पोस्ट्स

स्वतःसाठी बदलताना भाग 3

इमेज
#स्वतःसाठी_बदलताना_भाग३ (गौरीहर्षल) आपण बोलताना नेहमी म्हणतो की, त्यांनी असं करायला हवं होतं, त्यांनी असं बोलायला हवं होतं. पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती काही वेगळीच असते आपण कोणत्या परिस्थितीत काय वागत, बोलत आहोत ह्याचे पूर्ण भान प्रत्येकाला असते. जर एखादी व्यक्ती एखादी गोष्ट बोलत नाही किंवा करत नाही म्हणजेच तिला ती गोष्ट करण्याची इच्छा नाही.  अशा वेळी आपण आपल्याला हवे ते करावे अन् लोकांना काय हवे ते करू दयावे. कारण कितीही प्रयत्न केला तरी आपण लोकांचं वागणं नाही बदलू शकत.  𝑺𝒕𝒐𝒑 𝒘𝒂𝒊𝒕𝒊𝒏𝒈 𝒂𝒏𝒅 𝒇𝒊𝒈𝒉𝒕𝒊𝒏𝒈 𝒇𝒐𝒓 𝒑𝒆𝒐𝒑𝒍𝒆 𝒘𝒉𝒐 𝒘𝒐𝒖𝒍𝒅 𝒏𝒐𝒕 𝒄𝒓𝒐𝒔𝒔 𝒂 𝒑𝒖𝒅𝒅𝒍𝒆 𝒇𝒐𝒓 𝒚𝒐𝒖.  𝑳𝒆𝒕 𝒕𝒉𝒆𝒎 𝒈𝒐. 𝑴𝒐𝒗𝒆 𝒐𝒏. 𝑫𝒐 𝒃𝒆𝒕𝒕𝒆𝒓.  𝖨𝖿 𝗍𝗁𝖾𝗒 𝗋𝖾𝖺𝗅𝗅𝗒 𝗐𝖺𝗇𝗍𝖾𝖽 𝗍𝗈, 𝗍𝗁𝖾𝗒 𝗐𝗈𝗎𝗅𝖽.

स्वतःसाठी बदलताना भाग 2

इमेज
#स्वतःसाठी_बदलताना_भाग२ (गौरीहर्षल) एखादे ध्येय गाठण्यासाठी १००वेळा मार्ग बदलावा लागत असेल तर तो नक्कीच बदलावा.  पण जर ते ध्येय गाठताना घ्यावे लागणारे श्रम तुम्हाला आनंद देत नसतील तर त्यामागे धावण्यात काही अर्थ नाही.  लोकांना वाटेल की तुम्ही हरलात, पण जी गोष्ट करताना आपल्याला शरीरासोबतच मनाचेही स्वास्थ्य पणाला लावावे लागत असेल अशी गोष्ट न केलेली कधीही योग्यच.  म्हणून तर, 𝙳𝚘𝚗'𝚝 𝚚𝚞𝚒𝚝 𝚋𝚎𝚌𝚊𝚞𝚜𝚎 𝚒𝚝 𝚒𝚜 𝚑𝚊𝚛𝚍.  𝚀𝚞𝚒𝚝 𝚘𝚗𝚕𝚢 𝚠𝚑𝚎𝚗 𝚒𝚝 𝚒𝚜𝚗'𝚝  𝚠𝚘𝚛𝚔𝚒𝚗𝚐 𝚏𝚘𝚛 𝚢𝚘𝚞.

स्वतःसाठी बदलताना भाग 1

इमेज
#स्वतःसाठी_बदलताना_भाग१   (गौरीहर्षल)   आपण नेहमी आपल्या सुखी, आनंदी असण्याचा संबंध एखाद्या गोष्टीशी किंवा व्यक्तीशी जोडतो. अन् ते मिळवण्यासाठी जीव तोडून आटापिटा करत राहतो.  जोपर्यंत आपलं सुख आपला आनंद हा फक्त आपल्या हातात आहे हे आपल्याला समजणार नाही तोपर्यंत समोर असलेलं सुखही दिसणार नाही.  म्हणून तर, H͎a͎p͎p͎i͎n͎e͎s͎s͎ i͎s͎ r͎i͎g͎h͎t͎ h͎e͎r͎e͎, r͎i͎g͎h͎t͎ n͎o͎w͎! 

do something for yourself - 4/365 days of self care

इमेज
नुकत्याच जॉईन केलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये नोटिफिकेशन येऊन पडली होती. नोटिफिकेशन होती उद्यापासून चालू होणाऱ्या एका ऑनलाईन क्लासची. मुग्धाने नोटिफिकेशन बघताच एक सुस्कारा सोडला.  क्लास काही फार अवघड अशा विषयांचा नव्हता.पण गेले काही दिवस मुग्धाच्या मनात बऱ्याच गोष्टी घोळत होत्या. त्या गोष्टींवर विचार करत असताना अचानक तिला इंस्टाग्राम वरती या क्लासची जाहिरात दिसली होती.  आणि सहज करून बघू म्हणून तिने नवऱ्याच्या कानावर ती गोष्ट घातली.  कोरोना नंतर पहिल्यांदा मुग्धाने नवीन काहीतरी शिकण्याचा विषय काढला होता. त्यामुळे नवरा अर्थातच मनापासून तयार झाला. कारण कोरोनाची दोन वर्ष आणि त्यानंतर मुग्धाचं कारणाशिवाय घराबाहेर पडणं टाळणं सुरू झालं होतं.  मुलं आणि नवरा या तिघांनाही तिच्या खूप मागे लागावं लागत होतं तेव्हा कुठेही तयार व्हायची. निदान मागच्या महिन्यापासून नवऱ्याने स्वतःहून जवळच्या लायब्ररीत नाव नोंदवत तिला पुस्तक आणून द्यायला सुरुवात केली होती. पुस्तकांमुळे ती पुन्हा थोडी थोडी माणसात येऊ लागली होती. आता तर काय रोज दोन तास ऑनलाइन क्लास म्हणजे त्यानिमित्ताने तिला नवीन कोणीतरी भेटेल. आणि ती आपसूक

नकारात्मक विचार दूर करण्याचे काही उपाय

इमेज
नकारात्मक विचार दूर करण्याचे काही उपाय  "मनस्वास्थ्य" हा सध्याच्या काळात आपल्याला सगळ्यांनाच महत्वाचा असणारा विषय आहे.  आपण सगळेच हल्ली सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतो. कारण ती काळाची गरज आहे. पण सोशल मीडियावर समोर येणाऱ्या कितीतरी गोष्टींचा प्रभाव आपल्या मनःस्वास्थ्यावर होत असतो.  त्यातही सगळ्यात जास्त त्रास कुठल्या गोष्टींचा होत असेल तर वेगवेगळ्या पोस्ट वाचून मनात सतत येणाऱ्या नकारात्मक विचारांचा.  हे नकारात्मक विचार आपल्या मनावर त्यांचा ठसा खूप खोलवर उमटवत असतात. ज्यामुळे कुठे ना कुठे आपल्या दैनंदिन आयुष्यात त्याचे पडसाद उमटत राहतात.  ह्या नकारात्मक विचारांना प्रयत्नपूर्वक दूर नक्कीच करता येते फक्त त्यासाठी काही साध्या सोप्या टीप्स फॉलो कराव्या लागतात.  कोणत्या ? त्यावर आपण चर्चा करू.  1. स्टॉप अँड पॉज मेथड ज्या ज्या वेळी आपल्याला अस वाटतं की आपण नको त्या विचारांवर जास्त रेंगाळत आहोत. त्या वेळी स्वतःला ऐकू येईल अशा आवाजात स्टॉप असं सांगावं.  यामुळे काय होतं?  विचारांची जी मालिका सुरू असते तिच्यात खंड पडतो.  आणि पुढे लगेच पॉज ही सूचना आपल्याला आपल्या विचारांना दुसऱ्या दिशेने वळ

नास्तिक

इमेज
नास्तिक  "गाडी का थांबवलीस रतन?" लॅपटॉपमध्ये डोकं खुपसून बसलेल्या डॉ. कोरडेनी गाडी थांबवल्याच जाणवलं तस ड्रायव्हरकडे बघण्यासाठी मान वर करत आपल्याच तालात विचारलं.  पण वर बघितल्यावर त्यांच्या लक्षात आलं की ड्रायव्हर जागेवर नाहीये. आणि गाडीच्या आजूबाजूला प्रचंड गर्दी आहे.  त्यांनी गाडीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तेंव्हा त्यांच्या लक्षात आलं की ते कधीचेच गाडीतून बाहेर पडले आहेत.  आणि फक्त गाडीतूनच नव्हे तर त्यांच्या शरीरातूनही बाहेर पडले आहेत.  स्वतःला बसलेल्या धक्क्यातून सावरत त्यांनी आजूबाजूला बघितलं तर आजूबाजूला असलेल्या गर्दीकडे त्यांचं लक्ष गेलं.  वारीसाठी जाणाऱ्या एका दिंडीतले वारकरी होते ते सगळे गर्दीतले लोक. जसे ते कोरडेंसाठी पूर्णपणे अनोळखी होते तसेच कोरडेही त्यांच्यासाठी पूर्णपणे अनोळखी होते.  पण आता या क्षणी मात्र ते सगळेजण कोरडेना आणि त्यांच्या ड्रायव्हर ला वाचवण्यासाठी धडपड करत होते. ड्रायव्हर कसा माहीत नाही पण गाडीच्या बाहेर फेकला गेला आणि वाचला होता. पण डॉक्टर मात्र गाडीतच होते.  काही वेळातच तिथे ऍम्ब्युलन्स आली. एम्ब्युलन्स मधून उतरलेल्या कर्मचाऱ्यांनी दोघांना

मी आणि करुणात्रिपदी

इमेज
मी आणि करुणात्रिपदी मागच्या एका वर्षापूर्वी विश्वास कथेमधील काही भाग एकीने ढापला होता. नंतर मी ते फेसबुक वर शेअर केलं आणि त्यावर तिने काउंटर लेख लिहिला. तो वाचून माझ्या एका मैत्रिणीने सांगितलं की तू तिने लिहिलेलं नीट वाच. तिने तुझ्या लेखनाचा अभ्यास तुझ्यापेक्षा जास्त केला आहे. तुला तुझ्या देवाकडून संकेत आहे त्यात. मी शांतपणे ते लिहिलेलं वाचलं. आणि जाणवलं की काय मिस केलं मी. त्यात तिने लिहिलं होतं की दत्त गुरूंना ही म्हणजे मी गौरी हर्षल काय स्वतःची प्रॉपर्टी समजते का? तेंव्हा मी ते खूप हलक्यात घेतलं होतं. पण आज मला त्या व्यक्तीला थँक्यू म्हणायचं आहे. का? अरे नकळत का होईना तिच्यामुळे मला हे जाणवलं की माझा मित्र , माझा दत्त माझ्या आयुष्यात लेखनात किती भिनलेला आहे. हा प्रसंग माझ्या आयुष्यात खूप काही छान घडवून गेला. माझं दत्ताशी नातं इतकं घट्ट झालं की आता काही मागण्याची गरजच पडत नाही. दत्त माझी प्रॉपर्टी नाहीये पण माझ्या सगळ्या जन्मांच्या पाप-पुण्याच्या प्रॉपर्टीचा हिशोब प्रत्यक्ष त्याने आपल्या हातात घेतला आहे. बास अजून काय पाहिजे. वाईटातून चांगलं घडतं म्हणतात ते असं... पुढे करु

प्लेलिस्ट भाग 1 - गौरी हर्षल

इमेज
प्लेलिस्ट भाग 1  छोटी सी कहानी से, बारिशों के पानी से सारी वादी भर गयी ना जाने क्यों, दिल भर गया ना जाने क्यों, आँख भर गयी कानात हेडफोन आणि बसच्या खिडकीमधून बाहेर दूर कुठेतरी नभापलीकडे रेंगाळलेली नजर... ती तिच्याच विश्वात दंग... काय विचार करत असेल ती?  ह्या विचारात संपणारा बाकीच्या प्रवाशांचा रोजचा प्रवास... मुळात ती अशीच होती आपल्यात रमलेली.  जगाचं भान राखाव अस काही नव्हतच जगाकडे ... स्वतःशीच संवाद साधत ती तो प्रवास  भरभरून एन्जॉय करत राहायची.  इतर कुणी आपल्याला बघत आहे,  हे तिच्या खिजगणतीतही नसायचं.  ती आपली तिच्या वेगाने तिचं घर ते क्लिनिक, अन् क्लिनिक ते घर हा प्रवास तिच्या प्लेलिस्ट सोबत करायची.  रोज वेगळी प्लेलिस्ट रोजच्या मुडशी जोडलेली.  आज तर प्लेलिस्ट मधले आवडते सोबती बरोबर होते म्हणजे कारण ही खास होतं.  छोटी सी कहानी से... पासून सुरू झालेली प्लेलिस्ट विचारांच्या सोबत वाऱ्याशी गप्पा मारत होती.  नकळतच ओल्या होणाऱ्या डोळ्यांच्या कडांवर एखादा चुकार थेंब रेंगाळत होता. त्याला ही तसच स्वीकारत ती ओठांवर मात्र हसू खेळवत होती.  मनात हळूहळू भूतकाळाच्या तुकड्यातून पझल पूर्ण होत होते. एके