स्वतःला घडवण्यासाठी बॅच 3
#स्वतःला_घडवण्यासाठी बॅच 3
#संकल्प2023 #21dayschallenge
2023 हे वर्ष सुरू होताना आपल्या आजूबाजूच्या काही लोकांना अतिशय छान पद्धतीने काहीतरी देता यावं या संकल्पनेतून जन्माला आला स्वतःला घडवण्यासाठी हा 21 दिवसांचा कोर्स.
ज्याच्यामध्ये वेगवेगळे 21 टास्क पूर्ण करणे हे बंधनकारक आहे सुरू करताना कुठेतरी माझ्या स्वतःच्या आणि माझ्याबरोबर सगळ्या प्रवासात जोडल्या गेलेल्या वंदना ताईंच्या मनात सुद्धा ही गोष्ट होती की जवळपास 50 पेक्षा जास्त जणी या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तयार झालेल्या आहेत.
वेगवेगळ्या बॅकग्राऊंड मधून आलेल्या या सगळ्या मैत्रिणी ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने करतील. त्यांना त्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला कुठपर्यंत पुश करावे लागेल.
पण पहिले तीन दिवस सोडले तर चौथ्या दिवसापासून आम्हाला अक्षरशः अतिशय छान पद्धतीने प्रतिसाद आमच्या या सगळ्या मैत्रिणींकडून मिळतोय.
मी नेहमी म्हणते की आयुष्यातली कुठलीही गोष्ट दत्तगुरूंच्या इच्छे शिवाय घडत नाही.
आणि इथे ह्या कोर्सच्या बाबतीतही ती गोष्ट खरी ठरली.
कुठेतरी काचकूच करणारे आमच्या दोघींचं मन या सगळ्या रिस्पॉन्स नंतर जास्त उत्साही झाले आहे.
आणि पहिली गुगल मीट पार पडल्यानंतर आमच्या सगळ्या मैत्रिणींकडून आम्हाला ज्या प्रतिक्रिया आल्या. त्यानंतर मात्र आम्हाला कळलं की आम्ही कुठेतरी योग्य मार्गाने जात आहोत.
काही बोलक्या प्रतिक्रिया इथे शेअर करत आहोत....
विमल ताई ,
काल ची Google meet ही एक सुरुवात वाटली वेगळ्या प्रवासाची....जिथे सख्या भेटल्या तुमचं सर्व काही ऐकून घेणाऱ्या.. हा एक छान प्लॅटफॉर्म आहे जिथे कोणीही तुम्हाला तुमच्या रंग रूप,स्वभाव या वरून judge करत नाही......
खऱ्या अर्थाने सख्या भेटल्या..... Really blessed that I am part of the journey.......Thank you so much Gauri and Vandana Tai🙏🙏🙏🙏
शीतल ताई,
कालची google meet as usual खूप मस्त झाली. एक एकीचे प्रश्न ऐकून असं वाटत होतं की अरे हे प्रॉब्लेम्स तर आपल्याला पण होते किंवा आहेत.. म्हणजे आपण एकट्याच नाही आहोत.. म्हणजेच आपले प्रोबल्स जगा वेगले नाही आहेत पण आपण आपल्याच दुःखात इतके गुंतलेले असतो की आपल्याला त्याच्या पलीकडे काही दिसतच नाही.. खरं तर इतक्या दिवसांच्या टास्क आणि विश्वास ग्रूप मुळे कळले की आपल्याला गरज आहे फक्त आपला दृष्टिकोन बदलण्याची.. आपलेच दुःख खूप मोठे करून ठेवले की solution शोधायला आपण जातच नाही.. गौरी ताई आणि वंदना ताईंमुळे तेच खरं शक्य झालंय.. की दुष्टिकोन बदला आयुष्य नक्कीच सुखकर होईल.. ते म्हणतात ना की 'तुझे आहे तुझ पाशी परी तू जगा चुकलासी..' तसेच काहीसे..
पण या ७ दिवसांमध्ये चुकलेल्या जागा पण कळत आहेत आणि आपल्या पाशी काय आहे ते पण..
डॉ. गौरी
Thank you... छान झाली meeting... बऱ्याच जणी मोकळ्या झाल्या.. आपल्या सारखे अनेक आहेत हे समजल्यामुळे एकत्र प्रवासाला अजूनच अर्थ वाटू लागला. वंदना ताई आणि गौरी... मार्गदर्शन खूप छान करता तुम्ही दोघीही . आणि ते लक्षात राहते. प्रॅक्टिकल असते खूप. न कंटाळता ऐकून घेत असता दरवेळी आमचे बोलणे. आणि छान प्रत्येकाच्या कलेने समजावून सांगता. 🙏🏻
सुप्रिया मते,
गूगल मीट ही फक्तं भेट नसून कोणाला विचारू शकत नसलेल्या प्रश्नाचे उत्तर आणि तेही positive वे मध्ये मिळण्याचे व्यासपीठ आहे. इथे प्रवास चालू केल्या पासून अवघड वाटणारे नाते, प्रासंगिक गोष्टी सहज सुलभतेने हाताळायची आणि त्यातून मार्ग काढायची सवय लावून गेलय . Thank you so much.
रेवती ताई,
काल ची meet एक आरसा असल्यासारखी च झाली. आपण सर्व जणी एकाच नावेच प्रवासी आहोत ही जाणीव खूप प्रकर्षाने झाली. . एक कोणी प्रश्न विचारत होतं, पण उत्तर मात्र सर्वांनाच मिळत होते. .
मुख्य म्हणजे काय तर आपण आपण स्वतः कसे आहोत ह्याचा स्वीकार करणे आणि स्वतः वर काम करणे एवढंच आपल्या हातात असतं. . .हे कळतंय पण वळत नाही अशी स्थिती आपल्या सर्वांचीच आहे, पण जर रोजच्या प्रश्नांची उत्तरं आपण प्रामाणिकपणे दिली स्वतःलाच आणि त्याचा सराव केला तर आपोआप आपण केव्हा वळू हे ही आपल्याला समजणार नाही. .
गौरी ताई आणि वंदना ताई तुमच्या ऐकण्याच्या कलेचं खरच मनापासून कौतुक. . आणि सर्व सहप्रवासीयांचं अभिनंदन कारण आपण स्वतः ला घडवण्याचा 1 सात दिवसांचा टप्पा अगदी प्रामाणिकपणे पार केलाय. . सर्व जणी ह्याच energy नि पूर्ण दिवस असेच पूर्ण करू आणि स्वतःतल्या नवीन स्वतःला समोर आणू हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
आणि त्यासाठीच पुन्हा एकदा 16 तारखेपासून आम्ही स्वतःला घडवण्यासाठी ह्या 21 दिवसांच्या तिसरी बॅच सुरू करत आहोत.
बऱ्याच जणांना शंका आहेत की आम्ही काही फिजिकल टास्क वगैरे देतो का? तर अजिबात नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे टास्क आहे ते सगळे रायटिंग टास्क असतात. लिहिण्याचे टास्क आहेत. स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये एका डायरीमध्ये तुम्हाला हे टास्क लिहायचे आहेत.
टास्क काय असतील आणि ते कसे करायचे याचे मार्गदर्शन, त्याबद्दलच्या शंकांचे निरसन, रोज ठराविक वेळेला व्हाट्सअप ग्रुप मध्ये करण्यात येईल.
सात दिवसांचा एक टप्पा असेल आणि दर सातव्या दिवशी गुगल मीट असेल. ज्या गुगल मिट मध्ये सात दिवसांचा आढावा घेतला जाईल. प्रश्नांची उत्तर कशा पद्धतीने लिहिली गेली, ते लिहिताना काय काय अडथळे आले?, काय गोष्टी अनुभवल्या? आणि काय गोष्टी बदलण्याची गरज आहे? या सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा केली जाईल.
तर तुम्हाला जर स्वतःच्या दिशेने एखादा पाऊल टाकण्याची इच्छा असेल तर नक्कीच स्वतःला घडविण्यासाठी हा त्याच्यासाठी अतिशय उत्तम पर्याय ठरू शकतो.
आणि जर आपल्या आजूबाजूला कोणाला या गोष्टींची गरज असेल तर तुम्ही त्यांनाही त्या गोष्टी सांगू शकता.
सहभागी होण्यासाठी खाली दिलेली इमेज नीट वाचा.
बाकी सगळं #दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु !!!
#गुरूवार #संकल्पदिन
#आई_राजा_उदो_उदो
#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल
टिप्पण्या