मनाचे प्रतिबिंब

#मनाचे_प्रतिबिंब
असं म्हणतात आपला चेहरा हा आपल्या मनाचं प्रतिबिंब असतो. खूप सगळे विचार आपण करत असतो सकाळी उठल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत. त्या त्या क्षणी मनात जन्माला येणारे विचार क्षणभर का होईना आपल्या चेहऱ्यावर उमटतात. आपण खुश असतो ते आपला चेहरा सांगतो, कधी मनातून वाईट वाटलेल असतं पण ते सुद्धा आपल्या चेहऱ्यावर दिसतं. असं हे आपलं प्रतिबिंब नेहमी चांगलं दिसावं लोकांवर त्याचा चांगला परिणाम व्हावा अशीच तर आपली इच्छा असते. पण म्हणून आपण किती प्रयत्न करतो? चांगले विचार , चांगल्या पद्धती जगण्यात आणल्या तर प्रतिबिंबही तसच असेल.
जमेल का??? अर्थातच जमणार जसं शरीराचं बाह्य रूप खुलवण्यासाठी प्रयत्न केले जातात तसंच मनासाठीही करावे.  मनालाही काही पौष्टीक असे विचार , गोष्टी सांगाव्यात जेणेकरून मनाचं स्वास्थ्य सुधारत राहील. यासाठी फार काही करावं लागणार नाही फक्त आपलं वाचन, आपली संगत , आपली विचारसरणी थोडीशी ग्रुम करावी लागेल. ग्रुम कशी करायची हे आजूबाजूला निरीक्षण केले की समजते. मी तर करून बघणार आहे तुम्हीही ट्राय करा....
प्रत्येकाला आज एक तरी क्षण मनाचं स्वच्छ प्रतिबिंब दाखवणारा मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना! शुभं भवतु!!
#गौरीहर्षल
१२.७.२०१७

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या मना बन दगड...

आज कुछ अच्छा पढते हैं

मी आणि करुणात्रिपदी