पोस्ट्स

बोलनेसे सब होगा

इमेज
#बोलनेसे_सब_होगा मीनल आणि स्नेहल दोघी नणंद भावजय होत्या. स्नेहल मिनलच्या भावाची बायको. सतत हसतमुख,प्रसन्न चेहरा, वेळ कशीही येवो खंबीरपणे सगळं निभावून नेणारी. त्याउलट मीनल सतत चिडचिड, रागराग करणारी, अवघड प्रसंगी इतरांकडून अपेक्षा ठेवणारी.  पण आपसात मात्र दोघींचं मस्त पटत होतं. शेवटी दोघी एकाच वयाच्या होत्या न. स्नेहल च्या लग्नाला आता वर्ष होत आल होतं. वर्षभरात मीनल स्नेहलच वागणं बघत होती. मिनलच्या आईबाबांनी, दादाने आवाज चढवला तर मीनल मध्ये पडत असे पण स्नेहल मात्र शांतपणे तिला काय म्हणायचं आहे हे नंतर स्पष्ट शब्दांत सांगत असे. परिणामी हळूहळू सतत चिडखोर असलेलं घर आता शांतपणे एकत्र बसून समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करू लागलं होतं.  मिनलवरही नाही म्हटलं तरी या सगळ्या गोष्टींचा इफेक्ट झाला होताच. काही दिवसातच तिचंही लग्न झालं. ती सासरी आली. तिच्या कुटुंबाप्रमाणेच कुटुंब होतं. 5 माणसं फक्त. मिनलच्या नणंदेच शिक्षण सुरू होतं.  चिडखोर मिनलच्या वागण्यात लग्नानंतर बराच फरक पडला होता. कारण सासरी आधीपासूनच वातावरण शांत होतं. सगळेजण मिळून मिसळून वागणारे, चेष्टा मस्करी करणारे असे होते.  सासुसासरे तर

सेकंड चान्स

इमेज
#सेकंड_चान्स नवीन दिवस नवी सुरुवात. आयुष्यात असं झालं का कधी काहीतरी कुणालातरी सांगायचं होतं, बोलायचं होतं पण ती संधी मिळण्याआधीच ती व्यक्ती दूर निघून गेली ??? कधी परिस्थितीमुळे तर कधी तिच्या आयुष्यातील बदलांमुळे.  छोट्याश्या गोष्टी असतात पण आपण आपल्या इगोमुळे बऱ्याचदा त्यांना नको इतकं मोठं करतो. नाती तुटतात , माणसं दुरावतात कायमची. कधी कधी एक बाजू प्रयत्न करतेही सगळं नीट ,छान व्हावं म्हणून. पण दुसरी बाजू तसाच रिस्पॉन्स देते का हो?? मग शेवटी प्रयत्न करणारा थकून दूर जाण्याचा निर्णय घेतो. ह्या सगळ्यांवर वेळ हे एकच औषध आहे असं म्हटलं जातं. पण हल्ली आयुष्य इतकं फास्ट झालंय की कोण कधी राहती जागा,गाव,शहर आणि कदाचित जगही सोडून निघून जाईल सांगता येत नाही. अशावेळी नंतर हात चोळत बसणे अन् हळहळणे हेच मागे उरते. मग त्यावर उपाय काय कुणी जर नातं तोडून जात असेल तर तुम्ही प्रयत्न करा त्यांना थांबवण्यासाठी. निदान तुमची बाजू तरी मांडा आणि उलट असेल तर समोरचा काय म्हणतो आहे हे तरी शांत पणे ऐकून घ्या. कदाचित आयुष्यात पुन्हा कधीच तुमची भेट होणार नसेल तेंव्हा मनाला कसलीही चुटपूट नको लागायला. थोडंसं स्वतःला प

व्हॉईस वर्सा

इमेज
व्हाईस वर्सा कविश आज जरा आनंदातच रूमवर परत आला. पण तिथे येऊन बघतो तर त्याचा रूमी आदर्श तोंड पाडून बसलेला होता. त्याने आदर्शला कारण विचारले तर कळले की आदर्श ज्या कलिगवर सगळ्यात जास्त विश्वास ठेवत होता, त्यानेच आदर्शच्या आयडिया स्वतःच्या आहेत असं सांगून कंपनीच्या मॅनेजमेंट समोर मांडून प्रमोशन मिळवले होते. त्याच्या गोड बोलण्याला फसून आदर्शनेच बोलता बोलता  सगळं त्याला सांगितलं होतं. आणि आता परिणाम दिसत होते. आदर्श समोर पुढच्या संधीपर्यंत वाट बघण्याशिवाय पर्याय नव्हता. पण ह्यामुळे त्याला एक उत्तम धडा मिळाला होता तो म्हणजे सहजपणे कुणावरही विश्वास ठेवून आपल्या सगळ्या गोष्टी सांगू नयेत. कविश समोर मनातलं बोलल्यावर आदर्शला आता बरंच काही लक्षात आलं होतं. तो सावरला होता. त्याने कविशला सॉरी म्हणत विचारलं की तो एवढा खुश का होता? त्यावर कविश म्हणाला ," अरे तुझ्या अगदी उलट माझ्यासोबत घडलं. ज्या बॉसला मी रोज शिव्या देत होते त्याच बॉसने बदली होऊन जाता जाता माझी शिफारस त्याच्या जागेसाठी केली. आणि तो स्वतःच मला म्हणाला की डोळे उघडे ठेवून वावर. दिसतं तस नसतं. ज्या माणसाला मी शत्रू समजत होतो तो

चांगलं वागण्याची किंमत काय?

इमेज
(कृपया लेख नावासहितच शेयर करा. )  #चांगलं_वागण्याची_किंमत_काय?  चांगलं वागण्याचे पैसे पडत नाहीत,पण संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी चांगलं वागण्याची किंमत मात्र आपल्याला चुकवावी लागू शकते. कशी काय? तर त्यासाठी वाचूया ही गोष्ट.  "मंजिरी, काय गरज असते? प्रत्येक वेळेला तुला समोरच्या व्यक्तीशी चांगलं वागण्याची?",मंजिरीची मैत्रीण तिला तावातवाने जाब विचारत होती.   मंजिरी मात्र शांतपणे शून्यात नजर लावून बसली होती. त्याला कारणही तसेच होतं.   मंजिरीचा पहिल्यापासून एक ग्रह होता की, मी जर चांगल वागत आहे तर समोरची व्यक्ती ही कधीतरी चांगली वागेलच. आणि पुढे जाऊन तिला असंही वाटायचं की चांगलं वागण्याने कुठे माझं नुकसान होतंय? किंवा मला पैसे खर्च करावे लागतात?   पण दर वेळेला ती ही गोष्ट मात्र विसरून जायची की तिच्या याच स्वभावाचा फायदा उचलून लोक स्वतःची काम साधून घेतात आणि मंजिरीच्या वाट्याला मात्र मनस्ताप येतो.  आता मंजिरीचा स्वभाव मुळातच फारसा बोलका नसल्याने वाट्याला आलेला मनस्ताप ती जवळच्या ठराविक लोकांकडेच व्यक्त करत होती.  अन् त्या सगळ्यांकडून तिला नेहमी हेच वाक्य ऐकायला मिळायचं की, &

Twisted थॉट्स लेख ४ सर्च फॉर द सोल्युशन

इमेज
#Twisted_थॉट्स लेख ४ सर्च फॉर द सोल्युशन माणूस हा समाजशील प्राणी आहे हे १००% मान्य आहे मला. पण माझा एक प्रश्न आहे की माणसाला प्रत्येक गोष्ट करण्याच्या आधी इतरांच्या स्विकृतीची गरज का पडते?  म्हणजे आपण आर्थिकदृष्ट्या इतरांवर अवलंबून असू तर अशा गोष्टींबद्दल एकवेळ समजू शकेल पण जिथे तुम्हाला स्वतःचं आयुष्य मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत तिथे इतरांच्या होकार नकाराची वाट का बघत बसायची???  उदाहरण द्यायचे झाले तर, समजा मला खूप डिप्रेस वाटतंय, घरात कटकट सुरू आहे त्यामुळे मूड खराब झाला आहे किंवा काही करावंसं वाटत नाहीये... मग ह्यातून बाहेर मलाच पडायला हवं ना?  माझे आईवडील ,भाऊ बहीण ,बायको/ नवरा, प्रियकर/ प्रेयसी, सासुसासरे, मित्रमैत्रिणी काहीतरी करतील मग माझं आयुष्य बदलेल असा विचार का???  त्रास कुणाला होतोय तुम्हाला मग इतरांनी काही का करायचं? हा प्रश्न एकदा स्वतःला खडसावून विचारा.  असेल माझा हरी तर नेईल खाटल्यावरी ही वृत्ती सोडा. देव त्यांचीच मदत करतो जे स्वतःची मदत करण्यासाठी प्रयत्न करतात.  उपाय शोधला की नक्की सापडतो. कारण विश्वाचा एक महत्वाचा नियम आहे जिथे प्रश्न आहे तिथेच त्या प्रश्न

#Twisted थॉट्स लेख ३ ऑस्कर, चपराक, गालबोट , आणि मी

इमेज
#Twisted_थॉट्स लेख ३ ऑस्कर, चपराक, गालबोट , आणि मी सगळीकडे ऑस्करच्या सोहळ्यात विल स्मिथने कॉमेडियन ख्रिस रॉक च्या कानाखाली वाजवली ह्याची चर्चा सुरू आहे.  पण मला स्वतःला असं वाटलं की ह्याचा इतका उहापोह का होतोय? स्मिथही माणूसच आहे. त्यातून तो जे काही वागला ते जनरली आपल्या माणसांवर प्रेम करणारी माणसे करतातच.  इथे नवराबायको ह्या नात्यापेक्षा सुद्धा एका शारीरिक आजारामुळे आधीच मानसिक आणि शारीरिक त्रासात असलेल्या व्यक्तीचा त्रास जवळून अनुभवणारी व्यक्ती म्हणून कदाचित कुणीही असंच रिऍक्ट केलं असतं.  विल स्मिथचा एक इंटरव्ह्यू मी खूप आधी बघितला होता आणि त्यातलं त्याचं म्हणणं मला प्रचंड आवडलं होत.  तो म्हणाला होता की, जेडा माझी बायको आहे म्हणून तिला आनंदी ठेवायची जबाबदारी माझी नाही. तिच्या आनंदासाठी तिने प्रयत्न करावेत , तिचा आनंद कशात आहे हे तिला माहीत असेल तर आनंदी रहाण्यासाठी तिला माझी गरज कधीच पडणार नाही.  असं म्हणणारा व्यक्ती आपल्या जोडीदाराला एक माणूस म्हणून घडण्यासाठी किती छान पद्धतीने सपोर्ट करत असेल ह्यात शंकाच नाही.  बऱ्याच जणांना त्याचं वागणं भारी वाटलं , ते भारी आहे सुध्दा. पण प्रत्येक

Twisted थॉट्स लेख २ प्रिपेअर युअरसेल्फ फॉर वर्स्ट सिच्युएशन

इमेज
#Twisted_थॉट्स प्रिपेअर युअरसेल्फ फॉर वर्स्ट सिच्युएशन  माझी विचार करण्याची पद्धत थोडीशी विचित्र आणि वेगळी आहे.  कदाचित आयुष्यात कधीच कुठलीही गोष्ट सहजपणे न मिळाल्याने असेल. पण आता जे काही आहे ते असंच आहे.  सगळ्यांना ही पद्धत पटेलच असं नाही आणि खरं तर दुसऱ्या कुणाच्या तरी विचारसरणीवर आपण आपल्या आयुष्यात काही ही करू नये असं माझं वैयक्तिक आणि परखड मत आहे.  मी कुठल्याही कामात हात घालण्याआधी पूर्वतयारी करते.  पूर्वतयारी म्हणजे काय करते?  तर,  ----- स्वतःला आणि स्वतःच्या मनाला त्या कामाच्या स्वरूपाची कल्पना देते. -----त्यानंतर कामाला किती वेळ लागू शकतो आणि त्यासाठी काय काय एडजस्ट करावं लागेल हे लक्षात घेते.  ----- एकदा का वरच्या गोष्टींचा अंदाज आला की मग स्वतःला पुन्हा एकदा विचारते की सुरू करायच का? कारण एकदा एखादी गोष्ट हातात घेतली की मग काहीही झालं तरी आणि कितीही अडथळे आले तरीही ते काम पूर्ण करायचंच हे माझं तत्व आहे. आणि at any cost मी ते पाळतेच.  ----- मनाकडून एकदा कन्फर्म झालं की माझा मेंदू वेगाने कामाला लागतो. प्राथमिक जुळवाजुळव करतो. पहिल्यांदा काय करायचं, कुठून सुरुवात करायची , म्हणज

Twisted थॉटस् लेख १

इमेज
Twisted थॉट्स  प्रश्न तुमचा मग उत्तरही तुम्हीच व्हा.  निराश वाटतंय, नको नको झालंय मनस्थिती, परिस्थिती मध्ये बदल तर हवा आहे पण घरात बसून कस होईल? मग काय करायचं?  स्वतःच स्वतःला चियर अप करा.  स्वतःसाठी नवीन काही घडवून आणण्यासाठी काही मायनर म्हणजे छोटे छोटे बदल करून बघा.  जमलं तर वेल अँड गुड अन् नाही जमलं तर??? तर कुणी सुळावर थोडी चढवणार आहे?  पुन्हा नवीन मार्ग वापरून बघूया.  आयुष्य आपलं आहे मग ते जगण्यासाठी , भरभरून जगण्यासाठी हातपाय पण आपल्यालाच हलवावे लागणार आहेत.  मेंदू आणि मनही आपलंच आहे मग त्यांना योग्य ट्रॅकवर पण आपणच आणलं पाहिजे हो की नाही?  मी माझ्या अनुभवातून, शिक्षणातून , साधनेतून जे काही उपाय स्वतःसाठी, ओळखीच्या लोकांसाठी वापरले ते सांगणार आहे.  तुम्हाला आवडले , पटले तर वापरून बघा आणि रिझल्ट मिळाला तर सांगून बघा , रिझल्टच्या प्रमाणात वाढ होईल.  तुमचा फायदा डबल होईल ही खात्री.  बाकी? बाकी कळेल की हळूहळू.  साईबाबा म्हणतात न, "सबर का फल मिठा होता है।"  मग असणारच हो ना?  भेटू लवकरच इथेच.  योग्य शंका असतील तर नक्की कळवा. नाव न वापरता पुढच्या भागात उत्तर दिले जाईल. ज्यामुळ