स्वतःसाठी बदलताना लेख 18
#स्वतःसाठी_बदलताना लेख 18 आपण काय शिकलो? (थॉट अँड बिहेवियर पॅटर्न ) लहानपणी आपल्या शाळेच्या पुस्तकांमध्ये धड्याच्या शेवटी सारांश असायचा.त्याला वरती नाव असायचं आपण काय शिकलो? आणि पूर्ण धड्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांची नोंदणी तिथे असायची. समुपदेशन घेण्यासाठी येणाऱ्या लोकांच्या समस्येत खूपदा हा प्रश्न समोर येतो की "मॅडम सतत तेच तेच अनुभव का येतात?" आणि जेंव्हा सरासरी सगळ्या केसेसचा विचार केला जातो तेंव्हा त्यामध्ये लक्षात यावा इतका कॉमन पॉइंट हा असतो की बऱ्याच जणांनी आयुष्यात अक्षरशः भयंकर अशा पद्धतीची परिस्थिती अनुभवलेली असते. पण तरीही त्यातून जे शिकायचं असतं ते ते शिकलेले नसतात त्यामुळे पुन्हा पुन्हा त्याच त्याच चुका केल्या जातात. चुका कशा प्रकारच्या? तर पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी मिळवण्यासाठी प्रयत्न करायचं. पुन्हा पुन्हा त्याच त्याच लोकांना आपल्या आयुष्यात महत्त्वाची जागा देत आपल्या आयुष्यातील निर्णयांमध्ये त्यांना सहभागी करून घ्यायचं. हे सगळं पुन्हा पुन्हा घडत असल्यामुळे ज्या गोष्टी त्यांनी भूतकाळात अनुभवलेल्या असतात, ज्या संकटांचा सामना केलेला असतो, ते पुन्हा कु