पोस्ट्स

स्वतःसाठी बदलताना लेख 18

इमेज
#स्वतःसाठी_बदलताना लेख 18  आपण काय शिकलो? (थॉट अँड बिहेवियर पॅटर्न ) लहानपणी आपल्या शाळेच्या पुस्तकांमध्ये धड्याच्या शेवटी सारांश असायचा.त्याला वरती नाव असायचं आपण काय शिकलो? आणि पूर्ण धड्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांची नोंदणी तिथे असायची.  समुपदेशन घेण्यासाठी येणाऱ्या लोकांच्या समस्येत खूपदा हा प्रश्न समोर येतो की "मॅडम सतत तेच तेच अनुभव का येतात?"  आणि जेंव्हा सरासरी सगळ्या केसेसचा विचार केला जातो तेंव्हा  त्यामध्ये लक्षात यावा इतका कॉमन पॉइंट हा असतो की बऱ्याच जणांनी आयुष्यात अक्षरशः भयंकर अशा पद्धतीची परिस्थिती अनुभवलेली असते. पण तरीही त्यातून जे शिकायचं असतं ते ते  शिकलेले नसतात त्यामुळे पुन्हा पुन्हा त्याच त्याच चुका केल्या जातात.   चुका कशा प्रकारच्या? तर पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी मिळवण्यासाठी प्रयत्न करायचं.  पुन्हा पुन्हा त्याच त्याच लोकांना आपल्या आयुष्यात महत्त्वाची जागा देत आपल्या आयुष्यातील निर्णयांमध्ये त्यांना सहभागी करून घ्यायचं.   हे सगळं पुन्हा पुन्हा घडत असल्यामुळे ज्या गोष्टी त्यांनी भूतकाळात अनुभवलेल्या असतात, ज्या संकटांचा सामना केलेला असतो, ते पुन्हा कु

वॉलपेपर, चालढकल आणि ती

इमेज
#वॉलपेपर_चालढकल_आणि_ती  आपल्या फोनचा वॉलपेपर आपण सगळे अगदी मनापासून निवडत असतो न? मीही ठेवते. माझा सापडेल तुम्हाला इमेजमध्ये.  त्या दिवशी मात्र गंमत झाली. रिक्षामधून येत असताना मी कामामुळे फोनवर होते. थोड्या वेळाने माझ्या शेजारी एक मुलगी येऊन बसली.कॉलेजकन्या होती.  माझा फोन सतत फ्लॅश होत असल्याने वॉलपेपर दिसत होता. तिचं एकदा लक्ष गेलं कदाचित नंतर मात्र ती प्रयत्न करून काय आहे हे वाचण्याचा प्रयत्न करू लागली. आणि शेवटी एकदाचं तिला ते जमलं. हुश्श... मग विजयी मुद्रेने माझ्याकडे बघितलं आणि अचानक म्हणाली,"हे मस्तच आहे, मला आवडलं." मी त्या प्रतिक्रियेने गोंधळून विचारलं की,"काय आवडलं वॉलपेपर?"होकारार्थी मान हलली. मग सुरू झाल्या गप्पा.  "ताई, हे अस सतत समोर राहणार म्हणून ठेवलं आहेस न? ", ती  "हो , त्यामुळे काम करताना आळस, चाल ढकल होऊ लागली की लगेच लक्षात येतं. आणि मन पुन्हा कामाकडे वळवता येतं. ", मी  "मी पण आता असच करेन. लवकरच माझ्या लास्ट सेमीस्टर चे पेपर आहेत. पण एकदा फोन हातात घेतला की नुसता टाईमपास होत राहतो. आता असा काही वॉलपेपर ठेवते की अभ्यास

स्वतःसाठी बदलताना लेख 17

इमेज
#स्वतःसाठी_बदलताना लेख 17 Planning and implementing हातात घेतलेली काम वेळेवर व्हावी तसं सगळ्यांनाच वाटतं पण ते होतं का? आपल्याकडून प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टीसाठी 100 टक्के प्रयत्न केले जातात का? की आपण कुठेतरी कमी पडतो? चालढकल होते का? प्रत्येक वेळी कोणीतरी बाहेरची व्यक्ती आपल्या मदतीसाठी तत्पर असणार आहे का? किंवा प्रत्येक वेळी त्या व्यक्तीकडे जाणं गरजेचं आहे का? आयुष्यात एक वेळा अशी कधीतरी नक्की येणार आहे, जेव्हा तुम्हाला स्वतःची मदत स्वतः करावी लागणार आहे . मग त्या वेळेची वाट बघत बसण्यापेक्षा आपण स्वतः आपल्या गोष्टींचे नियोजन करून स्वतः चे सगळ्यात जवळचे मित्र होण्याचा प्रयत्न केला तर??? यासाठी काय करायचं? काही वेगळं करायचं नाहीये तर आपल्याला आपल्या प्रत्येक महिन्याचं विशिष्ट पद्धतीने नियोजन करायच आहे. आणि त्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी सुद्धा आपणच स्वतःच्या मागे लागायच आहे. १. मागच्या महिन्याचा आढावा घ्या. मागच्या महिन्यात आपली किती काम पेंडिंग होती? त्यातली किती काम आपल्याकडून पूर्ण झाली? आणि किती काम पुन्हा करू किंवा नंतर करू म्हणून पुढे ढकलली गेली? जी काम पुढे ढकलली

स्वतःसाठी बदलताना लेख 16

इमेज
#स्वतःसाठी_बदलताना_लेख16 स्वतःला एखाद्या गोष्टीचा त्रास होत असेल तर त्यातून वाचण्यासाठी ,बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करणे हे पूर्णपणे नैसर्गिक आहे. पण अशावेळी बऱ्याचदा आपल्याला इतर व्यक्तींकडून नकारात्मक वागणुकीचा सामना करावा लागतो. मग काय करायचं? तर अशा परिस्थितीत स्वतःसाठी ठामपणे उभे राहणे आणि त्याच वेळी स्वतःची मन:शांती ढळू न देणं हेही गरजेचं असतं.  त्याबद्दल काही टिप्स... 1. स्वतःचे जागरूकतेने निरीक्षण करा. Self awareness  नकारात्मक विचार, भावना ह्या कशामुळे ट्रिगर होतात हे ओळखण्याचा प्रयत्न करणे गरजेचे असते. एकदा ते लक्षात आलं की त्या विचारांना कशा पद्धतीने प्रतिक्रिया द्यायची हे लक्षात येतं.  स्वतःच्या भावना आणि प्रतिक्रियांबद्दल जागरूकता निर्माण झाली की आपण दोन पावले मागे येऊन योग्य पद्धतीने विचार करून व्यक्त होऊ शकतो.  2. स्वतःसाठी मर्यादा आखून घ्या. Setting healthy boundaries.  बऱ्याचदा आपण आपल्या गरजा आणि अपेक्षा योग्य पद्धतीने, योग्य शब्दात समोरच्या व्यक्तीला सांगत नाही. त्यामुळे गैरसमज होण्याची शक्यता वाढते. अशा वेळी आपल्याला समोरच्या व्यक्तीकडून जी वागणूक मिळते त्यामुळे कुठेत

स्वामींचा प्रगट दिन आणि शेरुचा स्मृतिदिन

इमेज
#स्वामींचा_प्रगटदिन_आणि_शेरूचा_स्मृतीदिन लॉकडाऊन लागलं आणि दोन दिवसात आमच्या शेरूची तब्येत जरा जास्तच बिघडली. त्याच्याबद्दल मी हनुमान जयंती आणि हार्ट बीट या लेखामध्ये लिहिलेल आहे. शेरुला रामरक्षा आणि हनुमान चालीसाच प्रचंड वेड होत.  कोणी म्हणेल की कसं काय? पण ही खरंतर खूप आश्चर्याची गोष्ट होती. त्याला घरात अखंड रामरक्षा आणि हनुमान चालीसा ऐकायला हवी असायची.   आणि त्यासाठी एक सेपरेट मोबाईल, त्याच्यामध्ये ते दोन्ही स्तोत्र सतत चालू ठेवावे लागायचे.   कधी जर चुकून बॅटरी संपून मोबाईल स्विच ऑफ झाला तर त्याच्यावर पंजा आपटून फोन माझ्यापर्यंत आणून  सांगणं की चार्ज कर आणि लाव माझे गाणे.  याचा अर्थ  फक्त रामरक्षा आणि हनुमान चालीसा एवढे दोनच गोष्टींशी संबंध होता.  बाकी शक्यतो फारसा काही त्याला लागायचं नाही.  जेव्हा मी संक्षिप्त गुरुचरित्र किंवा काही वाचायला बसायचे की शेरू महाराज समोर येऊन मस्तपैकी ऐटीत बसणार अन् ऐकणार. अजिबात हलणार नाही, तास दोन तास त्याची समाधी लागलेली असायची.  ते म्हणतात ना, की प्राण्यांना त्यांच्या जाण्याचा दिवस कळतो किंवा ते खूप संयतपणे स्वतःचा मृत्यू स्वीकारतात असंच काहीसं माझ्

स्वतःसाठी बदलताना 15

इमेज
#स्वतःसाठी_बदलताना 15  कधी कधी आयुष्यात अशी परिस्थिती येते ना की प्रचंड उलथापालथ सुरू असते. काहीही नीट घडत नसते, मन अस्थिर असतं, आपण सतत गोंधळलेल्या अवस्थेत असतो, असं वाटत असतं की कुठून तरी एखादा तरी आशेचा किरण दिसावा. आणि ॲट द सेम टाइम या सगळ्यांमध्ये आपण स्वतः सुद्धा स्वतःसाठी काहीतरी प्रयत्न करत असतो.  माझ एक प्रामाणिक मत आहे की अगदी आत्महत्या करणारे व्यक्ती असू दे किंवा डिप्रेशनमध्ये जाणारी व्यक्ती... पहिल्या स्टेज पासून ते शेवटच्या स्टेजला पोहोचेपर्यंत व्यक्ती हात पाय मारत असते, प्रयत्न करते डायरेक्ट असं कोणीच या सगळ्या चक्रात जाऊन अडकत नाही.  पण  जेव्हा ती व्यक्ती हातपाय मारायचा प्रयत्न करत असते, बाहेर पडायचा प्रयत्न करत असते, तेव्हा जर तिच्या जवळच्या लोकांनी तिला शांतपणे समजून घेण्याचा प्रयत्न केला तर??? कित्येक जीव तिथेच सावरले जाऊ शकतात.  पण दुर्दैवाने आपल्याकडे याबाबतीत अवेअरनेसही कमी आहे आणि शक्यतो जर कोणी असं बोलायला लागलं तर त्याला टोचून टोचून बोलण्याचा प्रमाण खूप जास्त आहे.   उदाहरण द्यायचं झालं तर एखादी व्यक्ती जिच्या आयुष्यात नुकतंच काहीतरी घडून गेलेल आहे. घटस्फोट झालेल

स्वतःसाठी बदलताना हा कोर्स का करावा?

#स्वतःसाठी_बदलताना स्वतःसाठी बदलताना हा कोर्स मी का करावा असा प्रश्न जर पडत असेल तर हे नक्की वाचा.  1. भूतकाळातील वाईट गोष्टींचे वर्तमान काळावर अजूनही पडसाद उमटतात. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर भूतकाळात घडून गेलेल्या चुका किंवा मिळालेली वाईट वागणूक यामधून मला अजूनही बाहेर पडता येत नाहीये. असं काही जर तुमच्याबरोबर असेल तर तुम्ही हा कोर्स नक्की करा. 2. कितीही चांगले बदल करायचे म्हटले त्यासाठी कितीही संकल्प केले तरीही माझ्याकडून सातत्याने गोष्टी घडत नाही. म्हणून तर हा जो कोर्स आहे तो 21 दिवसांचा आहे.  21 दिवसांमध्ये सातत्याने स्वतःसाठी काम केल्याने मनाला, मेंदूला आणि पर्यायाने शरीराला त्या गोष्टींची सवय लागते.  3. विनाकारण चिडचिड, नीट झोप न लागणे, सातत्याने विचार करणे, कुठल्याही गोष्टीकडे बघताना नकारात्मक बाजूला जास्त झुकणे हे जर आपल्या बाबतीत होत असेल....तर आपल्याला आपला दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. त्यासाठी आपल्याला आपल्या विचारसरणीवर काम करायची गरज आहे आणि म्हणून हा कोर्स महत्त्वाचा आहे.  4. कुठलंही नवीन काम करणं, नवीन गोष्टीची सुरुवात करणं याची भीती वाटते किंवा एखादी गोष्ट कित

स्वतःसाठी बदलताना बॅच 1

इमेज
#स्वतःसाठी_बदलताना  #संकल्पदिन #गुरूवार #21dayschallenge गेले महिनाभर सातत्याने #संकल्प2023 #संकल्पदिन ह्या नावाने 31 संकल्प मी शेयर करत आहे. आधीही असेच काही संकल्प दिले होते.  ह्या संकल्पना माणसाच्या रोजच्या आयुष्यात जे बदल घडवून आणत आहेत त्या मागे एक वेगळी सकारात्मक ऊर्जा कार्यरत आहे. आणि तिच्याच परवानगीने आता पुढच्या टप्प्यात प्रवेश करत आहे.  "स्वतःला घडवण्यासाठी" ह्या 21 दिवसांच्या कोर्सच्या चार बॅचेस यशस्वीरीत्या पूर्ण झाल्या. आणि त्यातून नवीन संकल्पनेचा जन्म झाला ती म्हणजे "स्वतःसाठी बदलताना".हा कोर्स हा आधीच्या कोर्सच्या पुढचा टप्पा जरी असला तरी तो कुणीही करू शकते.   तुमच्या लक्षात आलं असेल की या सगळ्या गोष्टी स्वतःभोवती फिरतात. का??? कारण जोपर्यंत आपण स्वतःवरती काम करत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या आयुष्यात प्रत्यक्षात बदल जाणवत नाहीत.  आणि काम करायचं म्हणजे स्वतःला तडजोड करण्यासाठी तयार करायचं असा त्याचा अर्थ होत नाही तर गोष्टींबरोबर जुळवून घेताना स्वतःचा आयुष्य जगण्याचा आणि त्याचा भरभरून आनंद घेण्याचा प्रयत्न करायचा.  चढउतार हे आयुष्यात सातत्याने येतच असता