मॉर्निंग मंत्रा भाग 3
#मॉर्निंग_मंत्रा ३
२२ डिसेंबर २०२२
#थॉट्स_पॅटर्न (आपला focus कुठे आहे? )
संकल्प आणि नवीन वर्ष ह्यांचा फारच जवळचा संबंध असतो. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मी हे करायला सुरुवात करणार आहे अस आपण बऱ्याचदा ठरवतो पण आपण ते तडीस नेण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतो का?
तर त्यासाठी काही गोष्टी आपण स्वतःला विचारू शकतो.
शेवटी ज्यामध्ये बदल घडवायचे आहेत ते आपलं आयुष्य आहे आणि ज्याने बदल घडवायचे आहेत ते आपण स्वतः आहोत.
काय करता येईल?
तर सगळ्यात आधी स्वतःचं निरीक्षण करायचं आहे.
खाली दिलेल्या प्रश्नांची खरी उत्तरे तुम्हाला द्यायची आहेत आणि ती सुद्धा स्वतःला.
लिहून ठेवा हं उत्तरं....
हुश्श्श.... सुस्कारा सोडला हो न?
दुसऱ्याशी खर बोलायचं म्हणजे किती खोटं बोलावं लागतं. पण चुकत आहात तुम्ही. कारण माणूस ह्या जगात सगळ्यांशी खोटं बोलू शकतो पण स्वतःशी खोटं बोलू शकत नाही. आणि म्हणूनच स्वतःला उत्तर द्यायची आहेत.
प्रश्न
1. मला माझ्या दैनंदिन आयुष्यात ही गोष्ट करणं पूर्णपणे थांबवायचं आहे, पण जमत नाही........
2. मला माझ्या दैनंदिन आयुष्यात ही गोष्ट करणं कमी करायचं आहे,पण जमत नाही.........
3. मला माझ्या दैनंदिन आयुष्यात ही सवय लावून घेतली पाहिजे हे कळत पण जमत नाही.......
4. मला माझ्या दैनंदिन आयुष्यात आधीपासूनच करत असलेली ही गोष्ट सातत्याने करत राहायची आहे पण जमत नाही.....
5. मला माझ्या दैनंदिन आयुष्यात ह्या काही चांगल्या गोष्टी करणं वाढवणं गरजेचं आहे पण जमत नाही.....
ज्या व्यक्ती, वस्तू , गोष्टी , प्रसंग मला प्रगती करण्यासाठी अडवत आहेत त्यांना टाळणं मला जमायला हवं.
आणि ज्या व्यक्ती वस्तू गोष्टी प्रसंग मला प्रगती करण्यासाठी उपयोगाच्या आहेत त्या कडे मी हेतुपुरस्सर लक्ष केंद्रित करायला हवं.
तर मंडळी आपणच ठरवलं आणि झालं अस होत का? नाही होत न? का? कारण आपण आपल्या मनाच्या तालावर नाचत असतो. त्याने म्हटले कंटाळा आलाय,आज नको हे काम करायला झालं .....आपण लगेच ते शब्द पडत्या फळाची आज्ञा म्हणून मान्य करतो. आणि हातातलं काम बाजूला सरकवून सोशल मीडियावर स्क्रोल करायला सुरुवात करतो.
हे टाळायचं आहे? पण कस?
ते ही सांगेन. पण आत्ता साठी एवढे वरचे प्रश्न स्वतःला विचारून बघा. आणि उत्तरे लिहून ठेवा.
सो लोक्स,
आयुष्यात भरायचे असतील हवेहवेसे रंग
त्यासाठी करावा लागेल चांगल्या विचारांशी संग
हा आजचा मॉर्निंग मंत्रा. लवकरच भेटूया पुढच्या लेखात तोपर्यंत?
सगळं काही #दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु
#आई_राजा_उदे_उदे
#गुरूवार
#संकल्पदिन
#स्वतःला_शोधताना
टिप्पण्या
Dhanyawad