पोस्ट्स

सप्टेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

और तुम

इमेज
#और_तुम  इन्स्टाग्राम रिल्सवर मध्यंतरी काही दिवसांपूर्वी सतत अमितकुमारांच्या आवाजातील बडे अच्छे लगते हैं गाण्याचं एकच कडवं ट्रेंडिंग होतं.  हम तुम कितने पास हैं कितने दूर है चाँद सितारे सच पुछो तो मन को झूठे लगते है ये सारे  मगर सच्चे लगते है, ये धरती, ये नादिया, ये रैना, और तुम गाणं आवडतं असल्याने मीही काम करताना गुणगुणत होते. लेकाच्या कानावरही पडत होतं.  दोन दिवसांपासून मात्र एक दोन वेळा लक्षात आलं की छोटे कुलकर्णी हळू आवाजात काहीतरी म्हणत असतात.  मला वाटलं असेल नेहमीप्रमाणे अशक्य ही शक्य करतील स्वामी कारण ते त्याचं 24×7 आवडतं वाक्य, गाणं, मंत्र आहे . कारण त्याचे बजोबा (स्वामींना तो लाडाने आजोबा ऐवजी बजोबा म्हणतो ❤️) ,तर बजोबा आपले ऑल टाइम आवडते दोस्त आहेत.  पण आज मात्र सकाळी आगावपणा केला सायकल घेऊन ओट्यावर चढण्यासाठी प्रयत्न सुरू होते, मग अम्माकडून ओरडा खाल्ला, दोन फटकेही खाल्ले. शेवटी अम्मा काही ऐकत नाही हे लक्षात आलं मग एक कोपरा पकडला आणि बसून घेतलं.  माझं लक्ष होतंच पण लगेच राग सोडला की मग अर्थ नसतो आधीच्या रागावण्याला. सो मी गप्प बसले.  हळूहळू जवळ येऊन मागून गळ्यात हात टाकून तों

यु टर्न (भाग 5) ©®गौरीहर्षल ( 31/12/2016)

इमेज
यु टर्न (part ५)  सकाळी उठल्यापासून नेहाची चाललेली गडबड पाहून तिच्या नवऱ्याने राघवने न राहवून तिला विचारलच कि काय शिजतंय तिच्या डोक्यात? आपल्या प्लानचा त्याला थोडक्यात अंदाज देत ती आवरत होती. गरज पडलीच तर तुला फोन करेन असं त्याला हक्काने सांगून ती निघाली. आज वातावरण किती छान आहे असं स्वतःशीच म्हणत तिने गाडी चालू केली  आणि ती थेट ऑफिसला आली. तिकडे सारंग स्वतःसुद्धा सानिकाला कसं मनवायच याचा विचार करत होता. त्यासाठी त्याने नेहाचीच मदत घ्यायची असं ठरवलं. सारंगचा सकाळी सकाळी आलेला मेसेज पाहून नेहाला आश्चर्य वाटलं. त्याने तिला भेटायला बोलावलं होतं. संध्याकाळी सारंग तिला भेटला आणि त्याने तिला सानिकाबाबत सांगून एक सुखद धक्काच दिला. जी गोष्ट कशी करायची याचा विचार नेहा दिवसभर करत होती तिचं करण्यासाठी सारंग स्वतः तिची मदत  मागत होता. सारंगच्या म्हणण्यानुसार नेहाला फक्त सानिकाला कॅफे यु टर्न मध्ये दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आणायचं होतं. त्यासाठी नेहाने लगेच सानिकाला फोन केला आणि तिने केलेल्या सगळ्या मदतीसाठी तिला एकदा भेटून बोलायचं आहे असं सांगीतल. सानिकाने सुरुवातीला नको म्हणत टाळायचा प्रयत्न केला

#कु:संतानापेक्षा_नि:संतान_बरे ©®गौरीहर्षल

इमेज
#कु:संतानापेक्षा_नि:संतान_बरे ©®गौरीहर्षल (सत्य अनुभवावर आधारित ही छोटीशी कथा) "हुश्श ,आले बाई एकदाची सगळं निस्तारून.", असं म्हणत समिता घरी येऊन सोफ्यावर बसली.  तिचं हे वाक्य ऐकून आईच्या डोळ्यात अश्रू आले आणि वडिलांच्या कपाळावर एक सूक्ष्म त्रासिक आठी उमटली.  त्याला कारणही तसंच होतं, समिता वय वर्षे 30 च्या आसपास, लग्न झाल्यावर नको त्या टोकाला जाऊन सासरी भांडण करून कायमची माहेरी आलेली अत्यंत उद्धट, उर्मट मुलगी. कोर्टातली केस अजून मार्गीही लागली नव्हती तोवरच समिताचं उच्शृंखल आणि व्यभिचारी वागणं आईवडिलांच्या समोर आलं.  त्यांनी तिला समजावण्यासाठी साम, दाम ,दंड ,भेद सगळे मार्ग वापरून बघितले पण परिणाम शून्य. शिक्षण यथातथाच असल्याने अक्कल आणि बाहेरचं जग समजण्याची कुवत जवळपास नव्हतीच. पण आपल्या अशा वागण्याने आपलंच नाव सगळीकडे खराब होणार हेही तिला कळत नव्हतं. असो तर आत्ता जे निस्तारून आले असं ती म्हणत होती ती गोष्ट होती तिच्या उदरात वाढणारा गर्भ, जो तिच्या नको त्या संबंधांची खूण होता. ही गोष्ट आईवडिलांच्या लक्षात येताच त्यांना ब्रह्मांड आठवले होते. बातमी बाहेर पडली तर समिताच्या सासरचे

तुम्ही काय फॉलो करत आहात हल्ली?

इमेज
#तुम्ही_काय_फॉलो_करत_आहात_हल्ली?©®गौरीहर्षल आपण आपल्या मनाला, मेंदूला कुठली माहिती पुरवतो ह्यावर आपला दिवस कसा जाणार हे अवलंबून असतं. कसं ते वाचा ह्या ओळखीच्या गोष्टीत...... मानसी आज जास्तच गडबडीत होती. लॉकडाउन वगैरे मुळे आधीच कामाचा भार वाढला होता आणि त्यात आज तिचं एक महत्त्वाचं प्रेझेंटेशन होतं. सकाळी लवकर उठून घरातील बाकीची कामं जमेल तेवढी आवरून घेत तिने स्वतःसाठी मस्त आलं घालून चहा केला. चहाचा वाफाळता मग घेऊन ती शांतपणे बाल्कनीत येऊन बसली. तिची बाल्कनी तिच्यासाठी स्ट्रेस बस्टर होती.  सासूबाईंनी कौतुकाने लावलेली चार रोपं, लेकीच्या बालहट्टामुळे टांगलेले बर्डफिडर, आणि तिची आवड म्हणून बसवलेला छोटासा झोपाळा ह्या सगळ्या गोष्टी बाल्कनीला एक जिवंतपणा देत असत. छोट्या छोट्या पक्ष्यांची नाजूक आवाजात सुरू असलेली बडबड मनावर कितीही ताण असला तरी सुखावून जात असे. त्यामुळेच महत्वाच्या कामाच्या दिवशी मानसी ठरवून थोडासा वेळ तरी का होईना बाल्कनीत  फक्त स्वतःसाठी राखून ठेवत होती.  घरात अजून कुणाला जाग आली नव्हती सो तिला आज सगळं आवरल्या नंतर बराच निवांत वेळ मिळाला होता. तो मी टाईम ती स्वतःसोबत छानपैकी ए

दैव देतं आणि कर्म नेतं

इमेज
#दैव_देतं_आणि_कर्म_नेतं ©®गौरीहर्षल #सत्यघटनेवर_आधारित (काही वर्षांपूर्वी मी ज्या डॉक्टरांकडे प्रॅक्टिस करत होते तिथे समुपदेशनासाठी एक कुटुंब आलं होतं. कुटुंब म्हणण्यापेक्षा एक भाऊ आपल्या बहिणीला घेऊन आला होता. त्या कुटुंबाचा अनुभव मी कथास्वरूपात शेयर करत आहे.  कथा रूपांतर करताना व्यक्तींची नावे,घटना,प्रसंगात आवश्यक ते बदल केले आहेत.) महाराष्ट्रातल्या एका गावात राहणारे एक सुखी,सधन चौकोनी कुटुंब.  सुलेखा आणि पांडुरंग देशमुखांना दोन मुलं थोरला दिलीप,धाकटी शैलजा. इमानेइतबारे आपलं शेत सांभाळत सरळमार्गाने संसार करणाऱ्या देशमुखांनी दोन्ही मुलांवर अतिशय उत्तम संस्कार केले होते. मुलगा दिलीप शिकून सवरून नुकताच एका कंपनीत नोकरीला लागला होता. मुलगी शैलजा आत्ता कुठे पदवीच्या पहिल्या वर्षांत होती.  दिलीप चांगल्या ठिकाणी नोकरीला लागला होता आणि ही बातमी समाजात पसरण्यास फारसा वेळ लागला नाही. कधी उघडपणे तर कधी आडून आडून वधुपित्यांकडून चौकशी केली जाऊ लागली. पण दिलीपला पर्मनंट झाल्याशिवाय लग्न करायचे नव्हते. मुलाचा विचार योग्य आहे हे लक्षात आल्याने देशमुखांनीही फारसा जोर लावला नाही.  वर्षभरात दिलीपला त्य