घर हक्काचं भाग २

घर हक्काचं
भाग
काय होतं तिथं? गर्दीला दूर करत मयुरा पुढे गेली. तिथे ’शारदाश्रम’ संस्थेची एक कार्यकर्ती हातात कसलंतरी गाठोडं घेऊन उभी होती. मयुरा त्या भागात तिचं काम, स्वभाव यामुळे बरीच प्रसिध्द होती. तिला पाहताच त्या कार्यकर्तीने ते गाठोडं पुढे केलं आणि म्हणाली, “बघा नं मॅडम, किती सुंदर मुलगी आहे?” तिच्या शब्दांनी भानावर येत मयुराने बघितलं तर खाली जमिनीवर पैश्यानी भरलेली बॅग पडली होती. आणि तिच्या हातातल्या गाठोड्यात एक छानसं गुटगुटीत बाळ. न राहवून मयुराने त्या बाळाला जवळ घेतलं. बाळालाही तिच्या कुशीत सुरक्षित वाटलं असावं त्याने इवल्याश्या मुठीत तिचं बोट घट्ट पकडलं. थोड्याच वेळात पोलीस आले आणि सर्व सोपस्कार पूर्ण होऊन आई किंवा वडिलांचा शोध लागेपर्यंत बाळाला संस्थेच्या ताब्यात देण्यात आलं.
मयुरा घरी परतली पण बाळाच्या विचारांना सोबत घेऊनच. अंदाजे १५ दिवसांचा जीव, पण जन्म देणार्यांना त्याला टाकून देताना काहीच कसं वाटलं नाही? काय झालं असतं त्या जीवाचं जर ते सापडलं नसतं कुणालाच तर??? विचार करतच मयुराला रात्री खूप उशिरा झोप लागली. दुसरया दिवसापासून मयुराचा दिनक्रम बदलला. दुपारी लेक्चर संपली कि तिची पावलं आपसूक शारदाश्रम कडे वळू लागली. त्या बाळासोबतच इतर सर्व मुलंही तिच्या दिवसाचा आणि पर्यायाने आयुष्याचा भाग झाली. रात्रीच्या अंधारात सापडल्यामुळे बाळाचं नाव निशा असं संस्थेत लिहील गेलं. निशा आता ६ महिन्यांची होत आली होती पण अजूनही तिच्या घरच्यांचा काहीच पत्ता लागला नव्हता. तिला आश्रमातल्या सगळ्यांबरोबरच किंबहुना जास्तच मयुराचीही सवय लागली होती. मयुरालाही तिचा लळा लागला होता.
अशातच एका कॉन्फेरेंस साठी मयुराला आठवडाभर बाहेर जावे लागणार होते. निशाला काय आणि कसं समजवायचं या विचारातच मयुरा आश्रमात आली. ती निशाला शोधतच होती तेवढ्यात तिला कुणीतरी सांगीतल कि दत्तक घेण्यासाठी आलेल्या एका जोडप्याला निशा आवडली आहे. निशा त्यांच्यासोबतच ऑफिसमध्ये आहे. क्षणभर मयुराला धक्काच बसला पण कधीतरी हे होणारच होत याची अपेक्षा असल्याने ती लगेच सावरली आणि ऑफिसमध्ये पोहोचली. संस्थेकडून होणारं समुपदेशनाच काम मयुराच बघत असल्याने तिला प्रत्येक मुलाच्या प्रोसेसमध्ये रिपोर्ट द्यावा लागत असे. ती ऑफिसमध्ये पोहोचली आणि समोरचं दृश्य बघितल्यावर तिचे पाय जागीच थबकले.....
तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना इतक्या मजेत निशा त्या कपलच्या सोबत हसत होती. कपलही बऱ्यापैकी सुशिक्षित आणि सधन घरातले वाटत होते. इतक्यात त्यांच्यामधल्या स्त्रीने मयुरा तू????? असे म्हणत मयुराला मिठी मारली. मयुराने तिला पुन्हा एकदा निरखून पाहिलं तर ती तिची मैत्रीण अदिती होती. लग्न लवकर झाल्यामुळे पुढे मयुराचा तिच्याशी संपर्कच नव्हता. अदितीला बरीच वर्षं मूल न झाल्याने तिने व तिच्या नवऱ्याने दत्तक मूल घेण्याचं ठरवलं होतं. आश्रमात येताच तिला निशा दिसली आणि निशाही खूप जुनी ओळख असल्यासारखी तिच्याकडे झेपावली. दत्तकविधान प्रोसेस खूप मोठी असल्याने आता सतत भेट होईलच असं प्रोमीस करत अदिती मयुराला हक्काने तिच्या घरी येण्याचं आमंत्रण देऊन गेली. काहीवेळापूर्वी उगाच आपल्याला किती वाईट वाटलं होत हा विचार आता मयुराला हसू आणत होता. अदितीला खूप चांगल ओळखत असल्याने निशा अतिशय आनंदात राहील यावर आता मयुराला खात्री होती.
त्या आनंदातच मयुरा कॉन्फरन्स साठी गेली. तिथे पोहोचून ती निशा साठी संस्थेत फोन करतच होती कि तिला एक व्यक्ती खूप गडबडीत येऊन धडकली. आणि स्वतःच्याचं नादात सॉरी म्हणत तो निघूनही गेला. पुढे कॉन्फरन्स साठी ती हॉलमध्ये पोचली तेवढ्यात तिला कुणीतरी आवाज देत आहे असं वाटलं. तितक्यात तो तिच्याजवळ आला आणि तिला म्हणाला,” मिस मयुरा आपणच का? मी डॉ. शिशिर,मघाशी चुकून माझा तुम्हाला धक्का लागला मी सॉरी म्हणण्यासाठी आलोच होतो पण तोपर्यंत तुम्ही इकडे निघून आलात.” “इट्स ओके, होतं असं गडबडीत”,असं म्हणत मयुराने विषय संपवला आणि ती तिच्या जागेवर बसण्यासाठी निघून गेली. तिला पाठमोरी जाताना बघून नकळतच डॉ. शिशिरच्या चेहऱ्यावर हसू उमटले. कॉन्फरन्समध्ये एकामागे एक होणाऱ्या चर्चांमधून दोघांनाही एकमेकांविषयी बरीच माहिती मिळाली आणि नकळतच एकमेकांविषयी आदरही वाटू लागला. डॉ. शिशिर लहान मुलांचेच डॉक्टर असल्याने मुलांशी निगडीत समस्यांबद्दल त्यांचाही अभ्यास होताच. त्यात त्यांना मानसशास्त्राबद्दल कुतूहल असल्याने त्याबाबतीतहि ते बरीच माहिती बाळगून होते. मयुरा आणि त्याचं काही मुद्द्यावर पटत असल्याने त्यांच्यात चर्चा होत होतीच. त्याशिवायही शिशिर मयुराच्या इतक्या लहान वयात मिळवलेल्या यशामुळे थक्क झाला होता. मनोमन त्याला मयुरा आवडली होती. फक्त आता मयुराला ते कधी कळतय याची तो वाट बघत होता.  लवकरच तशी वेळही येणार होती ..........
क्रमशः #गौरीहर्षल


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या मना बन दगड...

आज कुछ अच्छा पढते हैं

मी आणि करुणात्रिपदी