स्वामींचा प्रगट दिन आणि शेरुचा स्मृतिदिन
#स्वामींचा_प्रगटदिन_आणि_शेरूचा_स्मृतीदिन लॉकडाऊन लागलं आणि दोन दिवसात आमच्या शेरूची तब्येत जरा जास्तच बिघडली. त्याच्याबद्दल मी हनुमान जयंती आणि हार्ट बीट या लेखामध्ये लिहिलेल आहे. शेरुला रामरक्षा आणि हनुमान चालीसाच प्रचंड वेड होत. कोणी म्हणेल की कसं काय? पण ही खरंतर खूप आश्चर्याची गोष्ट होती. त्याला घरात अखंड रामरक्षा आणि हनुमान चालीसा ऐकायला हवी असायची. आणि त्यासाठी एक सेपरेट मोबाईल, त्याच्यामध्ये ते दोन्ही स्तोत्र सतत चालू ठेवावे लागायचे. कधी जर चुकून बॅटरी संपून मोबाईल स्विच ऑफ झाला तर त्याच्यावर पंजा आपटून फोन माझ्यापर्यंत आणून सांगणं की चार्ज कर आणि लाव माझे गाणे. याचा अर्थ फक्त रामरक्षा आणि हनुमान चालीसा एवढे दोनच गोष्टींशी संबंध होता. बाकी शक्यतो फारसा काही त्याला लागायचं नाही. जेव्हा मी संक्षिप्त गुरुचरित्र किंवा काही वाचायला बसायचे की शेरू महाराज समोर येऊन मस्तपैकी ऐटीत बसणार अन् ऐकणार. अजिबात हलणार नाही, तास दोन तास त्याची समाधी लागलेली असायची. ते म्हणतात ना, की प्राण्यांना त्यांच्या जाण्याचा दिवस कळतो किंवा ते ...