तुमच्या बाबतीत सुद्धा असं होतं का?
कुठलाही निर्णय घेताना आपण जर कोणी आपल्याला सल्ला विचारला तर अतिशय छान पद्धतीने विचार करून त्याला सल्ला देतो.
आणि त्या उलट स्वतःच्या बाबतीत जर एखादा निर्णय घ्यायचा असेल तर मात्र कुठे ना कुठेतरी आपण कोणावर तरी अवलंबून राहतो. इथे आपला स्वतःवर सहजासहजी विश्वास बसत नाही. कुणीतरी आपल्याला पटवून द्यावं लागतं की आपण एखादी गोष्ट करण्यासाठी पुरेसे आहोत.
असं का होत असेल?
कारण आपल्याला वाटतं की आपल्याकडून निर्णय घेण्यात जर चूक झाली तर
👉ती चूक नसून फार काहीतरी मोठा अपराध असेल.
👉लोक आपल्याला नावं ठेवतील.
👉 आणि मग नकळतच आपण स्वतःबद्दल विश्वास दाखवू लागतो.
अशा वेळेस काय करायचं?
🧡प्रयत्नपूर्वक स्वतःवर विश्वास ठेवायला शिकावे.
🧡मार्गदर्शन करायला, प्रोत्साहन द्यायला किंवा कोणता निर्णय घ्यावा हे सांगायला प्रत्येक वेळी कोणीतरी जवळ असेलच असे नाही.
कधीतरी तुम्हाला स्वतःच्या विचारांवर आणि निर्णयक्षमतेवर विश्वास ठेवायला शिकावे लागते.
🧡 न डगमगता निर्णय घ्या.
🧡निकालातून शिका.
🧡चुका झाल्या तरी त्या चुका सुधारा. पुन्हा प्रयत्न करा.
🧡आपण नेहमी बरोबरच असू, अशी अपेक्षा स्वतःकडून ठेवू नका.
स्वतःवरचा विश्वास कधीच चूक न करण्यातून येत नाही. तो या जाणिवेतून येतो की आपण चुका हाताळू शकतो, त्यातून शिकू शकतो आणि पुढे जात राहू शकतो.
मार्ग शोधण्याच्या आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवा.
लक्षात घ्या, निर्णय घेतल्यानंतर झालेल्या चुकींमधून शिकणे हे निर्णय न घेण्यापेक्षा कधीही चांगलेच असते. कारण तेव्हा काय करू नये हा अनुभव आपल्या गाठीशी आलेला असतो.
जेव्हा आपण स्वतःवर अविश्वास दाखवतो तेव्हा नकळतच आपण आपल्या आयुष्याची दोरी दुसऱ्यांच्या हातात देत असतो.
सो मंडळी निर्णय घ्या आणि त्या निर्णयाला योग्य किंवा बरोबर सिद्ध करण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करा.
बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु!!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा