Quote of the day 12

#Quote_of_the_day12

वैभव घरात मधला होता मोठा भाऊ होता आणि धाकटी बहीण. मोठा भाऊ पहिला म्हणून घरात प्रचंड लाडका तर बहीण एकुलती एक म्हणून. अशात वैभवकडे कधीतरी चुकून दुर्लक्ष होत असे. पण तो तसा समजूतदार होता. त्यामुळे ते आपल्या मनावर न घेता तो स्वतःच्या पायावर लवकर उभा राहिला. जिद्दीने शिक्षण ही पूर्ण केले. त्या उलट घरात इतर दोघांची अवस्था वेगळी होती. भाऊ अति लाडामुळे हट्टी बनला होता, एका नोकरीत फार काळ टिकत नसे. तर बहिणीला हुशार असूनही नटणे मुरडणे ह्यातून अभ्यासासाठी वेळ नव्हता. त्यामानाने वैभव लवकर सेटल झाल्याने घरीदारी सगळ्यांच्या तोंडी आता वैभव असे. त्याचे उदाहरण सतत इतरांना ऐकायला मिळत होते. जो मुलगा इतके दिवस कुणाला दिसतही नव्हता तोच आता प्रकाशझोतात होता. वैभव मात्र ह्या सगळ्याने हुरळून जाणाऱ्यातला नव्हता तो आपला स्वतःच्या विश्वात बिझी राहत असे. घरात पैसे देत असतानाच तो स्वतःसाठीही इन्व्हेस्टमेंट करत होता. काही दिवसांनी बहिणीचे लग्न झाले वैभवने स्वतःच्या सेविंगमधून मदत केली. वडिलांना त्याचा अभिमान वाटला पण त्यांनी बोलून दाखवल नाही. वैभवच्या तर अशा काही अपेक्षा नव्हत्याच त्यामुळे तो मदत करून बाजूला होई. भाऊ सुद्धा बऱ्यापैकी नोकरीत स्थिर झाला त्याचेही लग्न झाले. वैभवची बायको आल्यावर जबाबदारी आहे असं सांगत भाऊ कुटुंबासह वेगळा झाला आणि घरात लक्षही देणं बंद केलं. वैभव बायकोसोबत सगळं निभावत होता. पण आईवडिलांचा ओढा थोरल्या कडे जास्त होता. ते त्याच्याकडेच राहू लागले. खटकले तरी वैभवने फारसं मनावर घेतले नाही. तो आपल्या कुटुंबात खुश होता. अशातच त्याचे प्रमोशन झाले. आनंद साजरा करण्यासाठी त्याने सगळ्यांना आमंत्रण दिले. सगळे आले पण कुणाच्याही चेहऱ्यावर आनंद नव्हता कसातरी कार्यक्रम झाला आणि सगळे निघून गेले. त्या दिवशी त्याला प्रकर्षाने जे जाणवलं त्यामुळे त्याला खूप वाईट वाटलं. पण त्याचवेळी त्याच्या हातावर हलकेच थोपटत त्याचा जिवलग मित्र त्याच्या जवळ बसला. तो वैभवकडे बघत म्हणाला, माणसं आपलीच आहेत ह्यात शंका नाही. पण परिस्थिती आपली नाही. तू पहिल्यांदा यशस्वी झालास तेंव्हाच मला हे जाणवलं होत पण मी तुझं तुला समजावं म्हणून काही बोललो नाही. जेंव्हा लोकांना आपल्या यशाने त्रास होतो तेंव्हा समजून जावं की ते यश खूप अनमोल आहे. त्यांना ते मिळवण शक्य नाही म्हणून त्यांना त्रास होतो आहे. आणि सोबतच आपला पाय खेचला जाणार ह्याच भानही असू द्यावं. माणसाला कुणी गेलं तर जेवढा त्रास होत नाही त्यापेक्षा जास्त त्रास जवळच्या व्यक्तीच्या यशस्वी होण्याने होतो. मानवी स्वभाव आहे हा.अरे सुखात आनंदाने सहभागी होणाऱ्या लोकांना काय रडवतो रे तू अस मित्र म्हणाला तसा वैभव मनापासून हसला आणि सगळ्यामध्ये सहभागी झाला.
       आपण आपल्या मार्गावर जात राहावे लोकांना चूक कळली तर ठीक नाहीतर त्यांना गेट वेल सून म्हणत शुभेच्छा द्या आणि पुढे चला. 
Anyone that can pull you down is already below you.
कसा वाटला हा Quote of the day नक्की कळवा. 
थॅंक्यु. #गौरीहर्षल

टिप्पण्या

जागृती सावंत म्हणाले…
या जगात दुसऱ्याच्या डोक्यावर पाय ठेवल्याशिवाय
आपल्याला वर जाता येत नाही म्हणे ....
कमाल आहे ...
दुसऱ्याच्या डोक्यावर पाय ठेवणारा
वर जाईलच कसा?

जा रे क्षणिक सुखासाठी
स्वार्थी झालेल्या ...
आधुनिकतेची झापडं लावून
जगाचं अंधानुकरण करणारयानो
तुमच्या भाषेत ..खुशाल वर जा..
मी वरून बघतेच आहे
कोण किती खाली आहे ते ....
deepaliniranjan म्हणाले…
Get well soon, गौरी तुझ्या या कथेने मला किती पटकन दिलासा दिला ते मी शब्दात मांडू शकत नाही. धन्यवाद या कथेसाठी.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या मना बन दगड...

आज कुछ अच्छा पढते हैं

मी आणि करुणात्रिपदी