ट्विस्ट अँड टर्न
#ट्विस्ट_अँड_टर्न सिरियल्सना कितीही नाव ठेवली तरी आपण सगळे सिरियल्स, डेली सोप बघतो. त्यात रमतो, कुणी चेष्टा करण्यासाठी बघतात तर काही जण आपापल्या दुःखाना विसरण्यासाठी बघतात. पण इथे तो विषयच नाहीये. इथे सिरियलच्या गोष्टीतली गोष्ट आहे. म्हणजे बघा ना सगळ्या सिरियलमध्ये त्या हिरो हिरोईनला इतर पात्रांना दोन ते तीन वेळा चान्स मिळतो नव्याने आयुष्य सुरू करण्याचा. आणि तेही मेक ओव्हर सहित. बऱ्याच जणांना हे बघायलाच जास्त आवडतं. कारण खऱ्या आयुष्यात असलं काही घडत नाही न. पण सध्या घडतंय की , आपल्या सगळ्यांचं आयुष्य स्थिर झालं आहे एका ठिकाणी येऊन कुणीही पुढे जात नाहीये कुणीही मागे रहात नाहीये. सगळे फक्त जगण्याची उमेद धरून ठेवण्याची धडपड करत आहेत. प्रत्येक जण आपापल्या परीने कसल्या न कसल्या गोष्टीत मन रमवण्याचा प्रयत्न करतोय. ह्यात कधी कधी चिडचिड होतेय भांडणं, वादही होताहेत. पण ते सगळं बाहेरच्या नकारात्मक परिस्थितीशी जुळवून घेताना होणारच. असो तर आपण बोलत होतो सिरियलसारख्या खऱ्या आयुष्यात आलेल्या ट्विस्ट आणि टर्न बद्दल. हा ट्विस्ट सध्या भरपूर बदल घडवतोय. काही गोष्टी काही माणसं नव्याने भेटत आहेत