पोस्ट्स

कातरवेळ

#कातरवेळ कातरवेळ मनाचा तळ ढवळून टाकणारी. कितीही इच्छा नसली तरी नको त्या आठवणींना फेर धरून सभोवताली नाचवणारी. अशा वेळी हमखास निसटलेल्या माणसांची अन् त्यांच्यासोबत घालवलेल्या क्षणांची आठवण येते. कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात असलेल्या दुःखाला अचानक जाग येते. अशावेळी लादलेला एकांत खरंच खूप जीव घेतो. कितीही प्रयत्न केला तरी कधीतरी ही कातरवेळ वेळ साधून गाठतेच. नको नको म्हणताना हात पडकून नेतेच आठवणींच्या राज्यात. या राज्यातून परतण्यासाठी मार्ग एकच भविष्यासाठी आठवणीच अशा बनवा ज्यांना आठवून चेहऱ्यावर हलकेच हसू येईल अन् डोळ्यात जरी पाणी असले तरी ते सुखाच्या क्षणांची साठवण असेल. त्यासाठी खूप काही नाही मनाची पाटी कोरी करता यायला हवी. दुःखाचा बॅलन्स कमी ठेवत सुखाने प्रत्येकाची ओंजळ भरत जावी. मग आपोआपच कातरवेळ लक्ष्मीच्या पावलाने सुख आणेल अन् समाधानी मन आयुष्यात रंग भरेल हवेहवेसे. #गौरी_हर्षल ३०.६.२०१७

सुगंधित हेतू

#सुगंधित_हेतू 'नीता' जोशींची धाकटी सून तिचं आणि वैभवचं म्हटलं तर लव्ह मॅरेज म्हटलं तर अरेंज. कारण दोघांची जात एकच आणि दोन्ही कुटुंबातील सदस्य एकमेकांना ओळखत होते. पण तिच्या थोरल्या जावेला मात्र हे लग्न मान्य नव्हतं. तरीही हसत खेळत एकदाचा नीता आणि वैभवाचा संसार सुरू झाला. मनात कसलीच अढी बाळगण्याची सवय नीताला नव्हती त्यामुळे कुणी काही बोललं तरी ती ते विसरून हसतमुखाने वावरत असे. हळूहळू मात्र सासू, सासरे, दिर, जाऊ, नणंद ,  नणंदेचा नवरा यांच्यामधली छुपी भांडणं हेवेदावे सतत तिला समजू लागले. घरातल्या घरातच सगळ्यांना एकमेकांशी स्पर्धा करायची होती कुणाला कमवत असलेल्या पैशाच्या जोरावर तर कुणाला घरातील महत्वाचं स्थान हवं म्हणून. वैभव निताचा नवरा मात्र तिच्यासारखाच होता ४ क्षण एकत्र आहोत तर आनंदाने जगू असा विचार करणारा. त्यामुळे आधी कधीच त्याला हे जाणवलं नाही आणि जरी जाणवलं तरी वयाने लहान म्हणून तो मध्ये पडला नाही. नीताला मात्र इतकी चांगली लोकं नको त्या गोष्टीत आयुष्य का वाया घालवत आहेत हेच कळत नव्हतं.  ही सतत चालणारी धुसफूस एकदाची संपवून टाकू म्हणून नीताने सगळ्यांना कुलदेवतेच्या दर्शनासो

नातं....

ढगांवर घातलेलं चांदण्यांचं पांघरूण काढून घेत रात्र परतीच्या प्रवासाला निघाली. नाजूकपणे पृथ्वीवर उतरणाऱ्या सूर्याच्या कोवळ्या किरणांना बघून खुदकन स्वतःशीच हसली.  नकळतच तिच्या मनात आले की कसं आहे हे पहिला आला की दुसऱ्याला जावेच लागते नं. तसंच काही नात्यांचंही होतं ना !! काही नाती रोजच्या जगण्यात खूपच सवयीची असतात, तर काही कधी हात सोडून निघून जातात कळतही नाही. एखादं नातं खूप गाजावाजा करत आयुष्यात येतं पण पुढे मात्र कुठल्याही वळणावर ते आपल्याला भेटतच नाही. एखादं नातं मात्र गुपचूप येतं आणि आपल्याला कळूही न देता आयुष्याचा महत्वाचा भाग होतं. काही नाती स्पीडब्रेकर सारखी असतात आयुष्यात योग्य वेळी येऊन आपल्याला धोक्याची सूचना देणारी. तर काही अडखळणारी कधी नेमकं काय करायचं हेच न समजल्याने आपल्याला सोबत घेऊन धडपडणारी. नाती येताना सोबत खूप काही आणतात चांगलं ते ठेऊन घ्यावं नको ते सोडून द्यावं. पण नाती कशीही असली तरी आपण ती आपली मानलेली असतात. त्यांच्यासोबत येणारे अनुभव, कडू गोड आठवणी आपलं आयुष्य समृद्ध करत असतात. शिकतोच आपण प्रत्येक नात्याकडून काही न काही. फक्त ते शिकलेलं जतन करता आलं पाहिजे. मन

चांगुलपणा एक शाप?

चांगुलपणा एक शाप टायटल फारच विचित्र आहे ना? पण कुठेतरी ही आजची वस्तुस्थिती आहे का? नुकताच मैत्रिणीसोबत घडलेला किस्सा.           एका बागेत शेजारी शेजारी राहणारी मुलं खेळत होती. तिथेच त्यांच्या भ्रमणध्वनीधारक व्यस्त माताही होत्या. मुलांचं वय असेल 4 ते 6 वर्षे वयोगट. कशावरून तरी मुलांचं भांडण झालं. एकजण रडत आईकडे सॉरी मम्मीकडे आला. भांडणाच कारण होत रडणाऱ्या मुलाकडे असलेलं नवीन खेळणं. बाकीच्यांपैकी कुणीतरी ते मागितलं ह्याने दिलं नाही. मारामारी केली मागणाऱ्याने. जो रडत आला त्याच्या मम्मीचं म्हणणं होतं की तू का मारलं नाहीस उलटून? या प्रसंगात ती जे म्हणाली ते कदाचित योग्य असेलही पण यातून पुढे खरा संवाद सुरू झाला. तो असा की हल्ली मुलांना चांगलं वागायला शिकवून काही उपयोग होत नाही . उलट इतरांवर चिडणे,मारणे , ओरडणे वगैरे शिकवावं लागत तिच्यामते आणि इतरही काही जणींच्या मते. चुकून माझ्या तोडून निघून गेलं की अगं न शिकवता तुमची मुलं चांगलं वागत आहेत तर तुम्हाला का त्रास होतोय??         त्यावर मला मिळालेलं उत्तर असं , तुला काय मिळतंय इथे चांगलं वागून?? तुझी तर सज्जनपणात phd आहेना. तुझ्यासारखा त्रास

मन...

इमेज
माणसाचं मन किती गोष्टी करत असत ना? रोजच्या धकाधकीच्या जीवनात सकाळी उठल्यापासून ते रात्री स्वप्नातही असंख्य विचार धावत असतात. चांगले विचार तसेच वाईटही. हे विचारच आपल्या दिवसाची आणि पर्यायाने आयुष्याची दिशा ठरवत असतात. आपण स्वतःसोबत इतरांनाही बरंच काही सांगत असतो कधी मनातल्या मनात तर कधी उघडपणे. खरं तर यात चांगल्या गोष्टींपेक्षा वाईटच जास्त असतात असं का? आपल्याला जर स्वतःबद्दल चांगलं घडावं असं वाटत असेल तर इतरांच्या बाबतीतही आपण चांगलाच विचार करायला हवा. जमत नसेल उघडपणे तर निदान मनातल्या मनात तरी कुणाला दूषणे, शिव्याशाप देऊ नयेत.  अवघड आहे पण स्वतःच्याच भविष्याचं नुकसान आपण करून घेत असतो. तर मग स्वतःसाठी तरी सुरुवात करायलाच हवी ना??? करून बघा कुणालाच न सांगता मनातल्या मनात चांगली सुरुवात खूप काही छान छान घडेल.                   एक चांगला विचार की "मी कुणाबद्दल वाईट विचार करणार नाही". फरक नक्कीच पडेल. सुप्रभात, वाचणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्यात आज एक छोटासा क्षण तरी नक्कीच येईल समाधानाचा,हसरा. गौरी हर्षल २९.६.२०१७

घर हक्काचं भाग ३

इमेज
घर हक्काचं भाग ३ इकडे आदितीचीही गडबड चालू होती निशाला लवकर घरी आणण्यासाठी. पण त्याच बरोबर तिला अजून एका व्यक्तीचं स्वागत वाजतगाजत करण्याची उस्तुकता लागली होती. अदितीच्या नवऱ्याचा एक जुळा भाऊ होता. अदितीचा नवरा आमोद   इंजीनियर त्यामुळे त्याचं शिक्षण लवकर संपून तो सेटलही लवकर झाला होता. पण शिशिर ,हो शिशिरच ... तोच जो मयुराला कॉन्फरन्समध्ये भेटला. तर त्याला डॉक्टर व्हायचं होत त्यामुळे त्याने घरच्यांना लग्न हा विषय काढण्यासाठी सक्त मनाई केली होती. पण आदितीकडून बर्याचदा मयुराच नाव घेतलं जाऊ लागल मग त्याला कुतूहल वाटलं आणि तो कुणालाही न सांगता एकदा मयुराला तिच्या नकळत पाहून आला. तिचं काम तिचा स्वभाव यामुळे त्याला तिच्याबद्दल आदर वाटू लागलाच होता. त्यातच मयुरा त्याला कॉन्फरन्समध्ये भेटली मग दोघांची हळूहळू गट्टीही जमली. आपल्याला मयुरा आवडते आहे हे कळल्यावर त्याने हि गोष्ट अदितीच्या कानावर घातली. अदितीला तर काय करावे हेच सुचेना. पण शिशिरने तिला सांगितलं को जोपर्यंत मयुराकडून हवा तसा रिस्पोन्स मिळत नाही तोपर्यत घरात काही सांगायचं नाही.

घर हक्काचं भाग २

इमेज
घर हक्काचं भाग २ काय होतं तिथं? गर्दीला दूर करत मयुरा पुढे गेली. तिथे ’ शारदाश्रम ’ संस्थेची एक कार्यकर्ती हातात कसलंतरी गाठोडं घेऊन उभी होती. मयुरा त्या भागात तिचं काम , स्वभाव यामुळे बरीच प्रसिध्द होती. तिला पाहताच त्या कार्यकर्तीने ते गाठोडं पुढे केलं आणि म्हणाली, “बघा नं मॅडम , किती सुंदर मुलगी आहे?” तिच्या शब्दांनी भानावर येत मयुराने बघितलं तर खाली जमिनीवर पैश्यानी भरलेली बॅग पडली होती. आणि तिच्या हातातल्या गाठोड्यात एक छानसं गुटगुटीत बाळ . न राहवून मयुराने त्या बाळाला जवळ घेतलं. बाळालाही तिच्या कुशीत सुरक्षित वाटलं असावं त्याने इवल्याश्या मुठीत तिचं बोट घट्ट पकडलं. थोड्याच वेळात पोलीस आले आणि सर्व सोपस्कार पूर्ण होऊन आई किंवा वडिलांचा शोध लागेपर्यंत बाळाला संस्थेच्या ताब्यात देण्यात आलं. मयुरा घरी परतली पण बाळाच्या विचारांना सोबत घेऊनच . अंदाजे १५ दिवसांचा जीव , पण जन्म देणार्यांना त्याला टाकून देताना काहीच कसं वाटलं नाही? काय झालं असतं त्या जीवाचं जर ते सापडलं नसतं कुणालाच तर ??? विचार करतच मयुराला रात्री खूप उशिरा झोप ला

घर हक्काचं भाग १

इमेज
घर हक्काचं भाग १ ‘ती’ दिसायला सामान्य . इतरांच्या दृष्टीकोनातून तर अगदी ugly वगैरे कॅटेगरीत मोडणारी. आपल्या वाट्याला फारसं कौतुक कधी येणार नाही याची जाणीव तिला खूप लवकर झाली. कारण इतरांचे टोमणे ऐकून जेंव्हा ती आईकडे आशेने बघायची तेंव्हा आई नकळत दुर्लक्षच करायची. आईचं वागणं तिला कमी वयात बरंच काही शिकवून गेलं. ती आता स्वतःच स्वतःला समजवण्यात पटाईत झाली होती. चुकून कधी वेळ आलीच तर हळूच स्वतःलाच टपली मारत ती म्हणायची, तू नं वेडी आहेस ‘मयुरा’. आणि स्वतःच खुदकन हसत कामाला लागायची. तिचा प्लस पॉईंट  होता तिचं दिलखुलास हसणं जे समोरच्याला एका क्षणात तिच्याशी बांधून टाकत असे एका समंजस नात्याने अपवाद फक्त तिच्या घरच्यांचा. प्रचंड मेहनतीने यश मिळवत आज मयुरा सेटल होती पण तिच्या घरच्यांना मात्र जसा तिच्या दिसण्याबद्दल प्रोब्लेम होता तसच तिच्या प्रगतीशीही त्यांना काही देणंघेणं नव्हतं.प्रत्येकवेळी तिची मित्रमंडळी मात्र तिचं यश दणक्यात साजरं करत. अशाच एका छोटयाशा पार्टीत तो तिला दिसला. वयाच्या थोड्याफार इफेक्टमुळे तिला नकळतच त्याच्याबद्दल आकर्षण वाटलं. पण आत्तापर्यंतच्या अनुभवांमधून शहाणी झालेली म