do something for yourself - 4/365 days of self care
नुकत्याच जॉईन केलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये नोटिफिकेशन येऊन पडली होती. नोटिफिकेशन होती उद्यापासून चालू होणाऱ्या एका ऑनलाईन क्लासची. मुग्धाने नोटिफिकेशन बघताच एक सुस्कारा सोडला. क्लास काही फार अवघड अशा विषयांचा नव्हता.पण गेले काही दिवस मुग्धाच्या मनात बऱ्याच गोष्टी घोळत होत्या. त्या गोष्टींवर विचार करत असताना अचानक तिला इंस्टाग्राम वरती या क्लासची जाहिरात दिसली होती. आणि सहज करून बघू म्हणून तिने नवऱ्याच्या कानावर ती गोष्ट घातली. कोरोना नंतर पहिल्यांदा मुग्धाने नवीन काहीतरी शिकण्याचा विषय काढला होता. त्यामुळे नवरा अर्थातच मनापासून तयार झाला. कारण कोरोनाची दोन वर्ष आणि त्यानंतर मुग्धाचं कारणाशिवाय घराबाहेर पडणं टाळणं सुरू झालं होतं. मुलं आणि नवरा या तिघांनाही तिच्या खूप मागे लागावं लागत होतं तेव्हा कुठेही तयार व्हायची. निदान मागच्या महिन्यापासून नवऱ्याने स्वतःहून जवळच्या लायब्ररीत नाव नोंदवत तिला पुस्तक आणून द्यायला सुरुवात केली होती. पुस्तकांमुळे ती पुन्हा थोडी थोडी माणसात येऊ लागली होती. आता तर काय रोज दोन तास ऑनलाइन क्लास म्हणजे त्यानिमित्ताने तिला नवीन कोणीतरी भेटेल. आणि ती आपसूक