पोस्ट्स

Twisted थॉट्स लेख ४ सर्च फॉर द सोल्युशन

इमेज
#Twisted_थॉट्स लेख ४ सर्च फॉर द सोल्युशन माणूस हा समाजशील प्राणी आहे हे १००% मान्य आहे मला. पण माझा एक प्रश्न आहे की माणसाला प्रत्येक गोष्ट करण्याच्या आधी इतरांच्या स्विकृतीची गरज का पडते?  म्हणजे आपण आर्थिकदृष्ट्या इतरांवर अवलंबून असू तर अशा गोष्टींबद्दल एकवेळ समजू शकेल पण जिथे तुम्हाला स्वतःचं आयुष्य मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत तिथे इतरांच्या होकार नकाराची वाट का बघत बसायची???  उदाहरण द्यायचे झाले तर, समजा मला खूप डिप्रेस वाटतंय, घरात कटकट सुरू आहे त्यामुळे मूड खराब झाला आहे किंवा काही करावंसं वाटत नाहीये... मग ह्यातून बाहेर मलाच पडायला हवं ना?  माझे आईवडील ,भाऊ बहीण ,बायको/ नवरा, प्रियकर/ प्रेयसी, सासुसासरे, मित्रमैत्रिणी काहीतरी करतील मग माझं आयुष्य बदलेल असा विचार का???  त्रास कुणाला होतोय तुम्हाला मग इतरांनी काही का करायचं? हा प्रश्न एकदा स्वतःला खडसावून विचारा.  असेल माझा हरी तर नेईल खाटल्यावरी ही वृत्ती सोडा. देव त्यांचीच मदत करतो जे स्वतःची मदत करण्यासाठी प्रयत्न करतात.  उपाय शोधला की नक्की सापडतो. कारण विश्वाचा एक महत्वाचा नियम आहे जिथे...

#Twisted थॉट्स लेख ३ ऑस्कर, चपराक, गालबोट , आणि मी

इमेज
#Twisted_थॉट्स लेख ३ ऑस्कर, चपराक, गालबोट , आणि मी सगळीकडे ऑस्करच्या सोहळ्यात विल स्मिथने कॉमेडियन ख्रिस रॉक च्या कानाखाली वाजवली ह्याची चर्चा सुरू आहे.  पण मला स्वतःला असं वाटलं की ह्याचा इतका उहापोह का होतोय? स्मिथही माणूसच आहे. त्यातून तो जे काही वागला ते जनरली आपल्या माणसांवर प्रेम करणारी माणसे करतातच.  इथे नवराबायको ह्या नात्यापेक्षा सुद्धा एका शारीरिक आजारामुळे आधीच मानसिक आणि शारीरिक त्रासात असलेल्या व्यक्तीचा त्रास जवळून अनुभवणारी व्यक्ती म्हणून कदाचित कुणीही असंच रिऍक्ट केलं असतं.  विल स्मिथचा एक इंटरव्ह्यू मी खूप आधी बघितला होता आणि त्यातलं त्याचं म्हणणं मला प्रचंड आवडलं होत.  तो म्हणाला होता की, जेडा माझी बायको आहे म्हणून तिला आनंदी ठेवायची जबाबदारी माझी नाही. तिच्या आनंदासाठी तिने प्रयत्न करावेत , तिचा आनंद कशात आहे हे तिला माहीत असेल तर आनंदी रहाण्यासाठी तिला माझी गरज कधीच पडणार नाही.  असं म्हणणारा व्यक्ती आपल्या जोडीदाराला एक माणूस म्हणून घडण्यासाठी किती छान पद्धतीने सपोर्ट करत असेल ह्यात शंकाच नाही.  बऱ्याच जणांना त्याचं वागणं भारी वाटलं , ते...

Twisted थॉट्स लेख २ प्रिपेअर युअरसेल्फ फॉर वर्स्ट सिच्युएशन

इमेज
#Twisted_थॉट्स प्रिपेअर युअरसेल्फ फॉर वर्स्ट सिच्युएशन  माझी विचार करण्याची पद्धत थोडीशी विचित्र आणि वेगळी आहे.  कदाचित आयुष्यात कधीच कुठलीही गोष्ट सहजपणे न मिळाल्याने असेल. पण आता जे काही आहे ते असंच आहे.  सगळ्यांना ही पद्धत पटेलच असं नाही आणि खरं तर दुसऱ्या कुणाच्या तरी विचारसरणीवर आपण आपल्या आयुष्यात काही ही करू नये असं माझं वैयक्तिक आणि परखड मत आहे.  मी कुठल्याही कामात हात घालण्याआधी पूर्वतयारी करते.  पूर्वतयारी म्हणजे काय करते?  तर,  ----- स्वतःला आणि स्वतःच्या मनाला त्या कामाच्या स्वरूपाची कल्पना देते. -----त्यानंतर कामाला किती वेळ लागू शकतो आणि त्यासाठी काय काय एडजस्ट करावं लागेल हे लक्षात घेते.  ----- एकदा का वरच्या गोष्टींचा अंदाज आला की मग स्वतःला पुन्हा एकदा विचारते की सुरू करायच का? कारण एकदा एखादी गोष्ट हातात घेतली की मग काहीही झालं तरी आणि कितीही अडथळे आले तरीही ते काम पूर्ण करायचंच हे माझं तत्व आहे. आणि at any cost मी ते पाळतेच.  ----- मनाकडून एकदा कन्फर्म झालं की माझा मेंदू वेगाने कामाला लागतो. प्राथमिक जुळवाजुळव करतो. पहिल्या...

Twisted थॉटस् लेख १

इमेज
Twisted थॉट्स  प्रश्न तुमचा मग उत्तरही तुम्हीच व्हा.  निराश वाटतंय, नको नको झालंय मनस्थिती, परिस्थिती मध्ये बदल तर हवा आहे पण घरात बसून कस होईल? मग काय करायचं?  स्वतःच स्वतःला चियर अप करा.  स्वतःसाठी नवीन काही घडवून आणण्यासाठी काही मायनर म्हणजे छोटे छोटे बदल करून बघा.  जमलं तर वेल अँड गुड अन् नाही जमलं तर??? तर कुणी सुळावर थोडी चढवणार आहे?  पुन्हा नवीन मार्ग वापरून बघूया.  आयुष्य आपलं आहे मग ते जगण्यासाठी , भरभरून जगण्यासाठी हातपाय पण आपल्यालाच हलवावे लागणार आहेत.  मेंदू आणि मनही आपलंच आहे मग त्यांना योग्य ट्रॅकवर पण आपणच आणलं पाहिजे हो की नाही?  मी माझ्या अनुभवातून, शिक्षणातून , साधनेतून जे काही उपाय स्वतःसाठी, ओळखीच्या लोकांसाठी वापरले ते सांगणार आहे.  तुम्हाला आवडले , पटले तर वापरून बघा आणि रिझल्ट मिळाला तर सांगून बघा , रिझल्टच्या प्रमाणात वाढ होईल.  तुमचा फायदा डबल होईल ही खात्री.  बाकी? बाकी कळेल की हळूहळू.  साईबाबा म्हणतात न, "सबर का फल मिठा होता है।"  मग असणारच हो ना?  भेटू लवकरच इथेच.  योग्य शंका असत...

प्रीप्लॅन प्रवास

इमेज
#प्रीप्लॅन_प्रवास  एका उंच टेकडीच्या टोकावर नेहमीप्रमाणे निसर्गाची कृपा होती. आजूबाजूचा सगळा परिसर सदैव हिरवाईने नटलेला  असायचा.  ती तिथून जात असताना एकदा तिला तिथे थांबण्याचा योग आला. As I always say , ह्या जगात घडणारी प्रत्येक गोष्ट ही pre planned असते. तुमची इच्छा असो किंवा नसो घडणाऱ्या गोष्टी घडतातच.  तिचंही असंच झालं. मनाविरुद्धच का होईना पण ती गाडीमधून बाहेर पडून एका मोठ्या दगडावर जाऊन बसली.  काही क्षणातच तिला जाणीव झाली की इथं काही तरी आहे आपल्यासाठी थांबलेलं. तिने पायातील सँडल काढून टाकले आणि पाय वर घेऊन  बिनधास्त मांडी घातली. डोळे आपसूकच मिटले गेले.  हळुवारपणे एका वेगळ्या विश्वात प्रवेश झाला. प्रचंड प्रसन्न वातावरण, हवेत ऊबदार थंडावा जो सगळ्या गात्रांना हळूहळू रिलॅक्स (शिथिल) करत होता. भान हरपून ती ते अनुभवत होती.  संवादाची वेळ जवळ आली होती, तसे आपोआपच मनपटलावर शब्द उमटले.  "हुशार झालीस की तू , हळूहळू का होईना कधी कुठे काय तुझ्यासाठी योजले आहे कळतंय तुला. आता हेच बघ ना, इथून तू कित्येक वेळा ये जा केली आहेस. पण स्वतःहून कधी थांबलीस का...

स्वतःला घडवण्यासाठी बॅच 3

इमेज
#स्वतःला_घडवण्यासाठी बॅच 3 #संकल्प2023 #21dayschallenge  2023 हे वर्ष सुरू होताना आपल्या आजूबाजूच्या काही लोकांना अतिशय छान पद्धतीने काहीतरी देता यावं या संकल्पनेतून जन्माला आला स्वतःला घडवण्यासाठी हा 21 दिवसांचा कोर्स.   ज्याच्यामध्ये वेगवेगळे 21 टास्क पूर्ण करणे हे बंधनकारक आहे सुरू करताना कुठेतरी माझ्या स्वतःच्या आणि माझ्याबरोबर सगळ्या प्रवासात जोडल्या गेलेल्या वंदना ताईंच्या मनात सुद्धा ही गोष्ट होती की जवळपास 50 पेक्षा जास्त जणी या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तयार झालेल्या आहेत.   वेगवेगळ्या बॅकग्राऊंड मधून आलेल्या या सगळ्या मैत्रिणी ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने करतील.  त्यांना त्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला कुठपर्यंत पुश करावे लागेल.   पण पहिले तीन दिवस सोडले तर चौथ्या दिवसापासून आम्हाला अक्षरशः अतिशय छान पद्धतीने प्रतिसाद आमच्या या सगळ्या मैत्रिणींकडून मिळतोय.   मी नेहमी म्हणते की आयुष्यातली कुठलीही गोष्ट दत्तगुरूंच्या इच्छे शिवाय घडत नाही.   आणि इथे ह्या कोर्सच्या बाबतीतही ती गोष्ट खरी ठरली.   कुठेतरी काचकूच ...

एकटेपणा की गोल्डन पिरियड?

इमेज
एकटेपणा की गोल्डन पिरियड खूप जण तक्रार करत असतात की तुम्हाला काय कळणार आहे?आम्ही आयुष्यात काय भोगलं आहे?आम्ही किती एकटे आहोत? आमच्या सोबत कसं कोणीच नाही आहे.  अशा सगळ्यांना मला एक सांगावसं वाटतं एकटेपणा....मग तो तुम्ही स्वीकारलेला असू दे किंवा तुमच्यावर लादलेला असू दे. जेव्हा तुम्हाला त्या एकटेपणाचा सदुपयोग कसा करायचा हे कळतं ना तेव्हा तुम्हाला तो एकटेपणा किंवा आपलं कोणीच नाहीये ही भावना कधीच छळत नाही.   आता कुणी म्हणेल की हे कसं काय करायचं आहे?  तुमचा आनंद, तुम्हाला कशात आहे हे माहित असतं ती गोष्ट करण्यासाठी सुरुवात करायची.   सुरुवातीला मन विरोधच करतं. मग टंगळमंगळ करायला सुरुवात करतं. पण जेव्हा तुम्ही सातत्याने ती गोष्ट करायला सुरुवात करतात. तेव्हा हळूहळू मनाला सवय लागते ते इकडे तिकडे भटकत नाही. व्यवस्थित लक्ष देऊन काही गोष्टी करायला सुरुवात करत.   आणि मग अशा वेळेला आपल्या लक्षात येतं की अरे इतके दिवस आपण इतरांच्या सहवासासाठी जे गळे काढून रडत होतो, आता त्या गोष्टीवरून आपली जरा सुद्धा चिडचिड होत नाहीये.   माझ्या आयुष्यातही अशा गोष्ट...

सुखसंवाद १

इमेज
#ध्यानसंकेत५  #सुखसंवाद  माझा मित्र - आज का फुगली आहेस तू? मी - फुगू नाही तर काय करू? लोकांना प्रत्येक गोष्टीत कशी शंका येते? मित्र - म्हणजे? आता कुणी शंका घेतली? मी - कुणी स्पेसिफिक अस नाही पण की गोष्ट आपण कधी अनुभवली नाही, जीच्याबद्दल आपल्याला फक्त वरवर माहीत आहे. त्या गोष्टीला फक्त समोरचा व्यक्ती चांगल म्हणतोय म्हणून विरोध करायचा ही कुठली पद्धत? मित्र - इथलीच पद्धत... माणसाचं कस आहे माहीत आहे का? त्याला स्वतः ला भलेही काही येत नसेल, माहीत नसेल, करायचं नसेल पण समोरचा करतोय न मग आपण खुसपट काढून त्याला विरोध करायचा. आणि समोरची व्यक्ती वैतागली की मग परिस्थितीचा फायदा घेऊन ती व्यक्ती कशी वाईट आहे असं बोंबलत सुटायचं. मी - हे इन जनरल ठीक आहे म्हणजे मान्यच आहे मला. पण जी शक्ती या सगळ्या जगाला चालवते तिलाही अशीच वागणूक? माणूस खरच इतका मोठा झाला आहे? मित्र - वागणूक? तुला खरच अस वाटत का की आम्ही अशा कुणाला खिजगणतीतही धरतो? तुझा आवडता कर्म सिद्धांत आहे की त्यांच्याकडे नीट लक्ष देण्यासाठी. हे बघ प्रत्येक चांगल्या गोष्टीला जितके जास्त विरोधक तितकं जास्त ते काम प्रभावी होतं. आणि...