boundaries style quiz
आपण जेंव्हा म्हणतो की आसपासची लोकं मला गृहीत धरतात किंवा मला ठरवून सुद्धा त्रासदायक लोकांपासून अंतर ठेवून वागता येत नाही तेंव्हा आपल्याला त्या नात्यात अपेक्षित मर्यादा स्पष्ट करता येत नाही हे नक्की. पण जर आपल्याला आपल्या मर्यादा किंवा boundaries चा अंदाज आला किंवा त्याबद्दल नेमक्या काही गोष्टी समजल्या तर?? म्हणूनच तर ही प्रश्नावली तयार करण्यात आली आहे. लक्षात घ्या ही कोणतीही मानसशास्त्रीय चाचणी नाही. हे काही साधे सोपे प्रश्न आहेत जे आपल्याला आपल्याच वागण्याचे प्रतिबिंब दाखवतील. ज्यावरून आपण नेमके काय बदल करायला हवेत हे आपल्याला समजेल. Boundaries चे चार प्रकार असतात आपण त्यापैकी कोणत्या प्रकारात मोडतो हे जाणून घ्यायचे असेल तर या प्रश्नांची प्रामाणिक उत्तर देण्याचा प्रयत्न करा. सूचना - खाली दिलेल्या प्रश्नांच्या पर्यायांपैकी जो पर्याय तुमच्या स्वभावाचे अचूक किंवा साधर्म्य दाखवणारे वर्णन करतो तो निवडा. 1. जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला मदत मागते तेव्हा तुम्ही काय करता? a) ते काम तुम्हाला जमणार आहे की नाही याची खात्री नसताना सुद्धा लगेच होकार देता....