#क्वालिटी_टाइम
आज सकाळी कधी नव्हे ते चिमण्यांची चिव चिव ऐकून जाग आली. कितीतरी दिवसांनी हा अनुभव घेतला नाहीतर सकाळी उठल्यापासून मागे लागलेली 'घाई' नावाची गोष्ट काही ऐकूच देत नाही. घाईघाईने घर, बाहेरची काम , ऑफिस करण्याच्या ह्या धबडग्यात आपलं मन, मेंदू, शरीर काही सांगत असतात पण आपल्याला ते ऐकायला वेळच नसतो. घड्याळाच्या काट्यावर चालणारे आपण सोमवार ते शुक्रवार मनात कुठेतरी ठरवत असतो की विकेंडला स्वतःला, घरच्यांना क्वालिटी टाइम दयायचा पण खरंच जमतं का हो?? की आपला क्वालिटी टाइम मॉल, पिकनिक ह्या सगळ्यांमध्ये हरवतो??
क्वालिटी टाइमवर सगळेच लेक्चर झाडत असतात पण प्रत्यक्षात किती जण तो खरंच जगण्याचा प्रयत्न करतात? म्हणजे नेमकं काय करायचं हेच आपल्याला कळत नाही. टीव्ही, फोन , लॅपटॉप याना सुट्टी देऊन जरा मस्त वेळ घालवायचा. एकमेकांना समजून घेण्यासाठी गप्पा मारणं हा सगळ्यात सोपा उपाय आहे त्यामुळे रोज जे जमत नाही ते करून बघायचं. सगळ्यांनी मिळून काही गोष्टी करायच्या. थोडंसं अवघड जाईल सुरुवातीला कारण हल्ली आपल्याला माणसांपेक्षा फेसबुक आणि वॉट्सअप्प ची जास्त सवय झाली आहे. पण जमेल, जी आपली जिवाभावाची माणसं आहेत ती आयुष्यभर सोबत हवीत ना मग इतकं करायलाच हवं. सगळ्यांना एकमेकांना समजून घेत मदत करायची हा एकच रुल क्वालिटी टाइमसाठी.
प्रत्येकाला आज खूप सारा क्वालिटी टाइम आपल्या माणसासोबत मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शुभं भवतु!!
#गौरीहर्षल
१५.७.२०१७
शुक्रवार, १४ जुलै, २०१७
क्वालिटी टाइम
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
#तेच_तेच_अडथळे? विचारांचे चक्र आणि बदल कधी कधी आपल्याला वाटतं की नशीबच खराब आहे. सगळीकडे सतत तेच तेच अडथळे, तीच ती "बॅड लक" ची माल...
-
The Art of Self-Compassion: Being Kind to Yourself in the Face of Adversity संकटाच्या वेळी स्वतःशी दयाळूपणे वागण्याची कला ती मा...
-
#Quote_of_the_day9 रजनी अगदी चिडखोर स्वभावाची होती पण कुणाला मदत करायची म्हटली की वेगळीच रजनी समोर यायची. थोडीशी ओळख असणाऱ्या लोकांनाही गरजे...
Contact form |
Tags |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा