आपल्या आजूबाजूच जग आपल्याला नेहमीच प्रतिक्रिया देण्यासाठी, स्पष्टीकरण देण्यासाठी किंवा स्वतःचा बचाव करण्यासाठी भाग पाडत असतं. पण कधी कधी बऱ्याचदा क्षणार्धात प्रतीक्रिया देण्यापेक्षा शांत बसून परिस्थितीचे निरीक्षण
आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक घटनेला आपण प्रतिसाद देणं गरजेचं नसतं. जर कुठे गैरसमज झाला असेल तर तिथे प्रत्येक वेळी तो दूर करण्यासाठी धावाधाव करण सुद्धा गरजेचं नसतं. कुठल्याही गोष्टीला, घटनेला आणि व्यक्तींना सुद्धा तुमच्या इन्स्टंट मताची गरज नसते.
जेव्हा तुम्ही शांतपणे समोरच्या व्यक्तीला अडथळा न आणता बोलू देता तेव्हा नकळतच त्या व्यक्ती स्वतःचं खरं व्यक्तिमत्व प्रगट करतात. निरीक्षण करणे ही खूप महत्त्वाची कला असते जी तुम्हाला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर समोरची व्यक्ती, घटना अगदी सुस्पष्टपणे बघण्यास मदत करते. हळूहळू तुम्हाला त्या सो कोल्ड क्षणांच्या ऐवजी लोकांच्या वागण्यातले पॅटर्न्स दिसू लागतात. नजरेला दिसत असणाऱ्या भावनिक खेळाऐवजी तुम्हाला लोकांच्या वागण्या मागचे खरे हेतू जाणवू लागतात.
जर तुम्ही भावनिक होऊन एखाद्या ठिकाणी तत्काळ प्रतिक्रिया दिली तर अर्थातच बऱ्याचदा आपण एखाद्या गरज नसलेल्या गुंत्यामध्ये अडकू शकतो. शिवाय ज्या गोष्टींचा अर्थाअर्थी तुमच्याशी काही संबंध नसतो, अशा अनेक गोष्टींचा ताण नकळतच तुमच्यावर येऊ शकतो.
जेव्हा तुम्ही निरीक्षण करायला शिकता तेव्हा नकळतच तुम्ही स्वतःची मनःशांती स्वतः निवडू शकता. शिवाय कुठल्या वादांमध्ये सहभाग घ्यायचा आणि कुठल्या संवादापासून दूर राहायचं हे तुम्हाला ठरवता येतं. हळूहळू नकळतच तुमची प्रतिक्रिया प्रतिसादात बदलते हेही तितकच खरं आहे.
शांत किंवा गप्प बसणं म्हणजे आपण समोरच्यापेक्षा कमकुवत आहोत असं नसतं. कधी कधी परिस्थितीपासून दूर निघून जाणं म्हणजे आपण आपली हार मान्य केली आहे असंही नसतं.
मग आता कोणी म्हणेल की बऱ्याचदा शांत बसण्याचा अर्थ तुम्हाला काहीच फरक पडत नाही असा सुद्धा घेतला जातो.
हो, पण शांत बसणं म्हणजे तुम्ही तुमचा वेळ, तुमची एनर्जी आणि तुम्ही स्वतःमध्ये जाणीवपूर्वक घडून आणलेल्या बदलांना काही काळासाठी मिळणाऱ्या क्षणिक समाधानापेक्षा जास्त किंमत देत असता.
आपल्या आसपास घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला आपल्या प्रतिक्रियेची गरज नसते. पण ज्या गोष्टींमध्ये आपण जाणीवपूर्वक स्वतःला सहभागी करतो त्या गोष्टी घटना आणि व्यक्ती नकळतच आपलं आयुष्य घडवत असतात. त्यामुळे कुठे सहभागी व्हायचं आणि कुठल्या गोष्टींपासून लांब राहायचं हे विचारपूर्वक ठरवा.
स्वतःला शोधताना - गौरी हर्षल
क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आणि कौन्सेलर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा