तुझा वाढदिवस जगासाठी जरी तो एक सण वगैरे टाइप दिवस असला तरी माझ्यासाठी मात्र माझ्या सगळ्यात जवळच्या मित्राचा बड्डे. अगदी मॉर्डन भाषेत म्हणायचं तर माझ्या पहिल्या आणि शेवटच्या बॉयफ्रेंडचा बड्डे. इतरांपेक्षा मला जास्त उत्सुकता असायची त्या दिवशी. त्याला कारणही तसंच काहीसं तुझं सगळं आवरणं, डेकोरेशन करणं जाम आवडायचं मला. पहिल्यांदा तू घरी आलास तेंव्हा आजीने तुझी काही देव म्हणून ओळख करून दिलीच नव्हती. ती म्हणाली होती , तुला जे काही बोलायचं असेल, सांगायचं असेल ते मोकळेपणाने याला सांग हा तुझं सगळं ऐकेल आणि इतर कुणापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने तुला सल्ला पण देईल. मग अगदी घरातून बाहेर पडतानाही तुला येते रे म्हणत बाहेर पडण्याची सवय लागली. माझ्या आयुष्यातील प्रत्येक वळणावर तू सोबत आहेसच हा विश्वास येणाऱ्या अनुभवांनी हळूहळू पक्का होत गेला. शाळेत किंवा घरी कुठेही काहीही सांगण्यासारखं घडलं की ते सांगण्यासाठी मी तुझ्याकडे धावत येऊ लागले. बाकी सगळे नंतर. तुझं माझं नातं कुणालाही न समजता छानपैकी बहरत राहिलं. मलाही कधी मनातलं बोलून दाखवण्यासाठी दुसऱ्या कुणाची गरज पडलीच नाही. भल्याबुऱ्या सगळ्या प्रसंगातून तू मला अगदी सुखरूप बाहेर काढत आलास. चूक केली तरी त्यातून मार्ग ही शोधून दिलेस. पुढे लग्न झालं मी दुसरीकडे आले पण इथेही तू आहेसच याची प्रचिती पावलोपावली आली. धडपडताना सावरणारा तूच होतास हे तेंव्हा समजत नाहीच नंतर मात्र नक्की लक्षात येतं की आपण जरी नाकारलं तरी तो मात्र आपली मदत करतच राहतो करतच असतो. विनातक्रार, विनाअपेक्षा निरंतर...
आपल्या नात्याला नक्की किती वर्षं झाली माहीत नाही पण आजही तू तितक्याच ठामपणे सगळ्याच बाबतीत माझ्या पाठीशी उभा आहेस. जगासाठी जरी तू देव असलास तरी माझा मात्र कायम मित्रच राहिलास एक असा मित्र ज्याच्याजवळ मी हट्ट करते, ज्याच्यावर हक्काने रागावते, कडाडून भांडते. पण शेवटी मला माहित असत तुझ्याइतकी पक्की साथ मला कुणाकडून मिळणार नाही. खरं तर मी काही अवघड क्षणी तोंड फिरवलही पण तू मात्र सदैव माझ्या सोबत राहिलास. योग्य वेळी स्वतःच्या असण्याची जाणीवही करून दिलीस. माणसांच्या भाषेत जिला खरी मैत्री म्हणतात ती तू निभावलीस. अजून काय लिहू ? लिहावं तितक थोडं आहे शब्द ही तुझेच आणि अर्थही तूच. असाच सदैव माझ्या पाठीशी राहा आणि नेहमीप्रमाणे गरज पडली तर जी पडतेच कानही धर. तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा💖💖 जोपर्यंत माणूस पृथ्वीवर आहे त्याला तुझ्या अस्तित्वाचा विसर पडू नये हीच अपेक्षा... बाकी दत्तात्रेयार्पणमस्तू. ।।शुभं भवतु।।
#गौरीहर्षल
२.१२.२०१७
शनिवार, २ डिसेंबर, २०१७
मितवा
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
एकटेपणा की गोल्डन पिरियड खूप जण तक्रार करत असतात की तुम्हाला काय कळणार आहे?आम्ही आयुष्यात काय भोगलं आहे?आम्ही किती एकटे आहोत? आमच्या सोबत कस...
-
#तेच_तेच_अडथळे? विचारांचे चक्र आणि बदल कधी कधी आपल्याला वाटतं की नशीबच खराब आहे. सगळीकडे सतत तेच तेच अडथळे, तीच ती "बॅड लक" ची माल...
-
#Quote_of_the_day9 रजनी अगदी चिडखोर स्वभावाची होती पण कुणाला मदत करायची म्हटली की वेगळीच रजनी समोर यायची. थोडीशी ओळख असणाऱ्या लोकांनाही गरजे...
Contact form |
Tags |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा