After all this time? - Always
हा संवाद आहे हॅरी पॉटर मधल्या हेडमास्टर डम्बलडोअर आणि प्रोफेसर स्नेप मधील...
प्रसंग असतो आत्मा शोषून घेऊन शिक्षा देणाऱ्या रक्षकांच्या तावडीत सापडलेल्या हॅरीला वाचवण्याचा...
तो संकटात आहे हे समजताच प्रोफेसर स्नेप त्यांच्या जादूच्या छडीने एक पितृदेव निर्माण करतात आणि त्याला वाचवतात.
तो पितृदेव असतो हरीण की काळवीट सदृश प्राणी... जो हॅरी च्या मृत आईचा सुद्धा असतो.
आता जे अज्ञानी म्हणजे हॅरी पॉटर च्या जगापासून दूर असणारे लोक्स आहेत त्यांना हे काहीही कळणार नाही. संदर्भासाठी पुस्तक वाचा किंवा मुव्ही बघा.
प्रोफेसर स्नेप हे व्यक्तिमत्व hp सिरीज मध्ये पूर्णपणे निगेटिव्ह, चीड आणणारे असे दाखवले आहे. कारण हॅरी च्या आईवडिलांच लग्न झाल्यावर विरुद्ध बाजूच्या जादूगारांसोबत त्यांनी हातमिळवणी केलेली असते. कुठे न कुठे त्या दोघांच्या मृत्यूसाठी सर्व जण त्यांना दोषी धरत असतात.
पण ह्या सीन नंतर लक्षात येतं की खरोखरच एखाद्यावर प्रेम करणे म्हणजे काय असते? ती व्यक्ती तर कधीच आपली होणार नाही. पण आता जेव्हा परिस्थिती ची गरज आहे तेव्हा आपण वाईटपणा घेत तिच्या मागे तिच्याच मुलासाठी आपल्याला शक्य असेल ते सगळे करायचं. आणि तेही पडद्यामागे राहून...
हे खूप अवघड काम आहे...
पण स्नेप ची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या ॲलन रिकमन ह्यांनी ते शिवधनुष्य अतिशय छान पेलले होते.
चला तर हे झालं नमनाला घडाभर तेल घालून 😆😆😆
मुळात पॉटरहेड म्हणजे hp चे चाहते मात्र हे वाक्य आपल्या आयुष्यातील प्रत्येक महत्वाच्या परिस्थिती सोबत जोडतात...
कारण ती भावना एक वेगळ्या लेव्हलचे बाँडिंग दाखवते...
साध्या मराठीत भाषांतर केले तर त्याचा अर्थ होतो ....
इतकं सगळं झाल्यावरही???
नेहमीच
मी पण माझ्या लेखात हे वापरते बऱ्याचदा... कारण कधीतरी मलाही जाणवतं... कधीतरी म्हणण्यापेक्षा बऱ्याचदा... की आपण माणसं त्या अमर्यादित जीव लावणाऱ्या वर बसलेल्या शक्तीशी असेच कृतघ्नपणे वागत असतो... आणि ती मात्र आपल्याला भरभरून फक्त आणि फक्त देतच असते.
मग अशा वेळी त्यालाच विचारावं वाटतं? 🤷🏻♀️
After all this time??? (मी कितीही चुका केल्या तरीही तू मला इतकं सांभाळून कसं काय घेतोस?? )
अन् तो कदाचित वीज चमकवत उत्तर देतो ⚡💫
Always...
पाठीशी उभे असणे याहून वेगळे काहीच नसते...
बाकी? बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु!!!
स्वतःला शोधताना - गौरी हर्षल
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा