#देवाक_काळजी_रे
#देवाक_काळजी_रे नुकतंच हे गाणं कानावर पडलं. आणि नेहमीसारखं आम्ही आपले शब्दांवर आणि अर्थावर रेंगाळून गाण्याच्या प्रेमात पडलो. फार काही तत्वज्ञान नाहीये अगदी साधं सोपं आहे सगळं पण माणसाला मात्र साध्या गोष्टींनाही अवघड करायची सवय असते. आयुष्यातले चढ उतार, सतत होणारे बदल त्यामुळे येणारे चांगले वाईट अनुभव विशेषतः वाईट जास्तच ह्यांच्यामुळे एक क्षण असा येतो की सरळमार्गी माणूसही चुकीच्या मार्गावर जातो किंवा जायचं ठरवतो. आणि हल्लीच्या फास्ट आयुष्यात तर संयम उर्फ पेशन्स फारच कमी लोकांकडे असतात. पण चुकीच्या मार्गाचे फायदे आणि तोटेही प्रत्यक्ष लक्षात येईपर्यंत न भरून येणारं नुकसान करून मोकळे झालेले असतात. त्यानंतर हाती उरलेली निराशा सगळीकडे फक्त आणि फक्त अंधार दाखवत असताना ज्याची गरज भासते तो असतो "देव". इथे मी देव ही संकल्पना फक्त मूर्ती अशी नाही म्हणत तर माझ्यासाठी देव म्हणजे मनाच्या कोपऱ्यात सदैव वसणारी अशी एक श्रद्धा असते जी योग्य वेळी,योग्य प्रकारे आणि योग्य रूपातही मदतीला धावून येतेच. गरज असते ती फक्त स्वतःवर आणि स्वतःच्या चांगल्या कृत्यांवर किंवा कर्मांवर ठाम विश्वास असण्याची आ