पोस्ट्स

विश्वास हा ग्रुप आणि त्याची संकल्पना काय आहे?

इमेज
#विश्वास हा ग्रुप आणि त्याची संकल्पना काय आहे?  आधी एक शॉर्ट इंट्रोडक्शन माझं  नमस्कार मंडळी,  मी गौरी हर्षल कुलकर्णी रा. अहमदनगर व्यवसायाने मी क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आणि समुपदेशक आहे.  पण त्यापेक्षा जास्त मी ओळखली जाते ती माझ्या विश्वास, कालाय तस्मै नमः आणि इतर काही अध्यात्मिक रहस्यकथामुळे.  "स्वतःला शोधताना - गौरी हर्षल" ह्या नावाने माझं फेसबुक पेज आहे आणि ब्लॉग ही.  ब्लॉग लिंक शेयर केली आहेच. त्यावर माझं लेखन वाचता येईल.  अध्यात्मिक मार्गदर्शन ही गोष्ट मात्र माझ्या आयुष्यात दत्तगुरुंच्या कृपेने आलेली आहे. त्यामुळे त्याचं सगळ श्रेय त्यांचं आहे.  आणि ते त्यांच्याच इच्छेने घडत.  ************************************************ विश्वास हा ग्रुप आणि उपक्रम हे अध्यात्म आणि विज्ञान ह्या दोन्हींच्या माध्यमातून सातत्याने काहीतरी देण्यासाठी राबवले जात आहेत.  त्यासाठी हे काही वाचावं लागेल.  दत्त जयंती 7 डिसेंबर 2022 http://gauriharshal.blogspot.com/2022/12/blog-post.html ************************************ सकाळ आणि रात्रीच्या टास्क सहित आहे त्यामुळे काळजीपूर्व

कर्मसिद्धांत first draft 16 may 2023

इमेज
#कर्मसिद्धांत first draft 16 may 2023  आज मुहुर्तच उत्तम होता. सगळे  एकाच ठिकाणी उपस्थित होते. आणि समोर होता एक जन समुदाय ज्याने पृथ्वीवर देवांच नाव घेऊन श्रेष्ठत्व स्वतःकडे घेतलं होतं.  पृथ्वीवर त्यांचा कार्यकाल संपल्यामुळे आता ते पुढच्या प्रवासात होते. पण इथे आज मात्र ते सगळे एका विशिष्ट हेतूने हजर असण्याच कारण होतं.  बऱ्याच गहन विषयांवर त्यांनी खाली असताना हिरीरीने जी मते मांडली होती आणि लोकांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन समाजात रुजवली होती त्याचीच आज इथे चर्चा सुरू होती.  एकीकडे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आपलं मत मांडत होते. तर तिथेच दुसरीकडे थोडसं बाजूला काही लहान मुलं खेळत होती. त्या मुलांना तिथे बघून तसं सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं होतं पण कुणाची काही बोलायची हिंमत नव्हती. अन् ती मुले ही त्यांच्या खेळात मग्न होती.   पण काही क्षणानंतर मात्र हळूहळू वातावरण तापू लागले. त्यांच्यापैकी एक गौरवर्णीय व्यक्तीसदृश आकृती तिच्या वागण्याचं समर्थन करीत तिने कसं सगळं योग्य केलं हे सांगू लागली. त्याच गर्दीत काही जण त्याचे पृथ्वीवरील समर्थक ही होते. चर्चा सुरू असल्याने बरोबर ठराविक मुद्द्याला त्यांन

Quote of the day 20 डोन्ट रश,जे घडायचं आहे ते नक्की घडणार

इमेज
#जे_घडायचं_आहे_ते_नक्की_घडणार #डोन्ट_रश  "काय करतेस केया? ",बाल्कनीत कुंड्याजवळ बसलेल्या केयाला तिच्या आजीने विचारलं.  "आजी बघ ना, हे झाड काही उगवून आलं नाही अजून.", केयाने उदास होऊन उत्तर दिलं.  आजी गालात हसत तिच्याजवळ आली. शेजारी असलेल्या खुर्चीवर बसत तिने केयाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. केया अजूनही तिच्या छोट्याशा कुंडीकडे बघत होती.  "केयु, अग दोनच दिवस झाले आहेत तू ते बी म्हणजे सिड्स त्या कुंडीत लावून. इतक्या लवकर कसं काय झाड येईल बाळा? " आजी म्हणाली.  "अग पण मग मी नेक्स्ट वीकमध्ये टीचर ना काय दाखवू? ", केयाने प्रश्न विचारला.  तिच्या जागी तिची काळजी स्वाभाविक होती. सुट्टी आहे म्हणून शाळेतून मुलांना हा प्रोजेक्ट सांगितला होता. त्याचा प्राथमिक उद्देश अर्थातच मुलांना कशात तरी गुंतवून ठेवण्याचा होता.  केया कुतूहलापोटी रोज वाट बघत बसत होती. फोनवर मैत्रिणींशी सुद्धा त्यावरच बोलणं होत होतं. इनमिन 5 वर्ष वय पण त्या रोपट्याबद्दल अशी चर्चा सुरू असायची की घरातले ऐकत बसायचे.  तरी बरं की त्यांच्या टीचर ने लवकर उगवतील अशीच झाडं लावायची अस वॉट्सॲपव

गीतसप्तक भाग १

इमेज
#गीतसप्तक "हमको मन की शक्ति देना" आजचं पहिलं गीत आहे "हमको मन की शक्ति देना" .  शाळेची प्रार्थना होती आमच्या. सुरुवातीला फारसा अर्थही कळत नव्हता. पण आज वळून पाहताना समजतंय की प्रार्थनेतूनही खूप काही शिकवायचं होतं शाळेला.   "हमको मन की शक्ति देना, मन विजय करें दूसरों की जय से पहले, खुद को जय करें " दुसऱ्यांच्या आधी स्वतःला एक माणूस म्हणून स्विकारतानाच स्वतःच स्वतःला आदर देणं. जे खूप जास्त गरजेचं आहे पण नकळतच विसरतो आपण . समाजातल्या सो कॉल्ड चौकटीत बसण्यासाठी आपल्यालाच इतकी घाई झालेली असते की स्वतःच्या कितीतरी चांगल्या गोष्टी आपण नाकारत राहतो. मग ते दिसणं असुदे किंवा वागणं. नंतर हळूहळू आपल्या लक्षातही येतं पण कितीजण पुन्हा स्वतःला मनापासून साद घालतात?  "भेदभाव अपने दिल से, साफ़ कर सकें  दोस्तों से भूल हो तो, माफ़ कर सकें  झूठ से बचे रहें, सच का दम भरें " हल्ली तर ह्या ओळींची ओळख पदोपदी पटते. सगळ्याच क्षेत्रात कळत- नकळत होत असणारे भेदभाव. आपल्या ही वागण्यातून उमटतच असतात. सुशिक्षित असूनही काही चुकीच्या जुन्या आणि नविनही गोष्टी आपण करतो.  जिवलग मित्र

स्मरणगामी

इमेज
"अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी" फक्त दोनच ओळी मनात घोळवत ती शांतपणे खिडकीतून बाहेर बघत बसली होती.  आणि अचानक तिला जाणवलं की आपल्या डोळ्यासमोर एक वेगळं दृश्य साकार होतंय. ते काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न जितका तिचा मेंदू करत होता, तितक्याच उत्कटतेने तिच्या मनाला आपण काय अनुभवत आहोत ह्याची खात्री पटत होती.  क्षणार्धात मेंदूकडून येणाऱ्या सगळ्या सूचना धुडकावून लावत तिने मनाचा कौल स्विकारला. आणि डोळ्यांनी ते दृश्य तिच्यासमोर पूर्ण करून उभं केलं.  खिडकीतून बाहेर बघताना दिसणाऱ्या आकाशाच्या , ढगांच्या बॅकग्राऊंडवर ते डोळे उमटले होते.  ज्या डोळ्यांना बघितलं की माणसाची सगळी दुखः, त्रास ,यातना एका क्षणात नाहीशा होतील असे ते डोळे.  ती त्या दृश्याकडे भान हरपून पाहत होती.  नकळतच तिला जाणीव झाली की ही अशी गोष्ट आहे जी अनुभवण्यासाठी माणसं जंगजंग पछाडतात आणि त्यांनी आपल्यासारख्या वेडीसाठी ती गोष्ट सहजसाध्य करून टाकली का? कारण मनात अजूनही अशक्य ही शक्य करतील स्वामी सुरूच होतं.   हल्ली तिला सवयच लागली होती काहीही घडो चांगल किंवा वाईट तोंडात हे वाक्य हमखास येणार. आणि

स्वतःसाठी बदलताना लेख 18

इमेज
#स्वतःसाठी_बदलताना लेख 18  आपण काय शिकलो? (थॉट अँड बिहेवियर पॅटर्न ) लहानपणी आपल्या शाळेच्या पुस्तकांमध्ये धड्याच्या शेवटी सारांश असायचा.त्याला वरती नाव असायचं आपण काय शिकलो? आणि पूर्ण धड्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांची नोंदणी तिथे असायची.  समुपदेशन घेण्यासाठी येणाऱ्या लोकांच्या समस्येत खूपदा हा प्रश्न समोर येतो की "मॅडम सतत तेच तेच अनुभव का येतात?"  आणि जेंव्हा सरासरी सगळ्या केसेसचा विचार केला जातो तेंव्हा  त्यामध्ये लक्षात यावा इतका कॉमन पॉइंट हा असतो की बऱ्याच जणांनी आयुष्यात अक्षरशः भयंकर अशा पद्धतीची परिस्थिती अनुभवलेली असते. पण तरीही त्यातून जे शिकायचं असतं ते ते  शिकलेले नसतात त्यामुळे पुन्हा पुन्हा त्याच त्याच चुका केल्या जातात.   चुका कशा प्रकारच्या? तर पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी मिळवण्यासाठी प्रयत्न करायचं.  पुन्हा पुन्हा त्याच त्याच लोकांना आपल्या आयुष्यात महत्त्वाची जागा देत आपल्या आयुष्यातील निर्णयांमध्ये त्यांना सहभागी करून घ्यायचं.   हे सगळं पुन्हा पुन्हा घडत असल्यामुळे ज्या गोष्टी त्यांनी भूतकाळात अनुभवलेल्या असतात, ज्या संकटांचा सामना केलेला असतो, ते पुन्हा कु

वॉलपेपर, चालढकल आणि ती

इमेज
#वॉलपेपर_चालढकल_आणि_ती  आपल्या फोनचा वॉलपेपर आपण सगळे अगदी मनापासून निवडत असतो न? मीही ठेवते. माझा सापडेल तुम्हाला इमेजमध्ये.  त्या दिवशी मात्र गंमत झाली. रिक्षामधून येत असताना मी कामामुळे फोनवर होते. थोड्या वेळाने माझ्या शेजारी एक मुलगी येऊन बसली.कॉलेजकन्या होती.  माझा फोन सतत फ्लॅश होत असल्याने वॉलपेपर दिसत होता. तिचं एकदा लक्ष गेलं कदाचित नंतर मात्र ती प्रयत्न करून काय आहे हे वाचण्याचा प्रयत्न करू लागली. आणि शेवटी एकदाचं तिला ते जमलं. हुश्श... मग विजयी मुद्रेने माझ्याकडे बघितलं आणि अचानक म्हणाली,"हे मस्तच आहे, मला आवडलं." मी त्या प्रतिक्रियेने गोंधळून विचारलं की,"काय आवडलं वॉलपेपर?"होकारार्थी मान हलली. मग सुरू झाल्या गप्पा.  "ताई, हे अस सतत समोर राहणार म्हणून ठेवलं आहेस न? ", ती  "हो , त्यामुळे काम करताना आळस, चाल ढकल होऊ लागली की लगेच लक्षात येतं. आणि मन पुन्हा कामाकडे वळवता येतं. ", मी  "मी पण आता असच करेन. लवकरच माझ्या लास्ट सेमीस्टर चे पेपर आहेत. पण एकदा फोन हातात घेतला की नुसता टाईमपास होत राहतो. आता असा काही वॉलपेपर ठेवते की अभ्यास

स्वतःसाठी बदलताना लेख 17

इमेज
#स्वतःसाठी_बदलताना लेख 17 Planning and implementing हातात घेतलेली काम वेळेवर व्हावी तसं सगळ्यांनाच वाटतं पण ते होतं का? आपल्याकडून प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टीसाठी 100 टक्के प्रयत्न केले जातात का? की आपण कुठेतरी कमी पडतो? चालढकल होते का? प्रत्येक वेळी कोणीतरी बाहेरची व्यक्ती आपल्या मदतीसाठी तत्पर असणार आहे का? किंवा प्रत्येक वेळी त्या व्यक्तीकडे जाणं गरजेचं आहे का? आयुष्यात एक वेळा अशी कधीतरी नक्की येणार आहे, जेव्हा तुम्हाला स्वतःची मदत स्वतः करावी लागणार आहे . मग त्या वेळेची वाट बघत बसण्यापेक्षा आपण स्वतः आपल्या गोष्टींचे नियोजन करून स्वतः चे सगळ्यात जवळचे मित्र होण्याचा प्रयत्न केला तर??? यासाठी काय करायचं? काही वेगळं करायचं नाहीये तर आपल्याला आपल्या प्रत्येक महिन्याचं विशिष्ट पद्धतीने नियोजन करायच आहे. आणि त्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी सुद्धा आपणच स्वतःच्या मागे लागायच आहे. १. मागच्या महिन्याचा आढावा घ्या. मागच्या महिन्यात आपली किती काम पेंडिंग होती? त्यातली किती काम आपल्याकडून पूर्ण झाली? आणि किती काम पुन्हा करू किंवा नंतर करू म्हणून पुढे ढकलली गेली? जी काम पुढे ढकलली