पोस्ट्स

एप्रिल, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्वतःसाठी बदलताना लेख 18

इमेज
#स्वतःसाठी_बदलताना लेख 18  आपण काय शिकलो? (थॉट अँड बिहेवियर पॅटर्न ) लहानपणी आपल्या शाळेच्या पुस्तकांमध्ये धड्याच्या शेवटी सारांश असायचा.त्याला वरती नाव असायचं आपण काय शिकलो? आणि पूर्ण धड्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांची नोंदणी तिथे असायची.  समुपदेशन घेण्यासाठी येणाऱ्या लोकांच्या समस्येत खूपदा हा प्रश्न समोर येतो की "मॅडम सतत तेच तेच अनुभव का येतात?"  आणि जेंव्हा सरासरी सगळ्या केसेसचा विचार केला जातो तेंव्हा  त्यामध्ये लक्षात यावा इतका कॉमन पॉइंट हा असतो की बऱ्याच जणांनी आयुष्यात अक्षरशः भयंकर अशा पद्धतीची परिस्थिती अनुभवलेली असते. पण तरीही त्यातून जे शिकायचं असतं ते ते  शिकलेले नसतात त्यामुळे पुन्हा पुन्हा त्याच त्याच चुका केल्या जातात.   चुका कशा प्रकारच्या? तर पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी मिळवण्यासाठी प्रयत्न करायचं.  पुन्हा पुन्हा त्याच त्याच लोकांना आपल्या आयुष्यात महत्त्वाची जागा देत आपल्या आयुष्यातील निर्णयांमध्ये त्यांना सहभागी करून घ्यायचं.   हे सगळं पुन्हा पुन्हा घडत असल्यामुळे ज्या गोष्टी त्यांनी भूतकाळात अनुभवलेल्या असतात, ज्या संकटांचा सामना केलेला असतो, ते पुन्हा कु

वॉलपेपर, चालढकल आणि ती

इमेज
#वॉलपेपर_चालढकल_आणि_ती  आपल्या फोनचा वॉलपेपर आपण सगळे अगदी मनापासून निवडत असतो न? मीही ठेवते. माझा सापडेल तुम्हाला इमेजमध्ये.  त्या दिवशी मात्र गंमत झाली. रिक्षामधून येत असताना मी कामामुळे फोनवर होते. थोड्या वेळाने माझ्या शेजारी एक मुलगी येऊन बसली.कॉलेजकन्या होती.  माझा फोन सतत फ्लॅश होत असल्याने वॉलपेपर दिसत होता. तिचं एकदा लक्ष गेलं कदाचित नंतर मात्र ती प्रयत्न करून काय आहे हे वाचण्याचा प्रयत्न करू लागली. आणि शेवटी एकदाचं तिला ते जमलं. हुश्श... मग विजयी मुद्रेने माझ्याकडे बघितलं आणि अचानक म्हणाली,"हे मस्तच आहे, मला आवडलं." मी त्या प्रतिक्रियेने गोंधळून विचारलं की,"काय आवडलं वॉलपेपर?"होकारार्थी मान हलली. मग सुरू झाल्या गप्पा.  "ताई, हे अस सतत समोर राहणार म्हणून ठेवलं आहेस न? ", ती  "हो , त्यामुळे काम करताना आळस, चाल ढकल होऊ लागली की लगेच लक्षात येतं. आणि मन पुन्हा कामाकडे वळवता येतं. ", मी  "मी पण आता असच करेन. लवकरच माझ्या लास्ट सेमीस्टर चे पेपर आहेत. पण एकदा फोन हातात घेतला की नुसता टाईमपास होत राहतो. आता असा काही वॉलपेपर ठेवते की अभ्यास

स्वतःसाठी बदलताना लेख 17

इमेज
#स्वतःसाठी_बदलताना लेख 17 Planning and implementing हातात घेतलेली काम वेळेवर व्हावी तसं सगळ्यांनाच वाटतं पण ते होतं का? आपल्याकडून प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टीसाठी 100 टक्के प्रयत्न केले जातात का? की आपण कुठेतरी कमी पडतो? चालढकल होते का? प्रत्येक वेळी कोणीतरी बाहेरची व्यक्ती आपल्या मदतीसाठी तत्पर असणार आहे का? किंवा प्रत्येक वेळी त्या व्यक्तीकडे जाणं गरजेचं आहे का? आयुष्यात एक वेळा अशी कधीतरी नक्की येणार आहे, जेव्हा तुम्हाला स्वतःची मदत स्वतः करावी लागणार आहे . मग त्या वेळेची वाट बघत बसण्यापेक्षा आपण स्वतः आपल्या गोष्टींचे नियोजन करून स्वतः चे सगळ्यात जवळचे मित्र होण्याचा प्रयत्न केला तर??? यासाठी काय करायचं? काही वेगळं करायचं नाहीये तर आपल्याला आपल्या प्रत्येक महिन्याचं विशिष्ट पद्धतीने नियोजन करायच आहे. आणि त्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी सुद्धा आपणच स्वतःच्या मागे लागायच आहे. १. मागच्या महिन्याचा आढावा घ्या. मागच्या महिन्यात आपली किती काम पेंडिंग होती? त्यातली किती काम आपल्याकडून पूर्ण झाली? आणि किती काम पुन्हा करू किंवा नंतर करू म्हणून पुढे ढकलली गेली? जी काम पुढे ढकलली