पोस्ट्स

Change your story...

इमेज
 #change_your_story माणसाला बदलाची भीती कायम वाटत असते. कारण कुठलाही बदल घडताना काही गोष्टी मागे सोडाव्या लागतात तर काही गोष्टी नव्याने अंगिकाराव्या लागतात. आणि या प्रवासात आपण हमखास मागे सुटलेल्या गोष्टींचा विचार करत असतो. बऱ्याचदा त्या टप्प्यापर्यंत पोहोचताना आपण काय कमावलं आहे हे आपल्या लक्षातच येत नाही.  Read that again. दुर्दैवाने ज्या गोष्टी आपल्याला सोडाव्या लागल्या आहेत किंवा ज्या आपल्या आयुष्यातून आपोआप वजा झाले आहेत आपण त्यांच्याकडे जास्त लक्ष देतो. पण तेवढेच किंवा त्यापेक्षा जास्त लक्ष आपण आयुष्यात काय मिळवू शकतो किंवा आपल्याला काय मिळायला हवे याकडे नसते. सोप्या भाषेत सांगायचं तर आपण काय डिझर्व्ह करतो हेच आपल्याला माहीत नसते.  कधी कधी आपल्या हातात असलेली छोटीशी गोष्ट आपण घट्ट धरून ठेवलेली असते. ती घट्ट धरून ठेवण्यामागे अर्थातच आपल्या मनात गमावण्याची भीती असते. पण त्या भीतीच्या दुसऱ्या टोकाला बऱ्याचदा काहीतरी खूप मोठं आणि आपल्याला अनपेक्षित असणार सुखद सरप्राईज असतं. अर्थात जोपर्यंत ती गोष्ट आपल्या हातात येत नाही तोपर्यंत आपला तिच्यावर विश्वास बसत नाह...

Prisoner of your own thoughts 6/8

इमेज
Prisoner of your own thoughts   दत्तगुरु 👉🏼चाणक्य👉🏼 आणि मी चाणक्य लिहीत असताना हल्ली बऱ्याचदा माझ्या ज्ञानात भर पडत असते. आणि खरं तर ती पडायलाच हवी. कारण कधी काळी मित्रासमोर बसून रडत रडत केलेल्या तक्रारीवर चाणक्य हा उपाय आहे असं मला वाटत. मला नाही कळत रे तुझ्या जगाचे छक्के पंजे असं मी नेहमी म्हणायचे. हे ऐकून ऐकून कदाचित दत्त वैतागले असतील 🫣 आणि म्हणाले असतील घे बाई एका दगडात दोन पक्षी मारतो. तू बिझी पण राहशील आणि खरे छक्के पंजे कसे असतात हे पण कळेल. ते सुद्धा त्यामध्ये "द" असलेल्या माणसाच्या चरित्रातून🤷  खरा गुरू हा एका जागी बसवून शिकवत नाही हे मात्र खरं. तो आपल्या शिष्याला स्वतः प्रयत्न करण्यासाठी भाग पाडतो.  मग ते एखादं नवीन स्किल शिकणं असो किंवा स्वतःच्या मनातल्या भीतीवर मात करणं. जोपर्यंत शिष्य त्यातून योग्य तो धडा शिकत नाही तोपर्यंत सराव कम्पल्सरी...  सो गेल्या काही महिन्यात एक गोष्ट सातत्याने समोर आली ती म्हणजे, गुलामगिरी मग ती नात्यातली असुदे किंवा विचारांची... जोपर्यंत माणूस स्वतः त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत नाही तोपर्यंत त्याची सुटका होत न...

Shadows of yesterday 5/8

इमेज
Shadows of yesterday.... भूतकाळ ही काही अडकून पडण्याची गोष्ट नाही. पण आपल्यापैकी बरेच जण भूतकाळातच अडकलेले असतात. त्या ऐवजी त्या भूतकाळाला एक स्टेपिंग स्टोन म्हणून घेत पुढे जाण्याचा प्रयत्न करावा. भूतकाळात घडलेल्या गोष्टी कधीकधी आपल्याला त्रासदायक ठरत असतात. पण अशा घटनांना स्वीकारून त्या अनुभवातून योग्य तो धडा घेणे आणि स्वतःच्या व्यक्तीमत्त्वामध्ये त्या दिशेने बदल करणे हे खूप जास्त गरजेचे असते. हे असं करणं सोपं नक्कीच नसतं.  पण त्या आव्हानाला एकदा स्वीकारल्यानंतर आयुष्य जगण्याची खरी मजा कशात आहे हे मात्र माणसाला कळतं. मग अशा कितीही चुकीच्या घटना घडल्या संकटं आली तरी माणूस ठामपणे त्यांना सामोरे जातो. शिवाय भूतकाळ स्वीकारून त्यातून योग्य तो धडा शिकलेला व्यक्ती पुन्हा पुन्हा त्या घटना, त्या व्यक्ती समोर आल्या तरी कमकुवत होत नाही. शेवटी भूतकाळात रमून भविष्यकाळावर किती परिणाम करत राहायचं हे आपल्या हातात असतं.  माझ्या लेखांमध्ये बऱ्याचदा उल्लेख असतो की भूतकाळात घडून गेलेल्या घटना मधून आपण काय शिकलो ते आठवा. त्यावर मनन चिंतन करा. आणि त्या गोष्टींना मार्गातला अडथळा बनवण्यापेक्षा भविष्...

blind perception 4/8

इमेज
Blind perception  या लेखमालेतल्या आधीच्या एका लेखावरती एक कमेंट आली होती. ती म्हणजे जेव्हा आपण दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होतो, तेव्हा त्यातली काही लोक मात्र आपल्याला खिजवण्यासाठी आपला अपमान करतात किंवा आपल्याला तुच्छ लेखतात. त्यांना असं वाटतं की त्यांनी जे काही यश मिळवलं आहे. त्याच्यामुळे आता समोरच्याला स्वतःच्या लायकीची जाणीव झाली असेल.  तर इथे पुन्हा एकदा तुलनेचा मुद्दा येतो. काही लोकांना दुसरे यशस्वी झाले तर पोटात दुखत तर काही लोकांना ते स्वतः यशस्वी झाले की दुसऱ्यांना त्रास द्यावासा वाटतो. पण या दोन्ही कॅटेगरी मधल्या लोकांना इतरांशी आपल्या आयुष्याची तुलना करण्याची सवय असते. आता इथे लोकांनी असं करावं की करू नये हा मुळात वादाचा मुद्दा नाही.  मुद्दा हा आहे की जेव्हा लोक असे वागतात तेव्हा आपण कशा पद्धतीने त्या गोष्टी घ्यायच्या. सगळ्यात पहिल्यांदा आपण ही गोष्ट लक्षात घ्यायची की समोरची व्यक्ती आपल्याबद्दल काय विचार करत आहे, हा पूर्णपणे तिचा दृष्टिकोन आहे. त्या व्यक्तीचा दृष्टिकोन जेव्हा आपण स्वीकारतो, तेव्हा नकळतच तिने आपल्याबद्दल केलेल्या कल्पना मग त्या खऱ्या असो किंवा नसो...

Turning point = upgrade yourself 3/8

इमेज
Turning point = upgrade yourself  कधी कधी आयुष्यात अचानक काही गोष्टी घडतात. एखादं आव्हान समोर उभे ठाकते, अचानक स्मूद चाललेल्या आयुष्याच्या गाडीला ब्रेक लागतो, काहीतरी अनपेक्षित वळण आयुष्य 360 डिग्रीच्या कोनातून बदलून टाकते.... त्यावेळेला आपण आधी असं म्हणतो की मीच का?? माझ्यासोबतच का??  आणि खरं सांगायचं तर त्यावेळी आपल्याला त्या फेजमध्ये होणाऱ्या त्रासाशिवाय दुसरं काहीच दिसत नसतं. या गोष्टीला कालांतराने काही वेळ, दिवस, महिने, वर्षं उलटून जातात आणि मग जेव्हा आपण मागे वळून पाहतो.  तेव्हा आपल्या लक्षात येतं की तो त्रास यातना ते दुःख वेदना हे आपल्याला घडवण्यासाठी खूप जास्त महत्त्वाचे होते.  आयुष्यात जोपर्यंत अडथळे येत नाहीत, आव्हान समोर उभं ठाकत नाही, एखादा धक्का बसत नाही. तोपर्यंत आपण आपला कम्फर्ट झोन सोडून बाहेर जायला तयार नसतो. कदाचित त्यामुळेच नियतीची किंवा देवाची अशी इच्छा असते की आपल्याला बसलेल्या झटक्याने तरी आपण जागे व्हावे.  सो अशा धक्के खात.... टक्के टोणपे सहन करत.... आयुष्याच्या रोलर कोस्टल राइडवर अजूनही टिकून असणाऱ्या सगळ्यांसाठीच आजचा रिमाइंडर...  ए...

comparison 2/8

इमेज
आपल्या आयुष्यात आपल्याला अशा काही व्यक्ती भेटतात, ज्यांना दुसऱ्यांना कुठल्याही गोष्टीत यश मिळालं तरी पोटात दुखतं. मग अगदी त्या स्वतः रनिंग रेस मध्ये पहिल्या आल्या असल्या आणि दुसरी व्यक्तीची लिंबू चमचाच्या शर्यतीत पहिली आली असली, तरी त्यांना दुसऱ्याच्या लिंबू चमचाच्या शर्यतीत पहिलं येण्याने त्रास होत असतो. आणि तो त्रास त्या व्यक्त सुद्धा करत असतात. पण आपल्या असं करण्याने इतर लोक दुखावली जात आहेत हे त्यांच्या गावी सुद्धा नसतं. कधी कधी चुकून आपण सुद्धा असं वागतो बर का... यामध्ये जी दुखावलेली लोक असतात ना? ती मात्र बऱ्याचदा स्वतःला एक प्रश्न विचारत असतात, की माझ्या यशाने या समोरच्या व्यक्तीच्या यशात किंवा आयुष्यात काहीच फरक पडणार नाहीये. मग हिला एवढा त्रास का होतोय?? तर त्याचं मुख्य कारण फक्त एवढंच असतं की त्या व्यक्ती स्वतःचा आयुष्य दुसऱ्यांबरोबर सातत्याने कम्पेअर करत असतात.  त्यांना दुसऱ्याच्या आनंदात, यशात सहभागी व्हावेसे वाटत नाही. अर्थात यामुळे कोणाचाही यश किंवा आनंद कमी होत नाही. पण जनरली जर आसपासच्या लोकांना गोष्टी पर्सनली घ्यायची सवय असेल तर त्यांना मात्र फार त्रास होतो. जिला...

Distance 1/8

इमेज
Distance  आपल्या बाजूला असे कित्येक लोक असतात की ज्यांची ओंजळ ओसंडून वाहत असते.... पण एखाद्या व्यक्तीकडे सगळं असलं तरी सुद्धा  त्याला दुसऱ्याकडे असणाऱ्या गोष्टींची भुरळ पडतेच... आणि मग त्या गोष्टी स्वतःकडे नाहीत म्हणून ती व्यक्ती आपल्यापेक्षा खालच्या स्तरावर असलेल्या लोकांवर सुद्धा जळत राहते. त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न करते.  तुम्ही सुद्धा हे अनुभवलं असेलच ना?? आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती शेवटपर्यंत आपल्या सोबत राहीलच असे नसते. सो जेव्हा काही लोकांमुळे आपल्याला अनादर, अपमान, त्रास या गोष्टींना सामोरे जावं लागतं. तेव्हा त्या लोकांना दूर करणेच योग्य असते. तुम्ही दुरूनही त्या लोकांचं चांगलं व्हावं असा विचार करूच शकता. त्यासाठी सातत्याने तो त्रास सहन करत त्यांच्या संपर्कात राहणे गरजेचे नसते.  आणि जर काही नाती अशी असतील जी आपण पूर्णपणे तोडून टाकू शकत नाही. त्या नात्यांमध्ये आपला वेळ आणि एनर्जी किती द्यायची हे मात्र आपल्याला ठरवून घ्यावे लागते.  सोप्या भाषेत सांगायचं तर बाऊंड्री सेट कराव्या लागतात.  आपण सुद्धा आदराल...

cup of tea... आणि आपण... १३.८.२०२४

इमेज
This is not my cup of tea... असं आपण बऱ्याचदा बोलताना म्हणत असतो. पण हीच गोष्ट उलट सुद्धा असते म्हणजे you can't be everyone's cup of tea... याचा अर्थ तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तुम्ही आवडाल किंवा तुमची बाजू समजेल किंवा हे तसा प्रयत्न करतील असं नाही. आणि असं झालं नाही तरीसुद्धा तुम्ही आणि तुमची सिच्युएशन अतिशय नॉर्मल आहात.  तुम्ही सांगितलेला एखादा विनोद प्रत्येकाला हसवू शकेल असं नसतं... तुम्ही केलेल्या चांगल्या कामाचं कौतुक तुमच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या लोकांना असेलच असंही नसतं... एखाद्या गोष्टीबद्दल तुमची प्रतिक्रिया समोरच्याला पटेलच असंही नसतं... आणि तरीही सगळं व्यवस्थित असतं. कारण यामध्ये चुकीचं काहीच नाही.  आपल्यापैकी बऱ्याच जणांना इतरांना खुश करण्याची सवय असते किंवा इतरांनी आपली मर्जी राखावी अशी अपेक्षा असते. पण हे सगळं करताना आपण विसरतो की आपण प्रत्येक जण एक वेगळी व्यक्ती आहोत. आपल्या प्रत्येकासाठी सौंदर्य आणि नॉर्मल असण्याच्या व्याख्या वेगवेगळ्या आहेत.   मग एखाद्याला आपण नाही आवडलो तर काय फरक पडतो?? त्यांना दुसरं कोणीतरी आवडत असतं.  ज...