Quote of the day 15

#Quote of the day 15

यश आणि जय दोघे सख्खे भाऊ. यश थोरला तर जय धाकटा. यश जरा अभ्यासू त्यातच जास्त रमणारा अगदी आदर्श टाईप. त्याउलट जयला मात्र शेंडेफळ असल्याने सगळं काही स्वतःला आवडेल तेच करायला आवडत असे. जय लहान असल्यापासून जरा आईच्या मागेच जास्त वेळ असायचा. त्यामुळे त्याला स्वयंपाकाची गोडी कधी लागली त्यालाही कळालं नाही. आधी अगदी इमर्जन्सी किंवा फारच मूड आला तर एखादा पदार्थ करणारा जय हळूहळू जास्त रस घेऊन सगळं बघत असे. आईने आपल्या टिपिकल स्वभावधर्माला धरून विरोध केला पण थोडासाच. मुलांनी स्वयंपाक करू नये वगैरे काही तिचे विचार नव्हते पण जयने काहीतरी वेगळं करावं असं तिला वाटायचं. जसं चार लोक यशच कौतुक करतात जयच सुद्धा करावं अशी तिची इच्छा होती. 
      जयच्या आवडीला गृहीत धरून आईबाबा आणि यश नेहमीच त्याला प्रोत्साहन देत. पण जयला अजून स्वतःबद्दल तेवढा विश्वास वाटत नव्हता. ह्यावर उपाय म्हणून यश सतत त्याला नवनवीन प्रयोग करायला लावत असे. अभ्यासात फारशी गती नसल्याने हॉटेल मॅनेजमेंट करणं शक्यच नव्हतं. पण म्हणून जे कौशल्य आहे ते का वाया घालवायचे? मग बाहेरून ग्रॅज्युएशन करता करता यशच्या मदतीने जय वेगवेगळ्या ठिकाणच्या पदार्थांची खासियत शिकण्याचा प्रयत्न करू लागला. यशही स्वतःचे व्याप सांभाळून जमेल तेवढी मदत करत असे. आई आणि आजीच्या हाताखाली तयार झाल्याने त्याला पारंपरिक पद्धतीचे पदार्थ अगदी छान जमत होते. मग यशने त्याला फ्युजन करता येईल का ते बघ असा सल्ला दिला. घाबरतच जयने सुरुवात केली. पहिली ऑर्डर छोटीशीच होती पण त्या ठिकाणी दिलेले पदार्थ सगळ्यांना फार आवडले. त्यासोबतच अजून तीन ठिकाणी ऑर्डरही मिळाली. पहिली कमाई जयने यशच्या हातात ठेवली. ती पुन्हा त्याच्याच हातात टेकवत यश त्याला म्हणाला, सुरुवात केली तर सगळं जमत बघ पण आपण सुरुवातीला कच खातो. मला रुटीन लाईफ आवडतं पण ह्याचा अर्थ असा नाही की तुलाही तेच आवडावं. तुला स्वतःवर विश्वास असेल तर सगळं शक्य आहे. इथून पुढेही ते नक्कीच होईल.
गोष्ट साधीशीच पण खरा अर्थ सांगते. आपल्याला खूप काही येत असत पण चार लोकांसमोर ते आत्मविश्वासाने मांडणं जमत नाही. किंवा भीती वाटते. जर आपणच स्वतःवर विश्वास ठेवला नाही तर जगात कुणीही ठेवणार नाही. ते म्हणतात न बोलणाऱ्याची मातीही खपते पण न बोलणाऱ्याच सोनही खपत नाही. 
So If you do not believe in yourself....
chances are nobody else will. 
कसा वाटला हा Quote of the day नक्की कळवा. थॅंक्यु❤️❤️#गौरीहर्षल


 

टिप्पण्या

deepaliniranjan म्हणाले…
सही बात हैं
सुरुवात केली की आत्मविश्वास वाढतो आणि कोणी पाठीवर हात ठेवणारं मिळालं की आपल्या मनाला जे हवं असतं किंवा पटतं ते यश (success) मिळतं
Ashwini D.G म्हणाले…
अगदी खर आहे..स्वतःवर विश्वास हवाच.
अनामित म्हणाले…
अगदी खरं आहे एखादे काम विश्वास पुर्वक करायला घेतल्यावर हमखास यश मिळते.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या मना बन दगड...

आज कुछ अच्छा पढते हैं

मी आणि करुणात्रिपदी