★मैत्री★➡️टर्म्स अँड कंडिशन अप्लाय ⬅️
★मैत्री★ ➡️टर्म्स अँड कंडिशन अप्लाय ⬅️ मैत्री - टर्म्स अँड कंडिशन अप्लाय जवळपास ७० सेल्फी काढून झाल्यावर ७१ व्या सेल्फीला २० वर्षांची कुल्फी आयमिन कलिका खुश झाली. मग बरेच हॅशटॅग वापरत सगळ्या सोशल मीडिया अकाउंटवर ती सेल्फी शेयर करण्यात आली. मग सुरू झाली लांबलचक प्रक्रिया म्हणजे प्रोसेस हो लाईक, कमेंटच्या देवाणघेवाणीची. अधूनमधून आपल्या सो कॉल्ड सोशल मिडिया प्रतिस्पर्धी लोकांचे खाते तपासणीही सुरू होती. पण जसजसे हिचे लाईक,कमेंट कमी होऊन इतरांचे वाढू लागले तशी ती अस्वस्थ झाली. घरात काम करत असणाऱ्या रचनाचा एक डोळा लेकीकडेही होता. नुकताच लेकीचा कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाचा रिझल्ट लागला होता. रचनाच्या अपेक्षेपेक्षा जरा २,४ टक्के जास्तच मिळाले होते कलिकाला. त्यामुळे तर हवा तसा फोन घेऊन दिला होता. तशी कलिका करियर वगैरे बाबत प्रचंड फोकस्ड होती. पण हल्ली हल्लीच हे सोशल मिडिया वेड जरा जास्तच वाढलं होतं. आणि अचानक झालेला हा बदल चाणाक्ष आईच्या नजरेने टिपला होता. रचना स्वतःही स्मार्टफोन छान प्रकारे वापरत असल्याने त्यातल्या खाचाखोचा तिलाही आता कळत होत्या. कलिकासोबतही तिचे नाते मैत्रीचे होते पण त्याचबर