पोस्ट्स

2017 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मितवा

तुझा वाढदिवस जगासाठी जरी तो एक सण वगैरे टाइप दिवस असला तरी माझ्यासाठी मात्र माझ्या सगळ्यात जवळच्या मित्राचा बड्डे. अगदी मॉर्डन भाषेत म्हणायचं तर माझ्या पहिल्या आणि शेवटच्या बॉयफ्रेंडचा बड्डे. इतरांपेक्षा मला जास्त उत्सुकता असायची त्या दिवशी. त्याला कारणही तसंच काहीसं तुझं सगळं आवरणं, डेकोरेशन करणं जाम आवडायचं मला. पहिल्यांदा तू घरी आलास तेंव्हा आजीने तुझी काही देव म्हणून ओळख करून दिलीच नव्हती. ती म्हणाली होती , तुला जे काही बोलायचं असेल , सांगायचं असेल ते मोकळेपणाने याला सांग हा तुझं सगळं ऐकेल आणि इतर कुणापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने तुला सल्ला पण देईल . मग अगदी घरातून बाहेर पडतानाही तुला येते रे म्हणत बाहेर पडण्याची सवय लागली. माझ्या आयुष्यातील प्रत्येक वळणावर तू सोबत आहेसच हा विश्वास येणाऱ्या अनुभवांनी हळूहळू पक्का होत गेला. शाळेत किंवा घरी कुठेही काहीही सांगण्यासारखं घडलं की ते सांगण्यासाठी मी तुझ्याकडे धावत येऊ लागले. बाकी सगळे नंतर . तुझं माझं नातं कुणालाही न समजता छानपैकी बहरत राहिलं. मलाही कधी मनातलं बोलून दाखवण्यासाठी दुसऱ्या कुणाची

स्वप्नांची खिडकी

#स्वप्नांची_खिडकी "पलभर के लिए कोई हमे प्यार कर ले" असं म्हणत देव आनंद हेमा मालिनीच्या मागे स्क्रीनवर धावू लागला. तशी ऋतुजा हातातलं काम टाकून देत लगबगीनं टीव्हीसमोर येऊन बसली. लहानपणापासून तिला हे गाणं प्रचंड आवडत होतं. तुम्ही समजताय तसं हिरोईन, हिरो किंवा गाण्यामुळे नाही तर त्यातल्या खिडक्यांमुळे. जेंव्हा पहिल्यांदा तिने चित्रपट बघितला तेंव्हा ते कळण्याचं तिचं वयही नव्हतं. पण ते गाणं त्या खूप सगळ्या मोठ्या मोठ्या खिडक्यांमुळे तिच्या मनात घर करून राहिलं कायमचं. त्यांचं घर तसं खूपच छोटं होतं त्यामुळे एकच खिडकी तिच्यातून प्रेक्षणीय असं काय दिसणार ना... असो तर त्या बंगल्याच्या खिडक्या तिला आवडल्या लहान असताना लपाछपी खेळायला किती मज्जा येईल तिथे म्हणून आणि मोठी झाल्यावर आणखी गोष्टी लक्षात आल्यामुळे. घरात सगळेच तिची ह्या वेडामुळे चेष्टा करायचे पण तिला काही फरक पडत नव्हता. पुढे मागे माहेरचं घरही मोठ्ठ झालं हवे तसे बदल घरच्यांनी केले पण ती सासरी जाणार असल्याने तिच्या आवडीनिवडी कुणी फारश्या लक्षात घेतल्या नाही. तिचं मन थोडंसं खट्टू झालं पण तिने स्वतःला समजावलं की इथे नाही पण स्वतःच

हुलकावणी

हुलकावणी....... सकाळी सकाळी ‘ती’ टेस्ट तिच्या चेहऱ्यावर न मावणारं हसू देऊन गेली. उत्साहाने भरून जात दोघेही स्वप्नांत गुंग झाले. अनपेक्षितपणे मिळालेला आनंद खूप काही क्षणार्धात बदलून गेला. कालपरवापर्यंत इतरांसाठी तर सोडाच पण स्वतःसाठीही महत्वाची नसणारी ती खूप महत्वाची असल्याप्रमाणे स्वतःलाच वागवू लागली होती. पुन्हा एकदा ते सगळं अनुभवताना , मनापासून तो त्रास सहन करताना ती मोहरत होती. पण का कुणास ठाऊक मनातली जुनी भीती नकळतच डोके वर काढू लागली कि तिच्या अंगावर नकोसे शहारे येऊन जायचे. तरीही एकमेकांना सावरत , सांभाळत ते दोघेही परत उभे राहिलेच होते. काही दिवसातच तिला डॉ कडूनही सगळं ठीक आहे असा सिग्नल नक्की मिळणार याची तिला खात्री वाटत होती. गेली काही वर्षं सगळे रिपोर्ट्स नॉर्मल असूनही ते दोघे सततच्या या हुलकावणीला वैतागले होते. त्यात नातेवाईक ,शेजारी यांच्याकडून काहीही शहानिशा न करता हीन आणि टोमण्यांच्या रुपात होणारी चौकशी भरच घालत असे. आता मात्र असं होऊ नये अशी दोघांनाही आशा वाटत होती , तशी मनोमन प्रार्थनाही ते देवाजवळ करत होते. अखेर तो

हरलेली पिढी

#हरलेली_पिढी #वयोगट_१५_ते_४० हो हरलेय ही पिढी नाती सांभाळताना, आयुष्य जगताना, यशस्वी होताना. मीसुद्धा ह्यांच्यातलीच एक पण वेळोवेळी आपल्या बरोबरीच्याना कोसळताना बघतेय. काय हवंय नेमकं आम्हाला आयुष्यात?? आम्हाला नुसतं शिक्षण नको तर पहिल्या नंबरच्या हव्यासापोटी धावाधाव करायची आहे. नंतरही नुसती नोकरी किंवा बिझनेस नको तिथेही टॉप पोझिशन हवीच आहे. पुढे जोडीदार भेटतो तर त्या नात्यातही आम्हाला खूप काही हवंच आहे. आयुष्याचं कुठलंही क्षेत्र घ्या आम्हाला फक्त जिंकायचं आहे. खरं पाहता ही रॅट रेस कुणी दुसऱ्याने आमच्यावर नाही लादली आम्ही स्वतःच हिच्यात सहभागी आहोत. एखादी वस्तू दुसऱ्याकडे बघितली की जीव तोडून ती मिळवण्यासाठी आम्ही पळतो. आम्हाला सगळं काही हवं आहे पैसा, पॉवर , पोझिशन, स्टेटस आणि ते मिळवण्यासाठी आम्ही जगणं विसरतोय. आमच्या आधीच्या पिढीनेही हे सगळं मिळवलं आहे नाही असं नाही पण त्याच्याकडे हे मिळवताना एक गोष्ट होती अन् ती म्हणजे "पेशन्स". जे आमच्या पिढीकडे अजिबात नाहीत काही अपवाद असतीलही पण बहुतांश जणांना ती इन्स्टंट ची सवय लागली आहे. मग एखादी गोष्ट नाही मिळाली किंवा ती मिळवताना अपय

सेकंड चान्स

#शुभं_भवतु #सेकंड_चान्स नवीन दिवस नवी सुरुवात. आयुष्यात असं झालं का कधी काहीतरी कुणालातरी सांगायचं होतं, बोलायचं होतं पण ती संधी मिळण्याआधीच ती व्यक्ती दूर निघून गेली ??? कधी परिस्थितीमुळे तर कधी  तिच्या आयुष्यातील बदलांमुळे. छोट्याश्या गोष्टी असतात पण आपण आपल्या इगोमुळे बऱ्याचदा त्यांना नको इतकं मोठं करतो. नाती तुटतात , माणसं दुरावतात कायमची. कधी कधी एक बाजू प्रयत्न करतेही सगळं नीट ,छान व्हावं म्हणून. पण दुसरी बाजू तसाच रिस्पॉन्स देते का हो?? मग शेवटी प्रयत्न करणारा थकून दूर जाण्याचा निर्णय घेतो. ह्या सगळ्यांवर वेळ हे एकच औषध आहे असं म्हटलं जातं. पण हल्ली आयुष्य इतकं फास्ट झालंय की कोण कधी राहती जागा,गाव,शहर आणि कदाचित जगही सोडून निघून जाईल सांगता येत नाही. अशावेळी नंतर हात चोळत बसणे अन् हळहळणे हेच मागे उरते. मग त्यावर उपाय काय कुणी जर नातं तोडून जात असेल तर तुम्ही प्रयत्न करा त्यांना थांबवण्यासाठी. निदान तुमची बाजू तरी मांडा आणि उलट असेल तर समोरचा काय म्हणतो आहे हे तरी शांत पणे ऐकून घ्या. कदाचित आयुष्यात पुन्हा कधीच तुमची भेट होणार नसेल तेंव्हा मनाला कसलीही चुटपूट नको लागायला. थोड

मनाचे प्रतिबिंब

#मनाचे_प्रतिबिंब असं म्हणतात आपला चेहरा हा आपल्या मनाचं प्रतिबिंब असतो. खूप सगळे विचार आपण करत असतो सकाळी उठल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत. त्या त्या क्षणी मनात जन्माला येणारे विचार क्षणभर का होईना आपल्या चेहऱ्यावर उमटतात. आपण खुश असतो ते आपला चेहरा सांगतो, कधी मनातून वाईट वाटलेल असतं पण ते सुद्धा आपल्या चेहऱ्यावर दिसतं. असं हे आपलं प्रतिबिंब नेहमी चांगलं दिसावं लोकांवर त्याचा चांगला परिणाम व्हावा अशीच तर आपली इच्छा असते. पण म्हणून आपण किती प्रयत्न करतो? चांगले विचार , चांगल्या पद्धती जगण्यात आणल्या तर प्रतिबिंबही तसच असेल. जमेल का??? अर्थातच जमणार जसं शरीराचं बाह्य रूप खुलवण्यासाठी प्रयत्न केले जातात तसंच मनासाठीही करावे.  मनालाही काही पौष्टीक असे विचार , गोष्टी सांगाव्यात जेणेकरून मनाचं स्वास्थ्य सुधारत राहील. यासाठी फार काही करावं लागणार नाही फक्त आपलं वाचन, आपली संगत , आपली विचारसरणी थोडीशी ग्रुम करावी लागेल. ग्रुम कशी करायची हे आजूबाजूला निरीक्षण केले की समजते. मी तर करून बघणार आहे तुम्हीही ट्राय करा.... प्रत्येकाला आज एक तरी क्षण मनाचं स्वच्छ प्रतिबिंब दाखवणारा मिळो हीच ईश्वर

इतनीसी खुशी

#इतनीसी_खुशी जगण्यासाठी काय महत्वाचं असतं?? पैसे की आनंद जो आपण त्या पैशात शोधत असतो? आनंद अगदी लहान मुलांच्या निरागस हसण्यातही असतो आणि वृद्धांच्या समाधानी हसण्यातही. छोट्या छोट्या गोष्टींमधून फक्त तो टिपता आला पाहिजे अलगद. असं जर झालं तर सगळंच खूप छान होऊन जाईल. आपण जसजसे आनंद टिपत निघू तसा आयुष्याची बाग फुलत राहील. प्रयत्न तर करून बघू फार काही नाही करायचं फक्त डोळे उघडे ठेवून निरीक्षण करायचं. मी तर करणारच आहे तुम्हीही ट्राय करा. प्रत्येकाला आज खूप सगळ्या छोट्या छोट्या आनंदाचे क्षण मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शुभं भवतु!!! #गौरीहर्षल १६.७.२०१७