पोस्ट्स

स्वतःसाठी बदलताना भाग 19

इमेज
स्वतःसाठी बदलताना भाग 19 आपल्यासोबत सगळं चांगलं व्हावं असं आपल्याला वाटत असतं. पण चांगलं होण्यासाठी प्रयत्न आपल्यालाच करावे लागतात. म्हणजे नेमकं काय करायचं? तर... ✓ स्वतः वर फोकस करण्याचा प्रयत्न करत राहायचं.  ✓ नाही म्हणायला शिकायचं.  ✓ नात्यांमध्ये मर्यादा निश्चित करायची मॉडर्न भाषेत हेल्दी बाऊंड्री सेट करायच्या.  ✓ स्वतःसाठी उभं रहायचं.  ✓ आपल्या भावना आणि विचार यामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी प्रयत्न करायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे , आपल्यासाठी सगळ्यात पहिली प्रायोरिटी आपण असायला हवं हे मान्य करायचं आणि ते फॉलो करण्यासाठी प्रयत्न करायचे.  हे सगळं स्वतःहून जमत असेल तर उत्तम आहे पण नसेल जमत तर ?  Stay connected...  गौरी हर्षल कुलकर्णी, कौन्सेलर  #स्वतःला_शोधताना #गौरीहर्षल 

स्वतःसाठी बदलताना भाग 10

इमेज
#स्वतःसाठी_बदलताना_भाग१०  (गौरीहर्षल) आपण काय आहोत आणि काय करू शकतो ह्याचा अंदाज आला की बरेच प्रश्न सुटतात.  कारण त्यानंतर आपण स्वतःचा होणारा अपमान,अवहेलना नाकारू लागतो. आणि आजूबाजूच्या असणाऱ्या बऱ्याच लोकांना ह्याचाच जास्त त्रास होऊ लागतो. Self respect आणि self acceptance ह्या गोष्टी जशा स्वतःला स्विकारणे अवघड जाते तशाच त्या आपल्या सोबत वर्षानुवर्षे चुकीचं वागणाऱ्यांच्या गळी उतरवतानाही त्रास होतो. पण हे स्वतःच्या मनस्वास्थ्यासाठी खूप गरजेचे असते.  You deserve much more than a life you feel pressured to settle for. “Never apologize for having high standards. People who really want to be in your life will rise up to meet them.”

स्वतःसाठी बदलताना भाग 14

इमेज
#स्वतःसाठी बदलताना भाग 14 (गौरीहर्षल) आयुष्यात एक वेळ अशी येते की जेव्हा तुमचे मार्ग अजून जास्त खडतर होतात. आणि अचानक तुमच्या लक्षात येतं की आता तुम्ही योग्य मार्गावर आहात आपण ज्या मार्गासाठी निवडले गेलेलो आहोत, तिथे कुठलीही गोष्ट सहज साध्य किंवा सोपी असणार नाहीये. उलट आपण जितके जास्त जोर लावू बघणार तितका जास्त विरोध आपल्याला वेगवेगळ्या पातळीवर सहन करावा लागणार. तितका जास्त त्रास आपल्याला सहन करावा लागणार.   पण या त्रासाचं फलित म्हणजे पुढे जाऊन मिळणाऱ्या गोष्टी ज्या शब्दातीत नसतात,शब्दात सांगताच येत नाहीत.   आणि हीच वेळ असते जेव्हा आपल्याला अजून जास्त प्रयत्न करावे लागतात त्या मार्गावर टिकून राहण्यासाठी. आपण डगमगण्याचे, हरण्याचे अनेक प्रसंग आयुष्यात वारंवार येत राहतात. पण त्यातून तावून सुलाखून बाहेर पडलो की जे मिळतं ते सगळ्या त्रासाची कष्टाची भरपाई करतं.  प्रतिकूल परिस्थिती नेहमी आपल्याला अशा संधीसाठी तयार करते जी आयुष्यात एकदाच येते. आणि त्या वेळेला आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य असणं फार जास्त गरजेचं असतं.  You will know you are on the right path when things stop being easy.  Ther

स्वतःसाठी बदलताना भाग 13

इमेज
स्वतःसाठी बदलताना  भाग १३ (गौरीहर्षल) आयुष्याच्या काही टप्प्यांमध्ये आपण एकट चालणं गरजेचं असतं. नियतीची तशी योजना असते.  पण नेमकं अशाच वेळी आपण काय करतो??? - इतर कुणासाठी तरी स्वतः ला त्रास करून घेतो. - त्यांनी आपल्याला त्यांच्या आयुष्यात जागा द्यावी म्हणून  त्यांच्या मागे पुढे करू लागतो.  - त्यासाठी वाट्टेल ते सहन करायची आपली तयारी असते.  आणि आपण बऱ्याचदा तेसुद्धा करतो.  याची खरच गरज असते का?   जर एखादी व्यक्ती किंवा अनेक व्यक्ती तुमच्याशिवाय आनंदी राहू  शकते तर तुम्ही त्यांच्याशिवाय आनंदी का राहू शकत नाही??? Never settle for less than the life that you deeply desire for yourself. Leave them , wish them well, and trust that “your people” will find you.

स्वतःसाठी बदलताना भाग 12

इमेज
#स्वतःसाठी_बदलताना_भाग१२ (गौरीहर्षल) आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा बरंच काही हातातून निसटलेलं असतं. आत्मविश्वास कमी झालेला असतो.  आशेचा कुठलाही किरण दिसत नाही. खरं तर अशाही परिस्थितीत अनेक मार्ग उपलब्ध असतात पण खराब मनस्थितीमुळे ते पटकन सापडत नाहीत. आणि सुदैवाने ते सापडले अन् आपण त्या दिशेने वाटचाल सुरु केली की आपल्या आजूबाजूच्या लोकांना ते पटत नाहीत.  त्या वेळी विरोध होऊ लागतो, लोक आपला तिरस्कार करू लागतात, वाद वाढतात कारण प्रत्येकाला आता आपण त्यांचंच ऐकावं अस वाटत असतं. माणूस एखाद्या वेळी अपयशी ठरला म्हणजे आता तो उभाच राहू शकत नाही हे लोकांच आणि त्यातही जवळच्या लोकांचे ठाम मत असतं.  अशा वेळी स्वतःवर विश्वास ठेवत पाऊल उचलणं खूप महत्त्वाचं आणि मुख्य म्हणजे अवघड असते. पण,  You have to get up every day and make sure you don't quit on yourself. Everything is OK in the end, if it's not OK, it's not the end. The only way to do great work is to love what you do. If you haven't found it yet, keep looking. Don't settle. — Steve Jobs

स्वतःसाठी बदलताना भाग 11

इमेज
#स्वतःसाठी_बदलताना_भाग११ (गौरीहर्षल) वेळ ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे असं आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत.  पण खरंच वेळेची किंमत करतो का? म्हणजे कित्येकदा नको असलेली कामं करतो, नको असलेल्या लोकांसोबत मनाविरुद्ध राहतो.  आपल्याकडे एक गोष्ट शिकवली जाते की माफ करा आणि नातं जपण्यासाठी प्रयत्न करा.  पण जो माफ करत असतो तो तेच करत राहतो आणि इतरांना मात्र त्याला हवं तसं वागवण्याचं लायसन्सच मिळतं. जोपर्यंत ही गोष्ट लक्षात येते तोपर्यंत आयुष्यातील कितीतरी महत्वाचे दिवस, प्रसंग, क्षण त्या व्यक्तीच्या हातातून निसटून गेलेले असतात.  आणि मग मनात सल राहते ती कायमचीच.  स्वतःची किंमत योग्य वेळी न कळाल्याने होणारा तोटा  कधी कधी आयुष्यभराच्या कमाईपेक्षा जास्त असतो Time is precious. Make sure you spend it with the right people.

स्वतःसाठी बदलताना भाग 9

इमेज
#स्वतःसाठी_बदलताना_भाग९ (गौरीहर्षल) प्रत्येकाची इतरांसोबत असणारी नाती, त्यातलं महत्व हे बदलत असते.  कधी कधी जे खूप जवळचे असतात ते एका रात्रीत अनोळखी होऊन जातात.  तर कधी ज्यांना आपण ओळखतही नसतो ते इतके आपले होतात की हे कसं घडलं असा प्रश्न पडतो.  ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपल्याला खूप त्रास होतो पण नीट विचार केला तर लक्षात येतं की आपल्या आयुष्यात आता असे लोक आहेत जे खरोखरच आपले आहेत.   अशा वेळी जास्त विचार न करता त्या आपल्या लोकांना त्यांच्या स्पेशल असण्याची जाणीव नक्की करून द्यावी.   "जाणारे जाणारच आहेत अन् येणारे येणारच आहेत." You are making way for somehting or someone even better. 𝐺𝑜𝑜𝑑 𝑝𝑒𝑜𝑝𝑙𝑒 𝑎𝑙𝑤𝑎𝑦𝑠 𝑒𝑛𝑑 𝑤𝑖𝑡ℎ 𝑔𝑜𝑜𝑑 𝑝𝑒𝑜𝑝𝑙𝑒.

स्वतःसाठी बदलताना भाग 8

इमेज
#स्वतःसाठी_बदलताना_भाग८ (गौरीहर्षल) भूतकाळ बऱ्याचदा कटू आठवणींनाच लवकर समोर आणतो.  मग त्या आठवणींचा इफेक्ट म्हणा किंवा अजून काही मनस्थिती बदलते.  तिचा परिणाम बाकी सगळ्या कामांवर , नात्यांवर होऊ लागतो.  कोण चुकीचं होतं, कोण बरोबर हे उगाळून हाती काहीच लागत नाही.  उलट स्वतःवर असणारा विश्वास डळमळू लागतो.अशा वेळी  आपण अवघड क्षणी घेतलेल्या निर्णयांवर ठाम राहण्याचा  प्रयत्न करावा.तेच निर्णय पुढे जाऊन आपण किती योग्य  होतो हे सिद्ध करून दाखवतात.  What happens yesterday is may not be your responsibility,but how you behave today is. You are not your circumstances, you are your choices.