Quote of the day 16
#Quote_of_the_day16
स्टेजवर मुलीचा सत्कार करण्यात येत होता. पण रजनीचे डोळे मात्र सतत भरून येत होते. कारणही तसंच होत रजनी आणि तिच्या दोन्ही मुलांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जगण्यातून मार्ग काढत आजचे यश मिळवले होते. इथे मुलीचा सत्कार बेस्ट बिझनेसवुमन म्हणून होत होता तर दोन दिवसांनी मुलाला त्याच्या क्षेत्रातल्या संशोधनासाठी सुवर्णपदक मिळाले म्हणून नावाजले जाणार होते. ह्या सगळ्यात जर कुणी त्यांच्यासोबत होते तर तो म्हणजे फक्त आणि फक्त त्यांचा आत्मविश्वास.
रजनीच्या नवऱ्याने अगदी मोक्याच्या क्षणी तिची आणि मुलांची साथ सोडून दिली होती ते ही नको त्या लोकांवर विश्वास ठेवून. तिने खूप प्रयत्न केले पण काही उपयोग झाला नाही. नोकरी होती म्हणून रजनीला तशी काही आर्थिक काळजी नव्हती. पण अचानक आलेल्या या संकटाने ती नाही म्हटलं तरी कोलमडली. तिच्या मनस्थितीला समजून घेत वरिष्ठांनी काही दिवस तिला ब्रेक घ्यायला लावला. मुलं शाळेत गेली की रजनी तासनतास रडत असे. अशीच एके दिवशी ती विचार करत असताना तिची जवळची मैत्रीण स्मिता तिला भेटायला आली. रजनीला बघताच तिला अंदाज आला की ती काय करत होती. तिने तिच्या ओळखीच्या एका बाईना सोबत आणले होते त्यांना घरकाम समजावून सांगत तिने आपला मोर्चा रजनिकडे वळवला. हे बघ रजनी जे झालं ते झालं, तू शक्य तेवढे प्रयत्न ही केलेस पण जर नाही समोरचा ऐकत तर काय करणार? तुझ्या सुदैवाने तू आर्थिक बाबतीत कुणावरही अवलंबून नाहीस. त्यामुळे तू आणि मुलं ह्या घरात निवांत राहू शकता. पण ज्या माणसाची लायकीच नाही त्याच्यासाठी तू अजून किती दिवस अश्रू ढाळत बसणार आहेस. विसरलीस का ती रजनी जी स्वतःबरोबर दुसऱ्यांसाठीही खंबीरपणे उभी असायची? बाहेर पड ह्या सगळ्यामधून तुझी मुलं तुझ्याकडे आशेने बघत आहेत. तू कालही त्यांची हिरो होतीस आणि आजही आहेस. अस बघू नकोस मला आज इथे मुलांनीच यायला लावलं. मुलं मोठी झाली आहेत रजनी तुला आता अजून खंबीरपणे त्यांच्यासाठी आणि स्वतःसाठीही उभं राहावं लागणार आहे. आम्ही सतत सोबत आहोतच पण वाट मात्र तुझी तुलाच चालायची आहे हो न??
ह्यानंतरही असे कमकुवत क्षण आले रजनीच्या आयुष्यात नाही असं नाही. पण मुलं आणि जवळच्या लोकांच्या मदतीने ती त्यातून बाहेर पडली. आज दोन्ही मुलांचं जस स्वतंत्र अस्तित्व होत तसच रजनीचही होतं. ह्या सगळ्या गोष्टींचा अजून एक साक्षीदार होता तो म्हणजे स्मिताने कामासाठी आणलेल्या सखुबाई. त्या सतत निरीक्षण करत होत्या की कस रजनीने सगळं स्वीकारले. हे सगळं नुसतं बघतच नव्हत्या तर त्यातून धडा घेत त्यांनी स्वतःच्या मुलांना स्वतःच्या पायावर उभं राहणं शिकवलं होतं. आणि जमेल तसं त्या रजनीला अशाच काही स्त्रियांना समजून सांगण्यासाठी भेटायची गळ घालत असत.
ह्या सगळ्या गोष्टींचा काही जणींना फायदा नक्कीच झाला होता.
परिस्थिती नेहमीच एकसारखी राहत नाही. ती कधी चांगली असते तर कधी वाईट. वाईट परिस्थितीतही खंबीरपणे उभं रहात जो स्वतःला सावरतो. त्याचं आयुष्य नक्कीच पुढे जाऊन एक उदाहरण म्हणून दिल जातं. परिस्थितीशी दिन हात करताना आपल्याला हे माहीत नसतं की कोण आपल्याला बघत आहे. पण जेव्हा आपण काही मिळवतो एका पदावर पोहोचतो. अन् कुणी कधीतरी येऊन सांगत की ही गोष्ट तुमच्याकडे बघून आम्ही शिकलो तेव्हा नकळतच जबाबदारी कळते. कदाचित ती गोष्ट छोटीशीही असू शकते पण समोरच्या व्यक्तीला जर त्याचा उपयोग झाला आहे तर ती नक्कीच महत्वाची आहे.
So folks ,
Be strong...
You never know who you are inspiring.
कसा वाटला हा Quote of the day नक्की कळवा.
टिप्पण्या