पोस्ट्स

एप्रिल, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जागतिक पुस्तक दिन 23 एप्रिल 2021

 Harry Potter हा माझ्यासाठी प्रचंड जिव्हाळ्याचा विषय❤️❤️❤️ ह्या पुस्तकांनी मला ते दिलं आहे, देत आहेत जे कुठूनही मिळालं नाही.  आयुष्यातल्या सगळ्या गाळलेल्या जागा ह्या पुस्तकांनी, त्यातील पात्रांनी भरून काढल्या.  एकटेपणा ही सुखद असू शकतो हे ह्या पुस्तकांनी शिकवलं.  स्वतःच  पुस्तक लिहिण्याची प्रेरणाही हेच.  मुख्य शिकलेली गोष्ट ही की इच्छाशक्ती आणि  स्वतःवर विश्वास असेल तर माणूस कुठल्याही परिस्थितीत तग धरुन राहू शकतो. आणि फक्त तग धरूनच नाही तर उत्तम पद्धतीने स्वतःला घडवू शकतो.  आयुष्यात कुणीही नसेल तरी आणि भरपूर जवळचे असतील तरी सर्वात जास्त प्रामाणिक दोस्त म्हणजे पुस्तकं❤️❤️त्यांचा हात कधीच सोडू नये.  आज माझ्याकडे जवळपास 100 + पुस्तकं आहेत. आणि  पुस्तक विकत घेणे ही एकमेव अशी गोष्ट आहे जी करताना मी दोनदा विचार करत नाही. 😊😊 माणसं अनुभव देतात पण पुस्तकं त्या अनुभवातून काय घ्यायचं ते शिकवतात. निसर्ग, प्राणी आणि पुस्तकं हे सगळ्यात उत्तम गुरू आहेत. न बोलता बरंच काही शिकवण्याची कला फक्त त्यांनाच अवगत आहे अस म्हटल तरी चालेल.  तर पुस्तकं वाचा,...