मन...

माणसाचं मन किती गोष्टी करत असत ना? रोजच्या धकाधकीच्या जीवनात सकाळी उठल्यापासून ते रात्री स्वप्नातही असंख्य विचार धावत असतात. चांगले विचार तसेच वाईटही. हे विचारच आपल्या दिवसाची आणि पर्यायाने आयुष्याची दिशा ठरवत असतात.
आपण स्वतःसोबत इतरांनाही बरंच काही सांगत असतो कधी मनातल्या मनात तर कधी उघडपणे. खरं तर यात चांगल्या गोष्टींपेक्षा वाईटच जास्त असतात असं का? आपल्याला जर स्वतःबद्दल चांगलं घडावं असं वाटत असेल तर इतरांच्या बाबतीतही आपण चांगलाच विचार करायला हवा.
जमत नसेल उघडपणे तर निदान मनातल्या मनात तरी कुणाला दूषणे, शिव्याशाप देऊ नयेत.  अवघड आहे पण स्वतःच्याच भविष्याचं नुकसान आपण करून घेत असतो.
तर मग स्वतःसाठी तरी सुरुवात करायलाच हवी ना???
करून बघा कुणालाच न सांगता मनातल्या मनात चांगली सुरुवात खूप काही छान छान घडेल.
                  एक चांगला विचार की "मी कुणाबद्दल वाईट विचार करणार नाही". फरक नक्कीच पडेल.
सुप्रभात, वाचणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्यात आज एक छोटासा क्षण तरी नक्कीच येईल समाधानाचा,हसरा.
गौरी हर्षल
२९.६.२०१७

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या मना बन दगड...

आज कुछ अच्छा पढते हैं

मी आणि करुणात्रिपदी