पोस्ट्स

सुखसंवाद १

इमेज
#ध्यानसंकेत५  #सुखसंवाद  माझा मित्र - आज का फुगली आहेस तू? मी - फुगू नाही तर काय करू? लोकांना प्रत्येक गोष्टीत कशी शंका येते? मित्र - म्हणजे? आता कुणी शंका घेतली? मी - कुणी स्पेसिफिक अस नाही पण की गोष्ट आपण कधी अनुभवली नाही, जीच्याबद्दल आपल्याला फक्त वरवर माहीत आहे. त्या गोष्टीला फक्त समोरचा व्यक्ती चांगल म्हणतोय म्हणून विरोध करायचा ही कुठली पद्धत? मित्र - इथलीच पद्धत... माणसाचं कस आहे माहीत आहे का? त्याला स्वतः ला भलेही काही येत नसेल, माहीत नसेल, करायचं नसेल पण समोरचा करतोय न मग आपण खुसपट काढून त्याला विरोध करायचा. आणि समोरची व्यक्ती वैतागली की मग परिस्थितीचा फायदा घेऊन ती व्यक्ती कशी वाईट आहे असं बोंबलत सुटायचं. मी - हे इन जनरल ठीक आहे म्हणजे मान्यच आहे मला. पण जी शक्ती या सगळ्या जगाला चालवते तिलाही अशीच वागणूक? माणूस खरच इतका मोठा झाला आहे? मित्र - वागणूक? तुला खरच अस वाटत का की आम्ही अशा कुणाला खिजगणतीतही धरतो? तुझा आवडता कर्म सिद्धांत आहे की त्यांच्याकडे नीट लक्ष देण्यासाठी. हे बघ प्रत्येक चांगल्या गोष्टीला जितके जास्त विरोधक तितकं जास्त ते काम प्रभावी होतं. आणि आम्हाला

मॉर्निंग मंत्रा भाग 3

इमेज
#मॉर्निंग_मंत्रा ३  २२ डिसेंबर  २०२२ #थॉट्स_पॅटर्न  (आपला focus कुठे आहे? ) संकल्प आणि नवीन वर्ष ह्यांचा फारच जवळचा संबंध असतो. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मी हे करायला सुरुवात करणार आहे अस आपण बऱ्याचदा ठरवतो पण आपण ते तडीस नेण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतो का?  तर त्यासाठी काही गोष्टी आपण स्वतःला विचारू शकतो.  शेवटी ज्यामध्ये बदल घडवायचे आहेत ते आपलं आयुष्य आहे आणि ज्याने बदल घडवायचे आहेत ते आपण स्वतः आहोत.  काय करता येईल?  तर सगळ्यात आधी स्वतःचं निरीक्षण करायचं आहे.  खाली दिलेल्या प्रश्नांची खरी उत्तरे तुम्हाला द्यायची आहेत आणि ती सुद्धा स्वतःला.  लिहून ठेवा हं उत्तरं.... हुश्श्श.... सुस्कारा सोडला हो न?  दुसऱ्याशी खर बोलायचं म्हणजे किती खोटं बोलावं लागतं. पण चुकत आहात तुम्ही. कारण माणूस ह्या जगात सगळ्यांशी खोटं बोलू शकतो पण स्वतःशी खोटं बोलू शकत नाही. आणि म्हणूनच स्वतःला उत्तर द्यायची आहेत.  प्रश्न 1. मला माझ्या दैनंदिन आयुष्यात ही गोष्ट करणं पूर्णपणे थांबवायचं आहे, पण जमत नाही........ 2. मला माझ्या दैनंदिन आयुष्यात ही गोष्ट करणं कमी करायचं आहे,पण जमत नाही......... 3. मला माझ्या द

बंधनापासून उकलल्या गाठी

इमेज
बंधनापासुनी उकलल्या गाठी आजही तेच , ती जितकी प्रयत्न करत होती, तितके तिच्या वाट्याला येणारे अनुभव रिपीट होत होते.  शेवटी शेवटचा उपाय म्हणून तिने डोळे मिटून घेतले आणि स्वतःच्या प्रश्नांची उत्तरं शोधायला सुरुवात केली.  कोण आहे मी? का म्हणून पुन्हा पुन्हा तेच घडत आहे माझ्यासोबत? हव्यास, अट्टहास हा माझा पिंड नाही आणि कधीही नव्हता. मग पुन्हा तेच का?  मनात उमटणारे सगळे प्रश्न धडा वाचत असल्यासारखे विचारून ती मोकळी झाली.  काही वेळ आजूबाजूला आणि मनातही एक निशब्द शांतता पसरली. ती शांतपणे त्या शांततेला शरण गेली. पट्टीचा पोहोणारा कसा आधी पाण्यात भरपूर हातपाय मारून शरीराला थकवतो आणि मग नंतर शांतपणे शरीर सैल सोडून पाण्यावर तरंगत राहतो. तसंच काहीसं...... हळूहळू मनाच्या पाटीवर अलगद शब्द उमटू लागले.  - अनुभव फक्त शिकवण्यासाठी असतात हे तुझं अनुमान अगदी बरोबर आहे. आणि ते सुद्धा अनुभवातूनच आलेलं आहे. तुला असं वाटतंय की तुझे अनुभव सतत रिपीट होत आहेत. पण तू नक्की सगळे मार्ग चाचपडून बघितलेस का? तर नाही. हे अनुभव असे आहेत, जिथे तू स्वतःची तुलना इतरांशी करतेस. आणि आमच्या दृष्टीने बघितलं तर ती तुलना अतिशय अयोग्

दत्त दत्त ऐसे लागले ध्यान

इमेज
#दत्त_दत्त_ऐसे_लागले_ध्यान #संक्षिप्त_गुरुचरित्र   २१ दिवस चॅलेंज  एखादा मानसिक त्रास सुध्दा तुम्हाला योग्य मार्गावर नेऊन सोडू शकतो. कस? मन:शांती हवी आहे म्हणून मी संक्षिप्त गुरुचरित्र पारायण सुरु केले. आणि हळूहळू मन:शांती सोबत अजून बरच काही पदरात अलगद येवुन पडलं.  अनुभव पहिला अचानक तंद्री लागली आणि एक 5 वर्षांची मुलगी समोर आली. आधी साधं असलेलं तिचं रूप एका क्षणांत पालटलं आणि ती काली मातेच्या रूपात दिसू लागली. खोडकर हसून मला फक्त एकच गोष्ट ती म्हणत होती आणि ती म्हणजे मी येऊ का तुझ्याशी खेळायला? तुला खेळायला घेत नाही न कुणी? मी आले की बघ सगळे कसे पळून जातील. तिच्या डोळ्यातले ते खट्याळ भाव माझ्या मनावर असलेला ताण कमी करण्यासाठी पुरेसे होते.  अनुभव दुसरा काही कारणांमुळे सतत भीती वाटत होती पण वाचन सुरू केलं आणि मनात एक १४ व्या अध्यायातील त्या ओळी सतत डोळ्यासमोर नाचू लागल्या. कोणत्या?  न करा चिंता असाल सुखे सकळ आरिष्टे गेली दुःखे म्हणोनी हस्त ठेवती मस्तके भाक देती तयेवेळी ||४४|| असं काही घडण्याची ही काही माझी पहिली वेळ नव्हती पण आपल्या हळव्या मनाला त्याने स्वतःचं अस्तित्व दाखवून उभारी देण्य

दत्तजयंती विशेष ७ डिसेंबर २०२२

इमेज
#दत्तजयंती_विशेष ७ डिसेंबर २०२२ यावर्षीची दत्तजयंती माझ्यासाठी बऱ्याच अर्थांनी विशेष ठरली. एक म्हणजे अगदी दत्त जयंती तोंडावर आलेली असताना करुणात्रीपदीच्या अध्ययन वर्गांबद्दल मला संकेत मिळाले.  आणि पंधरा दिवसांपूर्वी ते सुरूही झाले.   बऱ्याच जणांनी प्रश्न विचारले की अध्ययन करण्यासारखं यामध्ये काय आहे? पण कुठेतरी मला ह्या गोष्टीची खात्री होती की जर आपल्याला ही गोष्ट करण्यासाठी सांगण्यात आलेल आहे ,तर त्यामागे त्यांची काहीतरी खूप महत्त्वाची योजना आहे. आणि मी फक्त त्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून मला दिलेलं काम करण्याचा प्रयत्न केला.   आपण म्हणतो ना की काही गोष्टी योग्य वेळ आल्यानंतर त्या घडतातच तुम्ही त्या थांबवू नाही शकत.   तसंच काहीसं या बाबतीत झालं जेव्हा पहिला वर्ग घेणार असं मी 22, 23 नोव्हेंबरच्या दरम्यान सांगितलं त्यानंतर बऱ्याच स्तरांमधून बरेच रिस्पॉन्स आले आणि जवळपास पहिली बॅच 24 तारखेपासून सुरू सुद्धा झाली.  गुरुवारी... मार्गशीर्षातला पहिला गुरुवार आणि करुणात्रिपदीचा अध्ययन वर्ग सुरू करणे हा खरंतर दुग्ध शर्करा योग होता.   24 ला सुरू झालेली पहिली बॅच काल सात डिसेंबर दत्त जयंतीच्य

दुर्गे दुर्घट भारी भाग 3

इमेज
#दुर्गे_दुर्घट_भारी भाग ३  ध्यानाला बसायचं म्हणजे माझ्यासाठी नेहमीच एक अवघड काम असत. पण माझ्या लेकाने पोटात असल्यापासून ही गोष्ट माझ्याकडून करून घेतली.  जसं आमचा शेरू (बोका) अगदी थोरल्या मुलासारखा माझ्या हालचाली वर लक्ष ठेवायचा तसच लेकानेही सुरू केलं. आधी आपण शेरूचा अनुभव ऐकुया.  शेरु म्हणायला फक्त बोका होता. पण बाकी सगळं वागणं अगदी घरातल्या मोठ्या माणसासारख.  रोज तिन्ही सांजेला दिवा लावला की रामरक्षा आणि हनुमान चालीसा हे झालच पाहिजे असा त्याचा नियम होता. आता कुणी म्हणेल त्याला काय कळत होतं? पण त्याला कळायचं. ही दोन्ही स्तोत्रं आणि अजून काही स्तोत्रं खंड न पडता ऐकता यावीत म्हणून एका वापरात नसलेल्या फोनमध्ये सेव्ह करून मी ठेवली होती. तो फोन जिथे ठेवलेला असायचा शेरा बरोबर ठराविक वेळी तिथे जाऊन ओरडायला सुरुवात करायचा. आणि एकदा त्याला रिपीट मोडवर सगळ लावून दिलं की स्वतःच्या ठरलेल्या जागी बसून ऐकायचा.  अमावस्या, पौर्णिमा वगैरेच्या दिवशी ते दिवसभर आमच्या घरात हळू आवाजात दोन्ही स्तोत्रं सुरू असायची.  एक ,दोन वेळा हयगय केली तेंव्हा त्याला आणि इतर लेकरांना त्रास झाला. त्यानंतर मात्र माझी हिंमत

अध्यात्म म्हणजे काय ? भाग १

इमेज
#अध्यात्म_म्हणजे_काय_? भाग १ आपण लहानपणापासून काही विशिष्ट आणि ठराविक साच्यातूनच विचार करत आलो आहोत कारण आपल्याला तशीच सवय लागली आहे. आणि तस बघायला गेलं तर त्यात आपली चुक आहे अस काहीच नाही.  ओव्हरऑल  समरी काढली तर कॉमन पॉईंट हे निघतील - स्वतःच्या आत्म्यापर्यंत प्रवास - देवात किंवा त्या शक्तीत लीन होणे - स्वतःच्या आत्माच्या प्रगतीसाठी  - स्वतःमध्ये सकारात्मक विचार वाढवणे - मृत्यू ला शांतपणे सामोरे जाणे - देवाकडे पोहोचण्याचा मार्ग पण हे सगळं घडून येण्याच्या मध्ये अनेक पायऱ्या आहेत.  त्या पायऱ्या गाळून अचानक शेवटच्या टप्प्यात नाही जाता येत.  त्या पायऱ्या कोणत्या?  * आपली स्वतःप्रति असलेली कर्तव्य आणि जबाबदाऱ्या  - हो स्वतः, मी , ह्या मी ला विसरून "त्या"च्यापर्यंत पोहोचणे इतके सोपे नसते आणि ते सहज शक्य ही नसते.  आपल्याला मनुष्य जन्म मिळाला आहे तो कुठलीही एकच गोष्ट करण्यासाठी नाही. तर अनेक गोष्टी करत स्वतःची प्रगती करण्यासाठी.  मी ला विसरणे म्हणजे स्वतःच्या सगळ्या चांगल्या वाईट गुणांकडे डोळेझाक करणे.  मी खरा कसा आहे? हे ज्याला कळले तोच आणि तोचच स्वतःच्या दुर्गुणांवर काम करू शकतो. 

मॉर्निंग मंत्रा भाग 2

इमेज
#मॉर्निंग_मंत्रा २ १ नोव्हेंबर २०२२ #थॉटस्_पॅटर्न  ह्या जगात कुठली गोष्ट सर्वात जास्त अवघड असेल तर ती म्हणजे स्वतःच्या बाबतीत चांगल घडत आहे, घडणार आहे असा विचार करणे.  जसा वाईट विचार , भावना, व्यक्ती ह्यांचा मनावर परिणाम पटकन होतो तसा तो चांगल्या विचार, भावना आणि व्यक्तींचा होत नाही अस का? कारण जी गोष्ट सोपी , कमी त्रासदायक ती लवकर स्विकारली जाते. जी गोष्ट करायला, स्वीकारायला अवघड तिला शक्यतो टाळण्याकडे माणसाचा कल असतो.  चांगल्या सवयी स्वतः ला लावणे, स्वतःमध्ये रुजवणे हे सगळ्यात अवघड काम. त्यातही एका स्पेसिफिक वयानंतर तर मी कुणाचं का ऐकावं? हा मला सांगणारा कोण? ही वृत्ती वाढलेली असते. त्यामुळे चांगल काही शिकायचं म्हटल की जास्त कष्ट करावे लागतात.  मी याआधीही म्हणाले होते की अध्यात्मातच नाही तर आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यात प्रगती हवी असेल तर आधी बेसिकवर काम करा.  स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगला विचार करायचा प्रयत्न करा.  ज्यांना अस वाटत की , अध्यात्म म्हणजे फक्त परमार्थ त्यांना एक सांगते , जोपर्यंत स्वार्थी होऊन तुम्ही स्वतःची प्रगती करत नाही तोपर्यंत तुम्ही इतरांची मदत करू शकत नाही.