पोस्ट्स

अलक

#अलक १.  रोज तिच्या "लवकर या बाबा" कडे जाणूनबुजून दुर्लक्ष करणाऱ्या बाबाच्या गळ्याशी तेच शब्द येऊन अडकले. पण ती मात्र छोट्याशा आजाराचं निमित्त होऊन आज कधी न परत येण्याच्या प्रवासाला निघाली होती. कारण एकच ती मुलगी होती २. उदया ओपन डे साठी बाबा शाळेत येणार  म्हणून रात्र तिने आनंदात घालवली. पण ते मात्र मिटिंगच कारण देत तिच्या वर्गात न येताच निघून गेले.डोळ्यातलं पाणी आवरत ती गुपचूप बसून राहिली . कारण तेच ... ३. लग्नाचा विषय निघाल्यावर इतर मुलींसारखी तीही सुखदुःखाच्या हिंदोळ्यावर झुलू लागली. पण घरात होणारे आनंदी बदल तिच्या नजरेतून सुटले नाहीत. इतकी वर्ष समोर न येऊ दिलेली भावना आता मात्र प्रकर्षाने जाणवली. अन् अनेक नकोशा आठवणी डोळ्यांतून वाहू लागल्या. कारण तेच .... ४. नवीन घरात रुळू लागल्यावर जेंव्हा तिला नणंदेची अवस्था आपल्यासारखीच आहे हे जाणवलं. तेंव्हा नकळतच तिने तिला कुशीत घेत स्वतःच्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली. पण ह्यावेळी कारण वेगळं होतं तिने आता ठरवलं होतं कुणालाही  "नकोशी" असण्याच दुःखच होऊ द्यायचं नाही. नकळतच तिचा हात स्वतःच्या पोटावर निर्धाराने विसा

#देवाक_काळजी_रे

#देवाक_काळजी_रे नुकतंच हे गाणं कानावर पडलं. आणि नेहमीसारखं आम्ही आपले शब्दांवर आणि अर्थावर रेंगाळून गाण्याच्या प्रेमात पडलो. फार काही तत्वज्ञान नाहीये अगदी साधं सोपं आहे सगळं पण माणसाला मात्र साध्या गोष्टींनाही अवघड करायची सवय असते. आयुष्यातले चढ उतार, सतत होणारे बदल त्यामुळे येणारे चांगले वाईट अनुभव विशेषतः वाईट जास्तच ह्यांच्यामुळे एक क्षण असा येतो की सरळमार्गी माणूसही चुकीच्या मार्गावर जातो किंवा जायचं ठरवतो. आणि हल्लीच्या फास्ट आयुष्यात तर संयम उर्फ पेशन्स फारच कमी लोकांकडे असतात. पण चुकीच्या मार्गाचे फायदे आणि तोटेही  प्रत्यक्ष लक्षात येईपर्यंत न भरून येणारं नुकसान करून मोकळे झालेले असतात. त्यानंतर हाती उरलेली निराशा सगळीकडे फक्त आणि फक्त अंधार दाखवत असताना ज्याची गरज भासते तो असतो "देव". इथे मी देव ही संकल्पना फक्त मूर्ती अशी नाही म्हणत तर माझ्यासाठी देव म्हणजे मनाच्या कोपऱ्यात सदैव वसणारी अशी एक श्रद्धा असते जी योग्य वेळी,योग्य प्रकारे आणि योग्य रूपातही मदतीला धावून येतेच. गरज असते ती फक्त स्वतःवर आणि स्वतःच्या चांगल्या कृत्यांवर किंवा कर्मांवर ठाम विश्वास असण्याची आ

#मीच_चांगलं_वागायचं_का?

#मीच_चांगलं_वागायचं_का? नेहा नव्यानेच आली होती सोसायटीमध्ये. अजून कुणाशी फारशी ओळख नव्हती त्यामुळे ती शांतच असायची. हळूहळू मुलांना खाली खेळण्यासाठी नेल्यानंतर ओळखी होऊ लागल्या. तरीही आपण नवीन आहोत याचं भान ठेवून ती वावरत असे. तशीही तिला इकडंच तिकडे करण्याची सवयही नव्हती. रोज सगळ्यांसोबत गप्पा मारल्या जाऊ लागल्या. लवकरच  तिला वॉट्सअप्प ग्रुपमध्ये पण घेतलं. पण राहून राहून तिला एक गोष्ट खटकायची घरात असो किंवा बाहेर सगळीकडच्या व्यक्तींबाबत बोलणं सुरू झालं की जास्तीत जास्त जणींचा सूर असायचा #मीच_चांगलं_वागायचं_का? नेहाला समजयचंच नाही की अस का?? म्हणजे इतर सर्वांसारखेच तिच्या घरातही मतभेद, वाद होतेच नाही असं नाही पण तिला त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडला होता किंवा तिने शोधला होता अस म्हणूया. मग हळूहळू तिच्या लक्षात आलं की ह्या सगळ्या जणींचा मूळ प्रॉब्लेम #मीच_चांगलं_वागायचं_का? हा नसून कुणीच माझं कौतुक करत नाही हा आहे. आणि खरं तर तो अनंत काळापासून स्त्रियांच्या बाबतीतील मोठ्ठा प्रश्न आहे. होतं काय सणवार म्हटलं की 3,4 जणी एकत्र येतात बरं तिथे त्या एकमेकींना मदत करण्याऐवजी कुरघोडी कशी कर

मितवा

तुझा वाढदिवस जगासाठी जरी तो एक सण वगैरे टाइप दिवस असला तरी माझ्यासाठी मात्र माझ्या सगळ्यात जवळच्या मित्राचा बड्डे. अगदी मॉर्डन भाषेत म्हणायचं तर माझ्या पहिल्या आणि शेवटच्या बॉयफ्रेंडचा बड्डे. इतरांपेक्षा मला जास्त उत्सुकता असायची त्या दिवशी. त्याला कारणही तसंच काहीसं तुझं सगळं आवरणं, डेकोरेशन करणं जाम आवडायचं मला. पहिल्यांदा तू घरी आलास तेंव्हा आजीने तुझी काही देव म्हणून ओळख करून दिलीच नव्हती. ती म्हणाली होती , तुला जे काही बोलायचं असेल , सांगायचं असेल ते मोकळेपणाने याला सांग हा तुझं सगळं ऐकेल आणि इतर कुणापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने तुला सल्ला पण देईल . मग अगदी घरातून बाहेर पडतानाही तुला येते रे म्हणत बाहेर पडण्याची सवय लागली. माझ्या आयुष्यातील प्रत्येक वळणावर तू सोबत आहेसच हा विश्वास येणाऱ्या अनुभवांनी हळूहळू पक्का होत गेला. शाळेत किंवा घरी कुठेही काहीही सांगण्यासारखं घडलं की ते सांगण्यासाठी मी तुझ्याकडे धावत येऊ लागले. बाकी सगळे नंतर . तुझं माझं नातं कुणालाही न समजता छानपैकी बहरत राहिलं. मलाही कधी मनातलं बोलून दाखवण्यासाठी दुसऱ्या कुणाची

स्वप्नांची खिडकी

#स्वप्नांची_खिडकी "पलभर के लिए कोई हमे प्यार कर ले" असं म्हणत देव आनंद हेमा मालिनीच्या मागे स्क्रीनवर धावू लागला. तशी ऋतुजा हातातलं काम टाकून देत लगबगीनं टीव्हीसमोर येऊन बसली. लहानपणापासून तिला हे गाणं प्रचंड आवडत होतं. तुम्ही समजताय तसं हिरोईन, हिरो किंवा गाण्यामुळे नाही तर त्यातल्या खिडक्यांमुळे. जेंव्हा पहिल्यांदा तिने चित्रपट बघितला तेंव्हा ते कळण्याचं तिचं वयही नव्हतं. पण ते गाणं त्या खूप सगळ्या मोठ्या मोठ्या खिडक्यांमुळे तिच्या मनात घर करून राहिलं कायमचं. त्यांचं घर तसं खूपच छोटं होतं त्यामुळे एकच खिडकी तिच्यातून प्रेक्षणीय असं काय दिसणार ना... असो तर त्या बंगल्याच्या खिडक्या तिला आवडल्या लहान असताना लपाछपी खेळायला किती मज्जा येईल तिथे म्हणून आणि मोठी झाल्यावर आणखी गोष्टी लक्षात आल्यामुळे. घरात सगळेच तिची ह्या वेडामुळे चेष्टा करायचे पण तिला काही फरक पडत नव्हता. पुढे मागे माहेरचं घरही मोठ्ठ झालं हवे तसे बदल घरच्यांनी केले पण ती सासरी जाणार असल्याने तिच्या आवडीनिवडी कुणी फारश्या लक्षात घेतल्या नाही. तिचं मन थोडंसं खट्टू झालं पण तिने स्वतःला समजावलं की इथे नाही पण स्वतःच

हुलकावणी

हुलकावणी....... सकाळी सकाळी ‘ती’ टेस्ट तिच्या चेहऱ्यावर न मावणारं हसू देऊन गेली. उत्साहाने भरून जात दोघेही स्वप्नांत गुंग झाले. अनपेक्षितपणे मिळालेला आनंद खूप काही क्षणार्धात बदलून गेला. कालपरवापर्यंत इतरांसाठी तर सोडाच पण स्वतःसाठीही महत्वाची नसणारी ती खूप महत्वाची असल्याप्रमाणे स्वतःलाच वागवू लागली होती. पुन्हा एकदा ते सगळं अनुभवताना , मनापासून तो त्रास सहन करताना ती मोहरत होती. पण का कुणास ठाऊक मनातली जुनी भीती नकळतच डोके वर काढू लागली कि तिच्या अंगावर नकोसे शहारे येऊन जायचे. तरीही एकमेकांना सावरत , सांभाळत ते दोघेही परत उभे राहिलेच होते. काही दिवसातच तिला डॉ कडूनही सगळं ठीक आहे असा सिग्नल नक्की मिळणार याची तिला खात्री वाटत होती. गेली काही वर्षं सगळे रिपोर्ट्स नॉर्मल असूनही ते दोघे सततच्या या हुलकावणीला वैतागले होते. त्यात नातेवाईक ,शेजारी यांच्याकडून काहीही शहानिशा न करता हीन आणि टोमण्यांच्या रुपात होणारी चौकशी भरच घालत असे. आता मात्र असं होऊ नये अशी दोघांनाही आशा वाटत होती , तशी मनोमन प्रार्थनाही ते देवाजवळ करत होते. अखेर तो