पोस्ट्स

★मैत्री★➡️टर्म्स अँड कंडिशन अप्लाय ⬅️

इमेज
★मैत्री★ ➡️टर्म्स अँड कंडिशन अप्लाय ⬅️ मैत्री - टर्म्स अँड कंडिशन अप्लाय  जवळपास ७० सेल्फी काढून झाल्यावर ७१ व्या सेल्फीला २० वर्षांची कुल्फी आयमिन कलिका खुश झाली. मग बरेच हॅशटॅग वापरत सगळ्या सोशल मीडिया अकाउंटवर ती सेल्फी शेयर करण्यात आली. मग सुरू झाली लांबलचक प्रक्रिया म्हणजे प्रोसेस हो लाईक, कमेंटच्या देवाणघेवाणीची. अधूनमधून आपल्या सो कॉल्ड सोशल मिडिया प्रतिस्पर्धी लोकांचे खाते तपासणीही सुरू होती. पण जसजसे हिचे लाईक,कमेंट कमी होऊन इतरांचे वाढू लागले तशी ती अस्वस्थ झाली.  घरात काम करत असणाऱ्या रचनाचा एक डोळा लेकीकडेही होता. नुकताच लेकीचा कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाचा रिझल्ट लागला होता. रचनाच्या अपेक्षेपेक्षा जरा २,४ टक्के जास्तच मिळाले होते कलिकाला. त्यामुळे तर हवा तसा फोन घेऊन दिला होता. तशी कलिका करियर वगैरे बाबत प्रचंड फोकस्ड होती. पण हल्ली हल्लीच हे सोशल मिडिया वेड जरा जास्तच वाढलं होतं. आणि अचानक झालेला हा बदल चाणाक्ष आईच्या नजरेने टिपला होता.  रचना स्वतःही स्मार्टफोन छान प्रकारे वापरत असल्याने त्यातल्या खाचाखोचा तिलाही आता कळत होत्या.  कलिकासोबतही तिचे नाते मैत्रीचे होते पण त्याचबर

गंडांतर

इमेज
गंडांतर   वर्ष २०१८ चा जानेवारी महिना, उत्तरायण सुरू झालेले होते.  १२ जानेवारी २०१८ ला माझ्या सासूबाईंचे हृदयविकाराच्या धक्क्याने आकस्मिक निधन झाले.  ही घटना आमच्यासाठी अक्षरशः प्रचंड अनपेक्षित होती. कारण त्या दिवशी( शुक्रवार ,१२ जानेवारी २०१८ ) संध्याकाळी ७ वाजेपर्यंत आई अगदी चालत्या फिरत्या होत्या.  माझाही दोन दिवस आधीच गाडी चालवताना छोटासा अपघात झाला होता आणि त्यामुळेच त्या दोन तीन दिवसात आमचं बऱ्याचदा फोनवर बोलणं झालं होतं.  शेजारच्या सगळ्या मैत्रिणींसोबत बसून त्यांनी दुसऱ्या दिवशीची भोगीची भाजी निवडून ठेवली होती. रविवारी संक्रातीच्या दिवशीच हळदीकुंकू आवरून त्या सोमवारी सकाळी माझ्याकडे येण्यासाठी निघणार होत्या. तसं आमचं गुरुवारी फोनवर बोलणं झालं असल्याने आम्ही दोघेही निश्चिन्त होतो.  पण अचानकच शुक्रवारी रात्री साडे आठ च्या सुमारास मला फोन आला आणि शेजारच्या ताईने फोनवर आधी आई सिरीयस असल्याचे सांगितले आणि मग पुन्हा दहा मिनिटांनी दुसऱ्यांदा फोन करून त्या आता ह्या जगात नाहीत असं सांगितलं. आधीतर मी त्यांना काहीही काय सांगता म्हणत उडवूनच लावले पण जे घडलं होतं ते खरं होतं.  शेवटी स्वतःला

ती , तो आणि माईंड रिडींग

इमेज
ती , तो आणि माईंड रिडींग  ती (एक्साईट होऊन) - " लोकांच्या मनात काय सुरू आहे हे कळलं तर काय मज्जा येईल न? " तो (सुस्कारा सोडत नकारार्थी मान हालवत) - "सगळ्यात वाईट फॅन्टसी आहे ही तुझी."  ती (अजून स्वप्नाळू स्वरात) - " का? विचार करून बघ की जरा न बोलता, न सांगता प्रत्येकाला काय हवंय ते कळेल. किती तरी इच्छा पूर्ण करता येतील."  तो (कसं होणार हिचं अशा अर्थाने तिच्याकडे बघत) - "स्वप्नांच्या राज्यातून जमिनीवर या मॅडम. ह्या सगळ्यांच्या जोडीने अजून बरंच काही घडेल ते तुमच्या अजून लक्षात आलं नाहीये."  आता मात्र ह्याच सगळं आधी ऐकून मगच आपण बोलू असं ठरवून ती छानपैकी टेबलावर दोन्ही कोपरे टेकवून स्वतःच्या दोन्ही हाताच्या मधोमध स्वतःचा चेहरा धरत त्याच्याकडे बघत होती. तिच्या डोळ्यातले भाव ओळखून त्यानेही हातातला फोन बाजूला ठेवला.  आणि सावरून बसत तो बोलू लागला.  तो - "म्हणजे बघ हे तुझं गुडी गुडी कल्पना वगैरे ठीक आहे, पण जर खरच लोकांच्या मनात कुठल्या क्षणी काय विचार सुरू आहे हे कळू लागलं तर बरीच नाती जुळायच्या आधीच तुटून जातील. कारण बऱ्याच वेळेला माणूस मनात विचार

तो , ती आणि अपेक्षा

इमेज
#तो_ती_आणि_अपेक्षा "इथे प्रत्येक जण अपेक्षा कुणाकडूनही ठेवू नका हा सल्ला अगदी स्वतः तस वागत असल्याच्या थाटात देतंय." तो जरा वैतागतच म्हणाला.  "मग?" , तिने एक भुवई उंचावत विचारलं.  त्यावर अजूनच वैतागत तो म्हणाला, "मग काय अग? अशा सगळ्या महान लोकांपैकी कुणीच अपेक्षा कशा ठेवू नयेत ह्याबद्दल बोलतच नाही. म्हणजे मी काय म्हणतो, एक स्टेप बाय स्टेप गाईड द्या न आणून मला ज्यामध्ये योग्य पद्धतीने इतरांकडून अपेक्षा कशा ठेवू नयेत हे लिहिलेलं असेल. आणि ते मी आयुष्यभर फॉलो करू शकेन." त्याच्या ह्या बोलण्यावर तीही विचारात पडली.  बरोबरच बोलला न तो? आपण सगळेच जण कुणा ना कुणाकडून कसली तरी अपेक्षा ठेवतच असतो. कधी ती मोकळेपणाने व्यक्त करतो तर कधी मनातल्या मनात ठेवतो.   खरंच जमतं का हो अपेक्षा न ठेवता कृती करत राहणं? मला विचाराल तर नाहीच जमत.आणि का जमाव कारण बऱ्याच वेळेला समोरच्याने फक्त मोजक्या शब्दांत जरी आपण केलेल्या कृतीची दखल घेतली तरी आपल्याला पुन्हा झोकून देऊन काम करण्यासाठी उत्साह वाटतो.  जर प्रत्येकजण कुठलीही अपेक्षा न ठेवता समोर आलेलं काम करत गेला तर लोकांमध्ये सकारात्मक

खजिना

इमेज
#खजिना  नुकताच लॉकडाउन संपला होता त्यामुळे आज बाहेर पडण्याची हिम्मत करत ती घराजवळच असलेल्या छोट्याशा मंदिराच्या आवारात जाऊन बसली. कामाचा दिवस असल्याने मंदिरात कुणीच नव्हतं. सकाळीच पूजा वगैरे करून पुजारीही निघून गेले होते. शांत वातावरणाचा अनुभव घेत ती बाकड्यावर टेकली. अधूनमधून एखादी व्यक्ती येता जाता थांबून नमस्कार करत निघत होती. लोकांचं निरीक्षण करत तीही आपल्या विचारात रमली होती.  लॉकडाउन मुळे तिच्या परिस्थितीत तसा काही फरक पडला नव्हता. इतर स्त्रियांसारखीच तिचीही घरगुती काम वाढली होती बास. तिची तशी काही तक्रारही नव्हती त्याबद्दल कारण जे वाट्याला आलं आहे ते स्वीकारणं हा तिनं स्वतःच्या आयुष्याचा भागच केला होता.  मंदिरात शांतपणे बसल्याने तिला आज जरा बरं वाटलं.  तितक्यात एक चिरपरिचित सुगंध तिच्या आसपास दरवळला. त्याची जाणीव होताच तिच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू उमटलं. पण आज तो सुगंध लगेच हवेत विरला नाही, जणू तिची विचारपूस करत असल्यासारखा तिच्या सभोवती तो वावरत होता. त्याच्या अस्तित्वाने तिला अगदी भरून आल्यासारखं झालं. थकलेल्या त्या जीवाला कुणीतरी काळजीपोटी विचारावं, दखल घ्यावी एवढीच तिची अपे

मातृत्वाचा माज कशासाठी?

इमेज
आई होणं ही जगातली सर्वात सुंदर गोष्ट आहे. पण फक्त मूल जन्माला घातलं म्हणूनच आई होता येतं का? मान्य आहे की नैसर्गिकरित्या फक्त स्त्रीच हे अनुभवू शकते पण त्याचा माज करणं कितपत योग्य आहे? आज आजूबाजूला अशी कित्येक उदाहरणं सापडतील जे मूल होण्यासाठी तडफडत आहेत, वाट्टेल ते प्रयत्न करत आहेत मग अशा वेळी एखाद्याला ह्यातलं काही न करता मूल होत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, पण त्या व्यक्तीला इतरांचं मन दुखवण्याचा हक्क मिळतो का?  दुर्दैवाने अजूनही आपल्याकडे मूल होणं हे अनुभवण्यापेक्षा स्टेटस म्हणून मिरवण्यातच लोकांना धन्यता वाटते. अशा मुलांवर काय संस्कार होतात ते काळानुसार दिसतच.  ज्यांनी मूल होण्याच्या मार्गावर खूप काही गमावलं आहे ज्यात न जन्माला आलेले गर्भ, स्वतःची, जोडीदाराची मनस्थिती त्यांना स्वतःच मूल हातात आल्यावरही जर तुम्हाला काय कळणार किती त्रास होतो असे ऐकवले तर आपलीच मनोवृत्ती उघडी पडते.  आपल्याला मिळालं आहे ते उत्तमरीत्या सांभाळून दाखवावं टोमणे मारू पब्लिकने. तुम्हाला योग्य वयात मुलं झाली म्हणजे तुम्ही काही थोर कार्य केलेलं नाहीये. आणि ज्यांना होत नाहीत त्यांचं काही चुकलेल नाहीये.  ह्याला न

जागतिक पुस्तक दिन 23 एप्रिल 2021

 Harry Potter हा माझ्यासाठी प्रचंड जिव्हाळ्याचा विषय❤️❤️❤️ ह्या पुस्तकांनी मला ते दिलं आहे, देत आहेत जे कुठूनही मिळालं नाही.  आयुष्यातल्या सगळ्या गाळलेल्या जागा ह्या पुस्तकांनी, त्यातील पात्रांनी भरून काढल्या.  एकटेपणा ही सुखद असू शकतो हे ह्या पुस्तकांनी शिकवलं.  स्वतःच  पुस्तक लिहिण्याची प्रेरणाही हेच.  मुख्य शिकलेली गोष्ट ही की इच्छाशक्ती आणि  स्वतःवर विश्वास असेल तर माणूस कुठल्याही परिस्थितीत तग धरुन राहू शकतो. आणि फक्त तग धरूनच नाही तर उत्तम पद्धतीने स्वतःला घडवू शकतो.  आयुष्यात कुणीही नसेल तरी आणि भरपूर जवळचे असतील तरी सर्वात जास्त प्रामाणिक दोस्त म्हणजे पुस्तकं❤️❤️त्यांचा हात कधीच सोडू नये.  आज माझ्याकडे जवळपास 100 + पुस्तकं आहेत. आणि  पुस्तक विकत घेणे ही एकमेव अशी गोष्ट आहे जी करताना मी दोनदा विचार करत नाही. 😊😊 माणसं अनुभव देतात पण पुस्तकं त्या अनुभवातून काय घ्यायचं ते शिकवतात. निसर्ग, प्राणी आणि पुस्तकं हे सगळ्यात उत्तम गुरू आहेत. न बोलता बरंच काही शिकवण्याची कला फक्त त्यांनाच अवगत आहे अस म्हटल तरी चालेल.  तर पुस्तकं वाचा,उत्तम पुस्तकं वाचा, वाचल्याने आयुष्य समृद्ध होतं. लिहा

ʙᴇ ᴜɴɪǫᴜᴇ - वेगळेपण जपताना

इमेज
ʙᴇ ᴜɴɪǫᴜᴇ - वेगळेपण जपताना असं म्हणतात की खूप उन्हाळे-पावसाळे पाहून जे शहाणपण येत नाही ते काही अनुभव शिकवून जातात.  आणि अनुभवातून जे आपण शिकतो ते आपल्या कायम लक्षात राहतं.  लिझा , एक मेहनती आणि हसतमुख मुलगी. स्वतःला सिद्ध करण्यासाठी आपलं जन्मगाव सोडून महानगरात येऊन धडपड करत होती. शिक्षणाची बाजू बळकट असल्याने नोकरी मिळण्यात काहीच अडचण आली नाही. अन् हा मुख्य प्रश्न सुटल्याने खाणं, राहणं हेही प्रश्न सुटले होतेच.  आता प्रश्न होता तो शहरातल्या वेगळ्या वातावरणाशी जुळवून घेत सोबतच स्वतःला हरवू न देण्याचा. पण इथेच माशी शिंकली, लिझा जरी नावावरून मॉडर्न वाटत असली तरी तिच्यावर तिच्या आजीचे संस्कार होते. त्यामुळे इतरांसारखं पटकन अनोळखी लोकांशी मैत्री करणं, त्यांच्यासोबत मोकळेपणाने वावरण तिला जरा अवघड वाटायचं. तिची स्वतःची अशी एक स्पेस होती आणि त्यात उगाचच कुणी घुसण्याचा प्रयत्न केला तर लिझा अजूनच अलिप्त होत असे.  पण रियाने मात्र प्रेमाने , हळुवारपणे लिझाच्या ह्या स्पेस मध्ये शिरकाव केला होता. रिया लिझासारखीच छोट्या शहरातून दोन वर्षांपूर्वी इथे आली होती. सध्या लिझा ज्या फेजमधून जात होती त्यातून रिय