स्वतःसाठी बदलताना लेख 16
#स्वतःसाठी_बदलताना_लेख16 स्वतःला एखाद्या गोष्टीचा त्रास होत असेल तर त्यातून वाचण्यासाठी ,बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करणे हे पूर्णपणे नैसर्गिक आहे. पण अशावेळी बऱ्याचदा आपल्याला इतर व्यक्तींकडून नकारात्मक वागणुकीचा सामना करावा लागतो. मग काय करायचं? तर अशा परिस्थितीत स्वतःसाठी ठामपणे उभे राहणे आणि त्याच वेळी स्वतःची मन:शांती ढळू न देणं हेही गरजेचं असतं. त्याबद्दल काही टिप्स... 1. स्वतःचे जागरूकतेने निरीक्षण करा. Self awareness नकारात्मक विचार, भावना ह्या कशामुळे ट्रिगर होतात हे ओळखण्याचा प्रयत्न करणे गरजेचे असते. एकदा ते लक्षात आलं की त्या विचारांना कशा पद्धतीने प्रतिक्रिया द्यायची हे लक्षात येतं. स्वतःच्या भावना आणि प्रतिक्रियांबद्दल जागरूकता निर्माण झाली की आपण दोन पावले मागे येऊन योग्य पद्धतीने विचार करून व्यक्त होऊ शकतो. 2. स्वतःसाठी मर्यादा आखून घ्या. Setting healthy boundaries. बऱ्याचदा आपण आपल्या गरजा आणि अपेक्षा योग्य पद्धतीने, योग्य शब्दात समोरच्या व्यक्तीला सांगत नाही. त्यामुळे गैरसमज होण्याची शक्यता वाढते. अशा वेळी आपल्याला समोरच्या व्यक्तीकडून जी वागणूक मिळते त्यामुळे कुठेत