व्हॉईस वर्सा
व्हाईस वर्सा
कविश आज जरा आनंदातच रूमवर परत आला. पण तिथे येऊन बघतो तर त्याचा रूमी आदर्श तोंड पाडून बसलेला होता.
त्याने आदर्शला कारण विचारले तर कळले की आदर्श ज्या कलिगवर सगळ्यात जास्त विश्वास ठेवत होता, त्यानेच आदर्शच्या आयडिया स्वतःच्या आहेत असं सांगून कंपनीच्या मॅनेजमेंट समोर मांडून प्रमोशन मिळवले होते.
त्याच्या गोड बोलण्याला फसून आदर्शनेच बोलता बोलता सगळं त्याला सांगितलं होतं. आणि आता परिणाम दिसत होते.
आदर्श समोर पुढच्या संधीपर्यंत वाट बघण्याशिवाय पर्याय नव्हता. पण ह्यामुळे त्याला एक उत्तम धडा मिळाला होता तो म्हणजे सहजपणे कुणावरही विश्वास ठेवून आपल्या सगळ्या गोष्टी सांगू नयेत.
कविश समोर मनातलं बोलल्यावर आदर्शला आता बरंच काही लक्षात आलं होतं. तो सावरला होता.
त्याने कविशला सॉरी म्हणत विचारलं की तो एवढा खुश का होता?
त्यावर कविश म्हणाला ," अरे तुझ्या अगदी उलट माझ्यासोबत घडलं. ज्या बॉसला मी रोज शिव्या देत होते त्याच बॉसने बदली होऊन जाता जाता माझी शिफारस त्याच्या जागेसाठी केली. आणि तो स्वतःच मला म्हणाला की डोळे उघडे ठेवून वावर. दिसतं तस नसतं. ज्या माणसाला मी शत्रू समजत होतो तो मित्र निघाला बघ. ", कविशचा किस्सा ऐकून ते दोघेही हसू लागले.
आज दोघांना एक गोष्ट प्रकर्षाने कळली होती ती म्हणजे माणसं चांगली असो किंवा वाईट ती काही तरी शिकवूनच जातात. गरज असते ती आपण त्यातून योग्य ते शिकण्याची. #गौरीहर्षल
टिप्पण्या
सजगता आवश्यक आहे।
आम्हाला नोकरीवर असेच अनुभव येत असतो
त्याचातून बरेच काही शिकायला मिळते