पोस्ट्स

जुलै, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

माझ्या मना बन दगड...

इमेज
माझ्या मना बन दगड...  शीर्षक विचित्र आहे ना??? पण या ओळीत तथ्य मात्र आहे. समुपदेशन करत असताना किंवा वेगवेगळे वर्कशॉप घेत असताना बऱ्याच जणांकडून विचारला जातो की  - मॅडम समोरचा हेतूपुरस्सर आपल्याला त्रास देत असेल तेव्हा काय करायचं??  - किंवा एखादी व्यक्ती जी प्रचंड टॉक्सिक आहे पण आपण तिला टाळू शकत नाही कारण दुर्दैवाने ती आपल्या फार जवळच्या नात्यातील आहे. अशावेळी त्या व्यक्तीबरोबर वेळ घालवत असताना स्वतःच मानसिक स्वास्थ्य खराब होणार नाही याची काळजी कशी घ्यायची??  - दुर्लक्ष करणं हा उपाय उत्तम आहे. पण प्रत्येक वेळी दुर्लक्ष करताच येतं असं नाही.  - आणि कित्येकदा तर दुर्लक्षच करता येत नाही. इन्स्टंट रिस्पॉन्स जातो. मग हे नियंत्रण मिळवणं कसं शिकायचं??  तर आपल्या आजूबाजूला अशा काही व्यक्ती असतात ज्यांना आपण टाळू शकत नाही. आपल्याला त्यांच्याबरोबर राहणं भाग असतं. मग त्यांच्याबरोबर राहात असताना स्वतःचे रिस्पॉन्स किंवा प्रतिक्रिया कशा नियंत्रित करायच्या??  याच्यावर एक उपाय आहे... तोच जो वरती लिहिला आहे... हो तोच....... "माझ्या मनात बन दगड" .... अर्थात ही एक मेथड आहे जिला ग्रे रॉक मेथड ( g