स्वतःसाठी बदलताना भाग 19
स्वतःसाठी बदलताना भाग 19 आपल्यासोबत सगळं चांगलं व्हावं असं आपल्याला वाटत असतं. पण चांगलं होण्यासाठी प्रयत्न आपल्यालाच करावे लागतात. म्हणजे नेमकं काय करायचं? तर... ✓ स्वतः वर फोकस करण्याचा प्रयत्न करत राहायचं. ✓ नाही म्हणायला शिकायचं. ✓ नात्यांमध्ये मर्यादा निश्चित करायची मॉडर्न भाषेत हेल्दी बाऊंड्री सेट करायच्या. ✓ स्वतःसाठी उभं रहायचं. ✓ आपल्या भावना आणि विचार यामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी प्रयत्न करायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे , आपल्यासाठी सगळ्यात पहिली प्रायोरिटी आपण असायला हवं हे मान्य करायचं आणि ते फॉलो करण्यासाठी प्रयत्न करायचे. हे सगळं स्वतःहून जमत असेल तर उत्तम आहे पण नसेल जमत तर ? Stay connected... गौरी हर्षल कुलकर्णी, कौन्सेलर #स्वतःला_शोधताना #गौरीहर्षल