मॉर्निंग मंत्रा १
#मॉर्निंग_मंत्रा १ १९ ऑक्टोबर २०२२ #थॉट्स_पॅटर्न (स्विकार आणि बदल) Acceptance म्हणजे स्विकारणं. आयुष्यात बऱ्याच गोष्टी आपण नाईलाजाने स्विकारतो. पण काही गोष्टी मात्र खरोखरच स्विकारण्याची गरज असते. जसं की, - स्वतःला आहे तसं स्विकारणं - आपल्यामध्ये असलेले दुर्गुण स्विकारणं - आपल्याला एखाद्या गोष्टीचा, व्यक्तीचा, घटनेचा त्रास होतो हे स्विकारणं. - आपणही चुकू शकतो, चुकलो आहोत, चुकतो आहोत हे स्विकारणे आपली बऱ्याच परिस्थितीत प्रतिक्रिया काय असते माहीत आहे? मला नाही करायचं हे, लोक काय म्हणतील? , मला जमणार आहे का असलं काही? म्हणजे थोडक्यात काय तर आपल्याला पलायन करायचे असते. पळायचे मग ती एखादी समस्या असो किंवा आलेली संधी. पण पळून प्रश्न सुटतात का? विचारा.... स्वतःला विचारा की बाबारे आत्तापर्यंत मी कितीतरी वेळा कितीतरी गोष्टींपासून, माणसांपासून , समस्यांपासून, संधींपासून पळालो आहे तर त्यामुळे माझे प्रश्न सुटले की अजून गुंतागुंतीचे झाले? जर उत्तर सुटले अस असेल तर तुम्हाला साष्टांग दंडवत🙏 ग्रेट आहात तुम्ही. पण जर गुंतागुंत वाढली असेल तर ती सोडवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले? की नेहमी