शनिवार, २ डिसेंबर, २०२३

आज कुछ अच्छा पढते हैं

#आज_कुछ_अच्छा_पढते_हैं 
सकाळी उठल्यावर मनात चांगले विचार आणले तर दिवस चांगला जातो असं आपण ऐकत आलो आहोत. 
पण खरंच असं होतं का? रोज कितीही ठरवलं तरी आजूबाजूच्या वातावरणाचा, परिस्थितीचा परिणाम आपल्या मनस्थितीवर होत असतो. मग अशा वेळेला काय करायचं? 
असच एक ॲप चाळत असताना मला मॉर्निंग पेजेस ही संकल्पना सापडली. तशी ती बरीच जुनी आहे. 
1992 च्याच आसपास julia कॅमेरॉन ह्या लेखिकेने the artist's way म्हणून एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाची बेसिक संकल्पना होती spiritual path to higher creativity. 
असो तर मुख्यत्वे या पुस्तकाच्या माध्यमातून लेखिकेला काय अपेक्षित होतं ते सांगते. 
तिच्या म्हणण्यानुसार सकाळी कमीत कमी 20 मिनिटे स्वतःला देत 3 पानं तरी रोज लिहायची. 
या लिहिण्याला कुठलेही बंधन नाही. मनात येतील ते चांगले, वाईट विचार कागदावर उतरविण्यास सुरुवात करायची. फक्त लिहायचं. लिहायचंच का? कारण लिहिताना आपल्याला विचार करण्यास पुरेसा वाव मिळतो. आपल्या विचारांना सुसूत्रतेने कागदावर लिहून काढण्यासाठी आपण प्रयत्नपूर्वक विचार करू लागतो. आपल्या भावना आणि विचार यांचा ताळमेळ आपोआपच जुळतो आणि मनातले विचार सुस्पष्ट शब्दात कागदावर येतात. 
त्याउलट टायपिंग करताना आपण बऱ्यापैकी घाईत असतो. अन् मुख्य म्हणजे यांत्रिकपणे काम करत असतो. 
तर क
तर कॅमेरॉन बाईंनी अजून एक गोष्ट सांगितली आहे ती म्हणजे हे लिहिलेलं पुन्हा वाचायचं नाही. त्याला कुठल्याही फुटपट्टीने मोजायच नाही. स्वतःला जज करायचं नाही. 
शांतपणे मनातले खदखणारे विचार लिहीत जायचं. जेणेकरून मन मोकळं होईल आणि त्याला नवीन गोष्टींचा विचार करण्यासाठी वेळ मिळेल. 
स्वतःचं लिहिलेलं स्वतःच वाचायचं नसल्याने इतरांना ते दाखवण्याचा प्रश्नच येत नाही.
सुरुवातीला अवघड वाटणारी ही गोष्ट सवय लागल्यावर इंटरेस्टिंग होत जाणार हे नक्की. 
कशी? तेही सांगते. 3 पाने भरून रोज सकाळी लिहायचं म्हणजे खायचं काम नाही. सुरुवातीला जरी मनातल्या वाईट, नकारात्मक विचारांना बाहेर पडण्यासाठी मार्ग मिळाला तरी हळूहळू मनात नवीन आणि चांगल्या गोष्टींसाठी जागा तयार होत जाणार. 
उदाहरण द्यायचं झालं तर, मला भेंडीची भाजी आवडते म्हणून मी जर रोज भेंडीची भाजी खायची म्हटलं तर चालेल का? नाही 2च दिवसात कंटाळा येईल. तसंच मनाचही होणार. लिहिताना खोलवर विचार करायला सुरुवात झाली की आपल्याला काय करतो आहोत, काय घडत आहे याची जाणीव होत जाईल. आणि नकळतच बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू होतील. 
आपल्याला जर मनापासून स्वतःसाठी काही करायचे असेल तर हा अतिशय उत्तम आणि स्वस्तातला उपाय आहे. 
पण जर त्या पुढे जाऊन आपल्याला असं वाटत असेल की आपल्याला आपल्या मनातला गोंधळ एकट्याने सोडवता येत नाही तर तिथे तज्ञ व्यक्तीची मदत नक्की घ्यावी. 

बाकी? बाकी बरच काही आहे जे आपण आपल्या पातळीवर बदलण्याची गरज असते. 
जे बदलता येत नाही त्यासाठी स्वीकारण्याची गरज असते आणि 
उरलेल्या गोष्टी ज्या आपल्या हातात नसतात त्यासाठी "तो " असतो ना. त्या बाबतीत मात्र म्हणायचं,
बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु !!!
#स्वतःला_शोधताना #गौरीहर्षल 
2 डिसेंबर 2023 

सोमवार, १६ ऑक्टोबर, २०२३

स्वतःसाठी बदलताना भाग 19

स्वतःसाठी बदलताना भाग 19
आपल्यासोबत सगळं चांगलं व्हावं असं आपल्याला वाटत असतं. पण चांगलं होण्यासाठी प्रयत्न आपल्यालाच करावे लागतात. म्हणजे नेमकं काय करायचं? तर...
✓ स्वतः वर फोकस करण्याचा प्रयत्न करत राहायचं. 
✓ नाही म्हणायला शिकायचं. 
✓ नात्यांमध्ये मर्यादा निश्चित करायची मॉडर्न भाषेत हेल्दी बाऊंड्री सेट करायच्या. 
✓ स्वतःसाठी उभं रहायचं. 
✓ आपल्या भावना आणि विचार यामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी प्रयत्न करायचे
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे , आपल्यासाठी सगळ्यात पहिली प्रायोरिटी आपण असायला हवं हे मान्य करायचं आणि ते फॉलो करण्यासाठी प्रयत्न करायचे. 
हे सगळं स्वतःहून जमत असेल तर उत्तम आहे पण नसेल जमत तर ? 
Stay connected... 
गौरी हर्षल कुलकर्णी, कौन्सेलर 
#स्वतःला_शोधताना #गौरीहर्षल 

मंगळवार, ३ ऑक्टोबर, २०२३

स्वतःसाठी बदलताना भाग 10

#स्वतःसाठी_बदलताना_भाग१०  (गौरीहर्षल)


आपण काय आहोत आणि काय करू शकतो ह्याचा अंदाज आला की बरेच प्रश्न सुटतात. 

कारण त्यानंतर आपण स्वतःचा होणारा अपमान,अवहेलना नाकारू लागतो. आणि आजूबाजूच्या असणाऱ्या बऱ्याच लोकांना ह्याचाच जास्त त्रास होऊ लागतो.

Self respect आणि self acceptance ह्या गोष्टी जशा स्वतःला स्विकारणे अवघड जाते तशाच त्या आपल्या सोबत वर्षानुवर्षे चुकीचं वागणाऱ्यांच्या गळी उतरवतानाही त्रास होतो. पण हे स्वतःच्या मनस्वास्थ्यासाठी खूप गरजेचे असते. 


You deserve much more than a life you feel pressured to settle for.


“Never apologize for having high standards. People who really want to be in your life will rise up to meet them.”



सोमवार, २ ऑक्टोबर, २०२३

स्वतःसाठी बदलताना भाग 14

#स्वतःसाठी बदलताना भाग 14 (गौरीहर्षल)
आयुष्यात एक वेळ अशी येते की जेव्हा तुमचे मार्ग अजून जास्त खडतर होतात. आणि अचानक तुमच्या लक्षात येतं की आता तुम्ही योग्य मार्गावर आहात आपण ज्या मार्गासाठी निवडले गेलेलो आहोत, तिथे कुठलीही गोष्ट सहज साध्य किंवा सोपी असणार नाहीये. उलट आपण जितके जास्त जोर लावू बघणार तितका जास्त विरोध आपल्याला वेगवेगळ्या पातळीवर सहन करावा लागणार. तितका जास्त त्रास आपल्याला सहन करावा लागणार. 
 पण या त्रासाचं फलित म्हणजे पुढे जाऊन मिळणाऱ्या गोष्टी ज्या शब्दातीत नसतात,शब्दात सांगताच येत नाहीत. 
 आणि हीच वेळ असते जेव्हा आपल्याला अजून जास्त प्रयत्न करावे लागतात त्या मार्गावर टिकून राहण्यासाठी. आपण डगमगण्याचे, हरण्याचे अनेक प्रसंग आयुष्यात वारंवार येत राहतात. पण त्यातून तावून सुलाखून बाहेर पडलो की जे मिळतं ते सगळ्या त्रासाची कष्टाची भरपाई करतं. 

प्रतिकूल परिस्थिती नेहमी आपल्याला अशा संधीसाठी तयार करते जी आयुष्यात एकदाच येते. आणि त्या वेळेला आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य असणं फार जास्त गरजेचं असतं. 

You will know you are on the right path when things stop being easy. 

There is no easy path to greatness, there is no rosy road to success, endure the pain, and you will enjoy the gain.

Don't turn back, It's when the going gets tough that you mustn't quit.



स्वतःसाठी बदलताना भाग 13

स्वतःसाठी बदलताना  भाग १३ (गौरीहर्षल)

आयुष्याच्या काही टप्प्यांमध्ये आपण एकट चालणं गरजेचं असतं. नियतीची तशी योजना असते. 

पण नेमकं अशाच वेळी आपण काय करतो???

- इतर कुणासाठी तरी स्वतः ला त्रास करून घेतो.

- त्यांनी आपल्याला त्यांच्या आयुष्यात जागा द्यावी म्हणून 

त्यांच्या मागे पुढे करू लागतो. 

- त्यासाठी वाट्टेल ते सहन करायची आपली तयारी असते.

 आणि आपण बऱ्याचदा तेसुद्धा करतो. 

याची खरच गरज असते का?  

जर एखादी व्यक्ती किंवा अनेक व्यक्ती तुमच्याशिवाय आनंदी राहू 

शकते तर तुम्ही त्यांच्याशिवाय आनंदी का राहू शकत नाही???


Never settle for less than the life that you deeply desire for yourself.


Leave them , wish them well, and trust that “your people” will find you.


स्वतःसाठी बदलताना भाग 12

#स्वतःसाठी_बदलताना_भाग१२ (गौरीहर्षल)

आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा बरंच काही हातातून निसटलेलं असतं. आत्मविश्वास कमी झालेला असतो. 
आशेचा कुठलाही किरण दिसत नाही. खरं तर अशाही परिस्थितीत अनेक मार्ग उपलब्ध असतात पण खराब मनस्थितीमुळे ते पटकन सापडत नाहीत. आणि सुदैवाने ते सापडले अन् आपण त्या दिशेने वाटचाल सुरु केली की आपल्या आजूबाजूच्या लोकांना ते पटत नाहीत. 
त्या वेळी विरोध होऊ लागतो, लोक आपला तिरस्कार करू लागतात, वाद वाढतात कारण प्रत्येकाला आता आपण त्यांचंच ऐकावं अस वाटत असतं. माणूस एखाद्या वेळी अपयशी ठरला म्हणजे आता तो उभाच राहू शकत नाही हे लोकांच आणि त्यातही जवळच्या लोकांचे ठाम मत असतं. 
अशा वेळी स्वतःवर विश्वास ठेवत पाऊल उचलणं खूप महत्त्वाचं आणि मुख्य म्हणजे अवघड असते. पण, 
You have to get up every day and make sure you don't quit on yourself.

Everything is OK in the end, if it's not OK, it's not the end.

The only way to do great work is to love what you do. If you haven't found it yet, keep looking. Don't settle. — Steve Jobs

स्वतःसाठी बदलताना भाग 11

#स्वतःसाठी_बदलताना_भाग११ (गौरीहर्षल)

वेळ ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे असं आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. 
पण खरंच वेळेची किंमत करतो का? म्हणजे कित्येकदा नको असलेली कामं करतो, नको असलेल्या लोकांसोबत मनाविरुद्ध राहतो. 
आपल्याकडे एक गोष्ट शिकवली जाते की माफ करा आणि नातं जपण्यासाठी प्रयत्न करा. 
पण जो माफ करत असतो तो तेच करत राहतो आणि इतरांना मात्र त्याला हवं तसं वागवण्याचं लायसन्सच मिळतं. जोपर्यंत ही गोष्ट लक्षात येते तोपर्यंत आयुष्यातील कितीतरी महत्वाचे दिवस, प्रसंग, क्षण त्या व्यक्तीच्या हातातून निसटून गेलेले असतात. 
आणि मग मनात सल राहते ती कायमचीच. 

स्वतःची किंमत योग्य वेळी न कळाल्याने होणारा तोटा 
कधी कधी आयुष्यभराच्या कमाईपेक्षा जास्त असतो

Time is precious. Make sure you spend it with the right people.

स्वतःसाठी बदलताना भाग 9

#स्वतःसाठी_बदलताना_भाग९ (गौरीहर्षल)

प्रत्येकाची इतरांसोबत असणारी नाती, त्यातलं महत्व हे बदलत असते. 
कधी कधी जे खूप जवळचे असतात ते एका रात्रीत अनोळखी होऊन जातात. 
तर कधी ज्यांना आपण ओळखतही नसतो ते इतके आपले होतात की हे कसं घडलं असा प्रश्न पडतो. 
ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपल्याला खूप त्रास होतो पण नीट विचार केला तर लक्षात येतं की आपल्या आयुष्यात आता असे लोक आहेत जे खरोखरच आपले आहेत.  
अशा वेळी जास्त विचार न करता त्या आपल्या लोकांना त्यांच्या स्पेशल असण्याची जाणीव नक्की करून द्यावी.  

"जाणारे जाणारच आहेत अन् येणारे येणारच आहेत."

You are making way for somehting or someone even better.

𝐺𝑜𝑜𝑑 𝑝𝑒𝑜𝑝𝑙𝑒 𝑎𝑙𝑤𝑎𝑦𝑠 𝑒𝑛𝑑 𝑤𝑖𝑡ℎ 𝑔𝑜𝑜𝑑 𝑝𝑒𝑜𝑝𝑙𝑒.


स्वतःसाठी बदलताना भाग 8

#स्वतःसाठी_बदलताना_भाग८ (गौरीहर्षल)

भूतकाळ बऱ्याचदा कटू आठवणींनाच लवकर समोर आणतो. 
मग त्या आठवणींचा इफेक्ट म्हणा किंवा अजून काही मनस्थिती बदलते. 
तिचा परिणाम बाकी सगळ्या कामांवर , नात्यांवर होऊ लागतो. 
कोण चुकीचं होतं, कोण बरोबर हे उगाळून हाती काहीच लागत नाही. 
उलट स्वतःवर असणारा विश्वास डळमळू लागतो.अशा वेळी 
आपण अवघड क्षणी घेतलेल्या निर्णयांवर ठाम राहण्याचा 
प्रयत्न करावा.तेच निर्णय पुढे जाऊन आपण किती योग्य 
होतो हे सिद्ध करून दाखवतात. 

What happens yesterday is may not be your responsibility,but how you behave today is.

You are not your circumstances, you are your choices.  

स्वतःसाठी बदलताना भाग 7

#स्वतःसाठी_बदलताना_भाग७ (गौरीहर्षल)

इथे प्रत्येक जण आपापल्या पातळीवर कुठल्या तरी गोष्टीशी झगडत आहे.कुणी शारीरिक, कुणी आर्थिक, कुणी मानसिक तर कुणीतरी व्यावसायिक. अशा वेळी त्या सगळ्या अवघड
परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी ज्याचे त्यालाच 
प्रयत्न करावे लागणार आहेत. 
प्रत्येक जण फक्त दुसऱ्याला मानसिक आधार,योग्य सल्ला 
आणि सोबत असण्याची जाणीव करून देऊ शकतो. 
पण तेही घेण्याची समोरच्या व्यक्तीची तयारी हवी नाहीतर पुन्हा आपल्याला मनस्ताप मिळतो. सो,हे नक्की लक्षात ठेवायचं. 
"न मागता मदत करायला गेलो तर त्रासच वाट्याला येईल."
𝑬𝒗𝒆𝒓𝒚𝒐𝒏𝒆 𝒉𝒂𝒔 𝒕𝒐 𝒇𝒊𝒈𝒉𝒕 𝒕𝒉𝒆𝒊𝒓 𝒐𝒘𝒏 𝒃𝒂𝒕𝒕𝒍𝒆, 𝒘𝒉𝒊𝒍𝒆 𝒚𝒐𝒖 𝒄𝒂𝒏 𝒉𝒆𝒍𝒑 𝒃𝒖𝒕 𝒚𝒐𝒖 𝒄𝒂𝒏𝒏𝒐𝒕 𝒇𝒊𝒈𝒉𝒕 𝒊𝒕 𝒇𝒐𝒓 𝒕𝒉𝒆𝒎. 
𝙄𝙩'𝙨 𝙣𝙤𝙩 𝙮𝙤𝙪𝙧 𝙟𝙤𝙗 𝙩𝙤 𝙝𝙚𝙖𝙡 𝙙𝙖𝙢𝙖𝙜𝙚𝙙 𝙥𝙚𝙤𝙥𝙡𝙚.

रविवार, १ ऑक्टोबर, २०२३

स्वतःसाठी बदलताना भाग 6

#स्वतःसाठी_बदलताना_भाग६ (गौरीहर्षल)

आपल्या जवळची अशी काही माणसं असतात, 
ज्यांना आपण मनापासून जवळचं मानत असतो. 
कधी कधी ते अचानक वेगळे वागतात, जे अनपेक्षित असतं. मग मात्र आपण दुखावले जातो. 
त्या गोष्टीचा स्वतःला नको तेवढा त्रास करून घेतो. 
आपल्याला त्यांच्याकडून माफी मागण्याची अपेक्षा असते आणि त्यांना मात्र स्वतःचं वागणं चुकीचं वाटत नसतं. 
अशावेळी स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा ती व्यक्ती, ते नातं कुठल्याही अपेक्षेशिवाय मागे सारत पुढे जाण्यातच शहाणपणा असतो. 
"𝗥𝗲𝗹𝗶𝗲𝘃𝗲 𝘆𝗼𝘂𝗿𝘀𝗲𝗹𝗳" 𝚋𝚢 𝚖𝚊𝚔𝚒𝚗𝚐 𝚙𝚎𝚊𝚌𝚎 𝚠𝚒𝚝𝚑 𝚝𝚑𝚎 𝚙𝚊𝚜𝚝, 𝚊𝚗𝚍 𝚝𝚊𝚔𝚒𝚗𝚐 𝚝𝚑𝚎 𝚛𝚒𝚐𝚑𝚝 𝚌𝚑𝚘𝚒𝚌𝚎!
𝐂𝐥𝐨𝐬𝐮𝐫𝐞 𝐢𝐬 𝐦𝐨𝐯𝐢𝐧𝐠 𝐨𝐧 𝐰𝐢𝐭𝐡𝐨𝐮𝐭 𝐚𝐧𝐲 𝐞𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐚𝐭𝐢𝐨𝐧𝐬 𝐟𝐫𝐨𝐦 𝐭𝐡𝐞𝐦. 
ᴛʜᴇ ᴄʟᴏsᴜʀᴇ ɪs ʏᴏᴜʀ ᴄʜᴏɪᴄᴇ.

स्वतःसाठी बदलताना भाग 5

#स्वतःसाठी_बदलताना_भाग५ (गौरीहर्षल)

आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचं नातं आपलं स्वतःशी असतं. जर ते नातंच सकस नसेल तर आपण स्वतःच्या बाबतीत योग्य निर्णय कसे घेणार? 
जे प्रेम, जी काळजी आपण इतरांसाठी दाखवतो तीच आधी स्वतःसाठी दाखवावी. स्वतःसोबत वेळ घालवला तर आपल्याला बऱ्याच अशा प्रश्नांची उत्तरे मिळतात,ज्यांची अपेक्षा इतरांकडून असते. 
ज्या क्षणी आपली स्वतःशी ओळख होईल त्या क्षणापासून आपले आयुष्य आपल्याला हवे तसे होऊन जाईल. 
𝑨𝒄𝒄𝒆𝒑𝒕 𝒂𝒏𝒅 𝒍𝒐𝒗𝒆 𝒚𝒐𝒖𝒓𝒔𝒆𝒍𝒇 𝒖𝒏𝒄𝒐𝒏𝒅𝒊𝒕𝒊𝒐𝒏𝒂𝒍𝒍𝒚.
Ⓗ︎Ⓐ︎Ⓟ︎Ⓟ︎Ⓘ︎Ⓝ︎Ⓔ︎Ⓢ︎Ⓢ︎ Ⓑ︎Ⓔ︎Ⓖ︎Ⓘ︎Ⓝ︎Ⓢ︎ Ⓦ︎Ⓘ︎Ⓣ︎Ⓗ︎ Ⓨ︎Ⓞ︎Ⓤ︎.

स्वतःसाठी बदलताना भाग 4

#स्वतःसाठी_बदलताना_भाग४ (गौरीहर्षल)

कुठलेही नवीन काम सुरू करण्यासाठी आधी रिस्क घ्यावी लागते तरच आयुष्यात हवे ते बदल घडू शकतात. 
रिस्क घ्यायची तयारी नसेल तर जे जसे सुरू आहे ते तसेच स्विकारण्याची तयारी ठेवावी. 
यश मिळण्याआधी कित्येकदा अपयशाची चव चाखावी लागते. 
कोणतीही चांगली गोष्ट सहजपणे घडत नाही. 
TᗩKIᑎᘜ ᑎO ᖇIՏK, IՏ Tᕼᗴ ᗷIᘜᘜᗴՏT ᖇIՏK Iᑎ ᒪIᖴᗴ. 
𝐓𝐡𝐞 𝐜𝐡𝐨𝐢𝐜𝐞 𝐢𝐬 𝐲𝐨𝐮𝐫𝐬! 
𝐍𝐨𝐭𝐡𝐢𝐧𝐠 𝐠𝐨𝐨𝐝 𝐞𝐯𝐞𝐫 𝐜𝐨𝐦𝐞𝐬 𝐰𝐢𝐭𝐡𝐨𝐮𝐭 𝐚 𝐥𝐢𝐭𝐭𝐥𝐞 𝐫𝐢𝐬𝐤!

गुरुवार, २८ सप्टेंबर, २०२३

स्वतःसाठी बदलताना भाग 3

#स्वतःसाठी_बदलताना_भाग३ (गौरीहर्षल)

आपण बोलताना नेहमी म्हणतो की, त्यांनी असं करायला हवं होतं, त्यांनी असं बोलायला हवं होतं. पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती काही वेगळीच असते आपण कोणत्या परिस्थितीत काय वागत, बोलत आहोत ह्याचे पूर्ण भान प्रत्येकाला असते. जर एखादी व्यक्ती एखादी गोष्ट बोलत नाही किंवा करत नाही म्हणजेच तिला ती गोष्ट करण्याची इच्छा नाही. 
अशा वेळी आपण आपल्याला हवे ते करावे अन् लोकांना काय हवे ते करू दयावे. कारण कितीही प्रयत्न केला तरी आपण लोकांचं वागणं नाही बदलू शकत. 
𝑺𝒕𝒐𝒑 𝒘𝒂𝒊𝒕𝒊𝒏𝒈 𝒂𝒏𝒅 𝒇𝒊𝒈𝒉𝒕𝒊𝒏𝒈 𝒇𝒐𝒓 𝒑𝒆𝒐𝒑𝒍𝒆 𝒘𝒉𝒐 𝒘𝒐𝒖𝒍𝒅 𝒏𝒐𝒕 𝒄𝒓𝒐𝒔𝒔 𝒂 𝒑𝒖𝒅𝒅𝒍𝒆 𝒇𝒐𝒓 𝒚𝒐𝒖. 
𝑳𝒆𝒕 𝒕𝒉𝒆𝒎 𝒈𝒐. 𝑴𝒐𝒗𝒆 𝒐𝒏. 𝑫𝒐 𝒃𝒆𝒕𝒕𝒆𝒓. 
𝖨𝖿 𝗍𝗁𝖾𝗒 𝗋𝖾𝖺𝗅𝗅𝗒 𝗐𝖺𝗇𝗍𝖾𝖽 𝗍𝗈, 𝗍𝗁𝖾𝗒 𝗐𝗈𝗎𝗅𝖽.



बुधवार, २७ सप्टेंबर, २०२३

स्वतःसाठी बदलताना भाग 2

#स्वतःसाठी_बदलताना_भाग२ (गौरीहर्षल)

एखादे ध्येय गाठण्यासाठी १००वेळा मार्ग बदलावा लागत असेल तर तो नक्कीच बदलावा. 
पण जर ते ध्येय गाठताना घ्यावे लागणारे श्रम तुम्हाला आनंद देत नसतील तर त्यामागे धावण्यात काही अर्थ नाही. 
लोकांना वाटेल की तुम्ही हरलात, पण जी गोष्ट करताना आपल्याला शरीरासोबतच मनाचेही स्वास्थ्य पणाला लावावे लागत असेल अशी गोष्ट न केलेली कधीही योग्यच. 
म्हणून तर,
𝙳𝚘𝚗'𝚝 𝚚𝚞𝚒𝚝 𝚋𝚎𝚌𝚊𝚞𝚜𝚎 𝚒𝚝 𝚒𝚜 𝚑𝚊𝚛𝚍. 
𝚀𝚞𝚒𝚝 𝚘𝚗𝚕𝚢 𝚠𝚑𝚎𝚗 𝚒𝚝 𝚒𝚜𝚗'𝚝 
𝚠𝚘𝚛𝚔𝚒𝚗𝚐 𝚏𝚘𝚛 𝚢𝚘𝚞.

सोमवार, २५ सप्टेंबर, २०२३

स्वतःसाठी बदलताना भाग 1

#स्वतःसाठी_बदलताना_भाग१   (गौरीहर्षल)

 

आपण नेहमी आपल्या सुखी, आनंदी असण्याचा संबंध एखाद्या गोष्टीशी किंवा व्यक्तीशी जोडतो. अन् ते मिळवण्यासाठी जीव तोडून आटापिटा करत राहतो. 

जोपर्यंत आपलं सुख आपला आनंद हा फक्त आपल्या हातात आहे हे आपल्याला समजणार नाही तोपर्यंत समोर असलेलं सुखही दिसणार नाही. 

म्हणून तर,

H͎a͎p͎p͎i͎n͎e͎s͎s͎ i͎s͎ r͎i͎g͎h͎t͎ h͎e͎r͎e͎, r͎i͎g͎h͎t͎ n͎o͎w͎! 


बुधवार, ५ जुलै, २०२३

do something for yourself - 4/365 days of self care

नुकत्याच जॉईन केलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये नोटिफिकेशन येऊन पडली होती. नोटिफिकेशन होती उद्यापासून चालू होणाऱ्या एका ऑनलाईन क्लासची. मुग्धाने नोटिफिकेशन बघताच एक सुस्कारा सोडला. 
क्लास काही फार अवघड अशा विषयांचा नव्हता.पण गेले काही दिवस मुग्धाच्या मनात बऱ्याच गोष्टी घोळत होत्या. त्या गोष्टींवर विचार करत असताना अचानक तिला इंस्टाग्राम वरती या क्लासची जाहिरात दिसली होती. 
आणि सहज करून बघू म्हणून तिने नवऱ्याच्या कानावर ती गोष्ट घातली. 
कोरोना नंतर पहिल्यांदा मुग्धाने नवीन काहीतरी शिकण्याचा विषय काढला होता. त्यामुळे नवरा अर्थातच मनापासून तयार झाला. कारण कोरोनाची दोन वर्ष आणि त्यानंतर मुग्धाचं कारणाशिवाय घराबाहेर पडणं टाळणं सुरू झालं होतं.
 मुलं आणि नवरा या तिघांनाही तिच्या खूप मागे लागावं लागत होतं तेव्हा कुठेही तयार व्हायची.
निदान मागच्या महिन्यापासून नवऱ्याने स्वतःहून जवळच्या लायब्ररीत नाव नोंदवत तिला पुस्तक आणून द्यायला सुरुवात केली होती. पुस्तकांमुळे ती पुन्हा थोडी थोडी माणसात येऊ लागली होती.
आता तर काय रोज दोन तास ऑनलाइन क्लास म्हणजे त्यानिमित्ताने तिला नवीन कोणीतरी भेटेल. आणि ती आपसूकच पहिल्यासारखी घराबाहेर पडायला आनंदाने तयार होईल. मुग्धाच्या नवऱ्याचा केलेला हा विचार किती योग्य  ठरणार होता हे लवकरच कळणार होते. 
दुसऱ्या दिवशी क्लासची वेळ जसजशी जवळ येऊ लागली तसतशी मुग्धाच्या मनात धडधड वाढली. दुसरीकडे मुलांनी मात्र बाबाच्या मदतीने आईसाठी बेडरूमच्याच कोपऱ्यात टेबल सेट केलं होतं. 
हेडफोन, पेन, डायरी सगळी तयारी झाली होती. 
मुग्धाने आजचा पहिला दिवस कसाबसा पूर्ण केला. पण उद्यासाठी मात्र क्लासच्या मॅडमनी अभ्यास सांगितला होता. आणि तो होता स्वतःची ओळख करून देण्याचा. 
स्वतःची ओळख... दिवसभर मुग्धा विचार करत होती. काय आहे माझी ओळख... मुग्धा काळे की स्नेहा नाईक (लग्नानंतरचे नाव) ? 
पण हे फक्त नाव आहे जे मला आईवडील आणि नंतर सासरच्या लोकांनी दिले आहे. 
मग नावा शिवाय माझी ओळख काय आहे? अर्पित, अंकुश ची आई की रजत ची बायको? की कुणाची सून ? मुलगी ? बहिण ? 
ही तर नाती आहेत. आणि ह्या प्रत्येक नात्यामध्ये माझं एक स्वतंत्र अस्तित्व आहे. आणि मला ते आवडतं. 
पण हे सुध्दा खरं आहे की गेले कित्येक दिवस कुणी मला नावाने हाक मारली नाहीये. की कुठलही संबोधन वापरून हाक मारली आहे. कारण कुणाशीच माझा संपर्कच राहिला नाही. 
किती गृहीत धरलं आहे मी स्वतःलाच? 
ह्या आणि अशाच विचारत मुग्धाचा दिवस संपला. 

संध्याकाळी क्लासची वेळ झाली. आज मुग्धा स्वतःहून सगळी तयारी करून लिंक वरून जॉईन झाली. 
सुरुवातीलाच मॅडम नी सगळ्यांना कंफर्टेबल करत सांगितलं की प्रत्येक जण जमेल तशी स्वतःची ओळख करून देणार आहे. सो अजिबात दडपण घेऊ नका. 
हळूहळू एकेक जण बोलू लागले. 

आणि आता मुग्धाचा नंबर आला. 
"येस मुग्धा, आता तू तुझी ओळख करून दे.", मॅडमनी स्क्रीन वर दिसणारे नाव उच्चारत तिला विचारले.

ते वाक्य ऐकताच मुग्धाच्या चेहऱ्यावर हसू आले आणि तिने बोलायला सुरुवात केली. 
" मी कोण आहे हे मी सांगते पण सगळ्यात आधी मला हे सांगायला आवडेल की आत्ता मी खूप खुश आहे. बऱ्याच महिन्यांनी मी एका सामूहिक उपक्रमात सहभागी झाले आहे, बऱ्याच महिन्यांनी मी माझं नाव ऐकलं आहे. आणि सगळ्यांना बघून मला खूप छान वाटत आहे. आपली तशी काही ओळख नाही पण ही फिलिंग की आपण नव्याने नवीन सोबतीसह काही शिकणार आहोत ही भारी आहे. ....." 
आणि मग मुग्धा भरभरून बोलत गेली. 

स्वतःहून स्वतःसाठी उचललेलं एक पाऊल मुग्धाला एक छान कारण देऊन गेलं होतं. आता पुढचा क्लास उत्साहाने पूर्ण करण्यासाठी कुणीही मागे लागण्याची गरज पडणार नव्हती. 

Caring for your body, mind, and spirit is your greatest and grandest responsibility. It's about listening to the needs of your soul and then honoring them.
~Kristi Ling

स्वतःच्या मनाच्या आणि शरीराच्या गरजा ओळखून त्या मान्य करणे ही आपली सगळ्यात पहिली जबाबदारी असते. कधी कधी एक छोटीशी गोष्ट सुद्धा खूप काही छान घडवून आणण्यासाठी उपयोगी ठरते. 
बरोबर ना? 
#do_something_for_yourself
#4/365_days_of_selfcare
#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल

शनिवार, १ जुलै, २०२३

नकारात्मक विचार दूर करण्याचे काही उपाय

नकारात्मक विचार दूर करण्याचे काही उपाय 


"मनस्वास्थ्य" हा सध्याच्या काळात आपल्याला सगळ्यांनाच महत्वाचा असणारा विषय आहे. 


आपण सगळेच हल्ली सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतो. कारण ती काळाची गरज आहे. पण सोशल मीडियावर समोर येणाऱ्या कितीतरी गोष्टींचा प्रभाव आपल्या मनःस्वास्थ्यावर होत असतो. 


त्यातही सगळ्यात जास्त त्रास कुठल्या गोष्टींचा होत असेल तर वेगवेगळ्या पोस्ट वाचून मनात सतत येणाऱ्या नकारात्मक विचारांचा. 


हे नकारात्मक विचार आपल्या मनावर त्यांचा ठसा खूप खोलवर उमटवत असतात. ज्यामुळे कुठे ना कुठे आपल्या दैनंदिन आयुष्यात त्याचे पडसाद उमटत राहतात. 


ह्या नकारात्मक विचारांना प्रयत्नपूर्वक दूर नक्कीच करता येते फक्त त्यासाठी काही साध्या सोप्या टीप्स फॉलो कराव्या लागतात. 

कोणत्या ? त्यावर आपण चर्चा करू. 


1. स्टॉप अँड पॉज मेथड


ज्या ज्या वेळी आपल्याला अस वाटतं की आपण नको त्या विचारांवर जास्त रेंगाळत आहोत. त्या वेळी स्वतःला ऐकू येईल अशा आवाजात स्टॉप असं सांगावं. 

यामुळे काय होतं? 

विचारांची जी मालिका सुरू असते तिच्यात खंड पडतो. 

आणि पुढे लगेच पॉज ही सूचना आपल्याला आपल्या विचारांना दुसऱ्या दिशेने वळवण्यासाठी उपयोगी पडते. 


2. डिलीट बटण दाबा आणि नकारात्मक विचार दूर करा. 


अंधार असलेल्या खोलीत जसे आपण बटण दाबले की दिवा उजळून प्रकाश पसरतो. तसच एक डिलीट बटण आपल्याला आपल्या मनात तयार करायचे आहे. 

ज्या क्षणी नकारात्मक विचार मनात डोकं वर काढत आहे असं आपल्याला जाणवतं. त्या क्षणी डोळे मिटून त्या विचाराला डिलीट करणारे बटण आपल्या मनात आहे अशी कल्पना करायची. 

आणि ठामपणे ते बटण दाबून त्या विचाराला आपल्या मनातून डिलीट करून टाकायचं. 

आणि त्या रिकाम्या झालेल्या जागेला एका नवीन चांगल्या विचाराने भरून टाका. 


3. लिहून मोकळे व्हा. 


जेंव्हा जेंव्हा नकारात्मक भावना अनावर होतात, अशा वेळी त्या कागदावर लिहून काढा. 

ते लिहीत असताना रडू येत असेल तर रडून मोकळं व्हा. 

पण एकदा लिहून झाल्यानंतर काय करायचं माहीत आहे? 

तो कागद फाडून कचरापेटी मध्ये टाका किंवा टॉयलेट मध्ये फ्लश करून टाका. 

मनावरचं ओझं काही प्रमाणात उतरल्याची जाणीव नक्की होईल. 


4. अनफॉलो अँड स्नुज


ही शेवटची पण सगळ्यात महत्वाची टीप…

सोशल मीडियावर वावरताना जी अकाउंट्स त्यावरच्या पोस्ट बघून तुम्हाला तुमची चिडचिड होते आहे अस वाटत. अशी अकाउंट्स तुम्ही अनफॉलो किंवा स्नूज करू शकता. 


शेवटी अजून एक गोष्ट म्हटली जाते की सोशल मीडियाच्या जगात कुणीही आपलं अपयश शेयर करत नाही. 


त्यामुळे जे चकाकत ते सगळं सोनं नसतं हे लक्षात घेत आपण आपल्या मनाचा तोल जाऊ नये म्हणून काळजी घ्यायची. 


वाचक मित्रमैत्रिणींनो ह्या आहेत अगदी बेसिक लेव्हलच्या टिप्स. पण तुमच्याकडे ह्यापेक्षा वेगळ्या काही टिप्स आहेत तर नक्की शेअर करा. 


स्वतःला शोधताना

गौरी हर्षल 

तुमच्या प्रतिक्रिया नक्की द्या. 




गुरुवार, २९ जून, २०२३

नास्तिक

नास्तिक 

"गाडी का थांबवलीस रतन?" लॅपटॉपमध्ये डोकं खुपसून बसलेल्या डॉ. कोरडेनी गाडी थांबवल्याच जाणवलं तस ड्रायव्हरकडे बघण्यासाठी मान वर करत आपल्याच तालात विचारलं. 

पण वर बघितल्यावर त्यांच्या लक्षात आलं की ड्रायव्हर जागेवर नाहीये. आणि गाडीच्या आजूबाजूला प्रचंड गर्दी आहे. 

त्यांनी गाडीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तेंव्हा त्यांच्या लक्षात आलं की ते कधीचेच गाडीतून बाहेर पडले आहेत.  आणि फक्त गाडीतूनच नव्हे तर त्यांच्या शरीरातूनही बाहेर पडले आहेत. 

स्वतःला बसलेल्या धक्क्यातून सावरत त्यांनी आजूबाजूला बघितलं तर आजूबाजूला असलेल्या गर्दीकडे त्यांचं लक्ष गेलं. 

वारीसाठी जाणाऱ्या एका दिंडीतले वारकरी होते ते सगळे गर्दीतले लोक. जसे ते कोरडेंसाठी पूर्णपणे अनोळखी होते तसेच कोरडेही त्यांच्यासाठी पूर्णपणे अनोळखी होते. 
पण आता या क्षणी मात्र ते सगळेजण कोरडेना आणि त्यांच्या ड्रायव्हर ला वाचवण्यासाठी धडपड करत होते. ड्रायव्हर कसा माहीत नाही पण गाडीच्या बाहेर फेकला गेला आणि वाचला होता. पण डॉक्टर मात्र गाडीतच होते. 

काही वेळातच तिथे ऍम्ब्युलन्स आली. एम्ब्युलन्स मधून उतरलेल्या कर्मचाऱ्यांनी दोघांनाही स्ट्रेचरवर घेत एम्ब्युलन्स मध्ये ठेवलं. शरीर एम्ब्युलन्स मध्ये ठेवताच कोरडेही तिकडे ओढले गेले, कदाचित अजून काही बंधन शिल्लक असावे. 

त्या दोघांकडे त्यांचा जीव वाचावा ह्या आशेने बघणाऱ्या वारकऱ्यांच्याकडे जाता जाता कोरडेंच लक्ष गेलं. आणि त्यांना तो प्रसंग आठवला. 

भेटीचीया ओढ लागलीसे डोळा,
वाट हि विरळा दिसे मजला,
लाखो राउळाशी टेकवीला माथा,
देव कुठे माझा शोधू आता,

कुणी पाहिला पाहिला पाहिला हो,
माझा देव कुणी पाहिला..
कुणी पाहिला पाहिला पाहिला हो,
माझा देव कुणी पाहिला..

सावळे विठाई, कान्हाई कृष्णाई
सावळे विठाई, कान्हाई कृष्णाई

गाण्याचे बोल आणि तो आवाज कोरडेंच्या मनात फेर धरून नाचू लागला. अन् ते सगळे चेहरे त्यांना आठवले. 

डॉक्टर कोरडे प्रचंड सुदैवी होते. त्यांच्या घरात एकाच वेळी चार पिढ्या गुण्यागोविंदाने नांदत होत्या. 

डॉक्टर सोडले तर सगळेजण रूढार्थाने देवभोळे असे होते. 
डॉक्टरांना मात्र ते सगळे  अजिबात आवडत नव्हते. आताही त्यांना तो प्रसंग आठवला जेव्हा त्यांनी घरातल्या सगळ्यांना गाण्याच्या बोलावर हातात टाळ घेऊन वारकरी वेशात नाचणाऱ्या नातवाकडे कौतुकाने बघताना बघितले होते. 

कोरडें चे आईवडील, बायको आणि  डॉक्टर मुलगा सूनही नातवाला कौतुकाने बघत होते. हे बघून त्यांचं डोकं फिरलं होतं. 

सगळ्यांवर चिडत त्यांनी नातवाच्या हातात असलेली टाळ फेकून दिली होती. कुठल्याही देवावर त्यांना इतका राग का आहे हे खुद्द त्यांनाही कळत नव्हतं. 

डॉक्टर रूढार्थाने जरी स्वतःला नास्तिक म्हणवून घेत असले तरी त्यांची त्यांच्या कामावर प्रचंड निष्ठा होती. अडल्या नडल्या लोकांना मदत करण्यासाठी त्यांना वेळ काळ कशाचेही भान उरत नसे. 

आणि त्यांच्या ह्याच गुणाबद्दल घरात आणि आसपासही सगळ्यांना आदर होता. अन् त्यामुळेच त्यांचे आईवडीलही त्यांचा देवावरचा राग सहन करत असत. कारण त्यांना त्या रागाचं मूळ कळलं होतं. 

एखाद्या पेशंटला इच्छा असूनही वाचवता आलं नाही की डॉक्टर हतबल होऊन चिडत असत. प्रॅक्टीसला इतकी वर्ष होऊनही अजूनही त्या गोष्टींचा त्यांच्या मनाला त्रास होत असे. 

सगळ्यात आधी उपचारासाठी दवाखान्यात आणण्याऐवजी देवळात, मशिदीत किंवा इतर कुठेतरी खेटे घालत बसलेल्या नातेवाईकांमुळे पेशंटला योग्य वेळी उपचार न मिळून तो दगावला की डॉक्टरांचा राग देवावर निघत असे. ते म्हणत असत की तुमचा देव ह्या लोकांना दवाखान्यात जा अशी बुद्धी का नाही देत?  मग लोक पेशंटला काही झालं की डॉक्टर वर का चिडतात? देवावर का नाही चिडत? 

आताही हा प्रसंग आठवताना त्यांना राग येत होता. मनातून वेगवेगळ्या गोष्टी समोर येत होत्या. 

पण अचानकच त्यांना आपल्या जवळ कुणीतरी उभं असल्याची जाणीव झाली. त्यांनी मान वळवून बघितलं तर एक व्यक्ती त्यांच्याकडे प्रेमळ हसत बघत होती. 

आतापर्यंत कोरडेंना आपल्या अवस्थेची जाणीव झाली होती. त्यामुळे ही व्यक्ती आपल्याला कशी काय बघू शकतेय ह्याच त्यांना आश्चर्य वाटलं. 

त्यांनी प्रश्नार्थक चेहऱ्याने त्या व्यक्तीकडे बघितलं. 
त्या व्यक्तीने हसून अगदी मित्रत्वाने बोलायला सुरुवात केली. 

" काय मग डॉक्टर कस वाटतंय? खूप सगळे प्रश्न आहेत न मनात? कळत नाहीये हे सगळं अस अचानक कसं घडलं? मी कोण आहे? तुम्हाला कसा काय बघू शकतो? वगैरे वगैरे...अहं .... असं अजिबात समजू नका की मी तुमची खिल्ली उडवतोय. मी तर तुमच्या मदतीसाठी इथे आलो आहे. तसा मी सगळ्यांनाच मदत करण्यासाठी येतो पण तुम्ही जरा जास्तच स्पेशल आहात. " 

"कस काय? अहो तुम्ही प्रत्यक्ष देव आहात कित्येक लोकांसाठी. तुम्हाला कितीही चीड आली तरी तुम्ही स्वतः आमचं प्रतिरूप आहात पृथ्वीवर. हो बरोबर ऐकलत... मीच तो ज्याचा तुम्हाला खूप राग येतो. पण मला तुमचा राग त्यामागची भावना कळते , जशी ती तुमच्या आईवडिलांना पण कळली आहे. पण कसं आहे न डॉक्टर प्रत्येक माणूस हा त्याचं नशीब घेऊन जन्माला येतो. ते कसं घडवायचं हे त्यांचा हातात असतं. आमच्यासारखे तुम्हीही फक्त निमित्तमात्र ठरता. " 

डॉक्टर मन लावून ऐकत होते. 

" आता त्या दिवशीचच उदाहरण घ्या. त्या दिवशी तुमचे दोन पेशंट दगावले. पहिला पेशंट बऱ्याच उंचावरून पडून गेला आणि दुसरा सुद्धा एक्सिडेंट होता. पण त्या मागची गोष्ट तुम्हाला माहित नव्हती डॉक्टर. पहिल्या पेशंट ने आईवडिलांना, बायकोला जीव नकोसा केला होता. तो गेल्यावर तुम्हाला जे वाटलं न की ह्याचं घर उघड्यावर पडेल तस काही होणार नव्हतं. कारण त्याच्यामागे उरलेले ते तिघे आणि अजून दोन निष्पाप जीव रोज अक्षरशः जीव मुठीत धरून जगत होते. त्या जीवांनी भलेही कधीच त्याच्या मृत्यूची कामना केली नसेल पण त्या जीवांना होणारा त्रास नियतीला दिसत होता. त्यामुळेच त्या दिवशी तो दारू पिऊन इकडे तिकडे भरकटत असताना ही गोष्ट घडली आणि तो मृत्यूच्या दारात पोहोचला. पाच जीवांच्या पुढे त्याला मिळालेली शिक्षा तशी कमीच आहे. पटलं न? " 

डॉक्टरांनी होकारार्थी मान डोलावली. 

"आणि दुसरा? त्याने स्वतःच्या आनंदासाठी बऱ्याच मुलींना फसवले होते. त्यापैकी दोघींनी ट्रकसमोर येऊन जीव दिला होता. त्या बिचाऱ्या अकाली गेल्या. आणि तुम्हाला वाटलं की त्याला नुकतंच नोकरी लागली होती, लग्न ठरलं होतं. पण डॉक्टर त्या मुलीचाही जीव वाचलाच. कारण ह्या मुलाच्या आईवडिलांना फक्त तो मुलगा आहे म्हणून त्याचे सगळे गुन्हे माफ करायची सवयच लागली होती. त्यांनाही शिक्षा होणं गरजेचं होतं. असे कित्येक आईवडील आहेत जे आपल्या अपत्याची मग तो मुलगा असो वा मुलगी चूक लपवतात ,त्यांना पाठीशी घालतात. पण त्यामुळे दुसऱ्या कुणाला त्रास होतो आहे हे त्यांना समजूनही ते दुर्लक्ष करतात. एखाद्या जीवाला हेतुपुरस्सर त्रास देणे मग तो मानसिक असो किंवा शारीरिक हे सगळ्यात मोठं पापच आहे न डॉक्टर? " 

इतका वेळ शांतपणे ऐकणारे डॉक्टर बोलू लागले, " बरोबर आहे तुमचं... मला फक्त नाण्याची एकच बाजू माहीत असायची त्यामुळे मी कित्येकदा तुमच्यावर आगपाखड केली. पण आज कळतंय की जाणारा जाण्यामागे बरीच कारणं असू शकतात. मी चुकलो , रागाच्या भरात खूपच चुकीचा वागलो. आईवडिलांना देवाचं करताना त्रास दिला. तुम्ही मला हवी ती शिक्षा देऊ शकता. " कोरडेंचे डोळे पाणावले होते. 

" हं शिक्षा तर होणार आहेच तुम्हाला. ",  ते हसत हसत म्हणाले. तस कोरडेना आश्चर्य वाटलं. 

" तुम्हाला परत पृथ्वीवर जायचं आहे, अजून बरच काम शिल्लक आहे. आमची एक छोटी मैत्रीण तुम्ही वाचावं म्हणून आम्हाला साकडं घालत आहे. ", अस म्हणत त्यांनी कोरडेना एक दृश्य दाखवलं. 

त्या दृश्यातले चेहरे ओळखू येताच कोरडेना आठवलं की त्या मुलीच्या आईला त्यांच्याकडे आणलं होतं. आणि तिचं दोन महिन्यांनी ऑपरेशन ठरलं होतं. ती मुलगी देवांना पाण्यात ठेवून डॉक्टर वाचूदे म्हणजे ते माझ्या आईला वाचवतील अस सांगत होती. ते बघून कोरडेना जाणीव झाली की घरातील लोकांपेक्षा जास्त बाहेर लोकांना त्यांची किती गरज आहे. 

आणि ते आठवताच कोरडेना घरच्यांची आठवण झाली. 

"आहेत आहेत ते सगळे इथेच ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आहेत. पण एक वाईट बातमी आहे बुवा तुमच्यासाठी... तुम्हाला बरं वाटलं की बरेच नवस फेडावे लागणार आहेत." अस म्हणत ते हसू लागले. 

"आता तर माझी कुठलेही नवस फेडायची तयारी आहे देवा, तुम्ही फक्त माझं काम माझ्याकडून नीट करून घ्या एवढं एकच मागणं. आणि माझे पाय जमिनीवर राहूदे. " डॉक्टर म्हणाले. 

" तथास्तु" अस कानावर पडत असतानाच कोरडेना वेगाने खेचलं गेल्याची जाणीव झाली. 

मोठयाने श्वास घेत त्यांनी डोळे उघडले तसे आजूबाजूला असलेल्या चेहऱ्यावर उमटलेले हसू बघून त्याना आपण परत आपल्या शरीरात आलो आहोत ह्याची जाणीव झाली. 

नर्सने बाहेर जाऊन सांगितलं तसं त्यांच्या कानावर आवाज आला, " देवा, पांडुरंगा वाचवलंस रे बाबा. ", ते ऐकून डॉक्टर कोपऱ्यात उभं राहून त्यांच्याकडे बघत डोळे मिचकवणाऱ्या त्या व्यक्तीला बघून हसले. 

सगळे जण त्या दिशेने बघू लागले तर तिथे भिंतीवर असलेल्या फोटोशिवाय काहीच नव्हतं. 

पण तो तिथेच होता सदैव. मनापासून आस्तिक असलेल्या नास्तिकासाठी. 

मंडळी पूजा , कर्मकांड करणारी प्रत्येक व्यक्ती मनापासून ते करत असतेच असे नाही तसेच आयुष्यभर मंदिराची पायरीही न चढलेली व्यक्ती नास्तिक असते अस ही नाही. 

माणसाचं कर्म आणि त्यांचे परिणाम , माणसाचं भविष्य घडवत असतात. 

मग तुम्ही देवावर विश्वास ठेवा किंवा नका ठेऊ. मनाने, विचाराने आणि कर्माने तुम्ही काय आहात हे तुम्हाला माहीत असतं. आणि त्यालाही . 

बाकी कर्मसिद्धांत स्पष्ट करतोच. Always and forever. 

#स्वतःला शोधताना 
#गौरीहर्षल

गुरुवार, २२ जून, २०२३

मी आणि करुणात्रिपदी

मी आणि करुणात्रिपदी
मागच्या एका वर्षापूर्वी विश्वास कथेमधील काही भाग एकीने ढापला होता. नंतर मी ते फेसबुक वर शेअर केलं आणि त्यावर तिने काउंटर लेख लिहिला.
तो वाचून माझ्या एका मैत्रिणीने सांगितलं की तू तिने लिहिलेलं नीट वाच. तिने तुझ्या लेखनाचा अभ्यास तुझ्यापेक्षा जास्त केला आहे. तुला तुझ्या देवाकडून संकेत आहे त्यात.
मी शांतपणे ते लिहिलेलं वाचलं. आणि जाणवलं की काय मिस केलं मी.
त्यात तिने लिहिलं होतं की दत्त गुरूंना ही म्हणजे मी गौरी हर्षल काय स्वतःची प्रॉपर्टी समजते का? तेंव्हा मी ते खूप हलक्यात घेतलं होतं.
पण आज मला त्या व्यक्तीला थँक्यू म्हणायचं आहे.
का? अरे नकळत का होईना तिच्यामुळे मला हे जाणवलं की माझा मित्र , माझा दत्त माझ्या आयुष्यात लेखनात किती भिनलेला आहे.
हा प्रसंग माझ्या आयुष्यात खूप काही छान घडवून गेला.
माझं दत्ताशी नातं इतकं घट्ट झालं की आता काही मागण्याची गरजच पडत नाही.
दत्त माझी प्रॉपर्टी नाहीये पण माझ्या सगळ्या जन्मांच्या पाप-पुण्याच्या प्रॉपर्टीचा हिशोब प्रत्यक्ष त्याने आपल्या हातात घेतला आहे. बास अजून काय पाहिजे.
वाईटातून चांगलं घडतं म्हणतात ते असं...
पुढे करुणा त्रिपदीचे अनुभव, मग अध्ययन वर्ग जे दत्त नवरात्र सुरू होतं त्या दिवशीच सुरू झाले. आणि आजही सुरू आहेत.

जितक्या लोकांनी मला करुणा त्रिपदी वरून नकळत टोमणे मारले  त्या पेक्षा किती तरी जास्त लोकांनी करुणा त्रिपदीचा अनुभव मला येऊन सांगितला.

आजही जेव्हा कुणी इरेला पेटून करुणा त्रिपदी आणि दत्तगुरु ह्या विषयांवरून उगाचच खेचायला किंवा तुच्छ लेखण्यासाठी येतं. तेंव्हा जाणीव होते की ते माझ्याकडून जे काही करून घेत आहेत. ते अतिशय उत्तम आहे.

माझ्यामुळे, माझ्या वर्गांमुळे, लेखनामुळे पोटशूळ उठणाऱ्या प्रत्येकाला एक सोपा उपाय सांगते " करुणा त्रिपदी ऐका"

थोरल्या महाराजांनी ती लिहिलीय तेच मुळात आपल्या चुकांचे परिमार्जन करण्यासाठी.

कुणास ठाऊक तुमचीही पोटदुखी बरी होईल.

बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु!!!

तो आहे सदैव माझ्या पाठीशी नव्हे माझ्या सोबत...माझ्यातल्या लेकराचा हात घट्ट धरून तो मला चालवत आहे योग्य दिशेने ... योग्य मार्गावर ...
अन् हे तो सांगतो प्रत्येक गुरुवारी कुठल्या ना कुठल्या रूपात.
22जून 2023

स्वतःला शोधताना
गौरीहर्षल

 

मंगळवार, २० जून, २०२३

प्लेलिस्ट भाग 1 - गौरी हर्षल

प्लेलिस्ट भाग 1 


छोटी सी कहानी से, बारिशों के पानी से

सारी वादी भर गयी

ना जाने क्यों, दिल भर गया

ना जाने क्यों, आँख भर गयी


कानात हेडफोन आणि बसच्या खिडकीमधून बाहेर

दूर कुठेतरी नभापलीकडे रेंगाळलेली नजर...

ती तिच्याच विश्वात दंग...


काय विचार करत असेल ती? 

ह्या विचारात संपणारा बाकीच्या प्रवाशांचा रोजचा प्रवास...


मुळात ती अशीच होती आपल्यात रमलेली. 

जगाचं भान राखाव अस काही नव्हतच जगाकडे ...


स्वतःशीच संवाद साधत ती तो प्रवास 

भरभरून एन्जॉय करत राहायची. 

इतर कुणी आपल्याला बघत आहे, 

हे तिच्या खिजगणतीतही नसायचं. 


ती आपली तिच्या वेगाने तिचं घर ते क्लिनिक,

अन् क्लिनिक ते घर हा प्रवास तिच्या प्लेलिस्ट सोबत करायची. 


रोज वेगळी प्लेलिस्ट रोजच्या मुडशी जोडलेली. 


आज तर प्लेलिस्ट मधले आवडते सोबती बरोबर होते म्हणजे कारण ही खास होतं. 

छोटी सी कहानी से... पासून सुरू झालेली प्लेलिस्ट विचारांच्या सोबत वाऱ्याशी गप्पा मारत होती. 


नकळतच ओल्या होणाऱ्या डोळ्यांच्या कडांवर एखादा चुकार थेंब रेंगाळत होता. त्याला ही तसच स्वीकारत ती ओठांवर मात्र हसू खेळवत होती. 


मनात हळूहळू भूतकाळाच्या तुकड्यातून पझल पूर्ण होत होते. एकेक पीस अलगद आपापल्या जागी येत होता. 


आणि एका क्षणी पझल पूर्ण झालं... तिच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली जणू काही लहान मुलाला खूप हट्ट केल्यानंतर हवी असलेली गोष्ट मिळालेली आहे. 


तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. इतका की आसपासच्या लोकांना त्याची जाणीव झाली. 

आणि तोच आनंद वाटत ती आपलं सामान सावरत उठली.  समोरच्या दरवाजाच्या दिशेने निघाली. 

 

गुणगुणत बसमधून उत्साहाने उतरलेल्या तिला बघताना प्रत्येकालाच काहीतरी गवसले. 


छोटी सी कहानी से, बारिशों के पानी से

सारी वादी भर गयी

ना जाने क्यों, दिल भर गया

ना जाने क्यों, आँख भर गयी...

तिचे ओठ अजुनही गुणगुणत होते. 


नेहमीची पायवाट सुद्धा आज नकळतच तिला आपली वाटली. 


रोज समोरून येणाऱ्या काकूंना चिडून उत्तर देणारी ती आज स्वतःहून हसतच म्हणाली, "आज मी लवकर आले बर का काकू …", आणि काकुंचे डोळे अजून मोठे होण्याआधी जिन्याने वर सटकली. 


घरासमोर येऊन तिने खिशातून चावी काढली. आणि हसऱ्या चेहऱ्याने घरात पाय टाकला. 


आज किती दिवसांनी असं येणाऱ्या तिला बघून घरानेही हसऱ्या पसाऱ्याने तिचं स्वागत केल. 


फोनवरची प्लेलिस्ट अलेक्साला लावायला सांगत तिने हळूच एकेक गोष्ट जागेवर ठेवायला सुरुवात केली. 


पुढच्या काही मिनिटात घर अगदी व्यवस्थित झालं. हसरा पसारा आता पसारा नव्हता. तर हॅप्पी प्लेस झाला होता. 


कॉफी मग हातात घेऊन तिने तिच्या हॅप्पी प्लेसकडे अभिमानाने बघितलं. 


मघाशी छोटीसी कहानी म्हणणारी प्लेलिस्ट आता… कित्येकदा लूप वर वाजून शेवटाकडे आली होती. 


पण त्या गाण्याने तिला तिच्या मनात सुरू झालेल्या वादळाला शांत करायला मदत केली होती. 



क्रमशः 

गौरी हर्षल


रविवार, १८ जून, २०२३

one day at a time - 3-365 days of self care

"आई, मी येतेय ह्या वीकेंडला. आणि माझा प्रोग्रॅम फिक्स आहे बरं का! आधी मी शॉपिंगसाठी जाणार आहे, तिथून एक बुक लॉन्च आहे, त्या नंतर वैदू सोबत लंच आणि मग दुपारी चारच्या आसपास घरी येणार. अँड देन....", शची नॉनस्टॉप बोलत होती. 

"अग हो , हो थांब, जरा श्वास घे. ", तिला थांबवत रीमा म्हणजे तिची आई म्हणाली, " तू घरी येणार आहेस की तुझ्या पी ए ला तुझ्या अपॉइंटमेंट सांगत आहेस? ", रीमाने थोडं रागातच विचारलं. 

"उप्स, साॅरी आई , एक्ससाईटमेंट मध्ये मीच बोलत राहिले. बट आय प्रॉमिस संध्याकाळ नंतर कुठेच जाणार नाहीये. घरीच असेन तुझ्या आणि बाबासोबत. ", शचीच्या आवाजात तिला तिची चूक कळली आहे हे जाणवत होतं. 

"ओके , ठीक आहे, बघू. संध्याकाळी तरी किती वेळ तुझा पाय घरात टिकतो ते. ", रीमा हसतच म्हणाली. 
दोघी मायलेकींनी संभाषण आवरतं घेत फोन ठेवला. 

ठरल्याप्रमाणे शची शनिवारी सकाळीच लवकर घरी आली. 
घरात पाऊल टाकत नाही तोच तिच्या बॉसचा फोन आला. आणि त्यावर बोलतच तिने नाश्ता केला. आवरून आईबाबांच्या गळ्यात पडून सॉरी म्हणतच तिने घर सोडलं. 

मग पुढचा भरगच्च कार्यक्रम पार पाडत वैदू आणि तिने लंच केलं. आणि चार ऐवजी पाच वाजता शची घरी आली. 

घरी आल्यावर ती इतकी थकली होती की कुणाशी काही न बोलता तिने सरळ बेडरूम गाठलं. आणि पुढच्या दहा मिनिटात स्वारी चंद्रावर पोहोचली. 

संध्याकाळ तशीच सरली. तिन्हीसांजेला झोपून राहू नये म्हणून रीमाने तिला उठवलं आणि हातात चहाचा कप दिला. 

गॅलरीत झोक्यावर बसून ती सूर्यास्त बघत होती. बघता बघता तिने शेजारी बसलेल्या रीमाच्या खांद्यावर हलकेच डोकं टेकवल. 

"काय झालं पिल्ल्या?", रीमाने तिच्या कृतीतूनच ओळखलं होतं की काहीतरी बिनसलं आहे. 

"आई, अस वाटत आहे की मी नुसती धावतेय. इट्स एन अन्एन्डींग रेस. आणि कितीही धावा काहीतरी मिस होतच आहे. बघ ना आज मी आणि वैदू बुक लॉन्चला गेलो होतो. तर समीर आणि आद्या म्युझिक कॉन्सर्ट मध्ये होते. त्यांना अस वाटल त्यांनी बुक लॉन्च मिस केला आणि आम्ही म्युझिक कॉन्सर्ट. कळत नाही काय चुकत आहे. " शचीने आपल्या मनात आलेलं आईला सांगून टाकलं. 

" तुमचा गोंधळ कुठे होतो आहे माहीत आहे का शची ? तुम्ही सगळ्या गोष्टी मिळवायच्या मागे धावत आहात. आणि त्या धडपडीत हातात जे आहे त्याचा आनंद घ्यायचाच राहून जातोय. वास्तविक पाहता तुम्ही ज्या ठिकाणी नाही जाऊ शकत त्याचे अपडेट पुन्हा सोशल मीडियावर मिळतातच तुम्हाला. रादर तुमची पिढी लकी आहे त्या बाबतीत. मिस होईल असं काही नाहीये. पण तुमच्या प्रायोरिटी ठरत नाहीयेत. आणि तुम्हाला अस वाटत की काही तरी मिस होतंय. पण प्रत्यक्षात आता नाही तर थोड्या वेळाने तरी तुम्हाला सगळं एक्सैसिबल आहे. ", रीमा म्हणाली. 

"खरंय आई तुझं. ही धावाधाव कुठेतरी थांबायला हवी. सुकून शोधायचा असेल तर थांबणे गरजेचे आहे.
 ते म्हणतात न , 
One day at a time,
One step at a time, 
One breath at a time... 

#one_day_at_a_time 
#3/365_days_of_selfcare
#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल 
 

मंगळवार, ६ जून, २०२३

learn from experience...2-365 days of self care

"आर्यन, झालं की नाही तुझं आवरून? उशीर होत आहे आपल्याला.", असं म्हणतच शिला आर्यनच्या खोलीत आल्या.
आर्यन खिडकीजवळ बसून टेबलवर असलेल्या त्या फोटोंकडे एकटक बघत होता. आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं.

त्याची अवस्था बघून शिलाला सुद्धा भरून आलं. आणि चार वर्षांपूर्वीचा आर्यन समोर उभा राहिला. पडलेले खांदे, रडवेला चेहरा आणि कोलमडून गेलेलं मन अशा अवस्थेतच आर्यन पीजी मधून घरी आला होता.

स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी शक्य ते प्रयत्न आर्यन करत होता. त्यासाठी तो वाट्टेल ते कष्टही घेत होता.
पण एकामागे एक संकटांची मालिका सुरू झाली. आणि कुठेतरी आर्यनचा आत्मविश्वास डळमळीत झाला.

शीला आणि रमेश मात्र ह्या काळात खंबीरपणे त्याच्या पाठीमागे उभे राहिले. रमेशची त्याच्या बिझनेस मध्ये पैसे गुंतवण्याची तयारी असूनही आर्यनने त्याला नकार दिला.

नकार देताना आर्यनने त्या दोघांनाही सांगितलं की , "माझ्या बुद्धिमत्तेच्या आणि कष्टाच्या जोरावर मला काही तरी करून दाखवायचे आहे. जर ह्या वेळीही  मला यश मिळालं नाही तर मी नक्की तुमची मदत घेईन. पण मला पुन्हा एकदा प्रयत्न करून बघू द्या. "
त्या दोघांनाही आर्यन ला पुन्हा उभं राहिलेलं बघायचं होतंच. त्यामुळे त्यांनी त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याची साथ द्यायचे ठरवले.

आणि रात्रंदिवस एक करून आर्यन ने घेतलेल्या कष्टाचं चीज झालं. त्याचा बिझनेस हळूहळू का होईना मार्गी लागला.

पण म्हणतात न, पडत्या काळात आपल्याला आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांपैकी कोण आपले खरे हितचिंतक आहेत हे लक्षात येतं. आर्यन ही काही वेगळा नव्हता. त्यानेही हा अनुभव घेतला.

आयुष्याच्या शाळेने त्याला असे काही अनुभव दिले की तो त्यातून तावून सुलाखून बाहेर पडला.

आणि आजच तो दिवस होता, आर्यनला एके ठिकाणी तरुण मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलवलं होते.

मागे वळून पाहताना आज आर्यन ला जाणवलं होतं की अनुभव नावाचा हा गुरू त्याचं आयुष्य किती समृद्ध करून गेला होता.

आर्यन ने तर घेतला होता त्याच्या अनुभवातून योग्य तो धडा म्हणून तर त्याच्या प्रयत्नांना यश मिळालं.  पण आपण त्या दृष्टिकोनातून लक्ष देतो का?

वाचक मित्रमैत्रिणींनो , प्रत्येक अनुभव मग तो चांगला असो किंवा वाईट आपल्याला काही तरी शिकवत असतो.

आणि जोपर्यंत आपण त्या अनुभवातून योग्य तो धडा घेत नाही,  तोपर्यंत आपल्याला त्याच त्याच पद्धतीचे अनुभव येतात.
नकळतच आपण म्हणतो ना की सारखं सारखं हे असच माझ्यासोबत का घडतं?

तर ती नियतीची योजना असते आपण त्या अनुभवातून योग्य तो धडा घेत #स्वतःला_घडवण्यासाठी.
अशावेळी खाली दिलेला सुविचार लक्षात ठेवायचा...
𝑫𝒐𝒏𝒕 𝒃𝒆 𝒂𝒇𝒓𝒂𝒊𝒅 𝒕𝒐 𝒔𝒕𝒂𝒓𝒕 𝒐𝒗𝒆𝒓.
𝑻𝒉𝒊𝒔 𝒕𝒊𝒎𝒆 𝒚𝒐𝒖'𝒓𝒆 𝒏𝒐𝒕 𝒔𝒕𝒂𝒓𝒕𝒊𝒏𝒈 𝒇𝒓𝒐𝒎 𝒔𝒄𝒓𝒂𝒕𝒄𝒉,
𝒚𝒐𝒖'𝒓𝒆 𝒔𝒕𝒂𝒓𝒕𝒊𝒏𝒈 𝒇𝒓𝒐𝒎 𝒆𝒙𝒑𝒆𝒓𝒊𝒆𝒏𝒄𝒆.
#learn_from_experience
#2/365_days_of_selfcare
#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल 



रविवार, ४ जून, २०२३

feel it heal it...from 1-365 days of self care

"मनीषा अजून किती दिवस धावणार आहेस तू या सगळ्या गोष्टींपासून? कधी ना कधीतरी तुला सगळ्या गोष्टींना फेस करावेच लागणार आहे. चार लोकांमध्ये जाऊन मिसळावे लागणार आहे. पुन्हा एकदा जॉब वर जावे लागणार आहे. पण तू आहेस की तुला फक्त घरात एका कोपऱ्यात बसून राहायचं आहे. असं केल्याने कसं चालेल मनीषा?" मनीषाची आई मनीषाला समजावण्यासाठी प्रयत्न करत होती.
मनीषा वय वर्ष 30 च्या आसपास.
असं काय घडलं होतं मनीषाच्या आयुष्यात? की ती सगळ्या गोष्टी सोडून घरात बसून रहात होती.
मनीषाचं वय बघता तुम्हाला एक साधारण अंदाज आला असेल.
तर मनीषा नुकतीच एका विचित्र नात्यातून सुटली होती.

ओळखीने ती त्या व्यक्तीच्या आणि ती व्यक्ती तिच्या संपर्कात आले होते. बघता बघता दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. लग्नाचा निर्णय घ्यायची वेळ आली तसं मात्र समोरची व्यक्ती टाळाटाळ करू लागली.

मनीषा ने काही गोष्टी तिच्या मोठ्या बहिणीच्या कानावर घातल्या होत्या. त्यामुळे ही सुद्धा गोष्ट बहिणीला सांगितली. बहिणीने तिच्या नवऱ्याच्या मदतीने त्या मुलाची चौकशी केली. तेव्हा लक्षात आलं की, त्याचं ऑलरेडी लग्न झालेल आहे. बायको गावाकडे असते आणि हा शहरात. मनीषा ही त्याच्यासाठी फक्त सोय होती.

बहिणीच्या नवऱ्याने आपल्या पातळीवरती प्रयत्न करत पुरावे जमा केले. त्या सगळ्या गोष्टी त्याने मनीषा आणि त्या मुलाच्या समोर एकत्रच ठेवल्या. कारण नुसतं सांगून मनिषाला पटलं नसतच. 

एकीकडे जिथे मनीषाला धक्का बसला तिथे दुसरीकडे तो मुलगा मात्र मनीषा माझ्या मागे लागली होती असं म्हणू लागला .
त्याचं ते सगळं बोलणं ऐकल्यानंतर मनीषाने तिथेच त्याला आपल्यातलं नातं संपलं असं सांगून जायला सांगितलं.  तो रागा रागातच तडतडत निघून गेला.

त्यानंतर त्या दोघांचा एकमेकांशी काहीही संपर्क उरला नाही. रादर मनीषाच्या बहिणीने आणि तिच्या नवऱ्याने तशी काळजी घेतली. पण मानसिकरित्या मनीषावर जे आघात व्हायचे होते ते झालेच होते. दुखावलं जाणं, विश्वासघात होणं या सगळ्या गोष्टी कुठेतरी तिच्या मनावर खोलवर परिणाम करून गेल्या.

परिणामी गेले काही दिवस मनीषा सुट्टी घेऊन घरात बसून राहिली होती. तिचं हे नातं फारशा कोणाला माहित नसलं तरी लोक काय म्हणतील?कुणाला काय वाटेल? ह्या गोष्टींचा विचार तिच्या मनात पिंगा घालू लागला. घरात आता सगळ्यांना माहीत होतं. पण मनीषाची काही चूक नसल्याने सगळ्यांनी तिला समजून घेण्याचा पवित्र घेतला होता. तिने त्या नात्यातून, त्याच्या कटू आठवणींमधून बाहेर पडावं म्हणून सगळेजण प्रयत्न करत होते. पण मुख्य प्रयत्न तर मनीषानेच करण अपेक्षित होतं. आणि ती मात्र कुठेतरी अपराधीपणा घेऊन बसली होती.

वाचक मित्रमैत्रिणींनो , आपल्या बाबतीत अशा अनेक घटना घडत असतात. ज्यामध्ये बऱ्याचदा समोरची व्यक्ती चूक झाल्यानंतर सगळा ब्लेम आपल्यावर टाकून स्वतः नामानिराळी होते.

आपण मात्र त्या आरोपाला नकळतच स्वीकारतो आणि मग मानसिक पातळीवर त्रास होऊ लागतो. आपल्याला त्रास होऊ लागल्यावर मात्र आपली सगळ्यात पहिली भूमिका असते दुर्लक्ष करण्याची.

आपण आजारपण किंवा दुखणे मग ते शारीरिक असो किंवा मानसिक त्यांना टाळण्याचा प्रयत्न सगळ्यात आधी करतो. कारण आजूबाजूला तेच बघितलेले असते, सल्लेही तसेच मिळालेले असतात.

पण एका पॉइंट नंतर मात्र गोष्टी अवघड होतात....
अशा वेळी काय करायचं? ते खाली दिलेलं आहे...
Sit with it. sit with it. sit with it.
Even though you want to run.
Even when it's heavy and difficult.
Even though you are not quite sure of the way through.
Healing happens by feeling... Dr. Rebecca Ray

कितीही त्रास होत असला तरी ती भावना पूर्णपणे काढून टाकण्यासाठी आधी आपल्याला ती स्वीकारावी लागते.
- मला ह्या xyz व्यक्तीच्या ह्या वागण्याचा त्रास होतो आहे.
- कितीही पळून जावसं वाटलं तरी त्या गोष्टीला सामोरे जावे...आज नाही गेलो तर भविष्यात पुन्हा कधीतरी घूम फिरके ती गोष्ट कुठल्या ना कुठल्या रूपात समोर येणार हे नक्की... मग आजच सुरुवात करायची.
- गोष्टी अवघड असतात अशक्य नाही... त्यामुळे आपण प्रयत्न केले तर 99 टक्के त्रासातून सुटका होऊ शकते.
सो आधी प्रयत्न तर करू....
वरच्या quote मध्ये शेवटचं वाक्य आहे healing happens by feeling... ह्या वाक्यात सोप्या भाषेत सांगितल आहे.
"शारीरिक दुखण्यातून बरं व्हायचं असेल तर जसं कडू औषध, इतर ट्रीटमेंट घ्याव्या लागतात. तसच मानसिक पातळीवर गोष्टी बदलायच्या असतील तर त्या स्वीकारून त्यातून मार्ग काढण्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करणे गरजेचे असते."

जाता जाता एकच सांगते , त्रासदायक प्रसंग, घटना, आठवणी, व्यक्ती ह्यांना टाळू नका. जितकं टाळण्याचा प्रयत्न कराल तितका जास्त त्रास होईल. त्यापेक्षा त्या गोष्टींवर नीट विचार करून ती भावना समजून घेत त्यावर उपाय शोधून तो त्रास कायमचा दूर करण्यासाठी प्रयत्न करा.

𝙵𝚎𝚎𝚕 𝚒𝚝. 𝚃𝚑𝚎 𝚝𝚑𝚒𝚗𝚐 𝚝𝚑𝚊𝚝 𝚢𝚘𝚞 𝚍𝚘𝚗𝚝 𝚠𝚊𝚗𝚝 𝚝𝚘 𝚏𝚎𝚎𝚕. 𝙵𝚎𝚎𝚕 𝚒𝚝. 𝙰𝚗𝚍 𝚋𝚎 𝚏𝚛𝚎𝚎...

#feel_it_heal_it
#1/365_days_of_selfcare
#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल 


बुधवार, ३१ मे, २०२३

विश्वास हा ग्रुप आणि त्याची संकल्पना काय आहे?

#विश्वास हा ग्रुप आणि त्याची संकल्पना काय आहे? 


आधी एक शॉर्ट इंट्रोडक्शन माझं 
नमस्कार मंडळी, 
मी गौरी हर्षल कुलकर्णी रा. अहमदनगर
व्यवसायाने मी क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आणि समुपदेशक आहे.  पण त्यापेक्षा जास्त मी ओळखली जाते ती माझ्या विश्वास, कालाय तस्मै नमः आणि इतर काही अध्यात्मिक रहस्यकथामुळे. 
"स्वतःला शोधताना - गौरी हर्षल" ह्या नावाने माझं फेसबुक पेज आहे आणि ब्लॉग ही.  ब्लॉग लिंक शेयर केली आहेच. त्यावर माझं लेखन वाचता येईल. 
अध्यात्मिक मार्गदर्शन ही गोष्ट मात्र माझ्या आयुष्यात दत्तगुरुंच्या कृपेने आलेली आहे. त्यामुळे त्याचं सगळ श्रेय त्यांचं आहे. 
आणि ते त्यांच्याच इच्छेने घडत. 

************************************************

विश्वास हा ग्रुप आणि उपक्रम हे अध्यात्म आणि विज्ञान ह्या दोन्हींच्या माध्यमातून सातत्याने काहीतरी देण्यासाठी राबवले जात आहेत. 
त्यासाठी हे काही वाचावं लागेल. 

दत्त जयंती 7 डिसेंबर 2022
http://gauriharshal.blogspot.com/2022/12/blog-post.html

************************************
सकाळ आणि रात्रीच्या टास्क सहित आहे त्यामुळे काळजीपूर्वक वाचा.
बऱ्याच जणांच्या मनात शंका आहेत की आपण या ग्रुप मध्ये ऍड तर झालोय पण आता नेमकं काय काय आपल्याला करावे लागणार आहे? 
 सो सगळ्याना एक सांगते सीट बॅक अँड रिलॅक्स...
आपल्याला काहीही अवघड अतर्क्य असं करायला जायचं नाहीये . उलट आपल्याकडून ज्या काही गोष्टी करायच्या राहून गेल्या आहेत, निसटल्या आहेत त्या करण्याचा प्रयत्न करायचा आहे. 
 रोजचं आयुष्य,रोजच्या गोष्टी आहेतच आणि असणारच फक्त त्या सोबतीने असं काहीतरी शोधायचं जे जगण्यासाठी टॉनिक ठरेल.  
असं काय असू शकतं की जे तुमच्याकडेच आहे पण इतकी वर्ष तुम्हाला सापडल नाही आहे? 
 अशा बऱ्याच गोष्टी आहेत हळूहळू प्रत्येकाला त्या गोष्टी सापडतील हे नक्की.  पण एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे आपण सगळे एका समांतर मार्गाने प्रवास करत आहोत. कोणी थोडं पुढे आहे, कोणी थोडं मागे आहे. 
 पण प्रत्येकाचा प्रवास हा त्याचे/ तिचे  वेगळे अनुभव घेऊन आतापर्यंत आला होता आणि पुढेही येणार आहे. 

इथून फक्त एक महत्त्वाचा बदल हा असेल की तुम्हाला आयुष्याच्या जास्तीत जास्त चांगल्या क्षणांची शिदोरी सोबत कशी ठेवायची हे कळेल. आणि त्यामुळे गोष्टी सुकर होतील. 

 मी आहेच मदतीसाठी.  तुम्ही कधीही कुठल्याही शंकेसाठी इथे ग्रुप वर संपर्क साधू शकता. 

*** सकाळचे टास्क ***
रोज सकाळी उठल्या नंतर जागीच सुखासनात बसायचं आहे. "पाच" मिनिटे डोळे मिटून शांत बसायचं. 
ज्यांना येत असेल त्यांनी डोळ्यासमोर हाताची ओंजळ धरून खालील श्लोक म्हणायचा आहे. त्यानंतर दोन्ही हात एकमेकावर चोळून चेहऱ्यावरून फिरवायचे. 
कराग्रे वसते लक्ष्मीः करमध्ये सरस्वती।
करमूले तु गोविन्दः प्रभाते करदर्शनम्॥
(आधीपासून करत असाल तर अतिशय उत्तम) 

*** दात घासत असाल न तेंव्हा आजचा दिवस छान असणार, सगळी कामं मी ठरवली तसं करण्याचा प्रयत्न करणार अस जमेल तितक्या वेळा स्वतः ला सांगा.

झालं की इथे मेंशन करा. उठल्या उठल्या करायचं आहे त्यामुळे सकाळी लगेचच हे होण अपेक्षित आहे हा नियम पाळण्याचा प्रयत्न करा.

*** रात्रीचा टास्क ***
एक छोटीशी गोष्ट करण्याचा प्रयत्न करायचा आहे.
रोज रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरात घडलेल्या कमीत कमी तीन चांगल्या गोष्टी, घटना किंवा भेटलेल्या व्यक्ती आठवायच्या आहेत.
घरात कुणासोबत हे करायचं असेल तर अतिशय उत्तम. संवाद वाढतो आणि मुख्य म्हणजे फक्त चांगलं काय घडलं ते आठवायच आहे. 
(कुणी बोलण्यास नसेल तर लिहून ठेवायचं, फोनमध्ये सुद्धा लिहू शकता. )

धावपळ आणि गडबडीत दिवस सरून
सुरू झाली आहे रात्र
मनाच्या कप्प्यात जपून ठेवूया 
दिवसातील तीन सकारात्मक घटनांचे चित्र

झोपण्याआधी करायचं आहे सो त्यानंतर फोन हातात घेऊन बसायच नाही हा नियम पाळण्याचा प्रयत्न करा. 
तुम्ही झोपण्याआधी टास्क करायचा आहे. त्यानंतर शक्यतो फोन बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करा.

आणि हो सगळ्यांना एक विनंती वजा सूचना आहे की इथले टास्क बाहेर शेयर करू नका. त्याचा काही उपयोग होणार नाही. 
का? कारण माझी पद्धत वेगळी आहे. त्यामागे माझी साधना आणि दत्तगुरुंची इच्छा असते. 
मी ज्यांची जबाबदारी घेते त्यांनाच त्याचा फायदा होतो. ही त्यांनी 🙏 केलेली सोय आहे. - गौरी हर्षल 

(करुणात्रिपदी अध्ययन वर्ग, घोरकष्टोद्धरण स्तोत्र अध्ययन वर्ग आणि स्वतःला घडवण्यासाठी हा 21 दिवसांचा कोर्स, त्याशिवाय वैयक्तिक मार्गदर्शन हे मात्र माफक फी घेऊन केले जातात.)

बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु!!!
#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल 


गुरुवार, २५ मे, २०२३

कर्मसिद्धांत first draft 16 may 2023

#कर्मसिद्धांत first draft 16 may 2023 
आज मुहुर्तच उत्तम होता. सगळे  एकाच ठिकाणी उपस्थित होते. आणि समोर होता एक जन समुदाय ज्याने पृथ्वीवर देवांच नाव घेऊन श्रेष्ठत्व स्वतःकडे घेतलं होतं. 
पृथ्वीवर त्यांचा कार्यकाल संपल्यामुळे आता ते पुढच्या प्रवासात होते. पण इथे आज मात्र ते सगळे एका विशिष्ट हेतूने हजर असण्याच कारण होतं. 
बऱ्याच गहन विषयांवर त्यांनी खाली असताना हिरीरीने जी मते मांडली होती आणि लोकांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन समाजात रुजवली होती त्याचीच आज इथे चर्चा सुरू होती. 

एकीकडे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आपलं मत मांडत होते. तर तिथेच दुसरीकडे थोडसं बाजूला काही लहान मुलं खेळत होती. त्या मुलांना तिथे बघून तसं सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं होतं पण कुणाची काही बोलायची हिंमत नव्हती. अन् ती मुले ही त्यांच्या खेळात मग्न होती.  

पण काही क्षणानंतर मात्र हळूहळू वातावरण तापू लागले. त्यांच्यापैकी एक गौरवर्णीय व्यक्तीसदृश आकृती तिच्या वागण्याचं समर्थन करीत तिने कसं सगळं योग्य केलं हे सांगू लागली. त्याच गर्दीत काही जण त्याचे पृथ्वीवरील समर्थक ही होते. चर्चा सुरू असल्याने बरोबर ठराविक मुद्द्याला त्यांनाही त्या गोष्टी पुन्हा आठवल्या आणि ते पुन्हा त्याचं समर्थन करू लागले. 

समोरच्या उच्चासनावर बसलेल्या सगळ्यांच्या मागे बसून कुणीतरी ही चर्चा अजून तरी शांतपणे ऐकत होते. 

पण जसजसं त्या सगळ्यांनी पुन्हा आपल्या खऱ्या वृत्तीत प्रवेश केला.... 
तसे मागे बसलेल्या त्यांनी आपले डोळे उघडले आणि हलकेच हसत त्या लहान मुलांकडे नजर टाकली. त्यांची तिथे नजर पडताच एक मोठा धुळीचा लोट उठला. सगळ्यांचं लक्ष तिकडे वेधलं गेलं. आता तिथे फक्त घोंघवणारे धुळीचं वादळ होतं. मघाशी खेळणारी ती लहान मुलं कुठेच नव्हती. 

त्या तावातावाने बोलणाऱ्या गौरवर्णीय व्यक्तीवर मात्र या गोष्टीचा काही प्रभाव पडला नव्हता. ती अजूनच त्वेषाने तिचे मुद्दे मांडत होती. हळूहळू ते वादळ एका भोवऱ्यात बदललं आणि त्यातून क्षणभरासाठी एका छोट्याशा मुलीचा हसरा चेहरा डोकावला. 

तो चेहरा बघताच गर्दीच्या लक्षात आलं की ती मुलगी इतका वेळ तिथे खेळत होती. वादळ आता गर्दीच्या दिशेने वेगाने सरकत होते. ते जसे गर्दीच्या समोर आले तशी गर्दी दुतर्फा उभी राहिली. गर्दीच्या एका टोकाला वादळ तर दुसऱ्या टोकाला ती व्यक्ती होती. 
वादळ पुढे पुढे जात त्या व्यक्तिपासून काही अंतरावर थबकले पण थांबले नक्कीच नाही. 

वादळाला जागं केलेल्या त्या व्यक्तीने गालातल्या गालात हसत डोळे मिटून हुंकार भरला. तसं वादळाच्या पायऱ्या करत एक तरुण मुलगी खाली उतरून आली. तिच्या चेहऱ्यावर रागीट भाव होते. तीन पायऱ्या वरच थांबून तिने त्या गौरवर्णीय व्यक्तीवर आपली नजर टाकली. तिची नजर पडताच तो नखशिखांत हादरला. त्याच्या डोळ्यात मूर्तिमंत भीती बघताच तिच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली. 

आणि ती फक्त एकच शब्द बोलली "कर्मसिद्धांत"...

ती पुढे काही बोलणार इतक्यात तिला बोलवणारे ते जागी उठून उभे राहिले. 
त्याचं उठून उभे राहणं कुणालाही अपेक्षित नव्हतं त्यामुळे सगळेच उठले. 

ज्यांना माहीत होतं ते कोण आहेत आणि ज्यांना त्यांना बघूनच लक्षात आलं होतं की हे कुणीतरी महत्वाचं व्यक्तिमत्व आहे... सगळेच उभे राहिले. 

ती मात्र अजूनही रागात धुमसत होती. तिने त्यांच्याकडे बघितलं आणि त्यांनी तिला स्वतःच्या दिशेने येण्याची खूण केली. 
ती खूण बघताच क्षणार्धात वादळ हवेत विरले आणि त्या जागी एक तीन- साडेतीन वर्षे वयाची लहान मुलगी होती. 
सगळ्यांकडे आपल्या मोठ्या मोठ्या डोळ्यांनी बघत ती त्यांच्या दिशेने गेली. आणि त्यांनी पुढे केलेलं बोट हाताने धरून चालू लागली. 
जणू काही सगळ्या गोष्टींचा तिच्याशी काही संबंधच नव्हता. 

पण इथे त्या गौरवर्णीय व्यक्ती च्या डोळ्यासमोर मात्र काजवे चमकले. त्या मुलीच्या चेहऱ्यात त्याला त्या सगळ्या ओळखी अनोळखी स्त्रियांचे चेहरे दिसले ज्यांना त्याच्यामुळे त्रास झाला होता. 

आणि सगळ्यात शेवटी त्याला ती म्हणाली तो शब्द आठवला आणि त्याचं ते अस्तित्वही थरथरले....कर्मसिद्धांत....

कर्मसिद्धांत त्याला कधी ना कधी गाठणार होताच पण इतक्या लवकर ती वेळ येईल याची कल्पना त्याला नक्कीच नव्हती. 

#गौरीहर्षल #स्वतःला_शोधताना १६.५.२०२३

ह्याची कथा, दीर्घ कथा काही होईल की नाही माहीत नाही पण एक एपिसोड म्हणून वाचून घ्या. 🙈

सोमवार, २२ मे, २०२३

Quote of the day 20 डोन्ट रश,जे घडायचं आहे ते नक्की घडणार

#जे_घडायचं_आहे_ते_नक्की_घडणार #डोन्ट_रश 
"काय करतेस केया? ",बाल्कनीत कुंड्याजवळ बसलेल्या केयाला तिच्या आजीने विचारलं. 
"आजी बघ ना, हे झाड काही उगवून आलं नाही अजून.", केयाने उदास होऊन उत्तर दिलं. 
आजी गालात हसत तिच्याजवळ आली. शेजारी असलेल्या खुर्चीवर बसत तिने केयाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. केया अजूनही तिच्या छोट्याशा कुंडीकडे बघत होती. 
"केयु, अग दोनच दिवस झाले आहेत तू ते बी म्हणजे सिड्स त्या कुंडीत लावून. इतक्या लवकर कसं काय झाड येईल बाळा? " आजी म्हणाली. 
"अग पण मग मी नेक्स्ट वीकमध्ये टीचर ना काय दाखवू? ", केयाने प्रश्न विचारला. 
तिच्या जागी तिची काळजी स्वाभाविक होती. सुट्टी आहे म्हणून शाळेतून मुलांना हा प्रोजेक्ट सांगितला होता. त्याचा प्राथमिक उद्देश अर्थातच मुलांना कशात तरी गुंतवून ठेवण्याचा होता. 
केया कुतूहलापोटी रोज वाट बघत बसत होती. फोनवर मैत्रिणींशी सुद्धा त्यावरच बोलणं होत होतं. इनमिन 5 वर्ष वय पण त्या रोपट्याबद्दल अशी चर्चा सुरू असायची की घरातले ऐकत बसायचे. 
तरी बरं की त्यांच्या टीचर ने लवकर उगवतील अशीच झाडं लावायची अस वॉट्सॲपवर पालकांना सांगितलं होतं. कारण मुलांना सेपरेट लिस्ट दिली होती ज्यावर त्यांना नोंद करायची होती. 
केयाची एकूणच जडणघडण आईबाबा, आणि दोन्ही कडचे आजीआजोबा ह्यांच्या तालमीत उत्तम सुरू होती. 
त्यातच केयाच्या सध्याच्या शाळेत मीटिंग असल्याने त्यांना बोलावलं होतं.  
        मुलं आपापली रोपं घेऊन शाळेत हजर झाली होती. कुणी खूप खुश होतं तर कुणी थोडस उदास. सगळ्या टीचर मुलांशी बोलत त्यांना चियर अप करत होत्या. थोड्या वेळात सगळ्या मुलांना त्या उपक्रमासाठी आईबाबांकडूनच सर्टिफिकेट दिली गेली. आणि त्यांना खेळण्यासाठी सोडलं. मुलं आनंदाने गेली. 

टीचर आईबाबांशी बोलू लागल्या. 
" दरवर्षी प्रत्येक बॅच मधील मुलांना हा प्रोजेक्ट आम्ही एका विशिष्ट हेतूने देतो. तो म्हणजे मुलं एक रोपट वाढवताना आतून कशी घडत आहेत हे पालकांच्या लक्षात येईल. मुलांसाठी जसं ते रोप , त्याची वाढ हे महत्वाचे विषय आहेत, तसच मुलं आणि त्यांची वाढ हे पालकांसाठी असतात. सगळ्याच पालकांना आपल्या मुलांना बेस्ट द्यायची इच्छा असते. पण इथे प्रत्येक पाल्याची गरज वेगवेगळी असते. 
जसं कुणाकडे रोप जास्त लवकर वाढलं तर कुणाकडे कमी. का? कारण प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने आधी त्या रोपाला काय हवं ते दिलं आणि मग त्या रोपाला काय हवंय हे लक्षात आल्यावर बदल केले. 
जर मुलांच्या बाबतीत ही गोष्ट आधीच लक्षात आली तर तुमचा आणि मुलांचाच पुढचा प्रवास सोपा होईल. 
मला माहित आहे की आता तुम्ही सगळे जण मुलांसाठी पुढच्या दृष्टीने शाळा शोधत आहात. त्याच अनुषंगाने ही गोष्ट आहे. 
तुम्हाला सगळ्यांनाही मुलांचं निरीक्षण केलं तर त्यांच्यासाठी काय योग्य आहे हे कळेलच.
𝑫𝒐𝒏'𝒕 𝒕𝒓𝒚 𝒕𝒐 𝒓𝒖𝒔𝒉 𝒕𝒉𝒆 𝒕𝒉𝒊𝒏𝒈𝒔 𝒕𝒉𝒂𝒕 𝒏𝒆𝒆𝒅 𝒕𝒊𝒎𝒆 𝒕𝒐 𝒈𝒓𝒐𝒘. " असं म्हणत टीचरने आपलं बोलणं संपवलं. 
केयाच्या आईबाबांना तर कळल होत की त्यांना काय करायचं आहे पण तुम्हाला काय कळल? 
𝑫𝒐𝒏'𝒕 𝒕𝒓𝒚 𝒕𝒐 𝒓𝒖𝒔𝒉 𝒕𝒉𝒆 𝒕𝒉𝒊𝒏𝒈𝒔 𝒕𝒉𝒂𝒕 𝒏𝒆𝒆𝒅 𝒕𝒊𝒎𝒆 𝒕𝒐 𝒈𝒓𝒐𝒘.
ही गोष्ट आहे आपल्या सगळ्यांचीच ... कशी काय? आपण म्हणतो न अती घाई संकटात नेई. काही गोष्टी घडून येण्यासाठी वेळ द्यावा लागतो तेंव्हाच त्या गोष्टींचा योग्य परिणाम साधला जातो.  
आपण बऱ्याचदा बऱ्याच गोष्टींमध्ये असच करतो ना? जसं की मैत्री, ओळख, नाते आणि अजूनही बरच काही. 
हल्ली तर फार पटकन आपल्या अशा झटपट यश मिळवून देणाऱ्या गोष्टींवर विश्वास बसतो. 
कुणीतरी म्हणत आहे की 4 दिवस xyz गोष्ट केली आणि त्याला/तिला फायदा झाला. इथे आपल्यालाही वाटत की झट की पट जर आयुष्यात भारी, मस्त mindblowing बदल घडत आहेत तर मी सातत्याने प्रयत्न करायची काय गरज आहे? 
जाता जाता इतकचं सांगेन की, दोन मिनिटात तर मॅगी पण शिजत नाही मग आयुष्यात बदल कसे घडतील? 
नवीन आणि जास्त काळ टिकणारे असे काही बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न ही जास्त काळ करावे लागणार. 
आता आपण स्वतः स्वतःची काळजी घ्यायची की दुसरं कुणी माझ्यासाठी काहीतरी करेल म्हणून वाट बघत बसायची हा #ज्याचा_त्याचा_प्रश्न. 
 हा आहे आजचा #quote_of_the_day20 कसा वाटला नक्की सांगा. 
#quote_of_the_day 20
#स्वतःला_शोधताना #गौरीहर्षल 

गुरुवार, १८ मे, २०२३

गीतसप्तक भाग १

#गीतसप्तक
"हमको मन की शक्ति देना"
आजचं पहिलं गीत आहे "हमको मन की शक्ति देना" . 
शाळेची प्रार्थना होती आमच्या. सुरुवातीला फारसा अर्थही कळत नव्हता. पण आज वळून पाहताना समजतंय की प्रार्थनेतूनही खूप काही शिकवायचं होतं शाळेला.  
"हमको मन की शक्ति देना, मन विजय करें
दूसरों की जय से पहले, खुद को जय करें "
दुसऱ्यांच्या आधी स्वतःला एक माणूस म्हणून स्विकारतानाच स्वतःच स्वतःला आदर देणं. जे खूप जास्त गरजेचं आहे पण नकळतच विसरतो आपण . समाजातल्या सो कॉल्ड चौकटीत बसण्यासाठी आपल्यालाच इतकी घाई झालेली असते की स्वतःच्या कितीतरी चांगल्या गोष्टी आपण नाकारत राहतो. मग ते दिसणं असुदे किंवा वागणं. नंतर हळूहळू आपल्या लक्षातही येतं पण कितीजण पुन्हा स्वतःला मनापासून साद घालतात? 
"भेदभाव अपने दिल से, साफ़ कर सकें 
दोस्तों से भूल हो तो, माफ़ कर सकें 
झूठ से बचे रहें, सच का दम भरें "
हल्ली तर ह्या ओळींची ओळख पदोपदी पटते. सगळ्याच क्षेत्रात कळत- नकळत होत असणारे भेदभाव. आपल्या ही वागण्यातून उमटतच असतात. सुशिक्षित असूनही काही चुकीच्या जुन्या आणि नविनही गोष्टी आपण करतो.  जिवलग मित्र, आप्त, नातेवाईक ह्यांच्या चुका तर कुणीच सहजासहजी विसरू शकत नाही त्यावर समर्थनही केलं जातं. हे खरं तर जमायला हवं. जुन्या आठवणी उगाळत बसण्याने जितका त्रास आपल्याला होतो तो दुसऱ्या कुणालाही होत नसतो. म्हणजे ते सगळं विसरून जाऊन एका परीने आपण स्वतःलाच सुखी करणार असतो हो की नाही? 
ह्या कडव्यातली शेवटची ओळ "झूठ से बचे ऱहे, सच का दम भरे" हे तर सगळ्यात अवघड काम झाले आहे हल्ली. त्यात फेसबुक, वॉट्सअप्प तर मदतच करत असतात आपलं खोटं बोललेलं अजून छान पध्दतीने खऱ्या रुपात मांडण्यात. खरं बोलणं, वागणं खरंच इतकं अशक्य झाले आहे का? थोडासा प्रयत्न तर करून बघायलाच हवा. 
"मुश्किलें पड़ें तो हम पे, इतना कर्म कर 
साथ दें तो धर्म का, चलें तो धर्म पर 
खुद पे हौसला रहे, बदी से ना डरें"
कुठल्याही परिस्थितीत योग्य मार्गावरच चालण्याची आम्हाला ताकद दे आणि स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नको असंच ह्या ओळी सांगतात. पण बऱ्याचदा असं होतं अडचणी आल्या की
आपला सगळ्यात आधी स्वतःवरचा विश्वास उडतो. वस्तुस्थिती ही असते की आपल्याशिवाय आपली 100% मदत करणारं ह्या जगात कुणीही नसतं. आपण जर स्वतःची मदत करण्यासाठी सज्ज झालो तर जगात कुठेही जा कसलाही प्रॉब्लेम येऊदे आपण त्याला खंबीरपणे तोंड देऊ शकतो. 
तात्पर्य काय तर आत्मविश्वास असणारा , इतरांच्याही आधी स्वतःला आदर देणारा असा एक खरा माणूस होण्यासाठी मनाला तयार केले पाहिजे.  एक साधीशी प्रार्थना योग्य वयात कानावर पडत राहिली तर नक्कीच बदल घडवू शकते. 
#गौरीहर्षल   ||शुभं भवतु||

गुरुवार, ११ मे, २०२३

स्मरणगामी

"अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी
अशक्य ही शक्य करतील स्वामी"
फक्त दोनच ओळी मनात घोळवत ती शांतपणे खिडकीतून बाहेर बघत बसली होती. 
आणि अचानक तिला जाणवलं की आपल्या डोळ्यासमोर एक वेगळं दृश्य साकार होतंय. ते काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न जितका तिचा मेंदू करत होता, तितक्याच उत्कटतेने तिच्या मनाला आपण काय अनुभवत आहोत ह्याची खात्री पटत होती. 
क्षणार्धात मेंदूकडून येणाऱ्या सगळ्या सूचना धुडकावून लावत तिने मनाचा कौल स्विकारला. आणि डोळ्यांनी ते दृश्य तिच्यासमोर पूर्ण करून उभं केलं. 
खिडकीतून बाहेर बघताना दिसणाऱ्या आकाशाच्या , ढगांच्या बॅकग्राऊंडवर ते डोळे उमटले होते. 
ज्या डोळ्यांना बघितलं की माणसाची सगळी दुखः, त्रास ,यातना एका क्षणात नाहीशा होतील असे ते डोळे. 

ती त्या दृश्याकडे भान हरपून पाहत होती. 
नकळतच तिला जाणीव झाली की ही अशी गोष्ट आहे जी अनुभवण्यासाठी माणसं जंगजंग पछाडतात आणि त्यांनी आपल्यासारख्या वेडीसाठी ती गोष्ट सहजसाध्य करून टाकली का? कारण मनात अजूनही अशक्य ही शक्य करतील स्वामी सुरूच होतं. 

 हल्ली तिला सवयच लागली होती काहीही घडो चांगल किंवा वाईट तोंडात हे वाक्य हमखास येणार. आणि समोरच्या व्यक्तीने समजा चिडून विचारलं की काय सुरू आहे हे तुझं??? की मग तोंडातून स्पष्टीकरण म्हणून पुन्हा त्याच दोन्ही ओळी बाहेर पडणार... कोणत्या??? अहो त्या काय पुढे लिहिलेल्या 
"अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी
अशक्य ही शक्य करतील स्वामी" 
तसं बघायला गेलं तर त्यात चुकीचं काही नव्हतच. जगात काहीही घडतं ते त्यांच्याच इच्छेने. 
कधी कधी वाईट प्रसंगात आपण प्रचंड त्रागा करतो , त्यांना वाट्टेल ते बोलतो पण काही दिवसानंतर अचानक आपल्याला जाणीव होते की तो वाईट प्रसंग घडणही गरजेचं होतं. जर तो प्रसंग घडला नसता तर आज जे चांगलं घडत आहे ते घडलं नसतं. 
मला तर हमखास असा अनुभव येतो म्हणून तर मी आपली माझ्या मित्राशी मनापासून भांडते कारण मला पूर्ण खात्री आहे जगात कुणीही माझ्या बाजूने असो किंवा नसो तो मात्र असणार आहे. तसाच कायम after all this time.... Always म्हणत. 
बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु!!! ११ मे २०२३
#गुरूवार #अनुभवाच्या_पोतडीतून #संकल्पदिन
#स्वतःला_शोधताना #गौरीहर्षल 

शनिवार, ८ एप्रिल, २०२३

स्वतःसाठी बदलताना लेख 18

#स्वतःसाठी_बदलताना लेख 18 
आपण काय शिकलो? (थॉट अँड बिहेवियर पॅटर्न )
लहानपणी आपल्या शाळेच्या पुस्तकांमध्ये धड्याच्या शेवटी सारांश असायचा.त्याला वरती नाव असायचं आपण काय शिकलो? आणि पूर्ण धड्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांची नोंदणी तिथे असायची. 

समुपदेशन घेण्यासाठी येणाऱ्या लोकांच्या समस्येत खूपदा हा प्रश्न समोर येतो की "मॅडम सतत तेच तेच अनुभव का येतात?" 

आणि जेंव्हा सरासरी सगळ्या केसेसचा विचार केला जातो तेंव्हा 
त्यामध्ये लक्षात यावा इतका कॉमन पॉइंट हा असतो की बऱ्याच जणांनी आयुष्यात अक्षरशः भयंकर अशा पद्धतीची परिस्थिती अनुभवलेली असते. पण तरीही त्यातून जे शिकायचं असतं ते ते  शिकलेले नसतात त्यामुळे पुन्हा पुन्हा त्याच त्याच चुका केल्या जातात. 
 चुका कशा प्रकारच्या? तर पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी मिळवण्यासाठी प्रयत्न करायचं.  पुन्हा पुन्हा त्याच त्याच लोकांना आपल्या आयुष्यात महत्त्वाची जागा देत आपल्या आयुष्यातील निर्णयांमध्ये त्यांना सहभागी करून घ्यायचं. 
 हे सगळं पुन्हा पुन्हा घडत असल्यामुळे ज्या गोष्टी त्यांनी भूतकाळात अनुभवलेल्या असतात, ज्या संकटांचा सामना केलेला असतो, ते पुन्हा कुठल्या ना कुठल्या वस्तू, व्यक्ती, घटना त्यांच्या रूपात त्यांच्यासमोर येऊन उभे राहतात. 
 आणि मग माणसं विचारतात हे सगळं परत परत का घडतंय? यावर एक साधं सोप्प उत्तर असतं....कारण पहिल्यांदा जेव्हा ती गोष्ट तुमच्याबरोबर घडली तेव्हा तिच्यामधून जे शिकायचं होतं ते तुम्ही शिकलाच नाहीत. 
म्हणून परिस्थिती तुमच्याबरोबर त्याच त्याच गोष्टी कोणामार्फत तरी  घडवून आणत राहते. 
 आणि त्याला बऱ्याच अंशी तुमचं स्वतःचं वागणं हे कारणीभूत असतं.  त्याच त्याच चुका रिपीट होतात म्हणून त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा घडत राहतात. 

 यावर उपाय काय? आपण शांतपणे आपल्या आतापर्यंतच्या आयुष्याचं निरीक्षण करायचं, त्यामध्ये घडलेल्या चांगल्या वाईट घटनांची विभागणी करायची. 

चांगल्या घटना म्हणजे त्या की ज्या घटनेमध्ये तुम्ही तावून सुलखून बाहेर पडलात. 
 तुम्हाला तुमची आपली जवळची माणसं लक्षात आली, ओळखू आली.  आणि त्यातून तुम्ही योग्य तो धडा शिकून पुन्हा त्या गोष्टी करणं टाळलं. 

 अन् वाईट गोष्टी अशा की ज्या पुन्हा पुन्हा तुमच्याबरोबर घडत राहिल्या. 
 तुमच्या एक लक्षात येईल की ह्या गोष्टींमध्ये प्रसंग कॉमन असतील.  प्रसंगांमध्ये जसं साम्य आहे तसंच त्या घटना घडत असताना तुमच्या संपर्कात आलेली माणसेही आधीच्या माणसांशी साधर्म्य दाखवणारे असतात. किंवा बऱ्याचदा आधीचीच माणसे परत आलेली असतात. 
 ***मग यामधून आपल्याला काय शिकायचं असतं? 
तर अशा घटनांमधून आपल्याला हे शिकायचं आहे की हा पॅटर्न जर सतत रिपीट होत आहे तर आपल्याला आपल्या आयुष्यात काही योग्य आणि ठोस बदल करण्याची गरज आहे. 
 हे बदल कसे आणि कुठल्या प्रकारचे असतात , हे तुम्ही स्वतः ठरवू शकता.  त्यासाठी तुम्हाला दुसऱ्या कोणाच्याही मार्गदर्शनाची गरज असेल तर नक्की घ्या. पण ती व्यक्ती तज्ञ असावी. 
आणि आधी वर सांगितल्याप्रमाणे ते प्रसंग त्यावेळेस घडलेल्या घटना डिटेल्स मध्ये आठवा. 
 त्या वेळेला तुमच्या आजूबाजूला नव्याने , पहिल्यांदा तुम्हाला मदत करणारी माणसं कोण होती? आणि मदत करतोय असं दाखवणारी माणसं कोण होती? ते बघा आणि त्यानुसार गोष्टी ठरवा. 
3 एप्रिल 2023 
#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल 

सोमवार, ३ एप्रिल, २०२३

वॉलपेपर, चालढकल आणि ती

#वॉलपेपर_चालढकल_आणि_ती 
आपल्या फोनचा वॉलपेपर आपण सगळे अगदी मनापासून निवडत असतो न? मीही ठेवते. माझा सापडेल तुम्हाला इमेजमध्ये. 
त्या दिवशी मात्र गंमत झाली. रिक्षामधून येत असताना मी कामामुळे फोनवर होते. थोड्या वेळाने माझ्या शेजारी एक मुलगी येऊन बसली.कॉलेजकन्या होती.
 माझा फोन सतत फ्लॅश होत असल्याने वॉलपेपर दिसत होता. तिचं एकदा लक्ष गेलं कदाचित नंतर मात्र ती प्रयत्न करून काय आहे हे वाचण्याचा प्रयत्न करू लागली. आणि शेवटी एकदाचं तिला ते जमलं. हुश्श... मग विजयी मुद्रेने माझ्याकडे बघितलं आणि अचानक म्हणाली,"हे मस्तच आहे, मला आवडलं."
मी त्या प्रतिक्रियेने गोंधळून विचारलं की,"काय आवडलं वॉलपेपर?"होकारार्थी मान हलली. मग सुरू झाल्या गप्पा. 
"ताई, हे अस सतत समोर राहणार म्हणून ठेवलं आहेस न? ", ती 
"हो , त्यामुळे काम करताना आळस, चाल ढकल होऊ लागली की लगेच लक्षात येतं. आणि मन पुन्हा कामाकडे वळवता येतं. ", मी 
"मी पण आता असच करेन. लवकरच माझ्या लास्ट सेमीस्टर चे पेपर आहेत. पण एकदा फोन हातात घेतला की नुसता टाईमपास होत राहतो. आता असा काही वॉलपेपर ठेवते की अभ्यास करायची आठवण झाली पाहिजे. ", ती 
" मस्तच , पण नुसता वॉलपेपर ठेऊन होईल का? त्याशिवाय तुला ठरवून अभ्यासाला बसावं लागेल. फोनचा वापर कमी करावा लागेल. वेळापत्रक केलं तर जास्त सोपं जाईल. रोजच्या दिवसाचं कर आणि त्याचा फोटो वॉलपेपर म्हणून ठेव. ", माझा फुकटचा सल्ला. 
"हे तर बेस्ट होईल. ", ती आनंदात म्हणाली. आणि लगेच स्वतःच्या फोनमध्ये काहीतरी खुडबुड करू लागली. 
पाच मिनिटांनी डोकं वर केलं आणि माझ्या समोर फोन धरून मला लिस्ट दाखवली. फोनमध्ये लगेच लिस्ट तयार केली होती. 
मला तिचा उत्साह आवडला आणि विशेष म्हणजे तत्परतेने गोष्ट करणं आवडलं. आपल्याला काय हव आहे आणि ते मिळवण्यासाठी काय करणं गरजेचं आहे हे तिला लक्षात आलं होत. तिच्या प्रयत्नात तिला यश मिळणार हे ही नक्कीच आहे हो न? 
बाकी तुमच्याकडून सुद्धा #चालढकल (#procrastination) होते आहे का?  वर लिहिलेली साधीशी टीप वापरून बघा. 
बाकी ? बाकी सगळं तुमच्याच हातात आहे इतक्या छोट्या छोट्या गोष्टी साठी दत्तगुरुंना कशाला त्रास द्यायचा? बरोबर ना?
2 एप्रिल 2023 
#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल 




  

शनिवार, १ एप्रिल, २०२३

स्वतःसाठी बदलताना लेख 17

#स्वतःसाठी_बदलताना लेख 17
Planning and implementing
हातात घेतलेली काम वेळेवर व्हावी तसं सगळ्यांनाच वाटतं पण ते होतं का? आपल्याकडून प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टीसाठी 100 टक्के प्रयत्न केले जातात का? की आपण कुठेतरी कमी पडतो? चालढकल होते का? प्रत्येक वेळी कोणीतरी बाहेरची व्यक्ती आपल्या मदतीसाठी तत्पर असणार आहे का? किंवा प्रत्येक वेळी त्या व्यक्तीकडे जाणं गरजेचं आहे का?
आयुष्यात एक वेळा अशी कधीतरी नक्की येणार आहे, जेव्हा तुम्हाला स्वतःची मदत स्वतः करावी लागणार आहे .
मग त्या वेळेची वाट बघत बसण्यापेक्षा आपण स्वतः आपल्या गोष्टींचे नियोजन करून स्वतः चे सगळ्यात जवळचे मित्र होण्याचा प्रयत्न केला तर???
यासाठी काय करायचं? काही वेगळं करायचं नाहीये तर आपल्याला आपल्या प्रत्येक महिन्याचं विशिष्ट पद्धतीने नियोजन करायच आहे. आणि त्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी सुद्धा आपणच स्वतःच्या मागे लागायच आहे.
१. मागच्या महिन्याचा आढावा घ्या.

मागच्या महिन्यात आपली किती काम पेंडिंग होती?
त्यातली किती काम आपल्याकडून पूर्ण झाली?
आणि किती काम पुन्हा करू किंवा नंतर करू म्हणून पुढे ढकलली गेली?
जी काम पुढे ढकलली गेली त्या कामांमध्ये नेमके काय अडथळे होते?
अशी कोणती गोष्ट होती ज्यामुळे ते काम पूर्ण करण्यात आपल्याला निरुत्साह वाटत होता?
​या सगळ्या गोष्टींची एक व्यवस्थित पद्धतीने यादी करत तुम्हाला स्वतःला ते लिहून काढावे लागणार आहे.
​त्यासाठी तुम्ही एखादी वही वापरू शकता किंवा फोनमध्ये सुद्धा लिहू शकता.


२. नवीन महिन्यासाठी ध्येय ठरवून घ्या.

पूर्ण महिन्याभरात पूर्ण करण्यासाठी असलेल्या कामांची यादी करा
​त्यानंतर त्यातील महत्वाच्या कामांची यादी करा.
​रोज ठरवून त्या यादीतील एक तरी काम काही अंशी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा.
​दिवसाचे, आठवड्याचे आणि महिन्याचे गोल्स लिहून काढा.
​ते पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींचा अभ्यास करा. तयारी करा.
​सुरुवात केल्याशिवाय कुठलेही काम पुढे जाऊन पूर्ण होऊ शकत नाही. सो त्यासाठी आधी सुरुवात करा.


३. रोजचे रूटीन/ वेळापत्रक आखून घ्या.

​एखादी सवय लावण्यासाठी रोज ती आचरणात आणणे आवश्यक असते.
​त्यामुळे रोजच्या दिवसाचे वेळापत्रक आखून घ्या. जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की तुमचा वेळ कुठे नि कसा खर्च होतो.
​वेळापत्रक केल्याने हे ही लक्षात येईल की कुठली कामं आधी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत.
​वेळापत्रक फक्त तयार करून चालणार नाही तर तुम्हाला ते कटाक्षाने पाळावे लागणार आहे.
​तर आणि तरच तुम्हाला तुमच्या आयुष्यात बदल घडवून आणणे शक्य होईल.


चला मग वाट कसली पाहताय? ह्या आठवड्याचे प्लॅनिंग करत स्वतःला ऑन अ गुड नोट एप्रिल फूल करा. 1 एप्रिल 2023
#स्वतःला_शोधताना #गौरीहर्षल

 

शनिवार, २५ मार्च, २०२३

स्वतःसाठी बदलताना लेख 16

#स्वतःसाठी_बदलताना_लेख16
स्वतःला एखाद्या गोष्टीचा त्रास होत असेल तर त्यातून वाचण्यासाठी ,बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करणे हे पूर्णपणे नैसर्गिक आहे. पण अशावेळी बऱ्याचदा आपल्याला इतर व्यक्तींकडून नकारात्मक वागणुकीचा सामना करावा लागतो. मग काय करायचं? तर अशा परिस्थितीत स्वतःसाठी ठामपणे उभे राहणे आणि त्याच वेळी स्वतःची मन:शांती ढळू न देणं हेही गरजेचं असतं. 
त्याबद्दल काही टिप्स...
1. स्वतःचे जागरूकतेने निरीक्षण करा. Self awareness 
नकारात्मक विचार, भावना ह्या कशामुळे ट्रिगर होतात हे ओळखण्याचा प्रयत्न करणे गरजेचे असते. एकदा ते लक्षात आलं की त्या विचारांना कशा पद्धतीने प्रतिक्रिया द्यायची हे लक्षात येतं. 
स्वतःच्या भावना आणि प्रतिक्रियांबद्दल जागरूकता निर्माण झाली की आपण दोन पावले मागे येऊन योग्य पद्धतीने विचार करून व्यक्त होऊ शकतो. 
2. स्वतःसाठी मर्यादा आखून घ्या. Setting healthy boundaries. 
बऱ्याचदा आपण आपल्या गरजा आणि अपेक्षा योग्य पद्धतीने, योग्य शब्दात समोरच्या व्यक्तीला सांगत नाही. त्यामुळे गैरसमज होण्याची शक्यता वाढते. अशा वेळी आपल्याला समोरच्या व्यक्तीकडून जी वागणूक मिळते त्यामुळे कुठेतरी आपणच दुखावले जातो. म्हणून योग्य वेळी योग्य शब्दात आपल्या गरजा आणि अपेक्षा स्पष्ट करणे गरजेचे असते. जेंव्हा आपण असे करायला सुरुवात करतो तेव्हा अर्थातच आपल्याला आपल्या सोबतच इतरांकडून ही विरोध होतो. पण हळूहळू गोष्टी बदलतात हे नक्की. 
मनाविरुद्ध एखादी गोष्ट करावी लागणार असेल तर ठामपणे नकार देणं किंवा एखाद्या त्रासदायक गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करणे हे स्वतःसाठी बाऊंड्री सेट करण्याचे उत्तम उदाहरण आहेत. 
३.  स्वतःला/ इतरांना माफ करा. Practice forgiveness. 
चूक मग ती स्वतःकडून झालेली असू दे किंवा इतरांकडून त्यासाठी आपण स्वतःला त्रास करून घेत असतो. 
नकारात्मक विचारांना प्रयत्नपूर्वक दूर ठेवणे आणि समोरच्या व्यक्तीला, तिच्या वागण्यालाही माफ करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे असते. 
आपण कितीही ठरवलं तरी कुठलीही गोष्ट पूर्णपणे विसरू शकत नाही , तसेच कुणालाही माफ करणं सुद्धा सोपी गोष्ट नसते. माफ करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या चुकीच्या वागण्याचा विचार न करण्याचा प्रयत्न करणे. असं केल्याने आपल्याला आपोआपच मनाचा फोकस महत्वाच्या गोष्टींकडे वळवता येऊ लागतो. आणि हळूहळू त्या नकारात्मक भावना बोथट व्हायला सुरुवात होते. त्यांचा आपल्या मनावर तितकासा परिणाम होत नाही. 
४. वर्तमान काळावर लक्ष केंद्रित करा. Focus on the present moment. 
भूतकाळात घडून गेलेल्या घटनांवर ,किंवा भविष्य काळात काय घडेल ह्यावर विचार करत राहण्याची सवय बऱ्याच जणांना असते. त्या सवयींपासून प्रयत्नांनी दूर राहत वर्तमान काळात जगण्याची सवय मनाला लावावी लागते. 
आपली बाजू ठामपणे, आत्मविश्वासाने मांडण्यासाठी आक्रमक पवित्रा घेण्याची किंवा आक्रस्ताळेपणा करण्याची गरज नसते. 
वर उल्लेख केलेल्या गोष्टी आपण आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग बनवल्या की हळूहळू बदल घडू लागतात. 
25 मार्च 2023
#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल 
(ह्या आधीचे लेख खालील लिंक वर मिळतील. https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid02mZny1jqEDk8rHPuMkwTgc6At6LRB9GMGh7kJ2vzkDofgZHuj9sSw8Kdu6oKm9zWhl&id=100000197780430&mibextid=Nif5oz)