पोस्ट्स

2016 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

यु टर्न (भाग 4) ©®गौरीहर्षल (31/12/2016)

इमेज
यु टर्न (part ४) पूर्वार्ध – नेहा, प्रथितयश वेब डिझायनर पण त्यासोबतच अत्यंत हट्टी आणि स्वतःला हवं ते मिळवण्यासाठी काहीही करण्यासाठी तयार. याच हट्टापायी सारंगने तिच्या प्रेमाला दिलेला नकार तिला काही पचवता आला नाही. आणि मग सुडाच्या भावनेने तिने सारंग आणि सानिका याचं ठरलेलं लग्न शक्य ते सगळे प्रयत्न करून मोडलं. पुढे जाऊन तिनेही प्रेमात पडून राघवशी लग्न केलं पण लग्नानंतर आयुष्यात येणारे चढउतार पार करताना मात्र तिला स्वतःची चूक कळली. तीच नेहा पुन्हा एकदा फिरून सानिका समोर येते आणि नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी तिचीच मदत घेते. सारंगही स्वतःची चूक मान्य करत नेहाला माफही करतो आणि मदतही करतो.  आता पुढे नेहा आणि राघवची तर गाडी मार्गावर आली होती. पण सानिका आणि सारंगच काय? ते दोघे तर अजूनही काहीच पुढाकार घ्यायला तयार नव्हते. सानिकाच्या आत्यानेही तिच्या लग्नासाठी आता स्थळांचा विचार करू म्हणून तगादा सुरु केला होता.ही गोष्ट अमेयच्या कानावर येताच त्याने स्वरुपामार्फत सारंग पर्यंत पोचवली. त्यात भरीस भर ही पडली की इतके दिवस या गोष्टीना नकार देणाऱ्या सानिकाला आत्या आणि बाकी लोकांनी इमोशनल ब्लॅकमेल करत तय

यु टर्न (भाग 3) ©®गौरीहर्षल (31/12/2016)

इमेज
यु टर्न (part 3)       चार दिवसांच्या सुटीनंतर रिफ्रेश होऊन आज सानिका आज ऑफिसला निघाली होती. पार्किंग मध्ये गाडी लावत असताना एक फोर व्हीलर तिच्याजवळून गेली. ती चालवणाऱ्या व्यक्तीला आपण कुठे पाहिलं आहे याचा विचार करत ती अनिताला येऊन धडकली. “ मला वाटलं नव्हतं साना सुट्टीमुळे तू इतकी रिफ्रेश होशील” हसत हसत अनिता तिला म्हणाली. “ बाय द वे नेहा भेटली का तुला?”.  “ तरीच मला ती कार चालवणारी ओळखीची वाटली, बट किती चेंज झालीय ती? इतकी थकलेली हरलेली नेहा बघताना कसतरीच झालं?” सानिका म्हणाली. ती अनितासोबत तिच्या  केबिनमध्ये बसली. “ अनु तुला काही सांगायचं आहे का मला?” थोडसा विचार करत अनिता म्हणाली, “हो, साना नेहाला एका चांगल्या आणि समजून घेणाऱ्या मैत्रिणीची गरज आहे आणि सध्या तिची मनस्थिती पाहता तूच तिला योग्य पद्धतीने सांभाळू शकतेस. लहानपणापासून तिला हवं ते मिळत गेल त्यामुळे नकार पचवायची ताकदच नव्हती तिच्यात.त्याच भावनेतून तिने तुझं आणि स्वतःच आधीच खूप नुकसान केलय. आणि तिला याची जाणीव झालीय तीही अर्थातच खूप मोठी किंमत चुकवल्यानंतर. पण तू तिला या सगळ्यातून बाहेर काढू शकतेस. एक माणूस म्हणून विचार

यु टर्न (भाग 2) ©®गौरीहर्षल (31/12/2016)

इमेज
यु टर्न (part 2) “ आज तरी लवकर यायचंस न रे?” सानिका गाडी पार्क करत असलेल्या सारंगला थोडी रागातच म्हणाली, तसं तिच्याकडे टक लावून बघत तो हसला आणि गाडीतून उतरताना मागे लपवलेले गिफ्ट त्याने तिच्यासमोर धरत तिचा कान पकडला सॉरी म्हणण्यासाठी. एकमेकांना सॉरी म्हणण्यासाठी ते नेहमी असंच करायचे ज्यामुळे समोरचा कितीही रागात असला तरी ते विसरून मनापासून हसायचा. आत्ताही तसचं घडलं सारंगच्या त्या कृतीने सानिका खुदकन हसली. आणि मग दोघेही हातात हात घेऊन नेहमीच्या टेबलवर येऊन बसले. आजच्याच दिवशी १ वर्षांपूर्वी ते दोघे पहिल्यांदा भेटले होते. सारंग च्या बहिणीच्या स्वरूपाच्या  लग्नात. सानिका स्वरूपाचा नवरा अमेयची मावस आणि एकुलती एक लाडकी बहिण असल्यामुळे करवली म्हणून मिरवण्यात ती कुठेही कमी पडत नव्हती. ह्याच लग्नात थट्टामस्करी करता करता ती आणि सारंग एकमेकांचे चांगले मित्र झाले इतके चांगले कि बघणाऱ्याला वाटावं ते दोघ लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. सारंग देशमुख IIT मधून पास होऊन आता एका MNC मध्ये काम करत होता. तर सानिका पाटील नुकतीच कुठे देसाई मंडमची असिस्टंट म्हणून जॉइन झाली होती. दोघंही आपल्या कामामधून

यु टर्न (भाग 1) ©®गौरीहर्षल (31/12/2016)

इमेज
यु टर्न (part 1) समोर ठेवलेल्या पेशंटच्या फाईल कडे बघत सानिका भूतकाळात गेली. ४ वर्षांपूर्वीचा तो प्रसंग झरकन तिच्या डोळ्या समोरून गेला . सारंगला एकदा तरी निर्णयावर पुन्हा विचार कर अशी विनवणी करणारी ती आणि  तिच्याकडे पाठ करून उभा असलेला तो. एका व्यक्तीने क्षुल्लक कारणाचा राग मनात ठेऊन त्यांच्या सुंदर अशा नात्याला एक वाईट वळण लावले . खरतर त्या व्यक्ती इतकंच ते दोघेही त्याला जबाबदार होते. पण ती वेळ अशी होती कि कुणीच शांतपणे विचार करायला तयार नव्हते . एका क्षणात जोडल्या जाणाऱ्या नात्याची आणि स्वप्नांची राखरांगोळी होऊन गेली. आज पुन्हा हे सगळं आठवल्यावर सानिका क्षणभर थबकली ह्या विचाराने कि हे सगळं थांबवता येत होत न ? सारंग आणि आपण काहीच का प्रयत्न केला नाही ? विचारांचा गुंता वाढू लागला आणि तश्यातच इंटरकॉम ची बेल वाजली. भानावर येत सानिकाने फोन उचलला. पलीकडून देसाई मॅडम तिला एका जुन्या केसच्या डिटेल्स विचारात होत्या. डिटेल्स देऊन तिने फोन कट केला आणि समोर पडलेली फाईल उघडली. मिसेस नेहा, एका प्रथितयश कंपनी मध्ये वेब डिझायनर, प्रंचड तणावाखाली येऊन डिप्रेशनची शिकार आणि त्या भरात दोन वेळा केल