांचा एक फ्लॅट होता तो आणि निकिता तिथे राहू लागले. हळूहळू गाडी रुळावर आली. दोघीही आपल्या आवडीच्या कामात मन रमवू लागल्या. आई आणि निकिता दोघींनाही चूक कळली होती. पण आ