कालाय तस्मै नमः (भाग १२ ते १५)
कालाय तस्मै नमः| भाग १२ जाणीव स्व अस्तित्वाची एकीकडे माई आणि काका स्वराला भविष्यात येणाऱ्या गोष्टीवर मात करण्यासाठी तयार करत होते. तर दुसरीकडे अजूनही कुणीतरी स्वराच्या मदतीसाठी तयारी सुरू केली होती. भविष्यात असे काय घडणार होते? त्याची झलक स्वरा सात वर्षाची झाली तशी जाणवू लागली. एके रात्री अचानक ती झोपेत दचकली. माई शेजारीच झोपल्या होत्या त्यामुळे त्यांना पटकन ते जाणवले. तसे त्यांनी घाबरलेल्या स्वराला जवळ घेतले ती तशी अजूनही झोपेतच होती. पण बडबडत होती. माईंनी नीट कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न केला तसे काही अस्पष्ट शब्द त्यांना ऐकू आले, तिकडे जाऊ नको अस काहीसं. त्या काही विचारणार तेवढ्यात स्वरा कूस पालटत त्यांच्या कुशीत शिरून झोपून गेली. सकाळी उठल्यावर त्यांनी तिला विचारण्याचा प्रयत्न केला पण तिला काहीच आठवत नव्हते. स्वरा दुपारी शाळेतून घरी आली तशी नेहमीप्रमाणे माईंच्या खोलीत आली नाही म्हणून माई तिला शोधत तिच्या खोलीत गेल्या. तर ती दप्तर एकीकडे टाकून गुढघ्यात तोंड घालून मुसमुसत कोपऱ्यात बसली होती. तिच्या डोक्यावरून हात फिरवत माईनी विचारले, “काय झाले राणूबाई?” तशी ती डोळ्यातलं...