स्वतःला_शोधताना_ते_स्वतःसाठी_बदलताना
#स्वतःला_शोधताना_ते_स्वतःसाठी_बदलताना
#माझा_प्रवास
#गौरीहर्षल
गेल्या काही दिवसात लक्षात आलं की खरंच गरज आहे का किंवा असते का इतकं टोकाला जाऊन कुणाचं वागणं, बोलणं मनावर घेण्याची??? आपल्याला दुखावून समोरची व्यक्ती जर काही झालंच नाही अशा थाटात जगत असते तर आपण स्वतःला कोणत्या चुकीची शिक्षा देत असतो?? मग मात्र ठरवलं की राग येणं, वाईट वाटण हे तर होतच राहणार आहे पण दरवेळेस असं झालं की आपल्या मनाचा तो दरवाजा उघडायचा जो आपल्याला योग्य ठिकाणी नेईल. ते ठिकाण म्हणजे आपल्या नव्या विचारांचं दालन जे प्रत्येक चुकीची, अयोग्य वाटणारी गोष्ट एका नव्या नजरेतून दाखवेल. हा सगळा प्रवास स्वतःचा स्वतःसोबतच असणार आहे त्यामुळे आपण स्वतः कसे आहोत हे शोधण्याची संधी आपल्याला सतत मिळत राहते. आणि इतर कुणाच्या येण्याची वाट बघत बसण्याचीही गरज नाही.
ह्याच विचारातून #स्वतःसाठी_बदलताना काय करावं लागेल ती यादी तयार करायला सुरुवात केली.
आणि काय सांगू खूप काही सापडलं जे मला सतत जाणवून देत राहील की
"तुझे आहे तुजपाशी,
परि तू जागा चुकलासी"
मग काय म्हटलं हेही लिहून ठेवूया. कदाचित आपल्यासारखेच रस्ता माहीत असूनही वाट चुकलेले जे आहेत त्यांना उपयोग होईल.
शेवटी समर्थांनी म्हटलेच आहे न ,
"दिसा माजी काही तरी ते लिहावे |
प्रसंगी अखंडीत वाचीत जावे ||
जे जे आपणासी ठावे |
ते ते इतरांसी शिकवावे |
शहाणे करुन सोडावे सकल जन ||"
मधल्या काळात आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी, विचित्र वागणारी माणसं ह्यांचा त्रास करून घेत स्वतःच्या मनाला जो त्रास दिला तोच आता द्यायचा नाही असा संकल्प उद्या येणाऱ्या #दत्तजयंती च्या निमित्ताने केला आहे.
बाकी संकल्पच का ? तर पब्लिक न्यू ईयरला संकल्प करते माझ्यासाठी माझं नवीन वर्ष उद्यापासून सुरू होणार अस का कुणास ठाऊक मला वाटलं आणि अर्थातच सगळ्यात जवळच्या मित्राचा वाढदिवस ह्याशिवाय योग्य मुहूर्त कुठला असणार रस्ता चुकलेल्या मनाला मार्गावर आणण्यासाठी?
ते म्हणतात न , की तुम्ही जर एखाद्या विशिष्ट संकेताची वाट बघत असाल तर तो नक्कीच तुमच्या आसपास असतो.
सो, बरंच काही पेंडिंग आहे ते मार्गी लावण्यासाठी पुन्हा एकदा स्वतःला शोधण्यासाठी निघायचं आहे. प्रयत्न करण्यात तोटा काहीच नाही झाला तर फायदाच आहे so giving it a chance.
#स्वतःसाठी_बदलताना ही मी स्वतःसाठी लिहिलेल्या सूचनांची सिरीज आहे असं म्हटलं तरी चालेल. अशा गोष्टी ज्यांचा विसर पडतो आणि मग पुन्हा मन त्याच गल्लीत जाऊन धडकते जिथे जायची गरज नसते.
बाकी माझा संकल्प तडीस नेण्यासाठी माझा मितवा आहेच माझ्या सोबत तसा तो असतोच.
तर माझ्यातर्फे #स्वतःला_शोधताना च्या सगळ्या वाचक मित्रमैत्रिणींना दत्तजयंतीच्या शुभेच्छा.
थोडीशी सकारात्मकता मनात आणून उद्यापासून खूप काही चांगलं घडणार आहे ह्या विचारावर लक्ष केंद्रित करत बाकी सगळं #दत्तात्रेयार्पणमस्तू करूया.
https://www.facebook.com/109012627448262/posts/120681526281372/
सगळं काही दत्तात्रेयार्पणमस्तु!!! 🙏🙏
#गौरीहर्षल
२८.१२.२०२०
टिप्पण्या