बोलनेसे सब होगा
#बोलनेसे_सब_होगा मीनल आणि स्नेहल दोघी नणंद भावजय होत्या. स्नेहल मिनलच्या भावाची बायको. सतत हसतमुख,प्रसन्न चेहरा, वेळ कशीही येवो खंबीरपणे सगळं निभावून नेणारी. त्याउलट मीनल सतत चिडचिड, रागराग करणारी, अवघड प्रसंगी इतरांकडून अपेक्षा ठेवणारी. पण आपसात मात्र दोघींचं मस्त पटत होतं. शेवटी दोघी एकाच वयाच्या होत्या न. स्नेहल च्या लग्नाला आता वर्ष होत आल होतं. वर्षभरात मीनल स्नेहलच वागणं बघत होती. मिनलच्या आईबाबांनी, दादाने आवाज चढवला तर मीनल मध्ये पडत असे पण स्नेहल मात्र शांतपणे तिला काय म्हणायचं आहे हे नंतर स्पष्ट शब्दांत सांगत असे. परिणामी हळूहळू सतत चिडखोर असलेलं घर आता शांतपणे एकत्र बसून समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करू लागलं होतं. मिनलवरही नाही म्हटलं तरी या सगळ्या गोष्टींचा इफेक्ट झाला होताच. काही दिवसातच तिचंही लग्न झालं. ती सासरी आली. तिच्या कुटुंबाप्रमाणेच कुटुंब होतं. 5 माणसं फक्त. मिनलच्या नणंदेच शिक्षण सुरू होतं. चिडखोर मिनलच्या वागण्यात लग्नानंतर बराच फरक पडला होता. कारण सासरी आधीपासूनच वातावरण शांत होतं. सगळेजण मिळून मिसळून वागणारे, चेष्टा मस्करी करणारे असे होते....