गुरुवार, २८ ऑगस्ट, २०२५

attitude is everything

एटीट्यूड इज एव्हरिथिंग 

एटीट्यूड इज एव्हरिथिंग 
नेहा ही २५ वर्षांची मुलगी. इंजिनिअरिंग झाल्यावर तिला एक चांगली नोकरी मिळाली होती. ऑफिसचं काम, प्रवास, घरी आई-वडिलांचं टेन्शन आणि स्वतःच्या future बद्दलचे प्रश्न – सगळं काही एकाच वेळी तिच्या खांद्यावर आलं होतं.

एका संध्याकाळी ऑफिसहून परतताना अचानक तिला कंपनीने दिलेल termination letter हातात आलं. कंपनी downsizing करत होती आणि नेहाचं नाव यादीत आलं होतं.

तिच्या डोक्यात फक्त एकच विचार घुमत होता – “आता काय? मी इतक्या वर्षांच्या अभ्यासानंतर नोकरी टिकवू शकले नाही… माझं future संपलं!”

Psychologist’s Note

एखादी नोकरी जाणं म्हणजे फक्त उत्पन्नाचा प्रश्न नसतो; तो व्यक्तीच्या self-worth ला थेट स्पर्श करतो. मेंदू तात्काळ “catastrophic thinking” करायला लागतो – म्हणजे छोट्या गोष्टीचं मोठं संकट वाटायला लागतं.

नेहा पूर्ण दोन दिवस बेडवरून उठली नाही. फोनवर आलेल्या messages तिने वाचले नाहीत, आई-वडिलांशी बोलणं टाळलं. तिचं मन negative thoughts ने भरलं होतं.

तिसऱ्या दिवशी तिची कॉलेजमधली मैत्रीण स्मिता भेटायला आली. स्मिता आता clinical psychologist म्हणून काम करत होती.

तिने नेहाला विचारलं, “काय चाललंय?”

नेहाचं उत्तर –
“सगळं संपलंय. माझं career, माझं future, माझा आत्मविश्वास… मला आता काही जमत नाही.”

स्मिता शांतपणे ऐकत होती. मग हळूच म्हणाली –
“नेहा, तुला माहितेय का? The right attitude and thinking will always pull you out from any trouble. हे वाक्य म्हणजे फक्त सुविचार नाही, तर एक मनोवैज्ञानिक सत्य आहे. चल, मी तुला एक प्रयोग करून दाखवते.”

Psychologist’s Exercise: Cognitive Reframing

स्मिताने नेहाला विचारलं –
“चल, तीन कागद घे. 
पहिल्यावर लिही – worst possible outcome. 
दुसऱ्यावर – best possible outcome. 
तिसऱ्यावर – most realistic outcome.”

नेहाने लिहायला सुरुवात केली.

Worst: मी कधीच नोकरी मिळवणार नाही. लोकं माझी थट्टा करतील. मी आयुष्यात मागे पडेन.

Best: मला यापेक्षा चांगली नोकरी मिळेल जिथे माझ्या skills ला खऱ्या अर्थाने value मिळेल.

Realistic: थोडा वेळ लागेल, पण नवी नोकरी नक्की मिळेल. कदाचित मला नवे skills शिकावे लागतील.

नेहाने ते लिहून पूर्ण केलं आणि स्वतःच विचार करू लागली, “मी खरंच worst पेक्षा जास्त realistic situation मध्ये आहे.”

Turning Point 🧿
दुसऱ्या दिवशी सकाळी नेहाने स्वतःला आरशात पाहिलं. केस विस्कटलेले, डोळ्यांभोवती काळी वर्तुळे. पण आतून एक लहानसा आवाज ऐकू आला – “तू हार मानू शकत नाहीस. अजून बरीच संधी आहे.”

तिने मोबाईल काढला आणि LinkedIn उघडलं. तिला आठवलं की कॉलेजमध्ये ती coding competitions मध्ये नेहमी जिंकायची. मग तिने ठरवलं – Upskill करायचं!

ती रोज सकाळी दोन तास online courses करू लागली. संध्याकाळी resume update करून applications टाकू लागली.

Psychologist's note ✍🏼
यालाच म्हणतात problem-focused coping strategy. Depression मध्ये माणूस फक्त negative thinking करतो. पण attitude बदलल्यावर मेंदू dopamine release करतो, ज्यामुळे action घेणं शक्य होतं.

एका महिन्यानंतर नेहाला एका MNC कडून interview call आला. Interview खूप कठीण होतं. Panel ने तिला विचारलं, 
“तुझ्या मागच्या नोकरीतून तुला काढलं गेलं, तर आम्ही तुला का ठेवावं?”

नेहा थोडी थांबली. मग स्मिताने सांगितलेलं वाक्य तिच्या मनात उमटलं – “Right attitude and thinking will pull you out.”

ती शांतपणे म्हणाली –
“हो, माझी मागची नोकरी गेली. पण त्याने मला शिकवलं की stability म्हणजे company नाही, तर माझं mindset आहे. त्या अनुभवाने मी resilience (भावनिक लवचिकता) शिकले. मी आता नवे skills शिकले आहे आणि challenges हाताळायला तयार आहे.”

Psychologist’s Note ✍🏼
याला म्हणतात growth mindset. Failure ला end न समजता learning opportunity मानणं. अशा attitude मुळे interviewers ला candidate वर विश्वास बसतो.

दोन आठवड्यांनी तिला appointment letter मिळालं. नवीन नोकरी तिच्या जुन्या पगारापेक्षा जास्त होती. आई-वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद चमकत होता.

नेहाने स्मिताला फोन केला –
“तू बरोबर म्हणाली होतीस. Attitude बदलला की परिस्थिती आपोआप बदलते.”

स्मिता हसून म्हणाली –
“नेहा, situation पेक्षा जास्त महत्वाचं तुझं perception असतं. आपलं mind जर 'मी करू शकते' म्हणालं, तर जगातली कुठलीही अडचण तुला रोखू शकत नाही.”

Final Reflection
नेहाने आपल्या डायरीत लिहिलं –
“Life will always test you. कधी job जाईल, कधी relationship तुटेल, कधी health issues येतील. पण प्रत्येक वेळी एकच प्रश्न असतो – ‘तू attitude कसा ठेवणार?’ जर तू positive thinking, resilience आणि learning mindset ठेवलीस, तर कुठलीही अडचण तुला खाली खेचू शकत नाही. खरंच, The right attitude and thinking will always pull you out from any trouble!”

मनोवैज्ञानिक सारांश
1. Attitude > Situation – परिस्थिती बदलू शकत नाही, पण attitude बदलता येतो.
2. Cognitive reframing – Negative विचारांना realistic दृष्टीकोनातून rewrite करणं.
3. Growth mindset – Failure म्हणजे end नाही, तर पुढची step.
4. Problem-focused coping – Action घेणं, नव्या skills शिकणं, प्रयत्न करणं.
5. Resilience – प्रत्येक वेळी पडून पुन्हा उभं राहणं.

👉 ही कथा दाखवते की योग्य दृष्टीकोनाने अगदी कठीण परिस्थितीही नवी संधी निर्माण करता येऊ शकते. 
बाकी? सगळं काही दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु 🙏🏼 
स्वतःला शोधताना - गौरी हर्षल 
क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आणि कौन्सेलर 

बुधवार, १३ ऑगस्ट, २०२५

therapy has no shortcuts थेरपीमध्ये शॉर्टकट नसतो



🎬 थेरपीमध्ये शॉर्टकट नसतो

त्या दिवशी रात्री उशिरा मला मेसेज आला की उद्या अर्जंट ऑनलाइनच कौन्सिलिंग सेशन साठी वेळ हवी आहे. 
वेळ ठरली आणि मी त्या व्यक्तीच्या घाई करण्याबद्दल थोडीशी विचारात पडले. 
दुसऱ्या दिवशी सकाळी ठीक 11 वाजता गुगल मिटच्या विंडो मध्ये एक चेहरा झळकला. 

पंचवीसच्या आसपास वय, व्यवस्थित बांधलेले केस, नीटनेटका ड्रेस. पण डोळ्यांत मात्र स्पष्ट अस्वस्थता.
ती खुर्चीत कंफर्टेबल बसताच बोलली – "मी तुमचं लिहिलेलं सगळं वाचते आणि मला ते पटतं सुद्धा. पण मॅडम, मला जास्त वेळ देता येणार नाही. फक्त दोन–तीन सेशन्समध्ये मला बरं व्हायचं आहे. मला पॅनिक अटॅक येतात, गर्दीत श्वास अडकतो, हृदयात धडधडतं. पण महिनोनमहिने थांबणं शक्य नाही." 

तिचं बोलणं ऐकताना मला जाणवलं – हिच्या आयुष्याला जणू ‘फास्ट-फॉरवर्ड’ मोड लागलाय.
सगळं झटपट हवंय… पण मनाच्या जखमा त्या गतीने बऱ्या होत नाहीत.
केस स्टडी करण्यासाठी माहिती घेत आमच जुजबी बोलणं झालं. तुला सतत थांबवून प्रश्न विचारावे लागत होते. कारण एकच मला वेळ नाही, लवकरात लवकर बरं व्हायचं आहे. 

शेवटी मी शांतपणे म्हणाले –
"आदिती, (नाव बदललं आहे) कधी घर बांधताना पाहिलं आहेस? पायाभरणी घालायला वेळ लागतो. पण पाया मजबूत असेल, तर घर वर्षानुवर्षे उभं राहतं. मनाचंही तसंच आहे."

पहिल्या काही सत्रांत आम्ही फक्त तिच्या भीतीला नाव दिलं.
पॅनिक अटॅकच्या वेळी शरीरात कसा बदल होतो – श्वास कमी कमी होणं, हृदयाची गती वाढणं, हातपाय गार होणं – हे ती ओळखायला शिकली.
तिला पहिल्यांदा समजलं –प्रत्येक वेळी अनेक अटक आल्यावर तिला जे वाटत असतं की ती मरणार आहे तर ती मरणार नाहीये, फक्त तिचं शरीर भीतीला जरा जास्त प्रतिसाद देतंय.

पुढच्या महिन्यांत श्वासोच्छ्वासाचे व्यायाम, mindfulness, आणि ‘ग्राउंडिंग टेक्निक्स’ सुरू झाले.
तिला गर्दीची भीती असल्यामुळे ‘एक्सपोजर थेरपी’ हळूहळू केली – आधी घराजवळचा बाजार, नंतर बसने छोटा प्रवास, आणि मग मॉल, मेट्रो, आणि मोठ्या गर्दीच्या जागा.

कधी प्रगती दिसायची, कधी ती परत जुन्या भीतीत जात असे.
एका सत्रात ती डोळ्यात पाणी आणून म्हणाली –
"कधी वाटतं मी वर चढतेय, पण दुसऱ्याच दिवशी परत खाली कोसळते."
मी तिला समजावत म्हणाले –
"हीच थेरपीची खरी वाट आहे, आदिती. सरळ रेषेत नाही, पण हळूहळू वर नेणारी."

सहा महिन्यांनी, एका संध्याकाळी तिने फोन केला. व्हिडिओ कॉल. तिच्या चेहऱ्यावर त्या दिवशी पहिल्यांदा एक वेगळं हास्य होतं – आत्मविश्वासाचं.
"मॅडम, काल मी मेट्रोने प्रवास केला… एकटीने. थोड्याच अंतरासाठी केला पण मला एकदाही पॅनिक अटॅक आला नाही!"
 
त्या क्षणी माझ्या मनात फक्त एकच वाक्य उमटलं –
कधी कधी योग्य रस्ता, वेळ आणि मेहनत मागतो… पण तोच आपल्याला आपल्या खऱ्या ध्येयापर्यंत नेतो. 

हा टप्पा गाठण्यासाठी आदितीला जवळपास दीड वर्षाचा काळ लागला होता. हा प्रवास तिच्यासाठी सोपा नक्कीच नव्हता. पण तिने ते करून दाखवलं.
वाचक मित्रमैत्रिणींनो, 
कदाचित तुमच्याही आयुष्यात अशी एखादी भीती, सवय, किंवा अडथळा असेल ज्यासाठी तुम्हाला लगेच बदल हवा असेल. पण लक्षात ठेवा –
मानसिक किंवा भावनिक बदल झटपट होत नाहीत.
ते हळूहळू, सातत्याने, आणि संयमाने घडतात.

जर तुम्ही योग्य रस्त्यावर आहात, तर त्याला वेळ द्या.
कारण जेव्हा तुम्ही तुमचे लक्ष्य गाठाल, तेव्हा तुम्हाला जाणवेल की हा प्रवास फक्त लक्ष्य गाठण्यासाठी नव्हता… तर तुमच्यातील नवीन ‘तुम्हाला’ घडवण्यासाठी होता. 🌿
बाकी? सगळं काही दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु 🙏🏼 
स्वतःला शोधताना - गौरी हर्षल