पोस्ट्स

सप्टेंबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Prisoner of your own thoughts 6/8

इमेज
Prisoner of your own thoughts   दत्तगुरु 👉🏼चाणक्य👉🏼 आणि मी चाणक्य लिहीत असताना हल्ली बऱ्याचदा माझ्या ज्ञानात भर पडत असते. आणि खरं तर ती पडायलाच हवी. कारण कधी काळी मित्रासमोर बसून रडत रडत केलेल्या तक्रारीवर चाणक्य हा उपाय आहे असं मला वाटत. मला नाही कळत रे तुझ्या जगाचे छक्के पंजे असं मी नेहमी म्हणायचे. हे ऐकून ऐकून कदाचित दत्त वैतागले असतील 🫣 आणि म्हणाले असतील घे बाई एका दगडात दोन पक्षी मारतो. तू बिझी पण राहशील आणि खरे छक्के पंजे कसे असतात हे पण कळेल. ते सुद्धा त्यामध्ये "द" असलेल्या माणसाच्या चरित्रातून🤷  खरा गुरू हा एका जागी बसवून शिकवत नाही हे मात्र खरं. तो आपल्या शिष्याला स्वतः प्रयत्न करण्यासाठी भाग पाडतो.  मग ते एखादं नवीन स्किल शिकणं असो किंवा स्वतःच्या मनातल्या भीतीवर मात करणं. जोपर्यंत शिष्य त्यातून योग्य तो धडा शिकत नाही तोपर्यंत सराव कम्पल्सरी...  सो गेल्या काही महिन्यात एक गोष्ट सातत्याने समोर आली ती म्हणजे, गुलामगिरी मग ती नात्यातली असुदे किंवा विचारांची... जोपर्यंत माणूस स्वतः त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत नाही तोपर्यंत त्याची सुटका होत नाही. नात्यातली

Shadows of yesterday 5/8

इमेज
Shadows of yesterday.... भूतकाळ ही काही अडकून पडण्याची गोष्ट नाही. पण आपल्यापैकी बरेच जण भूतकाळातच अडकलेले असतात. त्या ऐवजी त्या भूतकाळाला एक स्टेपिंग स्टोन म्हणून घेत पुढे जाण्याचा प्रयत्न करावा. भूतकाळात घडलेल्या गोष्टी कधीकधी आपल्याला त्रासदायक ठरत असतात. पण अशा घटनांना स्वीकारून त्या अनुभवातून योग्य तो धडा घेणे आणि स्वतःच्या व्यक्तीमत्त्वामध्ये त्या दिशेने बदल करणे हे खूप जास्त गरजेचे असते. हे असं करणं सोपं नक्कीच नसतं.  पण त्या आव्हानाला एकदा स्वीकारल्यानंतर आयुष्य जगण्याची खरी मजा कशात आहे हे मात्र माणसाला कळतं. मग अशा कितीही चुकीच्या घटना घडल्या संकटं आली तरी माणूस ठामपणे त्यांना सामोरे जातो. शिवाय भूतकाळ स्वीकारून त्यातून योग्य तो धडा शिकलेला व्यक्ती पुन्हा पुन्हा त्या घटना, त्या व्यक्ती समोर आल्या तरी कमकुवत होत नाही. शेवटी भूतकाळात रमून भविष्यकाळावर किती परिणाम करत राहायचं हे आपल्या हातात असतं.  माझ्या लेखांमध्ये बऱ्याचदा उल्लेख असतो की भूतकाळात घडून गेलेल्या घटना मधून आपण काय शिकलो ते आठवा. त्यावर मनन चिंतन करा. आणि त्या गोष्टींना मार्गातला अडथळा बनवण्यापेक्षा भविष्याच्या दि